Pages

Sunday, May 14, 2023

वनामकृवित खरीप पिक परिसंवादाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य साधुन विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप पिक परिसंवादाचे आयोजन गुरूवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाजवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असुन उदघाटक तथा मुख्‍य अतिथी म्‍हणुन अमेरिकेतील कनेक्‍टीकट विद्यापीठाचे अधिष्‍ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे हे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास अहमदाबाद (गुजरात) येथील बन्‍सी गीर गोशाळेचे अध्‍यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध खरीप पीक लागवड, सोयाबीन, कापुस, ज्‍वारी, बाजरी, कडधान्‍य लागवड, भरड धान्‍याचे महत्‍व, किड – रोग व्‍यवस्‍थापन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाच्‍या कृषी विषयक विविध शंकाचे निरासरण करणार आहे. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती मासिकांचे विमोचन करण्‍यात येणार आहे तसेच विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीस सुरूवात होणार आहे. सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/@VNMKV  विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्‍यात येणार आहे. तरि परिसंवादाचा लाभ जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे यांनी केले आहे.