Pages

Thursday, March 28, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठात देशातील नामांकित कृषि शास्‍त्रज्ञांचे व्‍याख्‍यान



मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महावि़द्यालयाच्‍यावतीने कृषि संशोधनातील व व्‍यावसायीक संधी आणि व्‍यक्‍तीमत्‍व विकास यावर दोन दिवशीय कार्यशाळाचे  उदघाटन करण्‍यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणुन शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्‍मु) चे माजी कुलगूरू तथा कृषी विज्ञान राष्ट्रीय अकॅडमीचे सचिव  मा डॉ अन्‍वर आलम, स्‍वामी विवेकानंद तंत्रज्ञान विद्यापीठ (भिलाई) चे कुलगूरू डॉ बी सी मल, भारतीय कृषि अनूसंधान परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील एस्‍कॉर्ड लिमीटेडचे सल्‍लागार मा डॉ एस के टंडन, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ शंकरराव मगर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ व्‍ही एम मायंदे, नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर पी सिंग, महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण विभागाचे अव्‍वर सचिव अभियंता मा व्हि बी नाथ हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे होते तसेच शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळेविस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्‍या भाषणात प्रमुख पाहुणे मा डॉ अन्‍वर आलम म्‍हणाले कि, यशासाठी कोणताही शार्टकट नसतो हि एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपले विचार स्‍पष्‍टपणे मांडता येणे व्‍यक्‍तीमत्‍वाचा महत्‍वाचा पैलु असुन त्‍याचा विकास विद्यार्थ्‍यानी करावा. अध्‍यात्‍म हा व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी उपयुक्‍त असे साधन आहे. विद्यापीठाचे सिंचनस्‍त्रोत विकास प्रकल्‍प हा एक मोठा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प असुन विद्यार्थ्‍यानी याचा अभ्‍यास करावा. तर अध्‍यक्षयीय भाषणात मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले कि, वाढलेली मजुरी व मजुरांची कमतरता हि आजच्‍या शेती समोरील मोठया समस्‍या असुन शेतीचे यांत्रिकीकरण करणे गरजेचे आहे, त्‍यामुळे कृषि अभियांत्‍याना मोठा वाव आहे. पिकांच्‍या लागवडीपासुन ते काढणीपर्यंत कृषि अभियांते महत्‍वची भूमिका बचावु शकतात. तसेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, माती व जल संवर्धन, मुल्‍यवर्धीत तंत्रज्ञान आदी क्षेत्रात कृषि अभियांत्‍यानी अधिक संशोधन करावे. देशाला आज कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील कुशल मनुष्‍यबळाची अत्‍यंत निकड आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. कुलगूरू डॉ बी सी मल म्‍हणाले की, जगातील नामवंत शास्‍त्रज्ञानी त्‍यांच्‍या इच्छाशक्‍तीच्‍या बळावर अनेक संशोधने केली, त्‍याच्‍या जीवनात अशक्‍य हा शब्‍द नव्‍हता. मा डॉ एस के टंडन यांनी कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्‍याना उपलब्‍ध संधीची सविस्‍तर माहिती दिली. माजी कुलगूरू डॉ शंकरराव मगर म्‍हणाले की, उपजत व सकारात्‍मक विचार, एकाग्रता, इच्‍छाशक्‍ती आदी बाबींमुळे व्‍यक्‍तीमत्‍वाचा विकास होतो.  माजी कुलगूरू मा डॉ व्‍ही एम मायंदे म्‍हणाले की, जग आज अधिक स्‍पर्धात्‍मक होत असुन विद्यार्थ्‍याना आपल्‍या चांगल्‍या गुणांची व कमतरतांची जाणीव असायला पाहिजे. मा डॉ आर पी सिंग यांनी कृषि क्षेत्रातील शास्‍त्रज्ञ डॉ नॉर्मल बोरलॉग, डॉ एम एस स्‍वामीनाथन यांचा आर्दश विद्यार्थ्‍यांनी डोळयासमोर ठेवावा असा सल्‍ला दिला. अभियंता मा व्हि बी नाथ म्‍हणाले की, विद्यापीठाने विद्यापीठ प्रक्षेत्राचा पाणलोट विकास व विद्यार्थ्‍यांचा व्‍यक्‍तीमत्‍व विकास या दोन्‍हीवर भर दिला आहे.
या कार्यक्रमाच्‍या कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी कार्यशाळेबाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्मिता खोडके यांनी तर आभार प्रदर्शन डॉ गोपाल शिंदे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.  

मान्यवरांनी साजरा केला चिमुकल्यांचा पदवीदान सभारंभ



    मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृह विज्ञान महाविद्यालायाच्‍या  एल पी पी स्कूलच्‍या विद्यार्थीचा अभिनव असा चौथा पदवीदान सभारंभ मान्यवरांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणुन शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्‍मु) चे  माजी कुलगूरू तथा कृषी विज्ञान राष्ट्रीय अकॅडमीचे सचिव मा डॉ अन्‍वर आलम, स्‍वामी विवेकानंद तंत्रज्ञान विद्यापीठ (भिलाई) चे कुलगूरू डॉ बी सी मल, भारतीय कृषि अनूसंधान परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील एस्‍कॉर्ड लिमीटेडचे सल्‍लागार मा डॉ एस के टंडन, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ शंकरराव मगर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ व्‍ही एम मायंदे, नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर पी सिंग, महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण विभागाचे अव्‍वर सचिव अभियंता मा व्हि बी नाथ हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे होते तसेच शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळेविस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
    आपल्‍या भाषणात माजी कुलगूरू मा डॉ अन्‍वर आलम म्‍हणाले कि, हा चिमुकल्‍यांचा पदवीदान संमारभ आमच्‍यासाठी अभिनव असा अनुभव आहे, यामुळे लहान मुलांना निश्चितच प्रेरणा मिळते. मा डॉ एस के टंडन म्‍हणाले कि, मुलांना आपण जसे घडवतो तसे ते घडतात, पालकांनी आपले निर्णय त्‍याच्‍यावर लादु नयेत. तर अध्‍यक्षयीय भाषणात मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले कि, हि मुले देशाची संपत्‍ती आहे विद्यापीठातील एल पी पी स्कूलचा हा उपक्रम स्तूत्य असा उपक्रम आहे. या सभारंभात एल पी पी स्कूलच्‍या 5-6 वर्ष वयोगटातील ब्रीज सेकशनच्‍या 32 विद्यार्थीना पुर्व प्राथमिक शिक्षण यशस्‍वीरीत्‍या पुर्ण केल्‍याबददल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात प्रा विशाला पट्टनम यांनी एल पी पी स्कूलबाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जया बंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ विना भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संध्‍या चौधरी सह इतर वर्ग शिक्षीकांनी परिश्रम घेतले. यावेळी बालकाच्‍या उच्‍चत्‍तम विकासासाठी हसत खेळत शिक्षण या सी डी चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीचे पालक, विद्यापीठातील प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Tuesday, March 26, 2013

मराठवाडा कृषी विद्यापीठात देशातील नामवंत कृषी शास्त्रज्ञांचे व्याख्यान


कृषि क्षेत्रातील विद्यार्थी शेती विकासात कार्य करण्‍यासाठी सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक परिस्थितीत सक्षम होण्‍यासाठी व जागतिकीकरणाला तोंड देण्यास सज्‍ज व्‍हावा यासाठी देशातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामां‍कीत कृषितज्ञांचे विद्यापीठीतील विद्यार्थ्‍याना कृषिक्षेत्रातील प्राधान्‍यक्रम विषयावर तां‍‍त्रीक माहीती व व्‍यक्‍तीमत्‍व विकास यावर मार्गदर्शनासाठी व्‍याख्‍यानाचे मराठवाडा कृषि विद्यापीठात दि 28 मार्च रोजी दुपारी 2.00 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्‍मु) चे माजी कुलगूरू मा डॉ अन्‍वर आलम, स्‍वामी विवेकानंद तंत्रज्ञान विद्यापीठ (भिलाई) चे माजी कुलगूरू डॉ बी सी मल, भारतीय कृषि अनूसंधान परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील एस्‍कॉर्ड लिमीटेडचे सल्‍लागार मा डॉ एस के टंडन, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ शंकरराव मगर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ व्‍ही एम मायंदे, नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर पी सिंग, महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण विभागाचे अव्‍वर सचिव अभियंता मा व्हि बी नाथ हे मार्गदर्शक म्‍हणुन लाभणार आहेत. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे राहणार असुन संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण प्रमुख उपस्थित राहणार आहे. तसेच दि 29 मार्च रोजी कृषि यांत्रिकीकरण, कृषि अभियांत्रिकीकरणाची शेती विकासातील महत्‍व, कृषि प्रक्रिया उद्योग, मृद व जल संधारण, पाण्‍याचा काटकसरीने वापरासाठी आधुनिक सिंचन पध्‍दती, अपारंपारिक उर्जेचा वापर, कृषि क्षेत्रात संगणकाचा वापर या कृषितील प्राधान्‍यक्रम विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमामुळे कृषीच्या विद्यार्थीच्या विचारला एक विशिष्ट अशी दिशा प्राप्त व्हावी व त्यांच्यातील व्‍यक्‍तीमत्‍व विकासास चालना मिळावी या उद्देशाने हा अभिनव असा आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामां‍कीत कृषितज्ञांच्या याख्‍यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, शास्त्रज्ञा, प्राध्यापक व कर्मचारी वर्गानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.  


Saturday, March 23, 2013

रक्‍तदान शिबीरानिमित्‍त मकृवीच्‍या रासेयोस सन्‍़मानचिन्‍़ह





मराठवाडा कृषि‍ विद्यापीठांतर्गत राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या विशेष शिबीरांतर्गत रक्‍तदान शिबीराचे आयोजन दि.21 मार्च रोजी करण्‍यात आले होते. या शिबीरात रक्‍तदानाचे महत्‍व, त्‍यातील घटक व त्‍यांचा उपयोग याबद्दल सविस्‍तर मार्गदर्शन शहरातील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्‍ट डॉ. हेमंत गुलवाडी यांनी केले तर रक्‍त घेण्‍याचे निकष व विविध रक्‍त चाचण्‍यांबद्दलची माहीती जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयातील रक्‍तपेढीचे डॉ. मोबीन व श्री सि‍द्धीकी यांनी दिली. सदरील शिबीरात एकुण 73 स्‍वंयसेवक व स्‍वंयसेविका यांनी रक्‍तदान केले. या उल्‍लेखनिय कार्याबद्दल मकृवितील राष्‍ट्रीय सेवा योजनेस जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय रक्‍तपेढी तर्फे सन्‍मानचिन्‍ह देण्‍यात आले. सदरील शिबीर यशस्वितेकरीता रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिस कांबळे,  प्रा. रविंद्र शिंदे, प्रा. भारत आगरकर, प्रा. विजय जाधव, प्रा. एस. पी. सोळंके व स्‍वंयसेवक रमाकांत कारेगावकर, धनराज जाधव, रत्‍नदिप कांबळे, आश्रोबा हाके, अनंता हांडे, कु रुबी कुमारी, कु मामीडवार, दिनेश जगताप, ज्ञानेश्‍वर कदम व कृष्‍णा माने यांनी अथक प्रयत्‍न केले.

Friday, March 22, 2013

गृहविज्ञान महाविद्यालयातील एल एल पी स्‍कुल मध्‍ये जा‍गतिक जल दिन साजरा




दिवसेंदिवस तीव्र होत असलेल्‍या दुष्‍काळाचा सामाना करण्‍यासाठी उपलब्‍ध पाणीचा काटकसरीने वापर करणे हि आज काळाजी गरज आहे असे प्रतिपादन मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांनी गृहविज्ञान महाविद्यालयातील एल एल पी स्‍कुल मध्‍ये जा‍गतिक जल दिना निमित्‍त आयोजीत कार्यशाळेत केले. ते पुढे म्‍हणाले की, पृथ्‍वीचा 70 टक्‍के भाग जलमय आहे, यापैकी केवळ 2 टक्‍के पाणी मानवास वापरण्‍या योग्‍य आहे तसेच प्रत्‍येक व्‍यक्‍तीला दररोज 35-40 लिटर पाणी आवश्‍यक असल्‍याने या अमुल्‍य संसाधनाचा अतिशय कादकसरीने वापर करणे प्रत्‍येक नागरीकाचे आद्य कर्तृव्‍य आहे. प्रत्‍येकाने दैनदिन जीवनात पाण्‍याची योग्‍य वापर करणे, पावसाच्‍या पाण्‍याचे पुर्नभरण करून ते पाणी पुनश्‍च वापरात आणणे व आवश्‍यक तेवढेच पाणी घेउन त्‍याचा अपव्‍यय टाळणे आवश्‍यक आहे असे त्‍यांनी विशेष केले. याप्रसंगी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांचा जल संवर्धन व व्‍यवस्‍थापन विषयक प्रसंशनीय संशोधन व विस्‍तार कार्यबाबत 'उत्‍कृष्‍ट जल संवर्धक' या पुरस्‍काराने गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांनी गौरव केला.
     याप्रसंगी एल एल पी स्‍कुल मधील विद्यार्थ्‍यीनी त्‍यांच्‍या वकृत्‍व कलेतुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रूद्राक्ष, शताक्षी, सिध्‍दी, कुणाल, विष्‍णू, जान्‍ही, हार्दिक, तन्‍वी या विद्यार्थ्‍यीना मा कुलगूरू यांनी प्रशस्‍तीपत्र देउन गौरविण्‍यात आले. 
     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ जया बंगाळे यांनी तर डॉ विणा भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा रम्‍मण्‍णा देसेटी, प्रा निता गायकवाड, पार्वती शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सर्व शिक्षिका व कर्मचा-यानी परिश्रम केले. 


Thursday, March 21, 2013

रासेयोच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण भागात जाऊन दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावते ….मा डॉ किशनराव गोरे

पाणी व मातीचे संवर्धन करणे या दोन्‍ही गोष्‍टी एकमेकांना पुरक असुन पावसाचे पाणी आडवून जमीनीची होणारी धुप थांबिवणे अत्‍यंत आवश्‍यक आहे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठचे मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांनी दि 20 मार्च 2013 रोजी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या विशेष शिबिरामध्ये शेततळ्याचे अस्‍तरीकरण व भूजल संवर्धन या कार्यक्रमाच्‍या प्रसंगी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांना उद्देशून केले. स्‍वयंसेवकांनी ग्रामीण भागात जावुन दुष्काळ निवारणासाठी प्रयत्‍न करावेत आणि विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्‍यांनी केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. व्ही  एस शिंदे यांनी आपल्‍या मार्गदर्शनपर भाषणात स्‍वयंसेवकांनी कृषीदुत बनुन शेतक-यांना मदत करावी असा सल्‍ला दिला. शेततळ्याचे अस्‍तरीकरण विद्यापीठातील परीसरातील प्रात्‍यक्षीक प्रक्षेत्रावर प्राध्‍यापक भास्‍करराव भुईभार, प्रा. चौलवार व प्रक्षेत्र प्रभारी प्रा. नारखेडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालयाच्या स्‍वयंसेवकांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सर्व महाविद्यालयचे कार्यक्रम अधिकारी  प्रा. ए. एम. कांबळे, प्रा. आर. व्‍ही. शिंदे, प्रा.बी .एस. आगरकर, प्रा. सोळंके, प्रा. िह. बी. जाधव व विविध महाविद्यालयाच्‍या स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले तसेच दिनेश जगताप, ज्ञानेश्‍वर कदम, कैलास बेदरे, रमाकांत कारेगांवकर, पंकज खंदारे, राहु शेळके आदी विद्यार्थ्‍यांनी परीश्रम घेतले.

Wednesday, March 20, 2013

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला विद्यापीठ सरसावले


राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी बांधव अत्यंत  अडचणीत सापडला आहे. राज्यातील शेतकरी मुख्य  केंद्रबिंदू मानून मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली असल्यामुळे विद्यापीठ शेतकऱ्याच्या प्रती असलेल्या बांधिलकीची जाण  ठेऊन राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या मदतकार्यात खारीचा वाटा म्हणून मराठवाडा कृषि विद्यापीठातील सर्व संवर्गातील कर्मचारी, प्राध्‍यापक ते चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्‍यावतीने मुख्यमंत्री साहयनिधी  त्यांच्या  वेतनातून जमा झालेल्या रु १५ लाख रक्कमेचा धनाकर्ष दि १९ मार्च २०१३  रोजी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांनी राज्याचे कृषीमंत्री मा ना  श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत  मुख्यमंत्री मा ना श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांना सुपूर्द  केला.                    

   सध्याच्या दुष्काळ परिस्थितीशी लढा देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीत दीर्घकालीन व तात्पुरते उपाययोजनेबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ मेळावा मार्फत मार्गदर्शन करीत आहेत. गेल्या दोन महिन्या पासून मोसंबीबागा वाचविण्यासाठी विद्यापीठ मोठी मोहीम राबवीत असून अनेक गावात शेतकरी मेळावे व चर्चासत्र घेण्यात आली आले आहेत. सर्व विद्यापीठ शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते, कर्मचारी व विध्यार्थानी या परिस्थितीत विध्यापीठचे अनुकूल तंत्रज्ञान शेतकऱ्यान पर्यंत पोहचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन मा कुलगुरू यांनी केले. 

Saturday, March 16, 2013

दुष्‍काळग्रस्‍त भागास मदतीसाठी एक दिवसाचे वेतन

मराठावाडयासह महाराष्‍ट्रातील दुष्‍काळग्रस्‍त भागास आपली मदत व्‍हावी, या उददेशाने मराठवाडा कृषि विद्यापीठातील सर्व संवर्गातील कर्मचारी, प्राध्‍यापक ते चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्‍या वतीने एक दिवसाचे वेतन मुख्‍यमंत्री आर्थिक सहायता निधी देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. दिनांक 13 मार्च 2013 रोजी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडलेल्‍या मकृवि कर्मचारी संघाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या बैठकीस विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागिरे, मकृवि कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे, सरचिटणीस श्री ज्ञानोबा पवार, उपाध्‍यक्ष श्री प्रदिप कदम, श्री पी बी शिंदे, सह सरचिटणीस श्री एकनाथ कदम, कार्यकारणी सदस्‍य प्रा रमेश देशमुख, श्री श्रीराम घागरमाळे, श्री पि जी जाधव, श्री एकनाथ घ्‍यार आदी उप‍‍स्‍थीत होते.  

Thursday, March 14, 2013

जैव-तंत्रज्ञानावरील संशोधनाला गती दयावी ........ मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे




जैव-तंत्रज्ञानाचा वापर करून जैविक–अजैविक ताणास सहनशील अशा पिकांच्‍या जाती निर्माण कराव्‍यात. शाश्‍वत कृषि विकासासाठी हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीच्‍या संशोधनावर भर देण्‍याचा सल्‍ला मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे यांनी मराठवाडा कृषि वि़द्यापीठाच्‍या कृषि संशोधन परिषदेच्‍या 16 वी बैठकीत दिला. मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे याच्‍या अध्‍यक्षतेखाली दि 09 मार्च रोजी हि बैठक संपन्‍न झाली. या परिषदेचे सदस्‍य भारती  अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दुर्ग (छत्‍तीसगड) चे प्राचार्य डॉ डी के दास, महाराष्‍ट्र राज्‍य कृषि बाजार मंडळाचे प्रकल्‍प सल्‍लागार डॉ बी बी गुंजाळ, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ आर एस पाटील, पशुसंवर्धन व दुग्‍ध विकास विभागाचे विभागीय सहआयुक्‍त श्री मोईउदिन, संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, विभाग प्रमुख उपस्थित होतेविद्यापीठाच्‍या कृषि संशोधनाची दिशा ठरविण्‍याचे कार्य ही परिषद असते.
मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे पुढे म्‍हणाले की, खाजगी संस्‍थेसोबत करार करून त्‍यांचा  सहभाग कृषि संशोधनात व विस्‍तार कार्यात घ्‍यावा. विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाचे पेंटटसाठी विशेष प्रयत्‍न करावेत. शेतक-यांच्‍या गरजेनुसार संशोधन कार्य व्‍हावे अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
डॉ बी बी गुंजाळ म्‍हणाले कि, या भागास अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीचे आवाहन शास्‍त्रज्ञांनी स्‍वीकारले पाहिजे. मुल्‍यवर्धीत पदार्थ निर्मितीचे तंत्रज्ञान शेतक-यांना देणे गरजेचे आहे. शेतका-यांमध्‍ये व विद्यार्थ्‍यामध्‍ये उद्योजकता विकास व्‍‍हावा. उघानविद्याचे हाय-टेक तंत्रज्ञान शेतक-यांसाठी उपयुक्‍त ठरेल. शेतक-यांच्‍या विकासासाठी सर्व विभागांनी सांघीक प्रयत्‍न करावेत असे आवाहन त्‍यांनी केले. डॉ डि के दास म्‍हणाले की, मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सिंचन प्रकल्‍प शेतक-यांसमोर एक आदर्श मॉडेल ठरणार आहे.
संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांनी विद्यापीठाच्‍या मागील वर्षीच्‍या संशोधन कार्याची माहिती दिली. सर्व सहयोगी अधिष्‍ठाता यांनी आपआपल्‍या विभागातील संशोधनाची माहिती दिली. बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संशोधन उपसंचालक डॉ ए एस कारले यांनी केले.  कार्यक्रमाच्‍या यश्‍स्‍वीतेसाठी डॉ लांडे, प्रा सचिन मोरे, प्रा देव्‍हारे, श्री बनसोडे, श्री सुभेदार, श्री विकास शिंदे आदींनी परिश्रम घेतले 

Tuesday, March 12, 2013

स्‍व.यशवंतराव चव्‍हाण: राजकारणातील राजहंस ............... डॉ अशोक ढवण

कृषिगंध या वार्षिक अंकाचे विमोचन



स्‍व.यशवंतराव चव्‍हाण धोरणी राजकारणासोबत ते साहित्‍यप्रेमी होते त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व हे अष्‍टपैलु होते, ते राजकारणातील राजहंस होते, त्‍यांचे भावविश्‍व युवापिठीस आजच्‍या काळातही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी मराठवाडा कृषि विद्यापीठातील जिमखाना कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍व.यशवंतराव चव्‍हाण जन्‍मशताब्‍दीपुर्ती निमीत्‍त आयोजीत कार्यक्रमात मला भावलेले यशवंतराव या विषयावर व्‍याख्‍याना देतांनी केले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री विश्‍वभंर गावंडे होते. तसेच कुलसचिव श्री का. वि पागिरे, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ सवत्‍धर, विद्यापीठ अभियंता श्री दिगांबर कोळेकर, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी त्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वावर यशवंतरावाच्‍या विचारांचा बालवयापासुन असलेला प्रभाव व त्‍यांच्‍या सानिध्‍यात आल्‍यानंतर भावलेले यशवंतराव या विषयी श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध केले. प्रमुख पाहुणे निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री विश्‍वभंर गावंडे म्‍हणाले कि, महाराष्‍ट्राच्‍या महसुल सहितानिर्मितीत व ग्रामविकासात यशवंतरावांचे अमुल्‍य असे योगदान आहे. त्‍यांनी तयार केलेले कायदयाच्‍या आधारे आज देशातील व राज्‍यातील पंचायतराज यंत्रणा चालु आहे. याचा समावेश संविधानातही करण्‍यात आला आहे. अध्‍यक्षीय समारोप डॉ एन डी पवार यांनी केला.
याप्रसंगी डॉ विलास पाटील यांना जेव्ही लीबींग या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्‍यानिमित्‍त प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तसेच जिमखाना कृषि महाविद्यालयातर्फे प्रकाशित कृषिगंध या वार्षिक अंकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील प्रास्‍ताविकात कृषि महाविद्यालयाच्‍या जिमखान्‍याच्‍या विध्‍यार्थासाठीच्‍या सांस्‍कृतीक, क्रिडा व सर्वकष व्‍यक्‍तीमत्‍व विकासातील योगदान थोडक्‍यात स्‍पष्‍ट केले. कार्यक्रमाचे सुत्रासंचालन डॉ हरिहर कौसडीकर तर आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. व्‍याख्‍यानास मकृवितील सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्याथ्‍यीनी उपस्‍थीत होते. 


डॉ आशा आर्य पाटील आदर्श शिक्षक पुरस्‍काराने सन्‍मानीत

डॉ आशा आर्य पाटील आदर्श शिक्षक पुरस्‍काराने सन्‍मानीत
मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयामध्‍ये अन्न व पोषण विभागात सहयोगी प्राध्‍यापक या पदावर कार्यरत असणा-या डॉ आशा आर्य यांना 2012-2013 या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्‍कार देवुन गौरविण्‍यात आले.
मराठवाडाच्‍या कृषि विद्यापीठाच्‍या दिक्षांत समारंभात केद्रिंय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार, मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे, भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ किर्तीसिंग, महाराष्‍ट्र शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष विजयराव कोलते व विद्यापीठाचे सर्व संचालक यांच्‍या प्रमुख उपस्थितीत महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या शुभहस्‍ते हा पुरस्‍कार त्‍यांना प्रदान करण्‍यात आला
डॉ आशा आर्य गेल्‍या 25 वर्षापासुन विद्यादान, संशोधन आणि विस्‍तार शिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्‍यांनी राष्‍ट्रीय संस्‍थामध्‍ये पोषण शास्‍त्राचे आणि अमेरीकेतील कॉर्नेल विद्यापीठात माता व बालपोषण विषयाचे सखोल प्रशिक्षण घेतले आहे. त्‍या आहारतज्ञ असुन अन्‍न व पोषण विभागातील न्‍युट्रीहेल्‍थ या आहार मार्गदर्शन केंद्रामार्फत आहार व पोषण विषयक समुपदेशाचे कार्य करीत आहेत. शहरात आयोजीत अनेक कार्यक्रमात त्‍यांनी विविध आजारात घ्‍यावयाचा आहारासंबंधी मार्गदर्शन केले आहेत.
     कुपोषण निर्मुलनासाठी आहारातील सोयाबीन समावेशासंदर्भात हिंगोली जिल्‍हयात जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन केलेल्‍या मोलाच्‍या कामगिरीबददल हिंगोली जिल्‍हा परिषदेने त्‍यांना अंगणवाडी मित्र शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबददल शिक्षण संस्‍थेने सावित्रीबाई फुले पुरस्‍कार देवुन गौरविले आहे. यापुर्वी त्‍यांना गृहविज्ञान महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक आणि मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उत्‍कृष्‍ट काम करणारा अधिकारी हा पुरस्‍कार मिळालेला आहे. त्‍यांनी अनेक विद्यार्थ्‍यांना पदव्‍युत्‍तर संशोधनासाठी मार्गदर्शन केलेले आहे, तसेच त्‍यांनी नवी दिल्‍ली येथील भारत सरकाराच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि नवी मुंबई येथील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचा पुरस्‍कृत संशोधन प्रकल्‍प यशस्‍वीपणे राबवित आहेत. त्‍यांच्‍या खास माता व बालकातील कुपोषण दुर करण्‍यासाठी विकसीत करण्‍यात आलेल्‍या सुपोषा प्रथिने, उर्जा, कॅलशिअम, समृध्‍द पुरक पदार्थ, पोषकद्रव्‍ये समृध्‍द कोबीची, हरभ-याची, शेवग्‍याची पाने आणि तेलविरहीत सोयामील वापरून तयार केलेल्‍या लोह, कॅलशिअम, प्रथिने, समृध्‍द पदार्थ आणि शिशु आहारास रक्‍तक्षय प्रतिबंधात्‍मक शैक्षणिक साहित्‍यास राज्‍यस्‍तरीय समन्‍वयीत संशोधन परिषदेची मान्‍यता मिळालेली आहे. लेख, महिला मेळावा, महिला मंडळ, शाळा, आकाशवाणी इत्‍यादी माध्‍यमातुन आहारविषयी सतत मार्गदर्शन करीत असतात. या सन्‍मानाबद्दल विद्यापीठातील सर्व संचालक, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्‍यापक इत्‍यादींनी अभिनंदन केले आहे.       
    


Sunday, March 10, 2013

जागतिक महिला दिनानिमित्‍त राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत हिमोग्लोबीन तपासणीचा अभिनव उपक्रम


महाविद्यालयीन युवतीची हिमोग्लोबीन तपासणी करतांना 

         अयोग्य आहारामुळे व हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे महिलांमध्‍ये विविध स्त्री रोंग होण्याचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्‍यानीनी अभ्यासासोबत आपल्या आहारावर व आरोग्यावर लक्ष दिल्यास सर्वागीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन अन्न व आहार पोषण तज्ञ ङॉ आशा आर्या यांनी महिलाच्या आरोग्यासाठी आहारशास्त्राचे महत्व या विषयाचे मार्गदर्शन करतांना केले.
     येथील मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. अशोक कडाळे हे होते. तर प्रमुख पाहूण्या ङॉ आशा आर्य होत्या.
     रासेयो व्‍दारे राबविलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असून हा उपक्रम समाजात मोठया प्रमाणात सर्व महाविद्यालयांनी राबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ.अशोक कडाळे यांनी केले.
     या शिबीरात एकुण 63 महाविद्यालयीन युवतीची हिमोग्लोबीन तपासणी झाली. या मध्ये 90 टक्के युवतीमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी आढळून आले.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र शिंदे यांनी केले.  तर जिल्हा सामान्य रूग्णालयाचे श्री.साखरे, श्री अब्दुल तसेच मराठवाडा कृषि विद्यापीठाचे डॉ. सुब्बाराव, डॉ. स्मिता खोडके, प्रा. विवेकानंद भोसले प्रा. सुभाष विखे, प्रा. सौ प्रमोदिनी मोरे, प्रा. मधुकर मोरे, प्रा. संजय पवार, प्रा. आगरकर आदीचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात महाविद्यालयात युवा युवतींनी उत्स्फर्त सहभाग घेतला होता.

Friday, March 1, 2013

संशोधक डॉ उदय खोडके हे राधाकिशन शांती मल्होत्रा पुरस्काराने सन्मानित

संशोधक डॉ उदय खोडके हे राधाकिशन शांती मल्होत्रा पुरस्काराने सन्मानित