वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी
(नांदेड-१) यांच्या समन्वयातून शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद मालिकेचा ६६
वा भाग “पूरस्थितीनंतर पिके व पशुधनाची घ्यावयाची काळजी व
उपाययोजना” या विषयावर दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ रोजी यशस्वीपणे
पार पडला.
प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) चे वरिष्ठ
शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख (उद्यानविद्या तज्ञ) यांनी केले. या
संवादामध्ये विविध विषयांवर मान्यवर शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यापीठाचे डॉ. प्रशांत देशमुख (मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी) आणि डॉ. कैलास
डाखोरे (हवामान शास्त्रज्ञ) यांनी आगामी हवामान स्थिती व त्यानुसार पीक
नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी
अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या कीड व रोग व्यवस्थापनासाठी उपयुक्त उपाय सुचविले. डॉ.
महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) यांनी पूरग्रस्त जनावरांच्या आरोग्य व पोषण
व्यवस्थापनाविषयी, प्रा. संदीप जायेभाये (कृषिविद्या तज्ञ) यांनी पूरानंतर
मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन आणि रब्बी हंगाम नियोजन यावर मार्गदर्शन केले तर डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी
शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तसेच
सौ. अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी ग्रामीण महिलांच्या सहभागाद्वारे घरगुती
स्तरावर पूरनंतरचे व्यवस्थापन कसे करता येईल, यावर विशेष भर
दिला.
या ऑनलाईन संवादामध्ये एकूण ६५ शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
शेतकऱ्यांनी संवादादरम्यान विविध प्रश्न उपस्थित करून शास्त्रज्ञांकडून तात्काळ
सल्ला मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय यांनी
केले.