Pages

Sunday, October 29, 2023

बदलत्या हवामानानुसार तण व्यवस्थापन यावरील दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) अंतर्गत बदलत्या हवामानानुसार अद्ययावत पध्‍दतीने तण व्यवस्थापन यावरील दिनांक २८ व २९ ऑक्‍टोबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २८ ऑक्टोबर रोजी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे जबलपूर येथील तणविज्ञान संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. जे. एस मिश्रा, रायपुर येथील पीक आरोग्य संशोधन केंद्र - राष्ट्रीय जैविक तनाव प्रबंधन संस्थेचेहसंचालक डॉ. अनिल दीक्षित, आणि आयएआरआयचे वनस्पती शरीर विज्ञानाचे विभागप्रमुख डॉ. रेणू पांडे, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, एलमाझ रशियाचे सीईओ श्री अलेक्‍साई लायस्‍कोह, डॅनियल ओगोरोडोव आदींची  उपस्थिती होती. 

कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतीत वाढता मजुरीचा खर्च पाहता, शेतकरी बांधवांचा तण व्‍यवस्‍थापनावर मोठया प्रमाणात खर्च होतो. रासायनिक तणनाशकांचा खर्चही दिवसेदिवस वाढत आहे. कृषि संशोधकांनी कमी खर्चीक तण व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान विकासित करावे. देशात-विदेशात उपलब्‍ध तंत्रज्ञानाचा अभ्‍यास करावा.  

डॉ. जे. एस. मिश्रा यांनी बदलत्या हवामानात नुसार अद्ययावत पद्दतीने तण व्यवस्थापनाकरिता कृषि मधील विविध विभागातील तज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काम करण्याचे आणि पिकांसाठी आर्थिक आणि पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित तण व्यवस्थापनासाठी अधिकाधिक पर्याय शोधण्याचे आवाहन केले.

दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात देशातील नामांकित तण व्‍यवस्‍थापनातील तज्ञ डॉ. अनिल दीक्षित, डॉ. रेणू पांडे, डॉ डि के दास, डॉ सिमरजीत कौर, डॉ कुशवाह यांनी मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षणासाठी ६० प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर, आचार्यविद्यार्थी आदींनी सहभागी नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्राचार्य डॉ. भगवान आसेवर यांनी केले. नाहेप मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ.वीणा भालेराव यांनी केले तसेच आभार डॉ. अनिल गोरे यांनी केले.

कार्यक्रमास कुलसचिव श्री पी के काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रविण निर्वळ, डॉ. सुनीता पवार, इंजी.एस एन पवार, डॉ.दयानंद टेकाळे आदींची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता नाहेप प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.