एनसीबीआयकडुन क्लेबसिएल्ला न्युमोनी जीवाणुच्या प्रजातीस डॉ बोरकर यांचे नाव
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
तथा प्राचार्य डॉ एस जी बोरकर यांचे नाव क्लेबसीएल्ला न्युमोनि जीवाणुच्या
प्रजातीस देण्यात आले असुन या जीवाणुमुळे मानवामध्ये न्युमोनिया म्हणजेच
फुफूसदाह हा जीवघेणा आजार होतो. हा जीवाणु वनस्पतीमध्येही रोगास कारणीभुत असल्याचे
डॉ. एस. जी. बोरकर व त्यांचा संशोधक विद्यार्थी अजयश्री टी एस यांना संशोधनात आढळुन
आले आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान माहिती केंद्रात (एनसीबीआय) या जीवाणुच्या प्रजातीचे जनुक १६ एसआरआरएनए अनुक्रमीत करून जतन करण्यात
आले आहे. अमेरिकातील राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान विषयक केंद्रानी सदरिल क्लेबसीएल्ला
न्युमोनी प्रजातीस बोरकर असे नाव दिले आहे. क्लेबसीएल्ला प्रजातीस सहसा अंक
दिले जातात परंतु शासत्रज्ञाचे नाव देण्याचे हे एकमेव उदाहरण आहे. डॉ बोरकर हे
प्रख्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनस्पती जीवाणुशास्त्रज्ञ असुन ते भारतीय
कृषि संशोधन संस्थेचे पदव्युत्तर व आचार्य पदवीधारक आहेत. भारत सरकारने डॉ
बोरकर यांना वनस्पती जीवाणुशास्त्रात विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी पोस्ट
डॉक्टरेट करण्यासाठी १९८४ साली फ्रान्समध्ये पाठवले होते. डॉ बोरकर यांनी वनस्पती
जीवाणुशास्त्रात केलेल्या संशोधनासाठी वॉशिग्टन येथील आंतरराष्ट्रीय
विद्यापीठाने १९९९ साली डी. एस्सी. पदवी बहाल केली. त्यांची प्लॅन्ट बॅक्टेरिओलाजी
विषयातील दोन पुस्तके अमेरिकेत प्रकाशित झाली असुन जगभर प्रसारित झाली आहेत. त्यांनी
संशोधीत केलेल्या डाळींबावरील जीवणुजन्य करपा व्यवस्थापनासाठी महात्मा फुले
कृषि विद्यापीठाचा प्रोटोकॉल नाशिक जिल्हातील शेतकरी यशस्वीरित्या वापरत आहेत.
याबाबत डॉ बोरकर यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.