Pages

Tuesday, July 1, 2025

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून टाकळगव्हाण येथे वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या  'ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम' अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मौजे टाकळगव्हाण (ता. जि. परभणी) येथे हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जुलै रोजी वृक्षारोपण व कृषी विषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी टाकळगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात जांभुळ, सीताफळ, आंबा, कडुलिंब, चिकू, वड इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. यासोबतच गाव परिसरात कृषिकन्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रभारी अधिकारी मा. डॉ. व्ही. एस. खंदारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालबंडी, विशेषतज्ञ डॉ. एस. व्ही. चिकसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. एस. देशमुख व डॉ. ए. व्ही. सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला टाकळगव्हाणचे सरपंच श्री मंचकराव वाघ,  जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा उमरीकर तसेच शिक्षक वृंद यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिकन्या प्राची, वैष्णवी, सरस्वती, किरण, रेखा, मोहिनी, मेहजबीन, रंजिता, शिल्पी, मयुरी तसेच कृषिदूत साईराज, राजरत्न, रितेश, अंकित, लाधेन्द्र, शुभम, अजिंक्य, मनोहर, राजेश, प्रथमेश, अर्जुन यांनी परिश्रम घेतले. या माध्यमातून शेतकरी बांधवांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणातील शैक्षणिक अपरिचित गोष्टींची माहिती देण्यात आली.