वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना, परभणी कृषि महाविद्यालय आणि पशुसंवर्धन विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक ५ ऑगस्ट रोजी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथे पशूंना लंपी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच विठ्ठल भिसे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब नरळदकर, रावेचे कार्यक्रम समन्वयक विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी.आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोहन पाटील यांनी फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन केले तर डॉ.बाळासाहेब नरळदकर यांनी लंपी चर्म रोग पासून संरक्षण बाबत माहिती दिली. डॉ. राजेश कदम यांनी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम बद्दल माहिती देऊन शेतकरी बांधवानी विद्यापीठ तंत्रज्ञान अवलंब करण्याचे आवाहन केले. डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम किटकावरील उझी माशीचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत तर डॉ. पी. आर. पाटील यांनीरोग प्रतिबंधक उपाय सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश पाटील यांनी केले. सुत्रसंचालन अंकिता जाधव तर उपसरपंच विठ्ठल भिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले संचालक शिक्षण आणि प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी कृषीकन्या आर.बी. हेळगे, के.जी.काकडे, इंगोले, ए.ए. कदम, गुंजाळ, जैस्वाल, ए.एस.कदम, व्हि.बी. कदम, एस.एम.कदम, कटके, खडसे,आर.आर.जाधव, पी.बी. जाधव, कालेवाड, ए.बी. जाधव यांनी परिश्रम घेतले.