Pages

Wednesday, February 7, 2024

वनामकृवितील रेशीम संशोधन योजना येथे प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

रेशीम तंत्रज्ञान अॅपचे उदघाटन 





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना, परभणी आत्मा (कृषि विभाग), आणि जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुक्‍त विद्यमाने प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक. ६ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्‍यात आले होते.  उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे होते, उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी मा. श्री रघुनाथ गावडे हे उपस्थित होते. 

उपजिल्हाधिकारी सौ. संगीता चव्हाण, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, प्रकल्प संचालक आत्मा श्री. दौलत चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. किशोरसिंह परदेशी, विभाग प्रमुख (किटकशास्त्र) डॉ. पी.एस.नेहरकर, एस.बी.आय. परभणी चे श्री. सुनिल हट्टेकर, केंद्रिय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव, तालुका कृषि अधिकारी (पाथरी) श्री. गोविंद कोल्हे,  रेशीम संशोधन योजनेचे डॉ. चंद्रकांत लटपटे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे श्री. गोविंद कदम, डॉ. शिवाजी म्हेत्रे, डॉ.डब्लू.एन. नारखेडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. आनंद दौडे, डॉ. हरिष आवारी आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानामुळे पीक उत्‍पादनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. केवळ पीक लागवडीवर अवलंबुन न राहता, इतर पर्यायी शेती पुरक उद्योग करणे गरजेचे आहे. यात रेशीम उद्योगातुन शेतकरी बांधवाचा शाश्‍वत उत्‍पादन मिळु शकते. मराठवाडयात रेशीम उद्योग विस्‍ताराकरिता विद्यापीठात स्‍वतंत्र रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी मा. श्री.रघुनाथ गावडे यांनी रोजगार निर्मीतीसाठी गटामधुन रेशीम उद्योग करण्‍याचा सल्‍ला देऊन परभणी जिल्हयात मोठा उद्योग उपलब्ध नसल्याने मुख्य उद्योग म्हणून रेशीम उद्योगात शेतक­यांचा विकास होईल असे मत व्यक्त केले, त्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वस्त केले.

उपजिल्हाधिकारी सौ. संगीता चव्हाण यांनी रेशीम किटक संगोपन हे पुरूषापेक्ष महिला चांगल्या रितीने करू शकतात व खेडयामध्ये रोजगार उपलब्ध होवू शकतो असे मत व्यक्त केले. तर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी तुतीच्या फळापासून प्रक्रिया उद्योग उभारून आर्थीक बाजू भक्कम करता येइल असे मत व्यक्त केले. प्रकल्प संचालक आत्मा श्री. दौलत चव्हाण यांनी रेशीम संशोधन योजना व आत्मा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने परभणी जिल्हयातील सात तालुक्यात रेशीम उद्योग प्रशिक्षण घेण्यात आले, त्यामुळे रेशीम उद्योग वाढीसाठी जिल्हयात त्याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले. श्री. गोविंद कदम यांनी रेशीम शेती संबधीत विविध शासकिय योजना याबाबत मार्गदर्शन केले. तर श्री. सुनिल हट्टेकर यांनी पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती दिली. डॉ. सी. बी. लटपटे म्‍हणाले की, मागील आठ वर्षापासुन रेशीम उद्योग वाढीचे प्रयत्न करीत असतांना मराठवाडयातील आठ जिल्हयात राष्ट्रिय कृषि विकास योजने अंतर्गत रेशीम उद्योग प्रशिक्षण घेण्यात आले.

कार्यक्रमामध्ये रेशीम संशोधन योजनाचे मराठी भाषेत विकसित केलेले तुती रेशीम उद्योग तंत्रज्ञान अॅपचे उदघाटन कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक १० फेब्रुवारी नंतर सदरील अॅप गुगल प्ले स्टोअर मधून ऑनराईड मोबाईल वर डाऊनलोड करून रेशीम शेती विषयी माहिती घेता येइल. सदर अॅपमध्ये तुती लागवड तंत्रज्ञान बाल्य व प्रौढ रेशीम किटक संगोपन, संगोपनगृह निर्जतुकिकरण, तुती व रेशीम अळी वरील किड व रोग व्यवस्थापन या बाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त रेशीम उद्योग शेतक­यांनी लाभ घ्यावा, असे योजनेचे प्रभारी अधिकारी, डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. संजोग बोकन यांनी केले तर आभार डॉ.पी.एस. नेहरकर यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील १३० शेतकरी व विद्यार्थीनी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. धनंजय मोहोड, श्री. दत्ता जटाळे, श्री. हरिश्चंद्र ढगे, श्री. बापुराव मुलगीर व जिल्हा रेशीम कार्यालयातील सर्व कर्मचा­यांनी परिश्रम घेतले.