Pages

Thursday, August 16, 2018

वनामकृवितील केरळच्‍या विद्यार्थ्‍यांनी फुलांची पारंपारिक रांगोळी काढुण साजरा केला ओणम

ओणम राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्रतिक......कुलगरू मा. डॉ. अशोक ढवण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण घेत असलेले केरळ राज्‍यातील विद्यार्थ्‍यांनी दिनांक १६ ऑगस्ट रोजी ओणम सण साजरा केला. केरळ राज्‍यातील सर्वात मोठा सण असुन या सणात फुलांच्‍या रांगोळीचे विशेष महत्‍व असते, या रंगोळीला ओणमपुक्‍कलम असे म्‍हणतात. विद्यापीठातील केरळच्‍या विद्यार्थ्‍यांनी फुलांची पारंपारीक रंगोळी काढली. या रांगोळीचे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी प्रशंसा केली. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. विशेषत: विद्यापीठात विविध कार्यासाठी आलेले मान्‍यवरांनीही हजेरी लावली होती, यात पंजाब कृषि विद्यापीठाचे कृषि पत्रकार विभागाचे प्रा. डॉ. सरबजीत सिंग, गाझीयाबाद (उत्‍तर प्रदेश) येथील विव्‍दान पंडित ब्र‍जेश शास्‍त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, पंजाब, उत्‍तर प्रदेश व महाराष्‍ट्र आदी विविध राज्‍यांतील व्‍यक्‍ती केरळ राज्‍यातील विद्या‍र्थ्‍यी साजरा करत असलेल्‍या ओणम सणात सहभागी आहेत, हे एक राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्रतिक आहे.