Pages

Friday, August 2, 2024

पर्यावरण संवर्धनासाठी वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम


 पर्यावरण संवर्धनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सर्व कार्यालयाना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी एक लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असून यावर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच परभणीचे मा. जिल्हाधिकारी, यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठात एक विद्यार्थी-एक वृक्षउपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे वृक्ष लागवड करण्यात आली. सदर वृक्ष लागवडीसाठी बदाम, कडूलिंब, बांबू शेवगा, आंबा, मोह्गणी, जांभूळ, मोहा, बेहेडा, सागवान, चिंच इ. झाडांची रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत पुरविण्यात येत आहेत. या वेळी मार्गदर्शन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ.जया बंगाळे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ वृक्ष लागवड न करता त्याचे योग्य रितीने संगोपन करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन डॉ.विद्यानंद मनवर, रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. जयश्री रोडगे, डॉ.सुनिता काळे, डॉ.विजया पवार, डॉ.वीणा भालेराव, प्रा. प्रियांका स्वामी, प्रा.मानसी बभूळगावकर, प्रा.स्वाती गायकवाड, प्रा.आश्विनी बेद्रे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मोठ्या संख्येने  विद्यार्थ्यांनी  या उपक्रमात उत्साहाने पर्यावरण संवर्धनाबाबत घोषणा देत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  रमेश शिंदे, शेख गौस, राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.