Pages

Tuesday, July 1, 2025

वनामकृविच्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत कृषि दिन साजरा

 

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी वि‌द्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महावि‌द्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दि. १ जुलै रोजी कृषिदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य व प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रमुख समन्वयिका डॉ. जया बंगाळे यांनी ब्रिज सेक्शनच्या सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. "झाडे लावू झाडे जगवू, परिसर आपला सुंदर ठेवू असे घोषवाक्य म्हणत झाडांचे महत्त्व पटवून दिले

यावेळी विभागातील डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव तसेच शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.