वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या गृहविज्ञान
महाविद्यालय व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा
(आत्मा) यांच्या
संयुक्त विद्यमाने धर्मापुरी येथे महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यशाळाचे नुकतेच
आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत महिला विकास व जबाबदा-या,
मानसिक स्वास्थाची जपवणुक, बालविकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी
महिलांचे काबाडकष्ट कमी करण्याचे तंत्रज्ञान, उद्योजकता विकासाकरिता कपडयावरील
बांधणीकाम, हस्तकलेच्या कलाकृती आदी विषयावरील कार्यानुभवातुन प्रशिक्षण देण्यात
आले. यावेळी कार्यशाळेत उपयुक्त ज्ञान कौशल्य प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया
सहभागी महिलांनी व्यक्त केली. कार्यशाळेत गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या
प्रा विशाला पटनम, प्रा निता गायकवाड, संगीता नाईक, संध्या अदमनकर आदी साधनव्यक्तींनी
मार्गदर्शन केले. कार्यशाळे यशस्वीतेसाठी प्राचार्या प्रा विशाला पटनम यांच्या मार्गदर्शनाखाली
मनिषा क-हाळे, संगिता नाईक आदीं परिश्रम घेतले तर होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ.
संजय टाकळकर, सरपंचा श्रीमती शारदाताई कदम, उपसरपंच श्री धाराजी उगले आदीसह गावकरी
मंडळीचे सहकार्य लाभले.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼
Friday, April 29, 2016
Tuesday, April 26, 2016
अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत मौजे धोंडी येथे आळंबी उत्पादनाबाबत मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठांतर्गत असलेल्या
परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आंळबी
उत्पादन केंद्राच्या वतीने दिनांक 22 एप्रिल रोजी मौजे धोंडी येथे आळंबी उत्पादनाबाबत
मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री बाळासाहेब
शिंदे हे होते तर गावातील प्रतिष्ठीत नागरिक श्री प्रभाकरराव बुचाले हे प्रमुख पाहुणे
म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमात आंळबीचे उत्पादन तंत्रज्ञान, पोषणमुल्य व त्याचे
आहारातील महत्व आकाश पी व स्वाती कांगणे यांनी माहिती सांगितले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन अनुराधा बुचाले हिने तर आभार प्रदर्शन विजय घाटोळ यांनी केले. कार्यक्रमास
गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. ेंद्राच्या
्गत अनुभव तर्गात कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग
प्रमुख डॉ के टी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दहातोंडे, प्रशांत गिते,
अरूणकुमार कठाळे, सुरेश चौरे, रत्नप्रकाश लोखंडे, सुमित तुमोड, सुभाष इरतकर,
ज्ञानेश्वर सुरसेटवाड, जगन्नाथ निकम, कल्पना राठोड, नेहा गरूड, अश्विनी जगताप,
जयश्री अंभोरे, जॉन के पी, योगेंद्र बनसोड, भारत खेलबाडे, मुकेश मिना, गोरख देवरे,
अतुल्या नायर, श्रीलक्ष्मी, माधव पवार, अजित गावडे, गजानन शिंदे, बालाजी
बोयेवार, प्रमोद पुंडगे, यशवंत देवरे आदींनी परिश्रम घेतले.
Monday, April 25, 2016
कुंभकर्ण टाकळी येथे शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या गृहविज्ञान
महाविद्यालय व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा
(आत्मा) यांच्या
संयुक्त विद्यमाने टाकळी कुंभकर्ण येथे महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यशाळाचे दिनांक
21 व 22 एप्रिल रोजी करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत महिला विकास व
जबाबदा-या, मानसिक स्वास्थाची जपवणुक, बालविकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात
आले. तसेच शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्याचे तंत्रज्ञान, उद्योजकता
विकासाकरिता कपडयावरील बांधणीकाम, हस्तकलेच्या कलाकृती आदी विषयावरील
कार्यानुभवातुन प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यशाळेत उपयुक्त ज्ञान कौशल्य
प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया सहभागी महिलांनी व्यक्त केली. कार्यशाळेत
गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा विशाला पटनम, डॉ जयश्री झेंड, प्रा
निता गायकवाड, डॉ जया बंगाळे आदी साधनव्यक्तींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळे
यशस्वीतेसाठी प्राचार्या प्रा विशाला पटनम यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषा
क-हाळे, संध्या अदमनकर, मंजुषा रेवणवार, संगिता नाईक आदीं परिश्रम घेतले तर सरपंच
विनायक सामाले, उपसरपंच श्यामाबाई कांचगुंडे आदीसह गावकरी मंडळीचे सहकार्य लाभले.
Tuesday, April 19, 2016
प्रगतशील शेतक-यांच्या शेतावर विद्यार्थ्यांनी गिरवीले आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे
अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत मौजे
जिंतुर तालुक्यातील केहाळ येथील कृषिभुषण श्री. मधुकरराव घुगे यांच्या शेतीला विद्यार्थ्यांची भेट
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील
कृषिविद्या विभागातील विद्यार्थ्यांची उन्हाळी
भुईमुग बिजोत्पादन तंत्रज्ञान या अनुभवातुन शिक्षण
कार्यक्रमांतर्गत अभ्यासदौ-याच्या माध्यमातुन
दिनांक ५ एप्रिल रोजी मौजे जिंतुर तालुक्यातील केहाळ येथील कृषिभुषण
श्री. मधुकरराव घुगे यांच्या शेताला भेट दिली.
नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब
करुन भुईमु्गाचे विक्रमी
उत्पादन श्री. मधुकरराव घुगे हे मागील
सोळा वर्षापासुन घेत आहेत. सद्य दुष्काळ परिस्थितीतही आधुनिक तंत्रज्ञानाच्या
अवलंब करून जमीनीची योग्य मशागत व तुषार सिंचनाचा योग्य वापरच्या आधारे भुईमुगाची उगवण व वाढ
एकसारखी दिसुन आली, २२ एकरावर टॅग ५७ व टॅग ४१ भुईमुगाच्या जाती घेतलेल्या असुन ब-यापैकी उत्पादन अपेक्षीत असल्याचे त्यांनी
सांगितले. अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत सदरिल विद्यार्थ्यांनी देखिल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषिविद्या विभागामध्ये
भुईमुगाचे बिजोत्पादन घेतले आहे, त्यात इक्रीसॅट पध्दतीने रुंद सरी वरंबा पध्दत, सरी वरंबा पध्दत व सर्वसाधारण
शेतकरी अवलंबीत असलेल्या सारा पध्दत या तीन्ही प्रकारे अभ्यास करण्यात येत
आहे. या अभ्यासक्रमाचा भाग म्हणुन अभ्यासदौ-याचे आयोजन प्राचार्य डॉ. डी. एन.
गोखले, डॉ. पी. के. वाघमारे, डॉ.
जयश्री एकाळे व डॉ.
प्रविण कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
Monday, April 18, 2016
गृहविज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची रौप्यमहोत्सवी जयंती उत्साहात साजरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातंर्गत असलेल्या गृहविज्ञान महाविद्यालय व वर्षा मुलींचे वसतीगृहात
दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रौप्यमहोत्सवी
जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.
विशाला पटणम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे
पुजन करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत
देशाच्या जडणघडणीतील योगदान व घेतलेले कठोर परिश्रम याबाबत प्रा. विशाला पटणम
यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर
आधारीत डॉ. बी. आर. आंबेडकर हा चित्रपट उपस्थितांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे
नियोजन प्रा. निता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,
कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Friday, April 15, 2016
वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी
Tuesday, April 12, 2016
वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योेतिबा फुले यांच्याे संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्यासमालिका
वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्यासमालिकेचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्यात आले होते, या अभ्यासमालिकेचे उदघाटन सहयोगी अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. अठरा तास अभ्यासवर्गाच्या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. व्ही. जी. मुळेकर, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. जे. व्ही. एकाळे, डॉ. एस. एल. बडगुजर, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. जी. पी. जगताप, डॉ. ए. टि. शिंदे, डॉ. एस. जी. नरवाडे, प्रा. एन. एम. तांबोळी, डॉ. पी. के. वाघमारे, डॉ मीना वानखडे, श्री चंद्रशेखर नखाते आदिसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महीवाल यांनी केले गृह विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
गृह विज्ञान महाविद्यालयाच्या जिमखान्याच्या वतीने
पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासावर एक दिवसीय कार्यशाळेचे
दि. ५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. परभणी जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा. श्री
राहुल रंजन महीवाल यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासासाठी आणि स्पर्धा
परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. कार्यशाळेत
प्राचार्य प्रा. विशाला पटनम यांनी विद्यार्थ्यांना सदरिल मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे
आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्षा प्रा. सुनीता काळे
यांनी केले. कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यां मोठया संख्येने सहभागी झाले
होते.
Monday, April 11, 2016
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या शेतकरी हिताच्या अनेक संकल्पना आजही उपयुक्त.......प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुळेकर
वनामकृविच्या कृषि महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य व्याख्यानाचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी मांडलेल्या अनेक तत्वांचा
अभ्यास जगात केला जातो. यावर्षी युनोमध्ये डॉ. बाबासाहेब यांची १२५ वी जयंती
पहिल्यांदाच साजरी करण्यात येणार आहे. शेतक-यांच्या शोषणाबाबत परखड विचार
मांडुन शेतक-यांच्या समस्या व त्यावरील उपाय यावर त्यांनी अभ्यासपुर्ण मते
मांडली, त्या आजच्या परिस्थितीतही उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. प्रल्हाद
लुळेकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या
वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीचे औचित्य साधुन औरंगाबाद येथील प्राध्यापक डॉ प्रल्हाद लुळेकर यांच्या व्याख्यानाचे
आयोजन दिनांक ७ एप्रिल रोजी करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी
परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, विभाग प्रमुख
डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. राकेश अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राध्यापक डॉ प्रल्हाद लुळेकर पुढे म्हणाले की, लहान
शेतक-यांना शेतसारा लावु नये, निराधारांना पेन्शन योजना, पाणी प्रश्नावर नदीजोड प्रकल्प,
अश्या शेतकरी हिताच्या अनेक संकल्पना त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी मांडल्या. शेतक-यांची
मुले भविष्यात अधिकारी झाले पाहिजेत. देशाचे पहिले पाटबंधारे मंत्री असतांना त्यांनी
दामोधर व्हॅली व भाक्रानानगल योजना पुर्ण केल्या. पाणी आडवुन शेतीस पाणी देणे,
पाण्याव्दारे वीज निर्मीती, धरणांच्या ठिकाणी पर्यटनस्थळांची निर्मीती,
जलवाहतुक आदी उदिष्टे धरण बांधतांना विचारात घ्यावीत असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतक-यांचे प्रश्न सोडविले नाहित तर शेतकरी आत्महत्या करतील असे भाकित महात्मा
फुले यांनी केले होते.
अध्यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यार्थ्यांनी
महाविद्यालयीन जीवनात जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाकरिता दयावा, हीच बाबासाहेबांना आदरांजली असेल असा सल्ला
विद्यार्थ्यांना दिला. कार्यकारी परिषदेचे माननीय सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले
यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवराज घाटुळ यांनी तर आभार प्रदर्शन विशाल
राठोड यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Wednesday, April 6, 2016
कृषि पदवीधरांनी शेतक-यांत उमेद जागृतीचे कार्य करावे......प्राचार्य डॉ डि एन गोखले
परभणी कृषि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ धर्मराज गोखले |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी येथील कृषि
महाविद्यालयाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे आयोजन तृतीय
वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने दिनांक ६ एप्रिल रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ धर्मराज गोखले
हे होते तर जिमखाना उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ विलास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन
उपस्थित होते, व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ एस एल बडगुजर
यांनी प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले
की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यीचे व्यक्तीमत्व घडत असते, विशेषत: आत्मविश्वास
वाढीस लागतो. परभणी कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी राज्यात संशोधक, प्राध्यापक,
प्रशासक, लोकप्रतिनिधी तसेच खाजगी क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत, कोणत्याही
क्षेत्रात कार्य करतांना शेतक-यांत उमेद जागृतीसाठी कृषि पदवीधरांना कार्य करावे, असा
सल्ला त्यांनी यावेळी दिला. जिमखाना उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ व्ही डी पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, महाविद्यालयीन
काळात अनेक बरे-वाईट प्रसंग येत असतात, या चार वर्षाच्या काळात आपल्यात चांगला
बदल घडवुन आपला व्यक्तीमत्व विकास विद्यार्थ्यांनी करावा.
कार्यक्रमात तुकाराम मंत्रे, उर्मिला दरडा, मीरा आरगड,
विशाल राठोड, शंकर अभंगे, प्रियंका खर्चे आदींनी आपले महाविद्यालयातील अनुभव
सांगितले तर विद्यार्थ्यीनी कु अथिरा हिने कथ्थक नृत्य सादर केले. याप्रसंगी
दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी मदतनिधीचे विद्यार्थ्यांच्या वतीने संकलन करण्यात
आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एस एल बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब
ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन सुप्रिया जाधव, प्रीती वायकुळे, स्वप्नील भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, केदार बारोळे, संभाजी सास्ते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीवेसाठी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित
होते.
मार्गद र्शन करतांना जिमखाना उपाध्यक्ष डॉ विलास पाटील |
Friday, April 1, 2016
महाराष्ट्राचे काळे सोने म्हणुन उस्मानाबादी शेळीचे संवर्धन होणे आवश्यक आहे.... कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
“मराठवाड्यातील शेळी मेंढी संगोपन : भविष्यवेध” या विषयावर एक दिवशीय
प्रशिक्षण संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालनालय व कृषि महाविद्यालयाचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत “मराठवाड्यातील शेळी मेंढी
संगोपन : भविष्यवेध” या विषयावर शेतकरी
पशुपालक, अधिकारी-कर्मचारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३०
मार्च रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ.
बी. व्यंकटेश्वरलू हे होते तर कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवण, संशोधन
संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शर्मीला माजी, कृषी
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीधर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
आपल्या भाषणात म्हणाले की, मराठवाड्यात प्रसिध्द असलेली उस्मानाबादी शेळी व्यवसाय
हा अल्पभुधारक शेतकरी व कष्टक-यांना आर्थिक स्त्रोताचे महत्वाचे साधन असुन
महाराष्ट्राचे काळे सोने म्हणुन उस्मानाबादी शेळीचे संवर्धन व वृध्दी होणे
आवश्यक आहे. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी शेतकरी पशुपालकांना शेतीशी निगडीत
शेळी व मेंढी पालन करण्याचे आवाहन केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले
यांनी आपल्या भाषणात चविष्ठ मांसासाठी प्रसिध्द असलेली उस्मानाबादी शेळी ही
मराठवड्यासाठी वरदान असल्याचे सांगितले. प्रशिक्षणास मराठवाड्यातुन ८५ शेतकरी
पशुपालकासह कृषि विभागाचे दहा अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणात शेळी मेंढी
अनुवंश सुधारणा, शेळी पालनाचे अर्थशास्त्र, करडांचे संगोपन, शेळीपालन आणि भविष्यवेध,
शेळीचे आरोग्य या विषयावर डॉ. धनंजय देशमुख, डॉ. माणिक धुमाळ, डॉ. एम. एफ. सिध्दीकी,
डॉ. आनंदराव पवार, डॉ. रेणुकादास बारबिंड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अनंत
शिंदे तर आभार प्रदर्शन प्रा. दत्ता बैनवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शंकर
नरवाडे, प्रा. नरेंद्र कांबळे, श्री प्रभाकर भोसले, श्री माधव मस्के, श्री नामदेव
डाळ आदीसह पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थींनी परिश्रम घेतले.
कृषि पुरक व्यवसायातुन शेतक-यांत आर्थिक स्वावलंबन शक्य...... कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
‘मराठवाड्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय : दिशा व आशा’ या विषयावर एक दिवशीय
प्रशिक्षण संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालनालय व कृषि महाविद्यालयाचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ‘मराठवाड्यातील पशुधन व दुग्ध
व्यवसाय : दिशा व आशा’ या विषयावर शेतकरी पशुपालक व कृषी विस्तारक यांचे एक दिवशीय प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २९ मार्च रोजी करण्यात आले होते. प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते संपन्न
झाले तर कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवण, संचालक विस्तार शिक्षण डॉ.
बाळासाहेब भोसले व प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीधर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
अध्यक्षीय भाषणात महणाले की, ज्या शेतक-यांकडे शेती पुरक जोड व्यवसाय आहे, ते
निश्चितच दुष्काळी परिस्थितीत काही प्रमाणात तग धरून आहेत. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
या कृषि पुरक व्यवसायातुन शेतक-यांत आर्थिक स्वावलंबन शक्य होईल, अशी आशा त्यांनी
यावेळी व्यक्त केली. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी शेतकरी पशुपालकांना
दर्जेदार पशुपालन जोपासण्याचे आवाहन केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले
म्हणाले की, शेतक-यांनी खचुन न जाता शेतीशी निगडीत असलेला पशुसंवर्धन व्यवसाय
करुन शेतीला आर्थिक पाठबळ द्यावे.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
मराठवाड्यातुन ७० शेतकरी पशुपालकासह कृषि विभागातील दहा अधिकारी-कर्मचारी उपस्थित
होते. प्रशिक्षणात पशु अनुवंश सुधारणा, पशु प्रजनन, पशु आहार, व्यवस्थापन व पशु
आरोग्य या विषयावर डॉ. अनिल भिकाणे, डॉ. भास्कर बोरगांवकर, डॉ. श्रीधर शिंदे व
डॉ. नितीन मार्कण्डे, डॉ. विनायकराव कल्लुरकर व डॉ. महादेव पाचेगांवकर यांनी
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे
यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अनंत शिंदे तर आभार प्रदर्शन डॉ. शंकर नरवाडे यांनी
केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दत्ता बैनवाड, प्रा. नरेंद्र कांबळे, श्री
प्रभाकर भोसले, श्री माधव मस्के, श्री नामदेव डाळ आदीसह पदव्युत्तर व आचार्य
पदवीचे विद्यार्थीनी परिश्रम घेतले.
वनामकृविच्या माती परिक्षण प्रयोग शाळेव्दारे १०३६ शेतक-यांच्या मातीचे परिक्षण
दिनांक ५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मृदा दिनी प्रतिनिधीक स्वरूपात मृदा आरोग्य पत्रिकेचे वापट करतांना |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या माती परिक्षण
प्रयोगशाळेव्दारे २०१५ - १६ यावर्षात मृदा आरोग्य जागृती अभियान राबवुन जिल्हयातील ३७ विविध गावात शिबीर
आयोजीत करुन १०३६ मातीचे प्रतिनिधीक नमुणे गोळा करुन माती परिक्षण अहवाल शेतकऱ्यांना सादर करण्यात
आले. सदरील शिबीरात शेतकऱ्यांना माती परिक्षण अहवाला प्रमाण पिकांस योग्य खतांची
मात्राची शिफारसी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ. व्हि. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अे. एल. धमक व श्री सय्यद जावेद जानी यांच्यासह विभागातील सर्व
अधिकारी-कर्मचारी व संबंधीत गावातील गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.