Tuesday, January 28, 2014

जिल्‍हास्‍तरीय निबंध स्‍पर्धेत परभणी कृषि महाविद्यालयाचा अनिकेत पाटील प्रथम


निवडणु‍कीच्‍या पार्श्‍वभुमीवर मतदारात जागृती निर्मितीसाठी दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रिय मतदार दिनाचे औचित साधुन परभणी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वतीने मतदानाचा हक्‍क बजवा, लोकशाही वाचवा याविषयावर जिल्‍हास्‍तरीय निबंधस्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. यात जिल्‍हयातील विविध शैक्षणिक संस्‍थेच्‍या शाळा व महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्‍यानी सहभाग नोंदवीला होता. यामध्‍ये परभणी कृषि महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थ्‍यी अनिकेत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍त दि 26 जानेवारी जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा महसुल राज्‍यमंत्री मा ना श्री सुरेशरावजी धस यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला, याप्रसंगी जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी प्रताप सिंह व जिल्‍हा पोलिस अधिक्षक मा श्री संदिप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिकेत पाटील यांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बालाजी भोसले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील व सांस्‍कृतिक समन्‍वयक प्रा संदीप बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.

Sunday, January 26, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य क्रीडा मैदानावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) मा डॉ विश्‍वास शिंदे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला. मा डॉ विश्‍वास शिंदे आपल्‍या मार्गदर्शनपर भाषणात म्‍हणाले की, देशाची वाढती लोकसंख्‍येच्‍या अन्‍न व पोषण सुरक्षा साध्‍य करण्‍यासाठी कृषि विद्यापीठाची भुमिका महत्‍वाची आहे. विद्यापीठाने मनुष्‍यबळाची कमतरता असतांना देखिल कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यात चांगले कार्य केले असुन विद्यापीठाकडुन शेतकरी, विद्यार्थी व समाजाची मोठया अपेक्षा आहेत, त्‍यासाठी सर्वानी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे, असा संदेश देऊन सर्वांना प्रजासत्‍ताक दिनांच्‍या शुभेच्‍छा दिला. याप्रसंगी विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे तसेच विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता, विभागचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

परभणी येथील कृषि महाविद्यालयाचा ध्‍वजारोहण

.

प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या प्रागंणात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बी बी भोसले यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला. याप्रसंगी विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Saturday, January 25, 2014

नुतन कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु यांचे 'कृषि व हवामान बदल' यावरील अभ्‍यासपुर्ण व्‍याख्‍यान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु यांचे दि 16-17 नोव्‍हेबर, 2011 रोजी नवी दिल्‍ली येथे आयोजीत साउथ एशिया मेडिया ब्रीफींग कार्यशाळेतील 'कृषि व हवामान बदल' यावरील अभ्‍यासपुर्ण  व्‍याख्‍यान 

Friday, January 24, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कुलगूरूपदी मा डॉ बी वेंकटेश्वरलू

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहु संशोधन संस्‍थेचे (क्रीडा) संचालक मा डॉ बी वेंकटेश्‍वरलू यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दि 23 जानेवारी रोजी कुलपती या नात्‍याने महा‍राष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल श्री के शंकरनारायणन यांनी ही नियुक्‍ती केली आहे. यासंदर्भात राजभवनातुन विद्यापीठाच्‍या कुलसचिव कार्यालयास दि 23 जानेवारी रोजी कळविण्‍यात आले.
      मा डॉ बी वेंकटेश्‍वरलू हे मुळचे आंध्र प्रदेश राज्‍यातील असुन सन 2006 पासुन ते भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत असलेल्‍या हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍थेचे संचालक आहेत. जिरायत शेती व वातावरणातील बदल हा त्‍यांचा संशोधनाचा विषय असुन ते मृद सुक्ष्‍मजीवशास्‍त्र विषयातील डॉक्‍टरेट आहेत. 1976 मध्‍ये हैद्राबाद येथील इक्रीसॅट या संस्‍थेत सहयोगी संशोधन म्‍हणुन संशोधन कार्यास सुरूवात केली. ते 1977 मध्‍ये भारतीय कृषि संशोधन सेवेत रूजु झाले. अनेक देशांना त्‍यांनी शास्‍त्रज्ञ या नात्‍याने व्‍दीपक्षीय कार्यक्रमांतर्गत भेटी दिल्‍या असुन त्‍यांची अनेक संशोधन लेख आंतरराष्ट्रिय व राष्ट्रिय पातळी वर प्रकाशित झालेले आहेत. मा डॉ बी वेंकटेश्‍वरलू लवकरच कुलगुरूपदी रूजु होणार असल्‍याचे कुलसचिव श्री का वि पागिरे यांनी सांगितले.
For English news release please see read more  

Thursday, January 23, 2014

जगात देश महिला अत्‍याचारात चौथ्‍या क्रमांकावर...... मा डॉ आशाताई मिरगे



जगात देश महिला अत्‍याचारात चौथ्‍या क्रमांकावर असुन महिलांनी ठरविल्‍यास महिलावरील अत्‍याचार कमी होऊ शकतात, असे प्रतिपादन राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या मा डॉ आशाताई मिरगे यांनी केले, त्‍या परभणी जिल्‍हा पोलीस दल व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या वतीने संयुक्‍त विद्यमाने आयोजित युवतींच्‍या समस्‍यांवर आधारीत गर्भापासुन सरणापर्यंत याविषयावरील व्‍याख्‍याना प्रसंगी बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा पोलीस अधिक्षक मा श्री संदीप पाटील हे होते तर प्रमुख अथिती म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, सहायक पोलीस अधिक्षक श्री अशोक प्रणव, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम,  नुतन महिला महाविद्यालयाचे डॉ अविनाश सरनाईक, शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम टी मुलगीर व शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
      त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, युवतींना स्‍त्री भ्रुण हत्‍या, बालविवाह, जन्‍मभर असमानता, हुंडाबळी, कौटुंबिक हिसांचार याचा आयुष्‍यभर सामाना करावा लागतो. अनेक कायदे, यंत्रणा निर्माण केल्‍या तरी हे अत्‍याचार कमी होणार नाहीत, त्‍यासाठी प्रत्‍येक स्‍त्रीने निश्‍चय केला पाहीजे. संसार जपत महिलांना या अत्‍याचारास विरोध करता आला पाहिजे. महिलांना आपला हक्‍क गाजवायचा आहे, परंतु पुरूष दुश्‍मन झाले नाही पाहिजे याची काळजी घावी लागेल. याप्रसंगी त्‍यानी कौटुंबिक अत्‍याचार कायदा 2005 तसेच विविध स्‍त्री सुरक्षेसाठीच्‍या कायदयाची माहिती दिली. 
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ अनुजा डावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस अधिकारी श्री जैतापुरकर यांनी केले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यींनी, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दालनास केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांची भेट


बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दालनास केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांनी भेट देऊन पिकांच्‍या विविध वाणांची चौकशी केली. 
भारतीय कृषि संशोधन परिषद, बारामती कृषी विकास प्रतिष्‍ठान यांच्‍या तर्फे दि 18 ते 20 जानेवारी दरम्‍यान बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रामध्‍ये देशातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या संचालकांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यानिमित्‍त अखिल भारतीय कृ‍षी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यात देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन संस्‍थांनी सहभाग घेतला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा श्री संजीव जयस्‍वाल, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली दालन उभारण्‍यात आले होते. यात विद्यापीठाने विकसित केलेले वाण, तंत्रज्ञान, पिकांचे व बियांणाचे नमुने, प्रक्रिया पदार्थ, सोयाबीन दुध, नोनी रस ठेवण्‍यात आला होता. दालनास मा ना श्री शरदचंद्रजी पवार, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, विविध वि‍द्यापीठांचे कुलगुरू, संचालक आदींनी भेट दिली. विद्यापीठाने विकसित केलेल्‍या ज्‍वारी, चिंच, तुर, सोयाबीन दुध प्रक्रियेबाबत माहिती घेतली. विद्यापीठाच्‍या दालनाचे मुख्‍य आकर्षण तुर बीडीएन 711 हे होते, याबाबत मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांनी विशेष चौकशी केली.
याप्रदर्शनाचे उदघाटन राष्‍ट्रपती मा ना श्री प्रणव मुखर्जी यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार, कृषी राज्‍यमंत्री मा ना श्री चरणदास महंत, मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, कृषि व पणन मंत्री मा ना श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयातर्फे श्री वैजनाथ सातपुते व डॉ किशोर झाडे यांनी दालनाची माहिती दिली.

Wednesday, January 22, 2014

एलपीपी स्‍कुलच्‍या टॅलेन्‍ट शोमध्‍ये चिमुकल्‍यांनी दाखविली चुणूक


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागाच्‍या एलपीपी स्‍कुलच्‍या वतीने दि 21 ते 23 जानेवारी दरम्‍यान टॅलेन्‍ट शोचे आयोजन करण्‍यात आले असुन दि 21 जानेवारी रोजी ब्रीज सेक्‍शन, ब्‍लू फलॉवर्स व ग्रीन फलॉवर्स सेक्‍शनच्‍या विद्यार्थ्‍यानी देशभक्‍तीपर समुह नृत्‍य, शेतकरी नृत्‍य, मुल्‍य संवर्धन, पर्यावरण संवर्धन अशा नाविण्‍यपुर्ण विषयांवरील नाटिका, लेझीम, फॅशन शो, समुह गाणी, भाषणे यासारख्‍या कलागुणांचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या की, बालकांच्‍या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भुमिका महत्‍वाची असुन त्‍यांची बालवयातच विशेष काळजी घ्‍यावी.  पर्यावरणावर पॉलीथीनच्‍या वापरामुळे मोठा दुष्‍परिणाम होत असुन त्‍यामुळे मानवाच्‍या आरोग्‍यावर ही मोठा परिणाम होत आहे, त्‍याच्‍या वापर न करण्‍याची शपथ सर्वाना याप्रसंगी त्‍यांनी घ्‍यायला लावली. कार्यक्रमात विद्यार्थ्‍याच्‍या वाढांक व बुध्‍दयांकाच्‍या आधारे जे विद्यार्थ्‍यी पात्र ठरले त्‍यांना व त्‍यांच्‍या पालकांना उत्‍कृष्‍ट पालक व उत्‍कृष्‍ट बालक पुरस्‍कारांने सन्‍मानित करण्‍यात आले. तसेच टॅलेन्‍ट शो मधील सहभागी विद्यार्थ्‍यांना उत्‍कृ‍ष्‍ट सादरिकरणाबददल प्रशस्‍तीपत्रे देण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वर्षा वाद्यमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जया बंगाळे, प्रा रमन्‍ना देसेटटी व प्रा निता गायकवाड यांच्‍या नेतृत्‍वखाली सर्व शिक्षिका, कर्मचारी, मदतनीस, विभागातील पदवीपुर्व व पदव्‍युत्‍तर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Sunday, January 19, 2014

कुंभकर्ण टाकळी ये‍थे कृषि निगडीत जोडउद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन

कुंभकर्ण टाकळी ये‍थे युवक व युवतींसाठी कृषिशी निगडीत व्‍यवसायाबाबत मार्गदर्शन करतांना वरिष्‍ठ संशोधिका प्रा निता गायकवाड व व्यासपीठावर  ग्रामपंचायत सदस्‍य राजु देशमुख व ज्ञानेश्‍वर सामाले आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातील अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पातर्फे परभणी तालुक्‍यातील कुंभकर्ण टाकळी ये‍थे युवक व युवतींसाठी कृषिशी निगडीत व्‍यवसायाबाबत मार्गदर्शन आयोजीत करण्‍यात आले होते. याप्रसंगी प्रकल्‍पाच्‍या वरिष्‍ठ संशोधिका प्रा निता गायकवाड यांनी कृषि निगडीत जोडउद्योग व्‍यवसाय जसे की सोयाबीन प्रक्रिया उद्योग, दुग्‍ध व्‍यवसाय, कोरफड जेली व ज्‍युस व्‍यवसाय याबाबतची माहिती देऊन जास्‍तीत जास्‍त युवकांनी कृषि संलग्‍न जोडव्‍यवसायाकडे वळण्‍याची काळाची गरज असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्‍य राजु देशमुख व ज्ञानेश्‍वर सामाले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यापीठातर्फे प्रकाशित कृषि विषयक विविध घडीपत्रिकेचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संशोधन सहयोगी रेश्‍मा शेख तर आभार प्रदर्शन रूपाली पतंगे यांनी केले. याप्रसंगी गावातील युवक व युवती मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍याची शैक्षणिक सहल

गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक सहली दरम्‍यान औरंगाबाद येथील जैन स्‍पाईसेस फॅक्‍ट्रीच्‍या भेटी प्रसंगी प्रा डॉ शंकर पुरी, डॉ जयश्री रोडगे व विद्यार्थ्‍यी 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍याची शैक्षणिक सहलीचे आयोजन दिनांक 11 ते 13 जानेवारी दरम्‍याण करण्‍यात आले होते. विद्यार्थ्‍याचे शैक्षणिक, औद्यागिक, संशोधनात्‍मक तसेच संवाद कौशल्‍य व बाजार व्‍यवस्‍थापन याबाबतचे ज्ञान वृंघ्दिगत होण्‍यासाठी शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्‍हणुन मराठवाडा विभागातील विविध स्‍थळांना प्रत्‍यक्ष भेटी दिल्‍या. यात औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍प, फळ संशोधन प्रकल्‍प, श्री शिवाजी संग्रहालय, अंकुर अॅपरल, जैन स्‍पाईसेस, नेक्‍सट फर्निचर, खुलताबाद येथील पैठणी व हिमरू शाल हातमाग केंद्र, पैठण येथील हायड्रोपावर प्रकल्‍प, तसेच कॉटन जिनींग व ऑईल मिल आदी ठिकाणी भेटी दिल्‍या. या शैक्षणिक सहलीचे नियोजन गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रा डॉ शंकर पुरी व डॉ जयश्री रोडगे यांनी केले.

Saturday, January 18, 2014

वाढत्‍या लोकसंख्‍येला पुरेसे अन्‍नासाठी जैवतंत्रज्ञानाची भुमिका महत्‍वाची .. शास्‍त्रज्ञ डॉ बी दिनेशकुमार

     जैवतंत्रज्ञानाचा वापर आपण विविध क्षेत्रात मोठया प्रमाणात करीत असुन वैद्यकीय क्षेत्रात अनेक आजारावरील उपाय यामुळे शक्‍य झाला आहे. स्‍टेम सेल, नॅनो पार्टीकल्‍स, प्रोबोयाटीक्‍स, जी एम पिके आदी जैवतंत्रज्ञानाचाच भाग असुन वाढत्‍या लोकसंख्‍येला पुरेसे अन्‍न पुरवण्‍यासाठी आपणास जैवतंत्रज्ञानाचा वापर करावाच लागणार आहे, असे मत हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय पोषण संस्‍थेचे उपसंचालक तथा शास्‍त्रज्ञ डॉ बी दिनेशकुमार यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि 17 जानेवारी रोजी मानवाच्‍या अन्‍न व आरोग्‍यात जैवतंत्रज्ञानाची भुमिका या विषयावर त्‍यांचे व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बी बी भोसले हे होते तर गोळेगांव कृषि महावि़द्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ विलास पाटील, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ पी एन सत्‍वधर व गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ विजया नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रत्‍येक तंत्रज्ञान वापरतांना फायदे व तोटे असतात, कोणतेही तंत्रज्ञान हे परिपुर्ण नसते. बोंडअळयामध्‍ये बी टी कापसास प्रतीकारक्षमता निर्माण होऊ नये म्‍हणुन बी टी कापसाच्‍या सभोवताली नॉन बी टी कापसाच्‍या झाडांची लागवड करण्‍याची शिफारस करण्‍यात आली होती, परंतु अधिकत्‍तर शेतक-यांनी यांचा अवलंब केला नाही. बी टी कापसामुळे देशाच्‍या कापसाचे उत्‍पादन वाढण्‍यास मदत झाली, त्‍यामुळे देशात कापसाच्‍या बाबीत पांढरी क्रांती घडुन आली. 
    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ पी आर झंवर यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, January 17, 2014

स्वामी विवेकानंद एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ......... डॉ. उदय खोडके

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात राजमाता जिजामाता व स्‍वामी विवेकानंद यांची जयंती निमित्‍त युवक दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके तर व्‍यासपीठावर महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्‍यक्ष प्रा. विवेक भोसले व विविध विभागाचे विभागप्रमुख व प्राध्‍यापक उपस्थित होते.
      कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्राचार्य खोडके म्‍हणाले, स्‍वामी विवेकानंदानी जगाला दिलेल्‍या मुल्‍यांचे अनुकरण प्रत्‍यक्ष क़ृतीतून अवलंब करणे गरजेचे आहे स्‍वामी विवेकानंदानी शिकागो येथील धर्मसंसदेत केलेल्‍या भाषणाचा उल्‍लेख करुन युवा पिढी सक्षम बनविण्‍याकरीता त्‍यांचे विचार अंगीक़त करण्‍याचे आवाहन त्‍यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांना केले. मॉ जिजामाता यांच्‍या सारख्‍या आदर्श मातांची आज देशाला गरज असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
      याप्रसंगी कु. जान्‍हवी जोशी, कु. मयुरी काळे, प्रसन्‍न पवार, इंद्रजीतसिंग, उमेश राजपुत, नवनाथ घोडके आदी विद्यार्थ्‍यांनी युव‍क दिनानिमत्‍त आपले विचार मांडले. देशाच्‍या सामाजिक आर्थिक व राजकीय उत्‍थानासाठी सर्व युवकांनी एकत्रितपणे पुढे येवून राष्‍टीय विकास साधावा असा द़ढ निश्‍चय करण्‍याचे विद्यार्थ्‍यांनी मान्‍य केले.
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभयसिंह पवार याने केले, तर आभार प्रदर्शन अनंता हांडे याने केले. कार्यक्रमाच्‍या यशस्वितेकरीता रामेश्‍वर वाघ, धनराज जाधव, अक्षय काकडे, ओंकार देशपांडे या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

कृषि अभियंत्यांना कृषि यांत्रिकीकरणाच्या संशोधन व व्यवसायात मोठी संधी ......जॉनडिअरचे वरिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी श्री. ए. राजशेखर


कृषि अभियंत्‍यांना कृषि यांत्रिकीकरणाच्‍या संशोधन व व्‍यवसायात मोठी संधी असुन कृषि यांत्रिकीकरण क्षेत्रात कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी कृषि यंत्रे व औजारे निर्मितीमध्‍ये पुढे येवून आपले योगदान द्यावे, असे आवाहन जॉनडिअर कंपनी वरिष्‍ठ तंत्रज्ञ अधिकारी श्री. ए. राजशेखर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयास दि. 17 जानेवारी 2014 रोजी कृषि यांत्रिकी क्षेत्रातील आंतरराष्‍टी्य पातळीवरील अग्रगण्‍य जॉनडिअर इंडिया कंपनीचे वरिष्‍ठ तंत्रज्ञ अधिकारी श्री.ए.राजशेखर, श्री. पंकज व श्री. विनायक बोरांगे यांनी भेट दिली. महाविद्यालयाच्‍या व्‍यवसाय सल्‍ला मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ.यु.एम.खोडके होते.
     याप्रसंगी त्‍यांनी जॉनडिअर कंपनीतर्फे कृषि अभिंयात्‍यासाठी आयोजीत देशपातळीवर टेक्‍नोचॅम्‍प 2014 स्‍पर्धाबाबत माहिती दिली. स्‍पर्धेचे नियम, अटी व कृ‍षि यांत्रिकीकरणातील सध्‍याची आव्‍हाने यांचे कंपनीतर्फे सादरीकरण करण्‍यात आले. कृषि यांत्रिकीकरणामध्‍ये तरुण संशोधकांना संधी मिळावी व त्‍यांच्‍या संशोधन कल्‍पना साकार व्‍हाव्‍या या उद्देशासाठी हया स्‍पर्धचे आयोजन करण्‍यात आले असुन स्‍थानिक पिक पध्‍दतीच्‍या गरजा लक्षात घेवून क़षि औजारे निर्मितीबाबत आपल्‍या संकल्‍पना मांडण्‍याची संधी कृषि अभियांत्‍याना मिळणार आहे, यात विद्यार्थ्‍यांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन जॉनडिअरच्‍या अधिका-यांनी केले. तसेच प्रत्‍यक्ष चर्चेद्वारे विद्यार्थ्‍यांची संशोधन दृष्‍टी व विचार पडताळून पाहिले.
कृषि क्षेत्राच्‍या प्रगतीमध्‍ये भविष्‍यात कृषि यांत्रिकीकरणावर जास्‍त भर राहणार असुन कृषि यांत्रिकीकरणातील आव्‍हाने पेलण्‍यासाठी कृषि अभियंत्‍यांनी पुढे येण्‍याची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्‍याना आवश्‍यक मार्गदर्शन महाविद्यालयाकडून करण्‍यात येईल, असे आश्‍वासन सहयोगी अधिष्‍ठाता डॉ.यु.एम.खोडके यांनी दिले. या निमित्‍ताने जॉनडिअर कंपनीतर्फे देशपातळीवर उत्‍कृष्‍ठ कृषि अभियंते निवडण्‍यासाठी या महाविद्यालयामध्‍ये निय‍मीतपणे व्‍यवसाय मार्गदर्शन व निवड मुलाखती आयोजीत करण्‍यात येतील असे अधिका-यांनी स्पष्‍ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयाचे व्‍यवसाय मार्गदर्शन व सल्‍ला केंद्राचे अधिकारी डॉ.जी.यु.शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. पोटेकर, प्रा. आवारी, प्रा. भुईभार, डॉ. स्‍मीता खोडके, प्रा. मुंडे, प्रा. जाधव, प्रा.शिंदे, प्रा. टेकाळे, प्रा. राउतमारे, श्री. राउत व विद्यार्थ्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला.

Sunday, January 12, 2014

विविध स्‍पर्धापरिक्षेत यशस्‍वी झालेल्‍या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पदवीधरांचा सत्‍कार समारंभ संपन्‍न

 मार्गदर्शन करतांना नांदेड महानगर पालिकेचे अप्‍पर आयुक्‍त तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मा श्री रामजी गगरानी
मार्गदर्शन करतांना नांदेडचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री दिलीपजी स्‍वामी
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या व विविध स्‍पर्धापरिक्षांमध्‍ये विविध पदावर निवड झालेल्‍या यशस्‍वी कृषि पदवीधर व स्‍पर्धामंचाचे सदस्‍य
अध्‍यक्षीय भाषण करतांना कृषि महावि‍द्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले 
 ................................................................................
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या स्‍पर्धा मंचाच्‍या वतीने आज दि 12 जानेवारी 2014 रोजी महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या व विविध स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये विविध पदावर निवड झालेल्‍या यशस्‍वी कृषि पदवीधरांचा सत्‍कार सभारंभाचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन नांदेड महानगर पालिकेचे अप्‍पर आयुक्‍त तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मा श्री रामजी गगरानी, नांदेडचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री दिलीपजी स्‍वामी, सहायक आयुक्‍त डॉ विजयकुमार मुंढे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष श्री अमोल राठोड, प्रा पी आर झंवर, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ जे पी जगताप, श्री कनके सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठातील कृषि पदवीधर मागील तीन वर्षात विविध पदावर निवड झालेले साधारणता 300 गुणवंताच्‍या सत्‍कार समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. यात राज्‍यसेवा परिक्षेत यश प्राप्‍त करून उपअधिक्षक पोलिस अधिकारी, उपजिल्‍हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, पोलिस उपनिरीक्षक, कृषि अधिकारी तसेच भारतीय कृषि संशोधन सेवा, महाराष्‍ट्र वनसेवा, बॅकींग सेवा आदी मध्‍ये निवड झालेल्‍या गुणवंताचा समावेश होता.
नांदेड महानगर पालिकेचे अप्‍पर आयुक्‍त तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी श्री रामजी गगराणी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढत असुन त्‍यांचे सामर्थ्‍य समाजापुढे येत आहे. प्रशासनात ही ते आपला ठसा उमठवत आहेत, ही आनंदाची बाब आहे. आज कृषि पदवीधर विविध पदावर कार्यरत असले तरी त्‍यांची आपल्‍या मातीशी व विद्यापीठाशी जवळीकता आहे.
अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री दिलीप स्‍वामी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातील ग्रंथालय व चांगल्‍या शैक्षणिक वातावरणाचा लाभ विद्यार्थ्‍यांनी घ्‍यावा. विद्यापीठात सध्‍या कार्यरत असलेला स्‍पर्धामंच हा एक चांगला व्‍यासपीठ विद्यार्थ्‍यांना प्राप्‍त झाला असुन याचा लाभ घेऊन देश पातळीवर स्पर्धापरिक्षेत यश प्राप्‍त करू शकता. यशासाठी विद्यार्थ्‍यांनी ध्‍येय निश्‍चती, सकारत्‍मकता, दृढ आत्‍मविश्‍वास, योग्‍य नियोजन, कठीण परिश्रम, संयम व शेवटी यश असे सप्‍तपदीचे अनुकरण करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय भाषणात कृषि महावि‍द्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या मा‍नसिकेतेमध्‍ये काळाप्रमाणे आमुलाग्र बदल झाला असुन करिअरकडे वस्‍तुनिष्‍ठपणे पाहात आहेत. विद्यापीठातील पदवीधर राज्‍यातील प्रशासनात विविध पदावर काम करतांना कृषि विकासास निश्चितच प्राधान्‍य देतात. कृषि विद्यापीठाच्‍या पदवीधरांनी प्रशासनात शेतकरी केंद्रबिंदु मानुन कार्य करावे, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.
राज्‍यसेवा परिक्षेत महाराष्‍ट्रात मागासवर्गीयात प्रथम आलेले उपजिल्‍हाधिकारी अविशकुमार सोनने, जनार्धन विधाते, महाराष्‍ट्र वनसेवा परिक्षेत राज्‍यात प्रथम आलेल्‍या पुष्‍पा पवार, कृषि अधिकारी प्रशांत जाधव, पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी स्‍वामी विवेकानंद व मॉ जिजाऊ यांच्‍या जयंती निमित्‍त मान्‍यवरांच्‍या हस्‍ते त्‍यांच्‍या प्रतीमेचे पुजन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल भालेकर, दादासाहेब हाकाळे व स्‍वाती कदम हयांनी केले तर आभार प्रदर्शन देवानंद शेटे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धमंचाच्‍य सदस्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यीनी वर्ग, विविध पदावर निवड झालेले गुणवंत मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, January 11, 2014

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश दिनांक ११ व १३ जानेवारी अंशतः ढगाळ व इतर काळात स्‍वच्‍छ राहील. कमाल तापमान २५.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १२.० ते १७.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ६.० ते १४.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१.० ते ६६.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९.० ते ३४.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात दिनांक ११ व १३ जानेवारी अंशतः ढगाळ व इतर काळात स्‍वच्‍छ राहील.

कृषि सल्‍ला

पिकांचे नाव
पिकाची अवस्‍था /किड व रोग
ृषि सल्‍ला
रब्‍बी  ज्‍वार
पोटरी / निसवनी / फुलोरा अवस्‍था 
ज्‍वारीचे पीक पोटरी/निसवणी अवस्‍थेत आहे.पोटरी अवस्‍थेत ज्‍वारीचे पिकास एक संरक्षीत पाणी द्यावे. पक्षापासुन संरक्षणासाठी बेगडी पटयांचा पिकात वापर करावा.   
करडई
फांदया फुटण्‍याची अवस्‍था / मावा
करडई पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्‍याच्‍या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस १५ मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.  
हळद
कंदवाढीची  अवस्‍था 
हळदीचे पिकास नियमीत पाणी द्यावे. उघडे पडले हळदीचे कंद मातीने झाकावेत. कंद माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्‍यास फोरटे १० ची हेक्‍टरी ६ किलो जमिनीतुन द्यावे.
केळी
घड वाढीची अवस्‍था
केळीचे पिकात पिलांची कापनी नियमीत करावी. पिकास नियमीत पाणी द्यावे. केळीचे झाडास आधार द्यावा. घडातील शेवटची फणी निसवल्‍यानंतर केळफुल काढुन टाकावे.
आंबा
मोहराची अवस्‍था / तुडतुडे / भुरी
मागील आठवडयात अकाश अंशतः ढगाळ असल्‍यामुळे आंबा पिकात फळकिडे / तुडतुडे व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्‍याचे नियंत्रणासाठी किप्रोनिल २० मिली + १० ग्रॅम कार्बेडेझीन प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
अंजीर
बहार सोडण्‍याची अवस्‍था
आंबेबहारासाठी अंजीराचे बागेत ताण सोडावा बागेत वाफेबांधनी करून प्र‍तेक झाडास ३० किलो चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्‍फुरद व २७५ ग्रॅम पालास देउन पाणी द्यावे.
फुलशेती
काढणी अवस्‍था
मोगरा / काकडा फुल पिकाची छाटनी करून अंतर मशागतीचे कामे या आठवडयात पुर्ण करावीत. गुलाबाचे पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे त्‍याचे नियंत्रणासाठी पाण्‍यात विरघळणारा गंधक २५ ग्रॅम प्र‍ती १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. 
पशुधन व्‍यवस्‍थापन : शेळया मेंढयामध्‍ये तोंडाचा मावा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याच्‍यानियंत्रणासाठी तोंडाच्‍या जखमा धुवुन हिमॅक्‍स मलम लावावा. पशुवैद्यकाचे सल्‍ल्‍याने प्रति जैविक औषध देण्‍यात यावे. 

सौजन्‍य
केंद्र प्रमुख
ग्रामिण कृषि मौसम सेवा
कृषि हवामानशास्‍त्र विभाग
पञक क्रमांकः  ७४/२०१४ दिनांक  १०/०१/२०१४

Wednesday, January 8, 2014

रासेयोचे स्‍वयंसेवक विशेष साहसी क्रिडा शिबीराकरीता रवाना

रासेयो स्‍वयंसेवकांसाठी राष्ट्रिय स्‍तरावर केंद्र शासनाच्‍या युवा विकास व क्रिडा मंत्रालय अंतर्गंत यावर्षापासुन विशेष साहसी शिबीराच्‍या माध्‍यमातून साहसी नैपुण्‍य निर्माण करण्‍यासाठी शिबीर आयोजीत करण्‍यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा क़षि विद्यापीठांतर्गंत राष्ट्रिय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक हे अमरावती येथे आयोजीत हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळ साहसी क्रिडा शिबीराकरीता विद्यापीठातील कु. मयुरी काळे, कु. अश्विनी नितनवरे, संतोष दशरथे, सदाशिव भालेराव या स्‍वयंसेवकांची निवड करण्‍यात येऊन, ते रवाना झाले. स्‍वयंसेवक निवडीकरीता व रवानगीकरीता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी प्रा. महेश देशमुख यांच्‍यासह कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र शिंदे, प्रा. अनिश कांबळे प्रा.विजय जाधव, प्रा. संजय प्रवार यांनी मार्गदर्शन केले. सदरील शिबीराकरीता स्‍वयंसेवकांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ.बी.बी. भोसले व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. यु.एम.खोडके यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

Tuesday, January 7, 2014

सेलु तालुक्‍यातील ग्रामीण भागात गृ‍हविज्ञानाची भरारी

 चिकलठाणा येथे मार्गदर्शन करतांना प्रा विशाला पटनम 
ढेंगळी पिंपळगावाच्‍या महीलांना मार्गदर्शन करतांना डॉ जयश्री झें
निपाणी टाकळी येथे मार्गदर्शन करतांना डॉ प्रभा अंतवाल 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने सुरू असलेल्‍या 'गृ‍हविज्ञान आपल्‍या दारी: कुटुंबाचे कल्‍याण करी' या अभिनव उपक्रमाच्‍या दुस-या टप्‍प्‍याची सुरूवात सेलु तालुक्‍यातील ढेंगळी पिंपळगांव, निपाणी टाकळी व चिकलठाणा या गावापासुन दि 04 जानेवारी 2014 रोजी झाली. चिकलठाणा येथे प्रा विशाला पटनम यांनी 'बाल विकास व शैक्षणिक संपादणुकीसाठी कानमंत्र' व 'माता व बाल मृत्‍यूदर कमी करण्‍यासाठी कुटूंबियांची जबाबदारी' या विषयावर मार्गदर्शन केले तसेच निपाणी टाकळी येथे डॉ प्रभा अंतवाल यांनी 'कौटुंबिक आनंदी जीवनाची गुरूकिल्‍ली' या विषयी मार्गदर्शन केले तर ढेंगळी पिंपळगावाच्‍या महीलांना डॉ जयश्री झेंड यांनी 'कुटूंबाच्‍या श्रमबचतीसाठी कार्य सरलीकरणाची सुलभ तत्‍वे' विषयी माहिती देऊन शेती कामातील काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचे प्रात्‍यक्षिक दाखवले. कार्यक्रमाची सांगता प्रश्‍नोत्‍तराच्‍या स्‍पर्धाने झाली, अचुक उत्‍तरे देणा-या सहभागी व्‍यक्‍तीस 'उत्‍कृष्‍ट श्रोता' पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गावकरी मंडळी, अंगणवाडी कार्यकर्त्‍या, अखिल भारतीय संशोधन समन्‍वयक प्रकल्‍पातील सहयोगी संशोधीका ज्‍योत्‍स्‍ना नेर्लेकर, रेश्‍मा शेख व मंजुषा रेवणवार यांनी परिश्रम घेतले.

Sunday, January 5, 2014

सन 2014 कृषि दिन‍दर्शिकेचे विमोचन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयातर्फे प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या सन 2014 कृषि दिन‍दर्शिकेचे विमोचन महिला शेतकरी मेळावादिनी बारामती येथील कृषि विकास प्रतिष्‍ठानाच्‍या विश्‍वस्‍ता मा. श्रीमती सुनंदाताई पवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, यावेळी प्रभारी कुलगुरु तथा शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती आशाताई भिसे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे आदी मान्‍यवर उपस्थित होते. कृषि दिनदिर्शकेचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण हे प्रकाशक आहेत तर संपादन विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी केले असुन श्री वाय. एस. सोनवणे यांनी संपादन सहाय्य केले आहे. सदर कृषि दिनदर्शिकेत शेतक-यांना उपयुक्‍त अशी शेती विषयक शास्‍त्रोक्‍त माहिती, प्रत्‍येक महिन्‍यात करावयाची शेतीची कामे, खताचा योग्‍य वापर, पिकाविषयी किड व रोग व त्‍यावरील उपाय तसेच कै. वसंतराव नाईक माजी मुख्‍यमंत्री यांचे विषयी त्‍यांचे शेतीबद्दल व शेतक-याविषयी प्रेम यावरील समर्पक असा लेख असुन सण, वार, धार्मिक यांची माहिती दिली आहे. सदरिल कृषि दिनदर्शिका विस्‍तार शिक्षण विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे विक्रिसाठी उपलब्‍ध आहे. 

Friday, January 3, 2014

महिला शेतकरी मेळावा उत्‍साहात संपन्‍न

महिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन द्विपप्रज्वलन करून करतांना बारामती येथील कृषि विकास प्रतिष्‍ठाणाच्‍या विश्‍वस्‍त मा श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार, विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू मा डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सावि फाउंडेशन, अकलुज च्‍या अध्‍यक्षा श्रीमती सविताताई व्‍होरा, लातुर येथील महिला उद्योजिका तथा राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती आशाताई भिसे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम आदी

महिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटनापर भाषण करतांना बारामती येथील कृषि विकास प्रतिष्‍ठाणाच्‍या विश्‍वस्‍त मा श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार, व्‍यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू मा डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सावि फाउंडेशन अकलुजच्‍या अध्‍यक्षा श्रीमती सविताताई व्‍होरा, लातुर येथील महिला उद्योजिका तथा राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती आशाताई भिसे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम आदी

समारोपीय भाषण करतांना प्रभारी कुलगुरू मा विश्‍वास शिंदेव्‍यासपीठावर बारामती येथील कृषि विकास प्रतिष्‍ठाणाच्‍या विश्‍वस्‍त मा श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सावि फाउंडेशनअकलुजच्‍या अध्‍यक्षा श्रीमती सविताताई व्‍होरा, लातुर येथील महिला उद्योजिका तथा राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती आशाताई भिसे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम आदी

     आज शासनाने अनेक सवलती स्‍त्रीयांना उपलब्‍ध करून दिल्‍या, परंतु राजकारणात व समाजकारणाच्‍या निर्णय प्रक्रियेत महिला आजही सक्रिय सहभाग घेत नाहीत, सावित्रीबाई फुलेंनी समाजातील कुचेष्‍ठांना तोंड देत महिला शिक्षणासाठी मोठे कार्य केले,  असे प्रतिपादन बारामती येथील कृषि विकास प्रतिष्‍ठाणाच्‍या विश्‍वस्‍त तथा भिमथडीच्‍या संयोजिका मा श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी केले.
     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय, महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग व गृह विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतिज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक 3 जानेवारी, 2014 रोजी आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. मेळाव्याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू मा डॉ विश्‍वास शिंदे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, अकलुज येथील सावि फाउंडेशनच्‍या अध्‍यक्षा श्रीमती सविताताई व्‍होरा, लातुर येथील महिला उद्योजिका तथा म‍हाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती आशाताई भिसे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम व आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      मा श्रीमती सुनंदाताई पवार पुढे म्‍हणाल्‍या की,  सावित्रीबाई, अहिल्‍यादेवी, जिजाबाई या स्त्रियांनी विपरीत परिस्थितीत समाज घडविण्‍याचे महान कार्य केले. परंतु आज अशा महान स्त्रिया घडण्‍याची प्रमाण कमी होत आहेत. समाजाला स्‍त्री भ्रुणहत्‍याचा हिशोब द्यावा लागणार आहे. सावित्रीबाईच्‍या पावलावर पाऊल टाकुन महिलांनी पुढे जाण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
      समारोपीय भाषणात प्रभारी कुलगूरू मा डॉ विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, सावित्रीबाई फुले ह्या चुल व मूल यात गुंतून न रहाता स्‍त्री शिक्षणाचे  महान कार्य केले. संपुर्ण देशात विज्ञान, प्रशासन, उद्योग, राजकारण, समाजकारण या विविध क्षेत्रात नाविन्‍यपूर्ण काम करीत आहेत. तसेच कृषि क्षेत्रातही महिलांचा मोलाचा वाटा आहे. स्‍त्रीयांचा आर्थिक सामाजिक व राजकीय सबलीकरणासाठी अधिक कार्य करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील स्‍त्रीयांमध्‍ये बचत गटाद्वारे होणारी मोठी क्रांती होत आहे. ग्रामीण महिलांच्‍या सक्षमीकरणासाठी व उद्योजकतेचे गुण विकसीत करण्‍यासाठी विद्यापीठ सदैव प्रयत्‍नशील आहे. ग्रामीण महिलाच ख-या अन्‍नपुर्णा असुन दुस-या हरीत क्रांतीसाठी ग्रामीण महिलांचा सहभाग महत्‍वाचा आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
      अकलुज येथील सावि फाउंडेशनच्‍या अध्‍यक्षा श्रीमती सविताताई व्‍होरा आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, मुलींनी स्‍वत:चा सन्‍मान स्वत:च करायला पाहिजे, जो पर्यंत स्‍वत:चा सन्‍मान करणार नाहीत तो पर्यंत समाज तुमचा सन्‍मान करणार नाहीत. स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत करु या, स्‍त्रीभ्रूणहत्‍या बंद झाल्‍या पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करु या, अशी शपथ उपस्थितांना देवविली.
      लातुर येथील महिला उद्योजिका श्रीमती आशाताई भिसे मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या की, महिलांच्‍या पाठीवर पुरुषांनी थाप दिली तर महिलांचे हातुन महान कार्य घडेल. आज बचत गटातील महिला मोठ्या ताकतीने उभी आहे. ही आर्थिक ताकद ख-या अर्थाने खेड्यातुन उभी राहीली आहे. बचत गटातुन ग्रामीण महिला सक्षम होत आहेत. स्त्रियांवर अन्‍याय करणा-यावर सामाजिक बहिष्‍कार टाकला पाहिजे..
      विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण प्रास्‍ताविकात म्‍हणाले की, कृषि विद्या शाखेत मुलींची लक्षणीय वाढ होताना दिसत आहे, हेच सावित्रीबाई फुले यांच्‍या महान कार्याचे फलीत आहे. महिलांचे शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी कृषि विद्यापीठाने अनेक औजारे विकसीत केलेले आहे.
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ राकेश अहिरे यांनी केले. विभागप्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे व श्री वाय. एस. सोनवणे यांनी संपादीत केलेल्या कृषी दिनदर्शिकाचे प्रकाशन तसेच शेतीभाती मासिकाचा महिला विशेषांकाचे व विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या प्रकाशनाचे विमोचन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. चर्चासत्रात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ प्रा. विशाला पटनम, डॉ. विजया नलावडे, डॉ. जयश्री झेंड, डॉ. जया बंगाळे व डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यास उपस्थित शेतकरी महिलाचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद होता. मेळाव्‍यात महिला शेतकरी, शेतकरी बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.  

मार्गदर्शन करतांना लातुर येथील महिला उद्योजिका तथा राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती आशाताई भिसे

कृषि प्रदर्शनाचे उदघाटन करतांना बारामती येथील कृषि विकास प्रतिष्‍ठाणाच्‍या विश्‍वस्‍त मा श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार, विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू मा डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सावि फाउंडेशन, अकलुज च्‍या अध्‍यक्षा श्रीमती सविताताई व्‍होरा, लातुर येथील महिला उद्योजिका तथा राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती आशाताई भिसे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम आदी

प्रास्‍ताविक करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण 

मार्गदर्शन करतांना अकलुज येथील सावि फाउंडेशनच्‍या अध्‍यक्षा श्रीमती सविताताई व्‍होरा