Pages

Wednesday, June 29, 2016

क्रॉपसॅप प्रकल्‍पामुळे प्रमुख पिकांवरील विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्‍यास मदत....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

राज्‍यातील कृषि‍ विभाग व कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कार्यरत असलेला क्रॉपसॅप प्रकल्‍प हा एक आदर्श प्रकल्‍प ठरला असुन राष्‍ट्रीय पातळीवरील पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. प्रकल्‍पामुळे गेल्‍या सात वर्षापासुन मराठवाडयातील प्रमुख पिकांवरील विविध कीड व रोगाच्‍या प्रादुर्भाव वेळीच रोखण्‍यात मोठी मदत झाली आहे, असे मत कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅप) प्रकल्‍पांतर्गत कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व विद्यापीठातील जिल्‍हास्‍तरीय समन्‍वयक यांचे दिनांक २९ व ३० जुन रोजी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषि उपसंचालक डॉ. रक्क्षा शिंदे, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, सदरिल प्रकल्‍पामुळे कीड व रोग व्‍यवस्‍थापनाबाबत शेतक-यांत जागृती होऊन रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांची अतिरिक्‍त फवारणी टाळता येऊन पर्यावरणाचे होणारे संभाव्‍य हानी टाळु शकलो. प्रकल्‍पाच्‍या परिमाणाचे आर्थिक व पर्यावरणदृष्‍टया संशोधनात्‍मक मुल्‍यांकन होणे गरजेचे आहे. यावर्षी राज्‍यात चांगल्‍या पर्जन्‍यमानाचा अंदाज असुन पिकांवरील विविध कीड व रोगांचे व्‍यवस्‍थापन केल्‍यास चांगले कृषी उत्‍पादन येईल, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपल्‍या भाषणात प्रकल्‍पाचे कार्य विस्‍तारत असुन प्रकल्‍पात मागील अनुभवाच्‍या आधारे योग्‍य ते बदल करावेत असे सुचविले. कीडींचा संभाव्‍य धोका लक्षात घेऊन प्रकल्‍पात कापसावरील गुलाबी बोंडअळी व हुमणी कीडीचा नव्‍याने समावेश केला असल्‍याचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी आपल्‍या भाषणात सांगितले तर कृषि उप‍संचालक डॉ. रक्क्षा शिंदे यांनी प्रकल्‍पात माहिती तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे गतिमानता प्राप्‍त झाल्‍याचे आपल्‍या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍त‍ाविक डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ ए जी बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. डि जी मोरे यांनी केले. प्रशिक्षणाच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रशिक्षणार्थ्‍यींना पिकांवरील विविध कीड व रोगाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कृषि विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Monday, June 27, 2016

गृह विज्ञान महाविद्यालयात अंगणवाडयातील बाल शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने परभणी जिल्हयातील टाकळी कुंभकर्ण येथील अंगणवाडयांचा बाल शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी दिनांक ९ ते २३ जुन दरम्‍यान पंधरा दिवसीय अनुभवमय प्रशिक्षिण आयोजीत करण्‍यात आले होते. सदरिल प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी श्री. सुभाश शिंदे, गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटनम व जिल्‍हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत असलेल्या एलपीपी स्कूलमध्ये संपन्‍न झाले. जिल्‍हा परिषदेचे एकात्मिक बाल विकास योजनेेतंर्गत प्रायोगिक तत्वावर मौजे टाकळी कुंभकर्ण येथून या प्रशिक्षणाची सुरुवात केली. सदरील प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रम विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत दिनांक २३ जुन रोजी पार पडला. बालवयातच बालकांमध्ये उत्तम संस्कार तथा शिक्षणाची बिजे रुजवल्या गेल्यास निश्चितच त्यांची चांगली फळे भविष्‍यात सुजाण नागरिकाच्या रुपात दिसून येतात, असे मत त्यांनी यावेळी व्‍यक्‍त करून सदरिल प्रशिक्षण प्राप्‍त केलेल्‍या सहभागी प्रशिक्षणार्थी बालशिक्षणाची कोणतीही आव्हाने पेलू काल असा विश्वासही त्यांनी प्रगट केला. प्रशिक्षण यस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना व साधनव्यक्तींना त्यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्रे प्रदान करण्‍यात आली. उपलब्ध संसाधनांचा उपयोग करुन ग्रामीण बालकांचा उच्चतम सर्वांगीण विकास घडवता येतो याबाबतचे वास्तववादी प्रभावी व सखोल प्रशिक्षण आंनददायी वातावरणात ज्ञान व कौल्यात वृध्दि झाल्‍याची भावना प्रशिक्षणार्थीनी यावेळी व्यक्त केले. बाल विकास शास्त्रज्ञ तथा प्राचार्या प्रा. विशाला पटनम या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका असून त्यांनी या प्रशिक्षणाचा संपूर्ण आराखडा तयार केला. या प्रशिक्षणासाठी प्रा. विशाला पटनम, डॉ. जया बंगाळे, डॉ. वीणा भालेराव, शिक्षिका वर्षा, अभिलाशा, वैषाली व श्रुती यांनी साधनव्यक्ती म्हणून त्यांची कार्ये पार पाडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. जया बंगाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक, एलपीपी स्कूल कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Wednesday, June 22, 2016

कृषिदुतांनी वृक्ष लागवडीचा संकल्‍प करावा......... प्राचार्य डॉ डि एन गोखले

कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या उद्बोधन वर्गात मार्गदर्शन

पर्यावरण संतुलनात झाडांचा मोठी भुमिका असुन ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी वृक्षलागवडीचा संकल्‍प करून येणा-या कृषीदिनी वृक्षलागवडीत आपले श्रमदान द्यावे, सा सल्‍ला प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्‍यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन दिनांक २१ जुन करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे, जल व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. ए. एस. कडाळे, विषयतज्ञ डॉ. के. डि. नवगिरे, प्रा. डि. एम. नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

   प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले पुढे म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयातील कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करावा तसेच विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचवावे. 

   कार्यक्रमात विषयतज्ञ डॉ. के. डि. नवगिरे, प्रा. डि. एम. नाईक प्रा. बी. पी. सावंत, प्रा. बी. एस. कदम, प्रा. एस. आर. नागरगोजे, डॉ. अनिल धमक, प्रा.. बी. बांगडे, प्रा. विशाल अवसरमल, प्रा. डि. व्‍ही. बैनवाड यांनी विद्यार्थ्‍यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रावे समन्‍वयक डॉ. आर. डि. आहिरे यांनी केले तर सुत्रसंचालन रावे प्रभारी अधिकारी डॉ. पी. एस. कापसे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. जयश्री एकाळे, प्रा. मेधा सुर्यवंशी, प्रा. पी. एच. गौरखेडे, डॉ. एस. एस. मोरे आदीसह कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते. कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात विद्यार्थी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करतात. सदरिल सत्रात यावर्षी महाविद्यालयाचे १८० विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.

दुष्‍काळग्रस्‍त शेतक-यांच्‍या मदतीसाठी वनामकृवि कर्मचा-यांच्‍या वतीने वीस लाख रूपयाचा निधी माननीय मुख्‍यमंत्री यांना सुपूर्त

मराठवाडयातील भीषण दुष्‍काळाच्‍या व पाणीटंचाईच्‍या पार्श्‍वभुमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी संघ आपले कर्तव्‍य समजुन दुष्‍काळग्रस्‍त शेतक-यांच्‍य मदतीच्‍या उद्देशाने खारीचा वाटा म्‍हणुन सर्व श्रेणी १ ते श्रेणी ४ पर्यंतच्‍या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन दुष्‍काळ निवारण्‍याच्‍या कामासाठी माननीय मुख्‍यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीस देण्‍याचे ठरवुन त्‍या अनुषंगाने विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी माहे मे २०१६ मधील आपल्‍या वेतनातुन एक दिवसाचे वेतन कपात करून माननीय मुख्‍यमंत्री आर्थिक सहाय्यता निधी दुष्‍काळ २०१५ यास एकुण रू २०,३५,८२२ /- रूपये (वीस लाख पस्‍तीस हजार आठशे बावीस केवळ) एवढा निधी जमा करण्‍यात आला. सदरिल निधीचा धनादेश दिनांक २० जुन रोजी मुंबई येथे माननीय मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वनामकृवि कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे यांच्‍या हस्‍ते सुपूर्त करण्‍यात आला. या प्रसंगी संघाचे उपाध्‍यक्ष श्री. प्रदीप कदम, प्रा. राजाभाऊ बोराडे, प्रा. रमेश देशमुख, श्री. सुभाष जगताप, श्री. रंगराव नवगिरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी माननीय मुख्‍यमंत्री यांचे सोबत विद्यापीठाच्‍या विविध समस्‍येबाबत चर्चा करून माननीय मुख्‍यमंत्रयानी समस्‍या सोडविण्‍याचे आश्‍वासन दिले व विद्यापीठातील सर्व कर्मचा-यांचे दुष्‍काळ निधीस योगदानाबद्ल अभिनंदन केले.

Tuesday, June 21, 2016

वनामकृवित आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या प्रागंणात आंतरराष्‍ट्रीय योगदिनाचे विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक २१ जुन रोजी आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्‍य अधिकारी डॉ सुब्‍बाराव व योगशिक्षक प्रा­­­. दिनकर जोशी यांच्‍यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ ए एस कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. मागदर्शन करतांना शिक्षण संचालक मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, योगामुळे शारिरीक व मानसिक तणाव कमी होऊन मनुष्‍य आपले दैनंदिन कार्य अधिक कार्यक्षमरित्‍या पार पाडु शकतो. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त योग मर्यादीत न राहता योग हा सर्वाच्‍या जीवनपध्‍दतीचा अविभाज्‍य भाग व्‍हावा, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन राम खोबे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी क्रीडाधिकारी प्रा डि एफ राठोड, यु. बी. उबाळे, किशोर शिंदे, प्रा. गजानन गडदे यांच्‍यासह विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या कर्मचा-यांनी व विविध महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण 

Thursday, June 16, 2016

वनामकृवित बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण संपन्न

मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण 
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने ट्रॅक्‍टर मालक शेतकरी व त्‍यांच्‍या चालकांकरिता बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी तज्ञाव्‍दारे एक दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक १५ जुन रोजी आयोजन करण्‍यात आले होते. कमी पर्जन्‍यमानात रूंद वरंबा व सरी पध्‍दती - बीबीएफव्‍दारेच सोयाबीन, मुग, उडीद सारख्‍या पिकांची लागवड करून चांगले उत्‍पादन काढु शकतो. शेतक-यांव्‍दारे बीबीएफ यंत्र वापरतांना ज्‍या त्रुटी आढळुन येतात किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे बरेच शेतकरी बीबीएफ यंत्राचा वापर करीत नाहीत. सदरिल अडचणी दुर करण्‍यासाठी व तांत्रिकदृष्‍टया बीबीएफचा योग्‍य वापर करण्‍याकरिता हे प्रशिक्षण खास ट्रॅक्‍टर मालक व चालकाकरिता आयोजित करण्‍यात आले होते. प्रशिक्षणात शेतक-यांना प्रात्‍यक्षिकाव्‍दारे या यंत्राचा वापराबाबत मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान करण्‍यात आले. प्रशिक्षणाच्‍या उदघाटनाास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. ए. एस. ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. एस. के. दिवेकर, कृषि अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, उपसंचालक कु. रक्षा शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बी. व्‍ही. आसेवार, प्रगतशिल शेतकरी श्री. रंधवे श्री. निरस, श्री.जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ. ए. एस. ढवण म्‍हणाले की, बीबीएफ सारख्‍या तंत्राचा वापर ही काळाची गरज असुन शेतक-यांनी हया तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्‍पादनात वाढ करावी. तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, ज्‍या शेतक-यांनी मागच्‍या वर्षी बीबीएफ वर पेरणी केली त्‍या शेतक-यांना इतर शेतक-यापेक्षा अधिक उत्‍पन्‍न मिळाले व या तंत्राव्‍दारेच सोयाबीन पेरण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. एस. के. दिवेकर यांनी यावेळी शेतक-यांना कृषि विभागाच्‍या योजनाविषयी माहिती दिली तर कृषि अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके यांनी अभियांत्रिकी महाविदयालयातर्फे बीबीएफच्‍या अडचणी सोडविण्‍याकरीता सर्वोतोपरी मदत करण्‍यात येईल असे सांगितले. उस्‍मानाबाद येथील शेतकरी श्री. रंधवे यांनी त्‍यांच्‍या बीबीएफ पेरणी विषयी त्‍यांचे अनुभव शेतक-यांना सांगितले.
   प्रशिक्षणात डॉ. स्मिता सोळंखी व डॉ.दयानंद टेकाळे यांनी शेतक-यांना प्रात्‍यक्षिकाव्‍दारे बीबीएफ यंत्राचा वापराबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. यु. एन. आळसे यांनी तर सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले. कार्यक्रमास डॉ. पी. आर. देशमुखप्रा. पी. एस. चव्‍हाण, प्रा. आर. एस. बोराडेप्रा. अे. टी‍. शिंदे आदीसह प्रशिक्षणात परभणी जिल्‍हयातुन ७० शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ स्मिता सोळुंकी

Tuesday, June 14, 2016

शेतीत पशुशक्तीचा योग्यरित्या वापर होणे गरजेचे......प्रकल्‍प समन्‍वयक मा. डॉ. एम. दीन

वनामकृवित सुधारित शेती अवजारे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

विविध शेती कामासाठी बैलशक्तीचा वापर करण्यात येतो, परंतु बैलशक्तीचा पुरेपूर वापर होत नसल्यामुळे त्यांचे संगोपन करणे परवडत नाही अशी शेतकऱ्यांची धारणा होत आहे. त्यासाठी शेतीत पशुशक्तीचा योग्यरीत्या वापर होणे गरजेचे असल्याचे मत प्रतिपादन भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील प्रकल्प समन्वयक डॉ. एम. दिन यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वयीत पशू शक्तीचा योग्य वापर या संशोधन प्रकल्पाद्वारे मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी निवडलेल्या शेतकऱ्यासाठी सुधारित शेती अवजारे वाटप आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ जुन रोजी करण्यात आले, कार्यक्रमाच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू हे होते तर  व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बालासाहेब भोसले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बालाजी नांदेडे, संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. डॉ. एम. दिन पुढे म्हणाले की, बैल जोपासल्यामुळे त्यांचा शेतकामासाठी वापर करण्याबरोबरच शेणखताचाही शेतीसाठी मोठा फायदा होतो. याप्रसंगी मा. डॉ. एम. दिन यांनी विद्यापीठ अंतर्गत सुरु असलेल्या पशू शक्तीचा योग्य वापर या संशोधन प्रकल्पाच्या कामाचे कौतुक केले. कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू आपल्या अध्यक्षीय भाषणात म्‍हणाले की, शेतकऱ्यानी विद्यापीठाने दिलेली सुधारित शेती अवजारे आपल्या शेतात वापरावीत, वापर करतांना काही अडचणी असल्यास विद्यापीठ शास्त्रज्ञांशी संपर्क करावा. सदरिल सुधारित शेती अवजारांचा शेतीत अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोळंकी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दयानंद टेकाळे यांनी केले. कार्यक्रमात ‘पीक उत्पादन वाढीसाठी सुधारील बैलचलित शेती अवजारे’ या घडी पत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्पाच्या वतीने बालाजी पांचाळ, रोहित स्टील पुणेचे प्रतिनिधी विठ्ठल फाळके, समद इंजिनिरीग परभणी या अवजारे निर्मात्यांचा सत्कार करण्यात आला. खामगाव (बीड), औरंगाबाद, खरपुडी (जालना), सगरोळी (नांदेड), तुळजापूर (उस्मानाबाद), लातूर, तोंडापूर (हिंगोली) येथील कृषी विज्ञान केंद्रांनी निवडलेल्या शेतकरी गटांना मान्यवरांच्या हस्ते सुधारित शेती अवजारांचे वाटप करण्यात आले. तांत्रिक सत्रात शेतक-यांना बैल चलित सुधारित अवजारांविषयी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध संशोधन योजनांचे प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक, कृषी विज्ञान केंद्रांतील विषयतज्ञ आणि मराठवाड्यातील सुमारे १५० शेतकरी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. राहुल रामटेके, प्रा. पंडित मुंडे, अजय वाघमारे, वडमारे, यंदे, काकडे, आव्हाड, माने, रणबावळे, खटिंग, शिंदे, होले आदीसह पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, June 7, 2016

वनामकृविच्‍या २१ शिफारशींना संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची मान्‍यता

पिकांंचे दोन वाणासह चार कृषी यंत्राचे प्रसारण व १५ पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारसींंचा समावेश

महाराष्‍ट्रातील चारही कृषी विद्यापीठाची संयुक्त कृषि संंशोधन आणि विकास समितीची ४४ वी बैठक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ या ठिकाणी दिनांक २८ ते ३० मे दरम्यान संपन्न झाली. सदरिल बैठकी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दोन पिक वाणांचे, चार कृषी यंत्राचे प्रसारण आणि १५ पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित अशा २१ शिफारशी पारित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर व संशोधन सहसंचालक डॉ. दिगंबर पेरके यांनी दिली असुन त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

वनामकृविच्‍या दोन पिकाच्‍या वाणास मान्‍यता
() सोयाबीनचा एमएयुएस ६१२ वाणास मान्‍यता


एमएयुएस ६१२ हा सोयाबीनचा वाण अधिक उत्पादकक्षम असून चक्रीभुंगा, खोडमाशीशेंगा पोखरणारी अळी या किडींना तसेच अल्टरनेरीया पानावरील ठिपके व शेंग करपा या रोगांना सहनशील असल्याने या वाणाची महाराष्ट्रात लागवडीकरिता शिफारस करण्यात आली.







() तुरीच्‍या बीडीएन ७१६ वाणास मान्‍यता


तुर पिकाच्या बीडीएन ७१६ या वाणांने नियंत्रक वाण बीडीएन ७०८, बीडीएन ७११, एकेटी ८८११, विपुला आणि राजेशवरीपेक्षा अनुक्रमे २४.७१, ४०.७७, २५.८२, २४.९७ आणि १३.१९ टक्के पेक्षा जास्त उत्पादन दिल्याचे आढळुन आले अुसन १६५-१७० दिवसात तयार होणा-या, मर व वांझ रोग प्रतिबंधक व उत्तम प्रतीची डाळ शिजवण्याची गुणवत्ता असल्याने या वाणाची महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली.





वनामकृविच्‍या चार कृषि यंत्रे प्रसारण
() वनामकृवि बैलचलित चक्राकार पद्धतीची परीवलन यंत्रणा
वनामकृवि विकसीत बैलचलित चक्राकार पध्‍दतीच्या परीवलन यंत्रणेची एक अश्‍वशक्तीचे धान्य उफणनी यंत्र, धान्य पॉलिशींग यंत्र, मिरची कांडप यंत्र व शेवया तयार करण्याचे यंत्र चालविण्यासाठी शिफारस करण्यात आली.
यंत्रणेची वैशिष्टे ही यंत्रणा एक अश्‍वशक्तीचे विविध कृषि प्रक्रिया यंत्र बैलाच्या साहाय्याने चालविण्यास उपयुक्त असुन बैलाचा रिकाम्या वेळेत उपयोग होतो. सदरिल यंत्रणा बचत गट व लघुउद्योग यांना फायदेशीर असुन याची क्षमता धान्य उफणनी व प्रतवारीसाठी प्रती तास ३४४.६६ कि. ग्रॅ., दाळ पॉलि करण्‍यासाठी २६३. कि.ग्रॅ., मिरची कांडप . कि.ग्रॅ. व  शेवया तयार करण्‍यासाठी .८३ कि.ग्रॅ. इतकी आहे.



() वनामकृवि मनुष्यचलीत बहुउद्देशीय कवच काढणी यंत्र


वनामकृवि विकसीत बहुउद्देशीय कवच काढणी यंत्राची बीबा, सुपारी, बदाम व आक्रोड यांचे कवच काढण्यासाठी शिफारस करण्यात आली.
यंत्राची वैशिष्टे - यंत्रासाठी विजेची गरज भासत नाही, विविध कवचधारी फळांचे कवच फोडण्यास होणारा त्रास कमी होतो तर बचत गटासाठी किंवा लघु उद्योगास फायदेशी आहे.











() इंजिन चलित खड्डे पाडण्याचे यंत्र


वनामकृवि विकसीत स्थिर सांगाडा असलेले इंजिन चलित खड्डे पाडणा-या यंत्राची विविध आकाराचे खड्डे पाडण्यासाठी शिफारस मान्‍य करण्यात आली.
यंत्राचे वैशिष्टे - विविध आकारांचे खड्डे पाडण्याकरीता उपयुक्तकमी इंधन खपत असुन यंत्राची क्षमता प्रती तास ४० खड्डे (खोली मीटर) अशी आहे.







() विद्युतचलीत भाजणी यंत्र


वनामकृवि विकसीत किलो क्षमतेचे उच्च तापमान व कमी वेळ या तत्वावर चालणा-या विद्युतचलीत भाजणी यंत्राची आणि प्रक्रियेची शिफारस भाजलेले सोयानटस् बनविण्यासाठी करण्यात येते. (प्रक्रिया : सोयाबीन एक तास भिजवीणे, दोन तास सावलीमध्ये सुकविणे व त्यानंतर १३० डिग्री से. तापमानावर . मिनीटे भाजणे)











पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत १५ शिफारसींना मान्‍यता

कृषि विद्या
() मराठवाडयातील मध्यम प्रतीच्या जमिनीवर कोरडवाहू कपाशीच्या सघन लागवडीसाठी एनएच-६१५, एनएच-६३५ व सुरज या अमेरीकन सरळ वाणांची ६० x १० सें.मी. अंतरावर (.६६ लाख झाडे प्रति हेक्टर) लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

मृद विज्ञान
() मराठवाडयातील जस्ताची कमतरता असलेल्या खोल काळ्या जमिनीसाठी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खत मात्रेसोबत (२५:५० किलो नत्र व स्फुरद) पाला ३० किलो प्रती हे. व २५ किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस करण्यात येते.

(३) मराठवाडा विभागातील चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापनासाठी मोसंबीचे अधिक उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी, मोसंबीच्या फळ बागेस ८०० : ४०० : ४०० ग्रॅम / झाड नत्र, स्फुरद व पाला खत मात्रा आवर्तनात ठिंबक सिंचनाद्वारे (सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे) अधिक १५ किलो गांडुळखत आणि १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा जमिनीतून बहार धरतेवेळी अधिक मिली प्रत्येकी अॅझोटोबॅक्टोर आणि पीएसबी प्रती झाड तसेच चिलेटेड जस्त, लोह आणि बोरान यांच्या अनुक्रमे ., .आणि .२० टक्के या सुक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी प्रत्येक महिन्याला (जून ते जानेवारी) करण्याची शिफारस करण्यात येते.       
खते देण्याचा कालावधी
खते देण्याचा महिना
खताची मात्रा (८००:४००:४०० नत्र, स्फुरद, पाला) प्रति झाड (ग्राम)
जीवाणु खते विद्राव्य अॅझोटोबॅक्टर व पीएसबी
नत्र
स्फुरद
पाला
विद्राव्य खते १९:१९:१९
युरीया
पहिला
जून
१००
१००
१००
५२०
-
मिली प्रत्येकी
दुसरा
जुलै
१००
२५
२५
१३०
१६५
मिली प्रत्येकी
तिसरा
ऑगस्ट
१००
५०
५०
२६०
११०
मिली प्रत्येकी
चौथा
सप्टेंबर
१००
२५
२५
१३०
१६५
मिली प्रत्येकी
पाचवा
ऑक्टोबर
१००
५०
५०
२६०
११०
मिली प्रत्येकी
सहावा
नोव्हेंबर
१००
२५
२५
१३०
१६५
मिली प्रत्येकी
सातवा
डिसेंबर
१००
७५
७५
३९०
५५
मिली प्रत्येकी
आठवा
जानेवारी
१००
५०
५०
२६०
११०
मिली प्रत्येकी

() अधिक कापुस उत्पादन, आर्थिक फायदा जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी . लीटर द्रवरूप ट्रायकोडर्मा व्हिरीडी ही जस्त विद्राव्य करणारी बुरशी १००० लीटर पाण्यात मिसळुन बी टी कापसाच्या मुळाजवळ लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत शिफारशीत खत मात्रेसह देण्याची शिफारस मराठवाडा विभागासाठी करण्यात येते.

पीक संरक्षण
(५) तुरीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापनाची खालीलप्रमाणे शिफारस करण्यात येत आहे.
. स्वच्छता मोहीम व उन्हाळयात खोल नांगरट करावी.
. कीड-रोगास प्रतीकारक्षम जास्त उत्पन्न देणारे वाण निवडावे उदा. बीएसएमआर ७३६
. शेंगा पोखरणा-या अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे प्रती हेक्टर शेतात लावावे.
. पक्षी थांबे ५० प्रती हेक्टर लावावे.
. मोठया अळया हाताने वेचून त्यांचा बंदोबस्त करावा.
. पीक ५० टक्के फुलो-यात आल्यावर अॅझाडीराक्टीन १०००० पीपीएम १० मिली प्रती १०  लीटर पाण्यात फवारावे.
. शेंगा पोखरणारी अळी आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडताच एचएएनपीव्ही २५० एलई / हेक्टर फवारावे.
. शेंगा पोखरणा-या अळी साठी इमामेक्टीन बेन्झोएट एस जी ग्रॅम / १० लीटर पाण्यात फवारावे.
. शेंगा माशीसाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एस एल १२. मिली / १० लीटर पाण्यात फवारावे.

अन्न तंत्रज्ञान
() साखरेऐवजी मध वापरून उत्तम प्रतीची आवळा कॅन्डी तयार करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
() सेलम हळदकंदाच्या किसामध्ये १५ % अद्रकचा किस व २० % लिंबाचा रस वापरून उत्तम प्रतीचे लोणचे तयार करण्याची शिफारस करण्यात येते.

गृहविज्ञान
() आहारात मक्याचा वापर वाढविण्यासाठी शे, लाडु व खस्ता असे फराळाचे पदार्थ तयार करतांना १०० टक्के मक्याच्या पीठाचा वापर करावा अशी शिफारस करण्यात येते.
(९) सात ते नऊ वर्षाच्या मुलांचे वजन, रक्तातील हिमोग्लोबिनच्या आणि प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी वनामकृवि विकसित प्रथीन समृद्ध मिश्र डाळीच्या शेवाचे सोयाबीन, मुग डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ मिश्र २०:१०:: दररोज ५० ग्रॅम सेवन करण्याची शिफारस करण्यात येते.
(१०) विकासात्मक दोष असलेल्या बालकांचे मुल्यमापन करून त्यांचा उच्चतम विकास साधण्याकरीता हया बालकांच्या कुटुंबांना शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्राच्या ठिकाणी शासकीय, शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय तथा दवाखाना येथे परिपुर्ण बाल मार्गदर्शन व कौटुंबिक समुपदेन चिकित्सालय स्थापन करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

कृषि अभियांत्रिकी
(११) नांदेड, हिंगोली, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्रांतील भुपृष्ठीय निचरा-प्रणालीचे आरेखन करण्याकरीता वनामकृवि विकसीत तालुकानिहाय निचरा गुणांकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
(१२) ज्या कुपनलिकेच्या जवळ पावसाचे वाहते पाणी एकत्रित जमा होते, त्या ठिकाणी मराठवाडयामध्ये कुपनलीकेत भुजल पुनर्भरण करण्याकरीता पुढील तपशील असलेली वनामकृवि सुधारीत कुपनलिका पुनर्भरण यंत्रणावापरण्याची शिफारस करण्यात येते.
- कुपनलिकेची सभोवताली . मी व्यासाचा, . मी. खोल खड्डा तयार करून केसींग पाईपला खालुन ५० सें.मी. उंचीपर्यंत मी.मी. व्यासाची छिद्रे पाडून त्यावर नायलॉन जाळीचे दोन आवरण घालावे.
- गाळण यंत्रणेत दोन थरानंतर नायलॉन जाळी टाकावी तसेच गाळण यंत्रणेच्या वरच्या भागात . मी. व्यासाचे व २० सें.मी. उंचीच्या दोन सिमेंट रिंग टाकाव्यात.         
अ.क्र.
गाळण साहित्य
खोली (सें.मी.)
जाडी (मि.मी.)
मोठे दगड
५०
६० ते ८०
छोटे दगड
५०
२० ते ३०
जाड वाळू/रेती
३०
१० ते १५
बारीक वाळू/रेती
२०
२ ते ३

जैवतंत्रज्ञान 
(१३) फ्लुरोसंस लेबेल्ड तंत्रावर आधारित वनामकृवि झापडिटेक्टसंचाचा वापर डाळिंब पिकामधील तेलकट डाग (झान्थोमोनास अक्झोनोपोडीस पी.वी.पुनिकी) या रोगाचे जनुकीय नमुन्याद्वारे जलद, विश्‍वासार्ह अचुक व सहज पद्धतीने निदान करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे.

कृषि अर्थशास्त्र
(१४) कृषी मालाच्या केंन्द्रामार्फत जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमती आणि महाराष्ट्र राज्याच्या पीक उत्पादन योजनेच्या माहितीच्या आधारावर शिफारशीत केलेल्या किंमती कमी आहेत त्या पिकांसाठी ही तफावत कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याची शिफारस करण्यात येत आहे.

विस्तार शिक्षण
(१५) हुमणी किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी जैविक (हेक्टरी १० किलो मेटारायझीयम अॅनिसोप्ली जमिनीतून वापरावा). रासायनिक (फिप्रोनिल ४० टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड ४० टक्के हे. मिश्र किटकना ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून हुमणीग्रस्त झाडाभोवती आळवणी करावी. तसेच हेक्टरी फोरेट १० टक्के दाणेदार हे कीटकना२५ किलो किंवा कोर्बोफ्युरॉन सी जी ३३ किलो ओल्या जमिनीत मिसळावे) व सामुहिक गावस्तरावर पीक संरक्षणाबद्दल कृषी विभाग, कृषी विज्ञान केंन्द्रे आणि कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने शेतक-यांची ज्ञान व अवलंबन पातळी वाढविण्यासाठी समूह माध्यमांद्वारे जागृती करावी. तसेच प्रशिक्षण व सामुहिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

सौजन्‍य
संशोधन संचालनालय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी