Sunday, August 24, 2014

सध्‍याच्या पाण्याच्या ताण परिस्थितीत कोरडवाहु शेतीमध्ये घ्यावयाची काळजी

अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या शिफारशी


सौजन्‍य

डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ आनंद गोरे, डॉ मदन पेंडके

अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प, वनामकृवि, परभणी

Friday, August 22, 2014

मोसंबी बागायतदारांच्‍या प्रशिक्षण व चर्चासत्रास मोठा प्रतिसाद

मोसंबी बागायतदारांच्‍या प्रशिक्षण व चर्चासत्राचे उदघाटन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत आयोजित एक दिवशीय प्रशिक्षण व चर्चासत्रात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु मोसंबी बागायतदारांशी संवाद साधतांनायाप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, शास्‍त्रज्ञ डॉ. डि के घोष, डॉ आर ए मराठे, श्री यु आर घाटगे, मोसंबी आदी
******************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत मोसंबी बागायतदारांच्‍या एक दिवशीय प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन दिनांक २० ऑगस्‍ट रोजी बदनापुर जि. जालना येथील मोसंबी संशोधन केंद्रात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, नागपुर येथील राष्‍ट्रीय संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. डि के घोष व डॉ आर ए मराठे, जालना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री यु आर घाटगे, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, टिएमसीचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी सरकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु उदघाटनपर भाषणात म्‍हणाले की, राज्‍यातील शेतकरीच मोठा शास्‍त्रज्ञ असुन शेतक–यांचे शेतीतील अनुभव हे मोसंबी संशोधनाची दिशा ठरविण्‍यासाठी मार्गदर्शक ठरतील. हवामान बदलाचा मोसंबी बागेवरील परिणामावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनीही मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात डॉ उदय खोडके, डॉ एस पी जिंतुरकर, डॉ एम बी पाटील, डॉ पी डब्‍ल्‍यु एंगडे, डॉ पि ए ठोंबरे, प्रा. कलालबंडी, प्रा एस एच जेधे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मा डाॅ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी मोसंबी बागायतदारांच्‍या विविध समस्‍या व अडचणी थेट संवाद साधत समजुन घेतल्‍या तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी त्‍यास उत्‍तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एम बी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ नंदकुमार भुते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ डी के पाटील यांनी यांनी केले. कार्यक्रमास जालना व औरंगाबाद जिल्‍हयातील 200 पेक्षा जास्‍त मोसंबी बागायतदार उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पीक संरक्षण मोहिमेचे उदघाटन करण्‍यात आले. ही मोहिम दि 20 ऑगस्‍ट ते 20 सप्‍टेंबर दरम्‍यान औरंगाबाद व जालना जिल्‍हात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रामार्फत राबविण्‍यात येणार आहे.

चर्चासत्रात शेतकरी – शास्‍त्रज्ञ यांच्‍यातील ठळक मुदयावर चर्चा होऊन पुढील शिफारशी करण्‍यात आल्‍या
1. माती परिक्षण करूनच मोसंबी लागवड करण्‍यात यावी.
2. मोसंबीची 6 बाय 6 मीटर आतंरावरच लागवड करावी.
3. रंगपुर खुंटाचा वापर करूनच न्‍युसेलर मोसंबीची रोपे तयार करावी.
4. सेंद्रिय खते व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचा वापर करावा.
5. ठिबंक सिंचनाच्‍या वापर करून पाण्‍याचे नियोजन करावे.
6. शेतक-यांनी स्‍वतं:च मातृवृक्षबागा तयार करून पुरक व्‍यवसाय निर्माण करावा.

विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पीक संरक्षण मोहिमेचे उदघाटन करतांना 
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अघिष्‍ठाता डॉ अशोक ढवण
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर  

Sunday, August 17, 2014

सोयाबीन व कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव

शेतक-यांनी वेळीच उपाययोजना करण्‍याचे आवाहन

कपाशीवरिल तुडतुडे

कपाशीवरिल फुलकिडे
कपाशीवरिल फुलकिडे
कपाशीवरिल तुडतुडे 
सौजन्‍य 
डॉ बी बी भोसले 
विस्‍तार शिक्षण संचालक, वनामकृवि, परभणी 

Saturday, August 16, 2014

आदिवासी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित आदिवासी उपयोजनातंर्गत आदीवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप


परभणी : देशाच्‍या स्‍वातंत्र्यानंतरही आदिवासी समाज विकासापासुन दुर आहे, शासनाने आदिवासी विकासाकरिता अनेक योजना राबविल्‍या, त्‍याप्रभावीपणे राबविण्‍यासाठी या योजनेतील खर्च फक्‍त आदिवासी समाजाकरिताच व्‍हावा सक्‍तीचे केलेले आहे. शेतीसाठी पाण्‍याचा कार्यक्षमरित्‍या व काटेकोरपणे वापर करण्‍यासाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्‍यावश्‍यक झाले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ आदिवासी शेतक-यांनी घ्‍यावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. स्‍वातंत्रदिनाचे औचित्‍यसाधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वीत संशोधन प्रकल्‍पातंर्गत पाणी व्‍यवस्‍थापन योजनामार्फत आदिवासी उपयोजनातंर्गत हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गांवातील आदीवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटपाचा कार्यक्रम दि १५ ऑगस्‍ट रोजी आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते, याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, सरपंच श्रीमती कविताताई दुधाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले व प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजनेतंर्गत निवडक ४६ आदिवासी शेतक-यांना मान्‍यवारांच्‍या हस्‍ते तुषार सिंचन संचाचे वाटप करण्‍यात आले.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आदिवासी शेतक-यांनी पिक पध्‍दतीत बदल करून पारंपारिक पिकासोबतच फळपिकांकडे वळावे जेणेकरून आर्थिक समृध्‍दी होईल. विद्यापीठाने आदिवासीबहुल मौजे वाई हे गांव दत्‍तक घेऊन तेथे संपुर्ण कृषि क्रांतीसाठी प्रयत्‍न करण्‍याची सुचना त्‍यांनी केले.
याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतीत आदिवासी शेतक-यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्‍यास त्‍यांच्‍या जीवनात नवी पहाट येईल. याकरिता आदिवासी बांधवांनी विद्यापीठास संपुर्ण सहकार्य करावे याप्रकल्‍पामुळे आदिवासी समाज व विद्यापीठ यांच्‍यातील नाते अधिक दृढ होईल अशी मत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आदिवासी शेतक-यांचे औषधी वनस्‍पतीचे ज्ञान अत्‍यंत महत्‍वाचे असुन त्‍याक्षेत्रातही विद्यापीठाला कार्य करत येईल अशी मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ ए एस कडाळे म्‍हणाले की, वाई हे गांवा संपुर्णपणे आदिवासीबहुल गांव असुन ये‍थील शेतीला पाणी देण्‍यासाठी पारंपारिक पध्‍दतीचा वापर केला जात असल्‍याने पिकांची उत्‍पादकता कमी आहे, योजनेचे लाभार्थ्‍यांची निवड सविस्‍तर सर्व्‍हेक्षण करून ग्रामसभेमार्फत करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे तुषार सिंचन संच वाटप प्रक्रिया पारदर्शकपणे करण्‍यात आली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ जी डी गडदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ के टी जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रा कराड, गिराम, खराडे, कांबळे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्‍या शेवटी तुषार सिंचना संचाच्‍या साहित्‍य गांवापर्यंत नेण्‍यासाठीची वाहनाची व्‍यवस्‍थाही प्रकल्‍पांतर्गत करण्‍यात आली होती, त्‍यावाहनास कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व वाई गांवाचे शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



विद्यापीठ परिसर पॉलिथीनमुक्त करण्याचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांचे रासेयोच्या स्‍वयंसेवकांना आवाहन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औजित्‍यासाधुन परिसर स्वच्छता व गाजरगवत निर्मुलन अभियान दि. १५ ऑगस्त २०१४ रोजी घेण्‍यात आले. या अभियानाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी ए  जाधव, परभणी कृषि म‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव, कृषि म‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 
राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, गाजरगवत व पॉलिथीन पर्यावरणास व जनावरांच्‍या आरोग्‍याला हानीकारक असुन यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत, यासाठी वर्षभर विद्यापीठ परिसर पॉलिथीनमुक्त ठेवण्यासाठी स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी कार्य करावे.
याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्‍यात येणारे विविध कार्यक्रमामुळे विद्यार्थ्‍यामध्‍ये समाजाप्रती असलेली बांधीलकीची जाणीव होते. यात विद्यार्थ्‍यांनी सक्रिय सहभाग घ्‍यावा.
कार्यक्रम यशस्वितेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एम.कांबळे व प्रा. व्हि. बी. जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, August 14, 2014

मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन

बदनापुर जि जालना येथे दि 20 ऑगस्‍ट रोजी लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानांतर्गत मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन 

Wednesday, August 13, 2014

कापुस लागवडीचे यांत्रिकीकरण शेतक-यांना किफायतीशीर असावे ..... कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवि व मोसॅन्‍टो यांच्‍यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍पास प्रारंभ

यंत्राव्‍दारे कापुस लागवड व वेचणीच्‍या प्रात्‍यक्षिक प्रकल्‍पाचे उदघाटन
वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठ व मोसॅन्‍टो इंडिया लिमिटेड यांच्‍यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍पाचे उदघाटन करतांना वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
******************************
परभणी : कापुस वेचणीच्‍या यंत्राबाबत शेतक-यांकडुन मोठी मागणी होत आहे, परंतु हे यांत्रिकीकरण शेतक-यांना आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठ व मोसॅन्‍टो इंडिया लिमिटेड यांच्‍यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍पातंर्गत दि. १२ ऑगस्‍ट रोजी यंत्राव्‍दारे कापुस लागवड प्रात्‍यक्षिकाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, मोंसॅन्‍टो इंडिया लि. चे मुख्‍य ज्ञान विस्‍तारक डॉ एस एस काजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कापुस वेचणीसाठी शेतकरी बांधवाना मोठया प्रमाणात मजुरांची समस्‍या भेडसावत असुन वेचणीसाठी मोठा खर्च होत आहे. यंत्राव्‍दारे कापुस वेचणीत येणा-या समस्‍याचे निराकरण या प्रात्‍यक्षिकात व्‍हावे तसेच यातच संपुर्ण फर्टिइरिगेशनचाही समावेश असावा, अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापुस लागवडीचे यांत्रिकीकरण प्रकल्‍प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतत्‍वावर आधारीत राबविणारे एकमेव विद्यापीठ असुन मोठया संख्‍येने शेतक-यांनी या प्रात्‍यक्षिकाची पाहणी करून ऐच्‍छीकरित्‍या पुढे येऊन याबाबत प्रतिक्रिया दयावीत म्‍हणजे या तंत्रज्ञानात अनुकूल बदल करता येतील.  
परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, कपाशीचे लागवड खर्चात बियाणावरील खर्च मोठा असल्‍यामुळे यंत्राव्‍दारे लागवड करण्‍यातांना याचा विचार व्‍हावा. प्रात्‍यक्षिकाचबाबत सविस्‍तर माहिती डॉ एस एस काजी व न्‍यु हॉलंडचे अधिकारी श्री अमित परदानिया यांनी उपस्थितांना माहिती दिली. डॉ एस एस काजी यांनी प्रात्‍यक्षिकाची माहिती देतांना सांगितले की, या प्रकल्‍पात यंत्राव्‍दारे वेचणीसाठी अनुकुल वाणाची लागवड यंत्राव्‍दारे सघन लागवड पध्‍दतीने करण्‍यात येऊन याची शेतक-यांच्‍या पारंपारीक कापुस लागवड पध्‍दतीशी पडताळणी करण्‍यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ आनंद गोरे यांनी केले, या उपक्रमास संशोधन उपसंचालक डॉ जी के लोंढे, रानडे अॅग्रोचे विभागीय व्‍यवस्‍थापक ए बी सयद, नावेद शेख, आर डी भोरे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थितीत होते.
सदरिल प्रात्‍यक्षिक हे कृषिविदया विभागाच्‍या प्रक्षेत्रावर घेण्‍यात आलेली असुन यात तीन प्रकारच्‍या प्‍लॉटचे नियोजन असुन यात शेतक-यांची पारंपारीक कापुस लागवड पध्‍दत, संपुर्ण यांत्रिकीकरण म्‍हणजे यंत्राव्‍दारे लागवड व वेचणी, अर्ध यांत्रिकीकरण म्‍हणजे फक्‍त वेचणी यंत्राव्‍दारे करण्‍यात येणार आहे.
कापुस लागवड यंत्राची माहिती देतांना 
प्रकल्‍पांतर्गत यंत्राव्‍दारे कापुस लागवड करतांना 

Thursday, August 7, 2014

वनामकृविचे मा. कुलसचिव यांचे विद्यापीठाच्‍या जमिनीबाबतचे निवेदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे मा. कुलसचिव यांचे विद्यापीठाच्‍या जमिनीबाबतचे निवेदन

विद्यार्थ्‍यांचे यशच विद्यापीठाची खरी ओळख असते .............. कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित विद्यापीठ खेळाडुंचा गुणगौरव सोहळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून बोलतांना कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळाप्रसंगी कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी. 
***********************
परभणी : विद्यार्थ्‍यांनी अभ्‍याससोबतच खेळांना ही तितकेच महत्‍व दयावे, वि‍द्यार्थ्‍यांचे शैक्षणिक क्षेत्रातील व विविध स्‍पर्धेतील यशच विद्यापीठाची ओळख असते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा दि ६ ऑगस्‍ट रोजी संपन्‍न झाला, त्‍या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. या प्रसंगी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची उपस्थिती होती.
कुलगूरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, खेळांमुळे विद्यार्थ्‍याचा व्‍यक्‍तीमत्‍व विकास होऊन संघ भावना वाढीस लागते व स्‍पर्धेात्‍मकतेचा विकास होतो. विविध खेळ हे आरोग्‍य चांगले राहण्‍यास मदत करतात. भावी काळात विद्यापीठ विद्यार्थ्‍यांना खेळासाठी विविध अद्यावत सुविधा पुरविण्‍याचा प्रयत्‍न करील त्‍याचा विद्यार्थ्‍यांनी उपयोग करून राष्‍ट्रीय पातळीवर मोठे यश संपादन करतील, असे आशा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठाचे वि‍द्यार्थ्‍यी विविध खेळ व सांस्‍कृतीक क्षेत्रात प्राविण्‍य मिळवीत आहेतच येणा-या काळात उत्‍तरोत्‍तर प्रगती होऊल.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी सन २०१६ मध्‍ये अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धा व २०१७ मधील इंद्रधनुष्‍य क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन विद्यापीठात होणार असल्‍याची माहिती दिली. यावेळी सम्‍यका अंभोरे व राहुल कांबळे या विद्यार्थ्‍यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सन २०१३-१४ मध्‍ये विविध क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धेत प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनीं तसेच विविध क्रीडा प्रकारातील संघ व्‍यवस्‍थापक, प्रशिक्षक व परिक्षक यांचा देखिल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.   
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शाहू चौहान यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडा विभागातील संलग्‍न व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यीनी व पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. डी एफ राठोड, प्रा. गणेश गुळभीले, यांच्‍यासह श्री जगताप, श्री सुयवंशी, श्री अन्‍वर यांनी परिश्रम घेतले.  
गुणगौरव सोहळयात सत्‍कार झालेले विद्यापीठ खेळाडू
जोहरट येथील आसाम कृषि विश्‍वविद्यालय येथे झालेल्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ क्रीडास्‍पर्धेत व्‍हॉलीबॉल मध्‍ये मुलींच्‍या गटास सुवर्ण पदक प्राप्‍त केले. या संघात सहभागी विद्यार्थ्‍यीनी संजिवनी बारंगुळे, अमिता कांबळे, शारदा चोपडे, अयोध्‍या गायकवाड, सविता दाभाडे, एस टी दासरवाड यांचा तसेच मैदानी स्‍पर्धेत कास्‍य पदक विजेता हटटा येथील कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी ए डी जाधव सत्‍कार करण्‍यात आला­. बेंगलोर येथील कृषि विज्ञान विश्‍वविद्यालयात झालेल्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ युवक महोत्‍सवात लोकनृत्‍यात रौप पदक प्राप्‍त केलेल्‍या संघातील सायली भडके, टी एस भोयर, निवेदीता परघने, श्रीदेवी स्‍वामी, देवयानी शिंदे, सम्‍यका अंभोरे, योगेश्‍वरी पवार, अंकीता डोंबे, शारदा चोपडे, संध्‍या बनसोडे यांचा सत्‍कार करण्‍यात आला तसेच कोल्‍हापुर येथे झालेल्‍या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सवात रांगोळी कला प्रकारात कास्‍य पदक व पोस्‍टर मेकींग मध्‍ये रजत पदक प्राप्‍त गृहविज्ञान महाविद्यालयाची एस डी गोडसलवार हीचा सत्‍कार करण्‍यात आला. संगीत विभागातील सुवर्ण पदक विजेता सिध्‍दीकांत देशमुख यांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. तसेच समुहगीत स्‍पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्‍त केलेल्‍या संघातील विद्यार्थ्‍यी निवेदीता परघने, टी एस भोयर, सम्‍यका अंभोरे, प्रेरणा देशपांडे, सायली भडके, शारदा चोपडे यांचा तर वादविवाद स्‍पर्धेतील विद्यार्थ्यी वसीम पठाण यांचा सत्‍कार करण्‍यात आला. राष्‍ट्रीय सेवा योजनेतील उत्‍कृष्‍ठ स्‍वयंसेवक म्‍हणुन निवड झालेली विद्यार्थ्‍यींनी परभणी कृषि महाविद्यालयाची अनुराधा पाटेखेडे हीचा सत्‍कार करण्‍यात आला.

Wednesday, August 6, 2014

वनामकृविचे कुलसचिव म्‍हणुन डॉ. दिनकर जाधव रूजु

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलसचिव म्‍हणुन डॉ दिनकर लक्ष्‍मणराव जाधव हे दि. ५ ऑगस्ट रोजी रूजु झाले. यापुर्वी डॉ जाधव हे चंद्रपुर येथे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी म्‍हणुन कार्यरत होते. डॉ जाधव हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचेच १९८५ चे कृषि पदवीधर असुन कृषि विद्याशाखेतील पदवीत्‍तुर आहेत. लातुर येथुन त्‍यांनी १९९१ साली कृषि विकास अधिकारी म्‍हणुन शासकीय सेवेस सुरूवात केली तसेच विभागीय मृद संधारण अधिकारी म्‍हणुन त्‍यांनी कार्य केले आहे. २००३ पासुन ते जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी या पदावर नागपुर, लातुर, सोलापुर या जिल्‍हयात कार्य केले. रोजगार हमी योजनाचा शेतकरी जीवनावर परिणाम या विषयावर संशोधन प्रबंध अमेरिकन विद्यापीठात सादर करून २०११-१२ मध्‍ये त्‍यांनी आचार्य पदवी प्राप्‍त केली. 
*************** 

विद्यापीठाचे नुतन कुलसचिव डॉ दिनकर जाधव दि. ५ ऑगस्ट रोजी रूजु झाल्‍या निमित्‍ताने मकृवि कर्मचारी महासंघाच्‍या वतीने त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्‍याप्रसंगी महासंघाचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे, प्रा. डि टि पवार प्रा. रमेश देशमुख, प्रा. रमेश चौगुले, उपकुलसचिव आर व्‍ही जुक्‍टे, सहायक कुलसचिव व्‍ही एन नागुल्‍ला, पी पी कदम, जी बी शिंदे, कृष्‍णा जावळे आदी.  
विद्यापीठाचे नुतन कुलसचिव डॉ दिनकर जाधव दि. ५ ऑगस्ट रोजी रूजु झाल्‍या निमित्‍ताने कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्‍याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले,  महासंघाचे अध्‍यक्ष डॉ जी के लोंढे, जी एस हत्‍तीअंबीरे, एस पी घागरमाळे, डी आर जाधव, डि के चांदणे, वडमारे, हिवराळे, सुर्यवंशी, डॉ जी एम वाघमारे, डॉ खंडारे, प्रा पायाळ, प्रा अनिस कांबळे,  उपकुलसचिव आर व्‍ही जुक्‍टे, सहायक कुलसचिव व्‍ही एन नागुल्‍ला आदी.  

Monday, August 4, 2014

वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालकपदी डॉ बी बी भोसले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक पदी डॉ बी बी भोसले यांची नियुक्‍ती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले असुन दि १ ऑगस्‍ट रोजी डॉ अशोक ढवण यांच्‍या कडुन पदभार स्‍वीकारला आहे. डॉ बी बी भोसले हे किटकशास्‍त्रज्ञ म्‍हणुन शेतक-यांमध्‍ये प्रसिध्‍द असुन त्‍यांना विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रातील विविध पदावर ३४ वर्षाचा अनुभव आहे. केंद्र शासनाचा ई-प्रशासन पुरस्‍कार प्राप्‍त महाराष्‍ट्र शासनाचा महत्‍त्‍वकांक्षी क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या राज्‍यस्‍तरीय सुकाणू समितीचे ते प्रमुख सदस्‍य असून मराठवाडा विभागीय पातळीवरील सुकाणू समितीचे अध्‍यक्ष  आहेत. अखिल भारतीय स्‍तरावरील कापुस तंत्रज्ञान मिशन प्रकल्‍पाचे मुख्‍य समन्‍वयक म्‍हणुन सध्‍या ते कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली संकलीत केल्‍या गेलेल्‍या विविध पिकांवरील किडकांच्‍या छायाचित्रणास बेंगलौर येथे झालेल्‍या चौथ्‍या आंतरराष्‍ट्रीय किटकशास्‍त्र कॉंग्रेस मध्‍ये २०१२ चा व २०११ मध्‍ये झालेल्‍या लुधीयाना येथील राष्‍ट्रीय किटकशास्‍त्र कॉंग्रेस मध्‍ये उत्‍कृष्‍ट छायाचित्रण म्‍हणुन सन्‍मानीत करण्‍यात आले आहे. त्‍यांची आजपर्यंत आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर ५० पेक्षा जास्‍त शोध निबंधे, २५० पेक्षा जास्‍त मराठी लेख व १४ पुस्‍तके प्रसिध्‍द केलेले असुन आकाशवाणीवर शंभर पेक्षा जास्‍त कार्यक्रम प्रसारीत झालेली आहेत. विद्यापीठात त्‍यांनी कृषि अधिकारी, सहायक प्राध्‍यापक, प्राध्‍यापक, विभाग प्रमुख, विद्यापीठाचे कुलसचिव तसेच लातुर येथील जैव तंत्रज्ञान महाविद्यालय व परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य म्‍हणुन विविध पदावर कार्य केले आहे. त्‍यांचा नियुक्‍तीबद्ल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी तसेच विविध स्‍तरातुन अधिकारी, कर्मचारी, शेतकरीवर्ग व‍ विद्यार्थ्‍यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे. 

वनामकृविचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) पदी डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) पदी डॉ अशोक ढवण यांची नियुक्‍ती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केली असुन दि १ ऑगस्‍ट रोजी निवृत्‍त शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे यांच्‍या कडुन पदभार स्‍वीकारला आहे. डॉ अशोक ढवण हे मृद विज्ञान व रसायनशास्‍त्र विभागाचे आचार्य पदवीधारक असुन त्‍यांना विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रातील विविध पदावर २९ वर्षाचा अनुभव आहे. विद्यापीठात त्‍यांनी सहायक प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक, प्राध्‍यापक, संशोधन उपसंचालक, विभाग प्रमुख तसेच लातुर व उस्‍मानाबाद कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य म्‍हणुन कार्य केले असुन गेली दोन वर्षापासुन विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुन कार्यरत होते. विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा विद्यापीठाचा महत्‍वकांक्षी अभिनव विस्‍तार प्रकल्‍प त्‍यांच्‍याच मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात आला. त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंधे, मराठी लेख व पुस्‍तके प्रसिध्‍द केलेले असुन त्‍यांची आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम प्रसारीत झालेली आहेत. त्‍यांचा नियुक्‍तीबद्ल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी तसेच विविध स्‍तरातुन अधिकारी, कर्मचारी, शेतकरीवर्ग व विद्यार्थ्‍यानी अभिनंदन केले आहे.

Friday, August 1, 2014

व्यक्तींने आपल्या ध्येयापासुन विचलीत होऊ नये........ कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृविचे शिक्षण संचालक व अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे यांना सेवानिवृत्‍ती निमित्‍त निरोप
वनामकृविचे शिक्षण संचालक व अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे सेवानिवृत्‍ती निमित्‍त सत्‍कार करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु सोबत नुतन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व नुतन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आदी
****************************************
परभणी : जीवन हे सरळ रेषा नसुन जीवनात अनेक वळणे आहेत, अनेक अडचणी येत असतात पंरतु व्‍यक्‍तींने आपल्‍या ध्‍येयापासुन विचलीत होऊ नये, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक व अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे दि ३१ जूलै रोजी निवृत्‍त झाले त्‍यानिमित्‍त त्‍यांचा विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित निरोप समारंभाच्‍या प्रसंगी ते बोलत होते­. या निरोप संमारंभ कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर नुतन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व नुतन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, विद्यापीठातील प्रत्‍येक व्‍यक्‍तींने आपले कर्तव्‍य व भुमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. डॉ विश्‍वास शिंदे यांनी आपल्‍या विद्यापीठाच्‍या प्रदिर्घ सेवा काळात अनेक अडचणीत धैर्याने कार्य केले म्‍हणुन ते आज समाधानाने निवृत्‍त होत आहेत. त्‍यांच्‍या काळात देशपातळीवर शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठाने मोठे कार्य केले आहे, असे गौरवौदगार डॉ विश्‍वास शिंदे यांच्‍याबाबत कुलगूरू मा बी व्‍यंकटेश्‍वरलू यांनी काढले.
सत्‍काराला उत्‍तर देतांना निवृत्‍त शिक्षण संचालक व अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, विविध पदावर विद्यापीठाची सेवा करण्‍याची संधी प्राप्‍त झाली हे माझे भाग्‍य समजतो, सर्वांच्‍या सहकार्यानी विद्यापीठाच्‍या सेवेतील ३४ वर्ष यशस्‍वीपुर्ण करू शकलो. विद्यापीठातील अनेक पदे रिक्‍त असतांना विशेषता कृषि संशोधन व शिक्षण क्षेत्रात मोठे काम करता आले, अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ जयश्री ऐकाळे यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी केले.
याप्रसंगी नुतन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता कृषि डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

डॉ विश्‍वास शिंदे यांचा कार्याचा अल्‍पसा परिचय

डॉ विश्‍वास शिंदे यांनी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍थेतुन कृषि विद्या शाखेतुन आचार्य पदवी पुर्ण करून विद्यापीठाच्‍या सेवेत विविध पदावर 34 वर्ष कार्य केले. यात कृषि अधिकारी म्‍हणुन नौकरीला सुरवात करून सहायक प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक, प्राध्‍यापक, कृषि विद्या शाखाचे विभाग प्रमुख तसेच अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालयचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य म्‍हणुन कार्य केले. गेल्‍या चार वर्षापासुन ते विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता कृषि म्‍हणुन कार्यरत होते. या काळात विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्‍यांनी राष्‍ट्रीय पातळीवरील कनिष्‍ठ संशोधन शिष्‍यवृत्‍ती परिक्षेत उल्‍लेखनीय यश संपादन केले. डॉ विश्‍वास शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील अनुभव आधारीत शिक्षणास पध्‍दतीचे अनेक प्रकल्‍प सुरू करण्‍यात आले. त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंधे, मराठी लेख व पुस्‍तके प्रसिध्‍द केलेले आहेत. पीक लागवड तंत्रज्ञान, पीक पध्‍दती, कोरडवाहु शेती व जल व्‍यवस्‍थापन यावरील उल्‍लेखनिय संशोधन केले आहे.