Tuesday, October 31, 2023

अद्ययावत फिरते बियाणे प्रक्रिया यंत्राचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अद्ययावत फिरते बियाणे प्रक्रिया यंत्राचे उदघाटन दिनांक २९ ऑक्‍टोबर रोजी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी जबलपूर येथील तणविज्ञान संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. जे. एस.  मिश्रा, रायपुर येथील राष्ट्रीय जैविक तनाव प्रबंधन संस्थेचे हसंचालक डॉ. अनिल दीक्षित, आणि आयएआरआयचे वनस्पती शरीर विज्ञानाचे विभागप्रमुख डॉ. रेणू पांडे, एलमाझ रशियाचे सीईओ श्री अलेक्‍साई लायस्‍कोह, डॅनियल ओगोरोडोव, अग्रोनेस्‍ट प्रा. लि. चे श्री सचिन गुणाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, सदर यंत्राच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या बियाणाची प्रतवारी कमी वेळेत शेतावरच करणे आता शक्य होते. सदर यंत्र शेतकरी उत्पादक कंपन्‍याकरिता अत्‍यंत उपयुक्‍त आहे. सदर यंत्राव्‍दारे अती जलद गतीने बियाणे स्‍वच्‍छ करून प्रतवारी करणे शक्‍य असुन याची क्षमता प्रती तास ४ टन आहे. हे यंत्र पूर्णपणे वायुगतिकीय तत्वावर चालते व यासाठी केवळ एचपी विदुतप्रवाहाची आवश्यकता आहे.

सदर यंत्र रशियन तंत्राज्ञानावर आधारित असुन माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनानुसार राज्‍यातील शेतकरी बांधवाच्‍या गरजेनुसार सदर यंत्रात बदल करण्‍यात आला आहे. हे यंत्र ट्रक्‍टरच्‍या सहाय्याने एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी नेता येते.  

सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. एस पी मेहत्रे, प्रभारी अधिकारी (बियाणे प्रक्रिया) डॉ एस बी घुगे, डॉ हिराकांत काळपांडे,  प्रगतशील शेतकरी श्री पंडीत थोरात, श्री जर्नाधन आवरगंड, श्री साबळे आदी उपस्थित होते. माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर यंत्र खरेदीकरिता नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार यांनी प्रयत्‍न केले.  कार्यक्रम यशस्वतीसाठी नाहेप संशोधकांनी परिश्रम घेतले.

Sunday, October 29, 2023

बदलत्या हवामानानुसार तण व्यवस्थापन यावरील दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) अंतर्गत बदलत्या हवामानानुसार अद्ययावत पध्‍दतीने तण व्यवस्थापन यावरील दिनांक २८ व २९ ऑक्‍टोबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २८ ऑक्टोबर रोजी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे जबलपूर येथील तणविज्ञान संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. जे. एस मिश्रा, रायपुर येथील पीक आरोग्य संशोधन केंद्र - राष्ट्रीय जैविक तनाव प्रबंधन संस्थेचेहसंचालक डॉ. अनिल दीक्षित, आणि आयएआरआयचे वनस्पती शरीर विज्ञानाचे विभागप्रमुख डॉ. रेणू पांडे, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, एलमाझ रशियाचे सीईओ श्री अलेक्‍साई लायस्‍कोह, डॅनियल ओगोरोडोव आदींची  उपस्थिती होती. 

कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतीत वाढता मजुरीचा खर्च पाहता, शेतकरी बांधवांचा तण व्‍यवस्‍थापनावर मोठया प्रमाणात खर्च होतो. रासायनिक तणनाशकांचा खर्चही दिवसेदिवस वाढत आहे. कृषि संशोधकांनी कमी खर्चीक तण व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान विकासित करावे. देशात-विदेशात उपलब्‍ध तंत्रज्ञानाचा अभ्‍यास करावा.  

डॉ. जे. एस. मिश्रा यांनी बदलत्या हवामानात नुसार अद्ययावत पद्दतीने तण व्यवस्थापनाकरिता कृषि मधील विविध विभागातील तज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काम करण्याचे आणि पिकांसाठी आर्थिक आणि पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित तण व्यवस्थापनासाठी अधिकाधिक पर्याय शोधण्याचे आवाहन केले.

दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात देशातील नामांकित तण व्‍यवस्‍थापनातील तज्ञ डॉ. अनिल दीक्षित, डॉ. रेणू पांडे, डॉ डि के दास, डॉ सिमरजीत कौर, डॉ कुशवाह यांनी मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षणासाठी ६० प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर, आचार्यविद्यार्थी आदींनी सहभागी नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्राचार्य डॉ. भगवान आसेवर यांनी केले. नाहेप मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ.वीणा भालेराव यांनी केले तसेच आभार डॉ. अनिल गोरे यांनी केले.

कार्यक्रमास कुलसचिव श्री पी के काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रविण निर्वळ, डॉ. सुनीता पवार, इंजी.एस एन पवार, डॉ.दयानंद टेकाळे आदींची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता नाहेप प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Saturday, October 28, 2023

जलद पैदास तंत्रज्ञानाने कमी कालावधीत नवीन वाण निर्मिती शक्‍य ...... भाभा अनुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडीगन्नावार

पिकांचे नवीन वाण निर्मितीकरिता कमीत कमी सात वर्षाच्‍या कालावधी लागतो, तर जलद पैदास - स्पीड ब्रीडींग तंत्रज्ञानाने अर्ध्‍या कालावधीतच नवीन वाण निर्मिती शक्‍य होते. देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता जलद पैदासकार तंत्रज्ञानाने अन्नधान्य सुरक्षेच्या बाबतीत एक उत्तम पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडीगन्नावार यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या वतीने दिनांक २७ ऑक्‍टोबर रोजी स्‍पीड ब्रींडिग तंत्रज्ञानावर आयोजित व्‍याख्‍यानात ते बोलत होते. कार्यक्रमास सहयोगी  अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्रगतशील शेतकरी श्री मधुकररावजी घुगे, सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. शिवाजी मेहत्रे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांची उपस्थिती होती.

डॉ.अशोक बडीगन्नावार यांनी पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना तसेच कृषी वनस्पतीशास्त्र आणि भाभा अनुसंशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या उत्परीवर्तनाद्वारे पिवळी ज्वारी आणि रब्बी ज्वारी मध्ये उच्च उत्पादन व गुणवत्तेमधील बदल घडविण्यासाठीच्या घेण्यात येत असलेल्या प्रयोगांना भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन केले. उत्पपरिवर्तनाद्वारे बदल झालेल्या राळ पिकाची पाहणी करण्यात आली. कृषिभूषण मधुकरराव घुगे यांनी भुईमूग बिजोत्पादन याबद्दल मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन डॉ. अंबिका मोरे यांनी केले व डॉ. अंबालिका चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. दिलीप झाटे डॉ. जयकुमार देशमुख, डॉ.गोदावरी पवार, डॉ. संदीप शिंदे आदींसह विभागातील विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री शेंगोळे आदीसह विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, October 24, 2023

मौ. मंगरूळ ता. मानवत येथे रब्बी शेतकरी मेळावा संपन्न



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व परभणी कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव जागृकता कार्यक्रम (रावे) आणि औद्योगीक संलग्नता उपक्रमांतर्गत मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे दिनांक १८ ऑक्‍टोबर रोजी रब्बी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी सरपंच श्री. जमीर खॉ पठाण हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख  (विस्तार शिक्षण) डॉ. राजेश कदम, कृषि विद्यावेता डॉ. गजानन गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत लाड, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे, मंडळ कृषि अधिकारी डॉ आर बी नाईक, पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र तज्ञ डॉ रमेश पाटील, डॉ.जयकुमार देशमुख आदींची उपस्थिती होती. 

डॉ राजेश कदम यांनी कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा बददल माहिती देऊन कृषि विद्यापीठात उपलब्‍ध निविष्‍ठांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले.डॉ. गजानन गडदे यांनी कापुस, तुर, हरबरा या पिकाच्या सुधारीत संकरवाण व खत, पानी यवस्थापन बददल व उत्पादन वाढीसाठी आवश्यक सुत्राबददल माहिती दिली. डॉ. अनंत लाड यांनी रब्बी पिक संरक्षण बददल तर डॉ. चंद्रशेखर अंबाडकर जैविक बुरशी नाशके, ट्रायकोडर्मा, जैविक खत रायझोफॉस, रायझोबीयम यांची बीजप्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम किटकावर प्रादुर्भाव करणारी उझीमाशी नियंत्रण करण्यासाठी लागणारे जैविक किटक (एन टी पाऊच) वापरण्याची शिफारस केली.

कार्यक्रमास शेतकरी बांधव व कृषिकन्या, अशोक देशमाने, राजाभाऊ डुकरे, मोहन कापसे, अशोक नाइकनवरे हे शेतकरी उपस्थीत होते.सरपंच श्री. जमीर खॉ पठाण यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक डॉ. रमेश पाटील. सुत्रसंचालन पल्लवी लाड व विद्या खिल्लारे यांनी केले तर आभार डॉ. जयकुमार देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यसस्वितेसाठी मंगरूळ व कोल्हावाडी येथील कृषि कन्या यांनी पुढाकार घेतला.