वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन
केंद्रास अन्नदाता पुरुष बचत गट, प्रकाशवाट शेतकरी उत्पादक कंपनी, आजेगाव, यशोधरा बचत गट, शिंदेफळ,
सावित्रीबाई फुले महिला बचत गट, भिमक्रांती महिला
बचत गट, पळशी तसेच वाघजडी ता. शेनगाव जिल्हा
हिंगोली येथील ६० महिला व पुरुष शेतकऱ्यांनी
भेट दिली. हे सर्व शेतकरी विद्यापीठातील
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशु शक्तीचा योग्य वापर विभागाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण व मूल्यवर्धन दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम व सुधारित शेती अवजाराचे
हस्तांतरण कार्यक्रमासाठी दि. २७ मार्च रोजी
आले होते. भेटी दरम्यान
केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी शेतकऱ्यांची रेशीम
प्रक्षेत्रास भेट आयोजित करून त्यांना तुती लागवड तंत्रज्ञान, तुतीपासून ग्रीन चहा,
तुती फळापासून जाम, साबण, वाईन इत्यादी वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
