Public Relations Officer,
Directorate of Extension Education,
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth,
Parbhani - 431 402 (M.S.)
(Maharashtra) INDIA
Pages
▼
Sunday, March 5, 2023
वनामकृवित शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली वर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि भारतीय कृषि सांख्यिकी
संशोधन संस्था, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नाहेप प्रकल्पांतर्गत शैक्षणिक
व्यवस्थापन प्रणाली यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २८ फेब्रुवारी व १
मार्च रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि अध्यक्षतेखाली
संपन्न झाले, यावेळी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे
कुलगुरू मा डॉ. प्रशांतकुमार पाटील, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन
संस्थेचे प्रमुख डॉ. सुदीप मारवाह, आयटी सल्लागार डॉ.
आर.सी. गोयल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इंद्रा मणी म्हणाले की,ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली मुळे विद्यापीठाच्या
शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार असुन विविध शैक्षणिक प्रक्रिया स्वयंचलित होणार
आहेत. यामुळे विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार असुन वेळेची आणि
श्रमाची बचत होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबविण्यास
मोठा हातभार लाभणार आहे. यावेळी कुलगुरू मा डॉ. प्रशांतकुमार पाटील
यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
डॉ सुदिप मारवाह म्हणाले की, शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीमुळे सर्व शैक्षणिक
कार्य वेळेत पुर्ण होऊन विद्यार्थ्यीचे विविध अभ्यासक्रमातील प्रवेशापासुन ते
पदवी अभ्यासक्रम पुर्ण होई पर्यंत सर्व माहिती प्रणालीत अद्यायावत होणार आहे, यात अभ्यासक्रम व्यवस्थापन,विद्यार्थी व्यवस्थापन,विद्याशाखा व्यवस्थापन,ई लर्निंग आणि ऑनलान शुल्क संकलन याचा
समावेश असुन यामुळे विद्यापीठाची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. याचा लाभ
विद्यार्थ्यांना होणार आहे.
मार्गदर्शनात डॉ. आर. सी. गोयल म्हणाले की, ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली माध्यमातून संस्थेची प्रत्येक शैक्षणिक माहिती विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासक यांना एका क्लिकवर कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होणार
आहे डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाने शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली करिता विद्यापीठ
करित असलेलया कार्याची माहिती दिली.
दोन दिवसातील तांत्रिक सत्रात डॉ. आर. सी. गोयल,
श्रीमती रजनी गुलिया आणि श्रीमती निशा यांनी शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एएमएस),
ऑनलाईन शिक्षण प्रणाली, ई-लर्निंग आदीबाबत मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रणजित
चव्हाण यांनी केले तर मुख्य अन्वेषक डॉ. गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्पातील उपक्रमांची
माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. रविंद्र
शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे,
डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. जे. ई. जहागीरदार,
डॉ. एस. डी. बांतेवाड, डॉ. आर. डी. अहिरे,
डॉ. बी. व्ही. आसेवार, डॉ. के. आर. कांबळे,
डॉ. आर. बी. क्षीरसागर आदीसह
प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.
समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे
वितरण करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली कक्षाचे उदघाटन
करण्यात आले.