Pages

Tuesday, October 31, 2023

अद्ययावत फिरते बियाणे प्रक्रिया यंत्राचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अद्ययावत फिरते बियाणे प्रक्रिया यंत्राचे उदघाटन दिनांक २९ ऑक्‍टोबर रोजी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी जबलपूर येथील तणविज्ञान संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. जे. एस.  मिश्रा, रायपुर येथील राष्ट्रीय जैविक तनाव प्रबंधन संस्थेचे हसंचालक डॉ. अनिल दीक्षित, आणि आयएआरआयचे वनस्पती शरीर विज्ञानाचे विभागप्रमुख डॉ. रेणू पांडे, एलमाझ रशियाचे सीईओ श्री अलेक्‍साई लायस्‍कोह, डॅनियल ओगोरोडोव, अग्रोनेस्‍ट प्रा. लि. चे श्री सचिन गुणाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, सदर यंत्राच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या बियाणाची प्रतवारी कमी वेळेत शेतावरच करणे आता शक्य होते. सदर यंत्र शेतकरी उत्पादक कंपन्‍याकरिता अत्‍यंत उपयुक्‍त आहे. सदर यंत्राव्‍दारे अती जलद गतीने बियाणे स्‍वच्‍छ करून प्रतवारी करणे शक्‍य असुन याची क्षमता प्रती तास ४ टन आहे. हे यंत्र पूर्णपणे वायुगतिकीय तत्वावर चालते व यासाठी केवळ एचपी विदुतप्रवाहाची आवश्यकता आहे.

सदर यंत्र रशियन तंत्राज्ञानावर आधारित असुन माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनानुसार राज्‍यातील शेतकरी बांधवाच्‍या गरजेनुसार सदर यंत्रात बदल करण्‍यात आला आहे. हे यंत्र ट्रक्‍टरच्‍या सहाय्याने एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी नेता येते.  

सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. एस पी मेहत्रे, प्रभारी अधिकारी (बियाणे प्रक्रिया) डॉ एस बी घुगे, डॉ हिराकांत काळपांडे,  प्रगतशील शेतकरी श्री पंडीत थोरात, श्री जर्नाधन आवरगंड, श्री साबळे आदी उपस्थित होते. माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर यंत्र खरेदीकरिता नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार यांनी प्रयत्‍न केले.  कार्यक्रम यशस्वतीसाठी नाहेप संशोधकांनी परिश्रम घेतले.