कर्मयोगी कै. अंकुशराव टोपे यांच्या जन्मदिनीनिमित्त
दिनांक 26 सप्टेबर रोजी अंबड येथे झालेल्या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण
साहित्यिक व सांस्कृतीक प्रतिष्ठान, जालना, समर्थ दूध संघ तसेच मत्स्योदरी
विद्यालयातर्फे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे विद्यापीठात विस्तार शिक्षण संचालक
असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सन 2013-14 व 2014-15 साली मराठवाडयातील दुष्काळी
पार्श्वभुमीवर विद्यापीठाच्या वतीने मोसंबी फळबाग वाचविण्यासाठी विशेष मोहिम
राबविण्यात आली होती तसेच त्यांच्याच काळात विविध विस्तार कार्यक्रम यशस्वीपणे
राबविण्यात आले. या त्यांच्या कृषि विस्तार क्षेत्रातील योगदानाबाबत त्यांना
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करून मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास
आमदार मा श्री राजेश टोपे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री सतीश टोपे, श्री विलास
शिंदे, मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष श्री मनोज मरकड, डॉ निसार देशमुख, श्री उत्तमराव
पवार, श्री भाऊसाहेब कनके, श्री रघुनाथ तौर, श्री सतीश होंडे, प्राचार्य श्री भगवतराव
कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी
शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारही प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास मोठया संख्येने नागरिक
उपस्थिती होते.
सदरिल पुरस्कार हा माननीय कुलगुरू यांनी मराठवाडयातील
शेतकरी तसेच मोसंबी फळबाग वाचविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात अविरत परिश्रम
केलेल्या संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ, कृषि विस्तारक
तसेच कृषि विभागातील कृषि विस्तारकांना समर्पित करून त्यांच्याच सहकार्याने ही
मोहिम राबविण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.