Pages

Friday, October 13, 2023

डॉ रामप्रसाद खंदारे यांची भारतीय मृद विज्ञान संस्‍थेच्‍या परिषदेवर निवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातंर्गत अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प दीर्घकालीन खत प्रयोगाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे यांची नवी दिल्ली स्थित भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या परिषदेवर सदस्‍य म्‍हणुन सन २०२४ व २०२५ या कालावधीसाठी निवडून आले आहेत. भारतीय मृद विज्ञान संस्था, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दि. ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या वार्षिक सभेत याची घोषणा करण्यात आली. सदर संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्य करत असून जमिनीची शाश्वतता आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचे महत्व व जागरुकता करण्याचे काम करते. तसेच राष्ट्रीय स्तरावर मृद विज्ञान शिक्षण व संशोधनामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने नेहमी कार्यरत असते. सदर संस्थेच्या परभणी शाखेच्या वतीने अनेक शैक्षणिक व संशोधनात्मक मृदा जागृती विषयक यामध्ये शालेय स्तरावर भित्तीपत्रक, चित्रकला, प्रश्न मंजुषा, निबंध इ. कार्यक्रम राबविल्या जातात. सदरील निवड हि जागतिक व देश पातळीवरील मृद संधारण, मृदा संवर्धन, समस्या यावर नवीनतम संशोधक निर्मिती, शिक्षणातील गुणवत्ता, मृदा आरोग्य जाणिव व वृद्धी यावर विचारमंथनाने नव संशोधकांना प्रोत्साहीत करणे, या उद्देशाने परिसंवादाच्या आयोजनात भाग घेऊन महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठात मृदा संशोधकांना प्रोत्साहीत करण्यासाठी झाली आहे.

डॉ. रामप्रसाद खंदारे यांची राष्ट्रीय स्तरावरील कार्य करणा­या संस्थेमध्ये निवड झाल्या बद्दल विद्यापीठाचे कुलगुरु मा प्रा. डॉ. इंद्र मणि, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. विलास टाकणखार, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. प्रभाकर आडसुळ, डॉ. महेश वाघमारे, डॉ. अजित पुरी, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड व डॉ. स्नेहल शिलेवंत यांनी अभिनंदन केले. भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या परभणी शाखेच्या पदाधिकारी आणि मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.