वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालयाच्या वतीने भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औजित्य साधुन दिनांक १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने वाचनाची सवय जोपासली पाहिजे. वाचनामुळे व्यक्तींचे विचार प्रगल्भ होतात. भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र युवकांना प्रेरणादायी असुन प्रत्येकांनी त्याचे वाचन केले पाहिजे.
यावेळी शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ डब्ल्यु एच नारखेडे, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम, श्री मोहनकुमार झोरे, गोमटेश बुक एजन्सीचे श्री भुषण घोडके आदीसह ग्रंथलयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.