Pages

Monday, March 20, 2023

फळ व भाजीपाल्याचे कलमीकरण रोबोटच्या सहायाने

वनामकृवित दोन दिवसीय प्रशिक्षण व संशोधनास सुरूवात


ग्राफ्टिंग रोबोटच्या माध्यमातून कमी मनुष्यबळात, कमी वेळात जास्त प्रमाणात दर्जेदार रोप कलमांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. विद्यापीठाच्या वतीने ग्राफ्टिंग रोबोट वर संशोधन व प्रशिक्षण कार्य करण्यात येणार आहे, हे तंत्रज्ञान नर्सरी चालक, बागायतदार शेतकरी यांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत दोन दिवसीय ग्राफ्टिंग रोबोट वर दिनांक २० व २१ मार्च रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे करण्‍यात आले आहे, कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे, इंजि. डि. व्हि. पाटिल, डॉ गोदावरी पवार, डॉ डी डी टेकाळे आदींची उपस्थिती होती. यात जपानस्थित हेल्पर रोबोटेक कंपनीच्या तज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी नाहेप प्रकल्‍पांतर्गत खरेदी केलेल्‍या ग्राफ्टिंग रोबोटेचे उदघाटन माननीय कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आले, सदर रोबोटच्या माध्यमातून दिवसामध्ये तीन हजार रोपांचे कलमीकरण होते. सदर कार्यशाळेत ग्राफ्टिंग रोबोट वर केकेके जपान येथील संशोधक डॉ. ई. एस. शिवशंकर, श्री. मुरा कोशी आणि श्री. जुगो मिनोहरा मार्गदर्शन करून आठ हजार रोपांचे कलमीकरण करण्‍यात येणार आहे.