महाराष्ट्राचे माजी
मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या
जयंतीनिमित्त राज्यभर 'कृषि दिन' साजरा करण्यात येतो. या निमित्ताने
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाच्या प्रक्षेत्र
परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात नारळ, जांभूळ,
चिकू आदी फळझाडांची लागवड विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि सहयोगी
अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांच्या शुभहस्ते करण्यात आली. हा उपक्रम मृद विज्ञान
विभागाचे विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
कार्यक्रमात हवामान
शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख श्री. एम. जी. जाधव, कीटकशास्त्र विभागाचे
प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, मृद विज्ञान विभागाचे प्राध्यापक
डॉ. सुरेश वाईकर, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. शिलेवांत तसेच विभागातील
पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
या उपक्रमाच्या
माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता
निर्माण करणे,
हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी वृक्षारोपणाचे
महत्त्व अधोरेखित केले आणि पुढील काळातही असे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त
केला.
.jpeg)