मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी
व तंत्रज्ञान महावि़द्यालयाच्यावतीने कृषि संशोधनातील व व्यावसायीक संधी आणि व्यक्तीमत्व
विकास यावर दोन दिवशीय कार्यशाळाचे उदघाटन
करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्मु) चे माजी
कुलगूरू तथा कृषी विज्ञान राष्ट्रीय अकॅडमीचे सचिव मा डॉ अन्वर आलम, स्वामी विवेकानंद तंत्रज्ञान
विद्यापीठ (भिलाई) चे कुलगूरू डॉ बी सी मल, भारतीय कृषि अनूसंधान परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील
एस्कॉर्ड लिमीटेडचे सल्लागार मा डॉ एस के टंडन, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ
शंकरराव मगर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि
विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ व्ही एम मायंदे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर पी सिंग, महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण
विभागाचे अव्वर सचिव अभियंता मा व्हि बी नाथ हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे होते तसेच शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, संशोधक संचालक डॉ गोवर्धन
खंडागळे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे मा डॉ अन्वर आलम म्हणाले कि, यशासाठी
कोणताही शार्टकट नसतो हि एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपले विचार स्पष्टपणे
मांडता येणे व्यक्तीमत्वाचा
महत्वाचा पैलु असुन त्याचा विकास विद्यार्थ्यानी करावा. अध्यात्म हा व्यक्तीमत्व
विकासासाठी उपयुक्त असे साधन आहे. विद्यापीठाचे सिंचनस्त्रोत विकास प्रकल्प हा
एक मोठा महत्वकांक्षी प्रकल्प असुन विद्यार्थ्यानी याचा अभ्यास करावा. तर अध्यक्षयीय भाषणात मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे म्हणाले कि, वाढलेली
मजुरी व मजुरांची कमतरता हि आजच्या शेती समोरील मोठया समस्या असुन शेतीचे
यांत्रिकीकरण करणे गरजेचे आहे, त्यामुळे कृषि अभियांत्याना मोठा वाव आहे. पिकांच्या
लागवडीपासुन ते काढणीपर्यंत कृषि अभियांते महत्वची भूमिका बचावु शकतात. तसेच
काढणी पश्चात तंत्रज्ञान, माती व जल संवर्धन, मुल्यवर्धीत तंत्रज्ञान आदी
क्षेत्रात कृषि अभियांत्यानी अधिक संशोधन करावे. देशाला आज कृषि अभियांत्रिकी
क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची अत्यंत निकड आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कुलगूरू
डॉ बी सी मल म्हणाले की, जगातील नामवंत शास्त्रज्ञानी त्यांच्या इच्छाशक्तीच्या
बळावर अनेक संशोधने केली, त्याच्या जीवनात अशक्य हा शब्द नव्हता. मा डॉ एस के टंडन यांनी कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्याना उपलब्ध संधीची सविस्तर माहिती दिली. माजी
कुलगूरू डॉ शंकरराव मगर म्हणाले की, उपजत व सकारात्मक विचार, एकाग्रता, इच्छाशक्ती
आदी बाबींमुळे व्यक्तीमत्वाचा
विकास होतो. माजी कुलगूरू मा डॉ व्ही एम
मायंदे म्हणाले की, जग आज अधिक स्पर्धात्मक होत असुन विद्यार्थ्याना आपल्या
चांगल्या गुणांची व कमतरतांची जाणीव असायला पाहिजे. मा डॉ आर पी सिंग यांनी कृषि
क्षेत्रातील शास्त्रज्ञ डॉ नॉर्मल बोरलॉग, डॉ एम एस स्वामीनाथन यांचा आर्दश
विद्यार्थ्यांनी डोळयासमोर ठेवावा असा सल्ला दिला. अभियंता मा व्हि बी नाथ म्हणाले
की, विद्यापीठाने विद्यापीठ प्रक्षेत्राचा पाणलोट विकास व विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व
विकास या दोन्हीवर भर दिला आहे.
या
कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ अशोक
कडाळे यांनी कार्यशाळेबाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्मिता खोडके
यांनी तर आभार प्रदर्शन डॉ गोपाल शिंदे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक
व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.