Monday, October 31, 2022

स्‍व. इंदिरा गांधी आणि स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या स्‍मृतीस विनम्र अभिवादन

माजी पंतप्रधान भारतरत्‍न स्‍व. इंदिरा गांधी यांची पुण्‍यतिथी आणि प्रथम गृहमंत्री लोहपूरुष स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक ३१ ऑक्‍टोबर रोजी विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते माजी पंतप्रधान भारतरत्‍न स्‍व. इंदिरा गांधी आणि स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्‍पहार अपर्ण करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळण्यात येऊन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज  आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday, October 24, 2022

मौजे ब्रम्‍हपुरी येथे विद्यापीठ विकसित रब्‍बी ज्‍वारीचे वाणाचे बियाणे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प - ज्वार संशोधन केंद्राच्‍या वतीने आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत दिनांक २४ ऑक्‍टोबर रोजी मौजे ब्रम्‍हपुरी येथील शेतकरी बांधवांना रब्बी ज्वारीचे बियाणे व कृषि निविष्‍ठांचे वाटप करण्‍यात आले.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर मंडळ कृषी अधिकारी श्री गायकवाड, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल एन जावळे, रोग शास्त्रज्ञ डॉ.के डि नवगिरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. महमद इलियास, कृषी विद्यावेता श्रीमती प्रीतम भुतडा, कृषी सहाय्यक श्री नदीम सय्यद, श्री अमोल चव्हाण आदींची उपस्थिती होती.

रब्‍बी ज्‍वारीचे विद्यापीठ विकसित वाण परभणी सुपर मोती, परभणी शक्ती, परभणी मोती, परभणी ज्योती आदींचे बियाणे तर बीज प्रक्रियेसाठी गाउचू, ट्रायको बूस्ट आणि ट्रायको कार्डचे वाटप संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, येणारे वर्ष २०२३ हे जागतिक पातळीवर भरड धान्य वर्ष म्‍हणुन साजरे केले जाणार असुन जगाला भरड धान्‍याचे महत्‍व लक्षात आले आहे. भारतीय शेतीत मोठा प्रमाणात भरड धान्‍य घेतली जातात, परंतु गेल्‍या काही वर्षात भरड धान्‍य लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे. हे क्षेत्र वाढीकरिता प्रयत्‍न केला जात असे सांगुन त्‍यांनी ज्वारीचे महत्त्व आहारातील महत्‍व, ज्‍वारी प्रक्रिया उद्योग आणि युवकांसाठी स्वयम उद्योग उभारणी यावर मार्गदर्शन केले.

प्रास्‍ताविकात डॉ. एल एन जावळे यांनी सुधारित वाणांविषयी माहिती दिली. डॉ. नवगिरे यांनी ट्रायको बूस्ट चा वापर व पिकांवरील रोगांविषयी मार्गदर्शन केले तर डॉ. इलियास यांनी कीड, ट्रायको कार्ड व गाऊचु या निविष्ठेविषयी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालनात श्रीमती प्रीतम भुतडा यांनी आद्य रेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेबद्दल माहिती दिली तर आभार श्री गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, October 17, 2022

दिल्‍ली येथे आयोजित प्रधानमंत्री किसान सम्‍मान संमेलनाच्‍या थेट प्रक्षेपणाचा शेतकरी बांधवानी घेतला लाभ

वनामकृविच्‍या वतीने पाच ठिकाणी करण्‍यात आले होती थेट प्रक्षेपणाची सुविधा 


पुसा (नवी दिल्‍ली) येथील भारतीय कृषी संशोधन संस्‍थेत केंद्र सरकारच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या वतीने दोन दिवसीय पीएम किसान सन्‍मान संमेलन २०२२ चे दिनांक १७ ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्‍या ह्रस्‍ते उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात ठेवण्‍यात आले होते. तसेच विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद, तुळजापुर, बदनापुर आणि खामगांव येथील कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी बांधवाना थेट प्रक्षेपण पाहण्‍याची सोय करण्‍यात आली होती. यात १८९५ व्‍यक्‍तींनी सहभाग नोंदविला, यात शेतकरी बांधव, महिला शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्‍यां याचा समावेश होता.

संपुर्ण देशातुन या कार्यक्रमाचा लाभ विविध संस्‍थांमधुन एक कोटीहुन अधिक शेतकरी या कार्यक्रमाला आभासी पध्‍दतीने उपस्थित होते. यात संशोधक, धोरणकर्ते आणि इतर कृषिशी निगडीत भागधारकांचा समावेश होता. रसायने आणि खते मंत्रालयाच्‍या अंतर्गत ६०० पंतप्रधान किसान समृध्‍दी केंद्राचे उदघाटन माननीय पंतप्रधान यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या योजनेंतर्गत देशातील खतांची किरकोळ दुकाने टप्‍प्‍याटप्‍प्‍याने या योजनेमध्‍ये रूपांतरित केली जाणार आहे. याव्‍दारे शेतक-यांच्‍या विविध प्रकारच्‍या गरज पुर्ण करण्‍यात येणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्‍या हस्‍ते शेतक-यांच्‍या कल्‍याणासाठीच्‍या पंतप्रधान सन्‍मान योजने च्‍या १२ व्‍या हप्‍त्‍याचे १६००० कोटी रूपये डिबीटी व्‍दारे वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमात पंतप्रधान भारतीय जन उर्वरक परियोजना एक देश एक खत योजनेचेही उदघाटन केले.

मार्गदर्शनात माननीय पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी म्‍हणाले की, किसान समृद्धी केंद्र हे केवळ शेतकर्‍यांसाठी खत खरेदी-विक्रीचे केंद्र नाही, तर शेतकर्‍यांना नाते दृढ करणारी केंद्र असुन प्रत्येक गरजेच्या वेळी मदत करणारे केंद्र आहे. वन नेशन, वन खतामुळे शेतकऱ्याची सर्व प्रकारच्या संभ्रमावस्थेतून सुटका होणार आहे आणि चांगले खतही उपलब्ध होणार असल्‍याचे ते म्‍हणाले.   

परभणी कृषि महाविद्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, कृषि अधिकारी श्री बी एस कच्‍छवे आदींची उपस्थिती होती. यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्‍हणुन श्री नरहरी शिंदे, श्री गंगाधर शिंदे, महिला शेतकरी श्रीमती अनुराधा कटारे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्य्रक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध वाणांची माहिती देऊन शेतकरी बांधवानी शेती पुरक व्‍यवसाय करण्‍याचे आवाहन केले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ गजानन गडदे , डॉ डि के पाटील यांनी रबी पीक लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले तर श्री बी एस कच्‍छवे यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले.

Sunday, October 16, 2022

वनामकृवित आयोजित गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण प्रशिक्षणाचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या विद्यमाने “विविध पिकांचे गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण” या विषयावर एक आठवडीय राष्ट्रीय प्रशिक्षण दिनांक १० ते १५ ऑक्‍टोबर दरम्यान आयोजन करण्‍यात आले होते, दिनांक १५ ऑक्‍टोबर रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला.  

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे आभासी पध्दतीने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आणि विशेष अतिथी म्हणुन  शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले हे उपस्थित होते. कार्यक्रमास हैद्राबाद येथील भात संशोधन संस्‍थेचे विभाग प्रमुख डॉ. डी. सुब्रमण्यम, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. रघुवीरराव, आयोजक विभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षण) डॉ. राजेश कदम, प्रशिक्षण समन्वयक डॉ. गोदावरी पवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, दर्जेदार पिकांसाठी गुणवत्तापुर्ण बियाणे व तंत्रज्ञान यांची नितांत गरज असते. त्या अनुषंगाने सदर प्रशिक्षण अतिशय महत्वाचे आहे. प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थी व शास्त्रज्ञ आपल्या संशोधन कार्यात करतील अशी आशा व्‍यक्‍त केली;

भाषणात डॉ. देवराव देवसरकर म्हणाले की, सोयाबीन व कापूस या पिकांत सुधारीत बीयाणे व त्यांची गुणवत्ता अतिशय महत्वाची असते. सोयाबीन या पिकामध्ये उगवण क्षमता हा अतिशय महत्वाचा घटक आहे. बियाण्याची अनुवंशीक शुध्दता अतिशय महत्वाची आहे.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज  गोखले यांनी आपल्या मार्गदर्शनात आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून म्हणाले की, शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटीही म्हण प्रशिक्षणाच्या विषयामध्ये अतिशय योग्य आहे. बियाण्याची शुध्दता व प्रमाणिकरण कृषी क्षेत्रात अतिशय आवश्यक आहे.

डॉ. डी. सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात प्राप्‍त ज्ञानाचा उपयोग संशोधनात करण्‍याचा सल्‍ला दिला तर डॉ. पी. रघुवीरराव यांनी बियाणे, बियाण्याची गुणवत्ता अतिशय महत्वपुर्ण असल्‍याचे नमुद केले. आयोजक डॉ. गोदावरी पवार यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती देतांना म्‍हणाल्‍या की. प्रशिक्षणात राष्ट्रीय पातळीवरील बीजोत्पादन क्षेत्रातील नामांकित 30 शास्त्रज्ञांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले तर प्रशिक्षणासाठी 67 पदव्युत्तर, आचार्य ‍विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी प्रशिक्षणार्थी श्री. वसंत जाधव, कु. स्मिता देशमुख, मोहम्मदी बेगम, हनुमान कदम आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, प्रा. संजय पवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रा. संजय पवार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रविण वैद्य, डॉ. भारत आगरकर, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. मेघा जगताप, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विणा भालेराव, डॉ. एस. एस. फुलारी, डॉ. सुनिता पवार, प्रा. प्रितम भुतडा, डॉ. श्याम गरुड, डॉ. विशाल इंगळे तसेच नाहेप प्रकल्पातील कर्मचारी डॉ. हेमंत रोकडे, इंजी. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. श्वेता सोळंके, इंजी. शिवानंद शिवपुजे, डॉ. शिवराज शिंदे, अब्दुल बारी, इंजी. पौर्णिमा राठोड, इंजी. संजीवनी कानवटे, इंजी. अपुर्वा देशमुख, इंजी. गोपाळ रनेर, इंजी. तनजीम खान, श्री. प्रदीप मोकाशे, श्री. रामदास शिंपले, श्री. नितीन शहाणे, मुक्ता शिंदे, श्री. गंगाधर जाधव, श्री. मारोती रनेर, श्री. जगदीश माने यांनी परिश्रम घेतले.

Thursday, October 13, 2022

कठोर मेहनत, शिस्‍त, दृढ इच्‍छा, विचार उच्‍च असतील तर यश तुमचे आहे..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महाराष्‍ट्र स्‍टार्टअप यात्रेचा दुसरा टप्‍पा निमित्‍त जिल्‍हास्‍तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते झाले. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, प्रभारी प्राचार्य डॉ कल्‍याण आपेट, जिल्‍हा प्रशिक्षण अधिकारी श्री रामकांत उनवणे, कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्‍त श्री प्रशांत खंदारे, महाराष्‍ट्र राज्‍य लघु उद्योजक महामंडळाचे श्री शंकर पवार, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ स्मिता खोडके, डॉ राजेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, भारतीय तरूणांमध्‍ये मोठे कौशल्‍य आहे, त्‍यांच्‍यातील उद्योजकता कौशल्‍यास वाव देण्‍याचा प्रयत्‍न स्‍टार्टअप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन होत आहे. या प्रकल्‍पामुळे अनेक युवकांनी आपल्‍या नवकल्‍पनास मुर्त रूप देऊन उद्योगात मोठी भरारी घेतली. यशस्‍वी उद्योजक होण्‍याकरिता चांगले शिक्षण असले पाहिजे असे काही नाही, तर आपल्‍याकडे नवकल्‍पना पाहिजे, त्‍या संकल्‍पना प्रत्‍यक्ष राबविण्‍याकरीता कठोर मेहनत, शिस्‍त, दृढ इच्‍छा, उच्‍च विचार असतील तर यश तुमचेच आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन श्री प्रशांत खंदारे यांनी केले. शहरातील विविध महाविद्यालयातील विद्याथ्‍र्यांनी शिबीरात कृषि, शिक्षण, आरोग्‍य, ई प्रशासन आदी क्षेत्रातील नाविन्‍यपुर्ण व्‍यवसाय संकल्‍पनांचे सादरीकरण जिल्‍हास्‍तरीय तज्ञ समितीसमोर केले.  यातील तीन संकल्‍पनांमधुन राज्‍यसरीय निवड तज्ञ समितीव्‍दारे अंतिम विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. 

Tuesday, October 11, 2022

दर्जेदार बीजोत्‍पादनाकरिता एकत्रित कार्य करण्‍याची गरज ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित आयोजित गुणवत्‍तापुर्वक बीजोत्‍पादन व प्रमाणीकरण राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

पिकांचे उत्‍पादन मोठया प्रमाणावर दर्जेदार बियाणे उपलब्‍धता यावरच अवलंबुन आहे. परभणी कृषी विद्यापीठ विकसित विविध पिकांच्‍या वाणास शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे. सदर वाणांचे बीजोत्‍पादन वाढीकरिता महाराष्‍ट्र शासन, कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, बियाणे कंपन्‍या आणि शेतकरी यांनी एकत्रित येऊन कार्य करण्‍याची गरज आहे. विद्यापीठ  खासगी बियाणे उत्‍पादक कंपन्‍यासोबत सार्वजनिक – खासगी भागादारी तत्‍वावर बीजोत्‍पादन वाढीकरिता प्रयत्‍न करित आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या विद्यमाने “विविध पिकांचे गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण” या विषयावर एक आठवडीय राष्ट्रीय प्रशिक्षणाचे दिनांक १० ते १५ ऑक्‍टोबर दरम्यान आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ११ ऑक्‍टोबर रोजी प्रशिक्षणाच्‍या उदघाटनप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणत ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर अकोला येथील महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ संतोष आळसे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेपुणे येथील कांदा व लसुण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय महाजन, केहाळ येथील प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर घुगे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, आयोजक विभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षण) डॉ राजेश कदम, डॉ गोदावरी पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इतर क्षेत्राच्‍या तुलनेत कमी असुन हा वापर वाढण्‍याकरिता कृषी विद्यापीठ कार्य करीत आहे. काटेकोर शेती मध्‍ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अत्‍यावश्‍यक आहे. शेतकरी हा समाजातील एक प्रामाणिक व्‍यक्‍ती असुन सर्वांनी एकत्रितरित्‍या शेतकरी कल्‍याण करिता काम करावे लागेल.

महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ संतोष आळसे म्‍हणाले की, दर्जेदार बीजोत्‍पादन करतांना अनेक समस्‍या येतात, हवामान बदलामुळे अवेळी पडणार पाऊसामुळे बीजोत्‍पादनात मोठा परिणाम होत आहे. बीजोत्‍पादनात मजुरांचीही समस्‍या आहे, यावर डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या आधारे मात करणे शक्‍य आहे, यावर संशोधनाची गरज आहे. मार्गदर्शनात डॉ. विजय महाजन म्‍हणाले की, कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढत आहे, याचा लाभ घेण्‍याकरिता शेतकरी बांधवांना गटशेतीच्‍या माध्‍यमातुन ए‍कत्र येण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर घुगे यांनी भुईमुग बीजोत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.

प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी दर्जेदार बियाणे पुरवठयाकरिता बियाणे प्रमाणीकरण आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. प्रशिक्षणाच्‍या आयोजिका डॉ गोदावरी पवार यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात आणि माजी कृषि विद्यावेत्‍ता डॉ उदय आळसे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे स‍ुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ राजेश कदम यांनी मानले.

सदर प्रशिक्षण बीजोत्‍पादन व या क्षेत्रातील संधी संबंधीत कौशल्य वृध्दिंगत करणे हा उद्देश ठेवुन कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर, आचार्य ‍विद्यार्थी, प्राध्यापक, शास्‍त्रज्ञ तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, इंजी. संजय पवार व डॉ. मेघा जगताप यांनी केले आहे. प्रशिक्षणात राष्ट्रीय पातळीवरील बीजोत्पादन क्षेत्रातील नामांकित २४ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन प्रशिक्षणासाठी विविध महाविद्यालयातुन पदव्युत्तर,आचार्य ‍विद्यार्थी, प्राध्या पकविद्यापीठ शास्त्रज्ञ तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी केलेली आहे.


Monday, October 10, 2022

ताडलिमला येथे कापूस संशोधन योजना तर्फे जागतिक कापूस दिवस साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापूस संशोधन योजन येथील किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प (आयआरएम) द्वारे निवड केलेल्या पाच गावापैकी ताडलिमला ता.जि.परभणी येथे जागतिक कापूस दिवस दिनांक ७ ऑक्‍टोवर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी गटचर्चा आणि प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी बांधवाना योजनाचे प्रभारी अधिकारी कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक जाधव व प्रकल्प समन्वयक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अशोक जाधव यांनी कापूस लागवडीमध्ये शेंडा खुडणे तसेच गळ फांद्या काढून योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादनात कशी वाढ करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. दिगंबर पटाईत यांनी कपाशी मधील कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रकल्पातील १० शेतकऱ्यांना निमार्क, प्रोफेनोफॉस आणि फ्लोनिकॅमिड या निविष्ठा वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन सहयोगी श्री.ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले. गावातील श्री.बबनराव पेडगे, श्री.शिवाजी चव्हाण, श्री.पाराजी आव्हाड, श्री.वैजनाथ आव्हाड, श्री.श्रीकांत कुटे, श्री.भागोजी जोगदंड, श्री.आकाश नवले व श्री.रणजित चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रगतशील शेतकरी श्री. बबनराव पेडगे यांच्या कापूस प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.नारायण ढगे, प्रक्षेत्र सहाय्यक, कापूस संशोधन योजना यांनी परीश्रम घेतले.

कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प हा कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील बाभळगाव, बोरगव्हाण व टाकळगव्हाण ता.पाथरी आणि ताडलिमला व परळगव्हाण ता. परभणी या गावांमध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. प्रकल्पाअंतर्गत प्रति गाव १० शेतकरी याप्रमाणे एकूण ५० शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशके, ट्रायकोकार्डस, कामगंध सापळे आणि रासायनिक कीटकनाशके यासारख्या निविष्ठा वाटप करण्यात येत आहेत.


Sunday, October 9, 2022

वनामकृवित गहू लागवड तंत्रज्ञान विषयावर निवासी विस्तार प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि औरंगाबाद येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर दरम्यान गहू लागवड तंत्रज्ञान विषयावर कृषि विभागातील विस्तार कार्यकर्ते यांच्याकरिता तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण विद्यापीठात संपन्‍न झाला. प्रशिक्षणात लातूर आणि औरंगाबाद कृषि विभागातील आठही जिल्ह्यातील एकूण ४० कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक पदावरील विस्तार कार्यकर्त्यानी सहभाग घेतला.

प्रशिक्षणामध्ये गहू लागवड तंत्रज्ञानाविषयी विविध विषयांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यात गहू पिकाचे विविध वाण आणि लागवड तंत्रज्ञान याविषयी गहू पैदासकार डॉ.सुनिल उमाटे, खत आणि पाणी व्यवस्थापनावर विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, तण व्यवस्थापनावर कृषि विद्यावेत्ता डॉ. सुनिता पवार, रोग व्यवस्थापनावर पीक रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, कीड व्यवस्थापनावर वरीष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मधूकर मांडगे, रब्बी ज्वारीचे मूल्यवर्धन यावर सहाय्यक प्राध्यापक डॉ. मधुमती कुलकर्णी, समाजमाध्यमांचा विस्तार कार्यात प्रभावी वापर यावर जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रविण कापसे, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर व घोणस अळी व्यवस्थापन यावर किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत आदींनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकातंर्गत गहू व मका संशोधन केंद्र, सोयाबीन संशोधन केंद्र, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) याठिकाणी भेट देऊन विद्यापीठामध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सदरील प्रशिक्षण रामेती, औरंगाबाद तर्फे प्रायोजित होते, त्याकरिता रामेती औरंगाबाद चे प्राचार्य डॉ. अभयकुमार पडिले, सहाय्यक संचालक श्री.एम.एस.गुळवे, कृषी पर्यवेक्षक श्री.एम.एन.सिसोदिया, श्री.डी.आर.करांडे, श्री.भगवान वाकडे यांनी आयोजन केले होते. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी श्री.डिगांबर रेंगे, श्री.ज्ञानेश्वर माहोरे, श्री.नितीन मोहिते, श्री. पांडुरंग डिकळे, शेख साजीद यांनी परीश्रम घेतले.


वनामकृवित पिकांचे गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण यावरील राष्‍ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या विद्यमाने “विविध पिकांचे गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण” या विषयावर एक आठवडीय राष्ट्रीय प्रशिक्षणाचे दिनांक १० ते १५ ऑक्‍टोबर दरम्यान आयोजन केले आहे. सदर प्रशिक्षण बीजोत्‍पादन व या क्षेत्रातील संधी संबंधीत कौशल्य वृध्दिंगत करणे हा उद्देश ठेवुन कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर, आचार्य ‍विद्यार्थी, प्राध्यापक, शास्‍त्रज्ञ तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा उदघाटन समारंभ दिनांक ११ ऑक्‍टोबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित केला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असुन अकोला येथील महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ संतोष आळसे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, मुख्य वक्ते कांदा व लसुण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय महाजन, केहाळ येथील प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर घुगे हे उपस्थित राहणार आहेत.

प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन प्रशिक्षणा राष्ट्रीय पातळीवरील बीजोत्पादन क्षेत्रातील नामांकित २४ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणासाठी विविध महाविद्यालयातुन पदव्युत्तर, आचार्य ‍विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यापीठ शास्त्रज्ञ तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी केलेली आहे, अशी माहिती प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, इंजी. संजय पवार व डॉ. मेघा जगताप यांनी दिली आहे.

Saturday, October 8, 2022

वनामकृवि व मे. अॅक्वॅटीक रेमीडीज लिमिडेट, मुंबई यांच्यात सामंजस्य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व मे. अॅक्वॅटीक रेमीडीज् ली. मुंबई यांच्या दरम्यान दिनांक ७ ऑक्टोबर रोजी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्‍यात आला. सामंजस्‍य करारावर विद्यापीठाच्‍या वतीने संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी तर अॅक्वॅटीक रेमीडीज लिमिडेटच्‍या वतीने श्री भरत मेहता यांनी स्‍वाक्षरी केली. यावेळी सहयोगी संचालक (बियाणे) डॉ, के. एस. बेग, बीज संशोधन अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे, श्री. प्रणेश चांडक आदींची उपस्थिती होती.

सोयाबीन बियाणात उगवणक्षमतेची मोठी समस्‍या येते, सोयाबीन बियाणाची उगवणक्षमता वृध्दींगत करण्याकरिता मे. अॅक्‍वॅटीक रेमीडीज लिमिडेट यांनी ईलेक्ट्रानीक उपकरण तयार केले आहे. सदर उपकरणाचे विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान संशोधन विभागामार्फत सन २०२२-२३ ते २०२३-२४ या दोन वर्षात संशोधनात्‍मक प्रयोग घेण्यात येणार आहेत.

English News