नापेह प्रकल्पांतर्गत विशेष उपक्रम
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च
शिक्षण प्रकल्पांतर्गत डिजिटल शेतीवर आधारीत प्रकल्प राबविण्यात येत असुन या
प्रकल्पांतर्गत डिजिटल शेतीसंबंधीत शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम राबविण्यात येत आहेत.
प्रकल्पांर्गत विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांमध्ये
डिजिटल शेती संबंधीत कौशल्य निर्मिती करणे हा मुख्य उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणुन
थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत विद्यापीठांतर्गत
असलेल्या विविध महाविद्यालयातील अकरा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञान
व त्याचा वापर या एक महिन्याच्या आयोजित प्रशिक्षण करिता दिनांक २६ फेब्रुवारी ते
२६ मार्च दरम्यान पाठविण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर संशोधन
हे डिजिटल तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यावर आधारित आहे.
सदर विद्यार्थींना शुभेच्छा देतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना परदेशात प्रशिक्षणास पाठविण्यात येत असुन यामुळे विद्यार्थ्यांना जागतिकस्तरावरील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करण्याची संधी प्राप्त होणार आहे. भविष्यात हे विद्यार्थी डिजिटल शेती करिता कुशल मनुष्यबळ म्हणुन आपले मोलाचे योगदान देणार आहेत. नुकतेच अमेरिकेतील चार नामांकित विद्यापीठांशी परभणी कृषि विद्यापीठांने सामजंस्य करार केले असुन दोन संशोधक प्राध्यापक अमेरिकेत प्रशिक्षण पुर्ण करून आले आहेत, लवकरच काही विद्यापीठ प्राध्यापक व संशोधक यांनाही पाठविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थीची दुसरा गट थायलंड, मलेशिया व स्पेन येथील नामांकित शैक्षणिक संस्थेत पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सदर विद्यार्थ्यांना पाठविण्यात करिता कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रिका डॉ दिपाराणी देवतराज, प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, डॉ उदय खोडके, डॉ राजेश क्षीरसागर, डॉ जया बंगाळे आदीसह विभाग प्रमुख, नाहेप प्रकल्पातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.