Friday, January 27, 2017

जिजाऊ व सावित्रीबाई यांच्‍या विचारांची आजही गरज.....प्रख्‍यात वक्‍त्‍या मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस

वनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन

राजमाता जिजाऊनी राजे शिवाजी घडविले, स्‍वराज्‍य स्‍थापन केले. आज जिजाऊचे स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. समाजात आजही अनेक अंधश्रध्‍दा आहेत, आपण कृत्रिम गोष्‍टींवर भर देत आहोत, समाजात मुलभूत परिवर्तन करण्‍यासाठी वास्‍तववादी झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्‍यात वक्‍त्‍या मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि म‍हाविद्यालयाच्‍या वतीने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन दिनांक २७ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, डॉ हेमा सरंबेकर, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी कृष्‍णा होगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस पुढे म्‍हणाल्‍या की, देशाला व राज्‍याचा मोठा इतिहास असुन समाज घडविण्‍यात अनेक समाजसुधारकांनी आपले योगदान दिले आहे, इतिहासाची पाने युवकांनी चाळली पाहिजे. सुसंस्‍कत समाज घडविण्‍यासाठी जिजाऊ व सावित्रीबाई यांच्‍या विचारांची आजही गरज आहे. अनेक स्‍त्रीयांनी त्‍यांच्‍या चरित्रपासुन प्रेरणा घेऊन समाजहितांची कर्तव्‍य केले आहे. आज राजकारणात महिला पुढे येत आहेत, परंतु त्‍यांच्‍या वतीने पुरूषच कारभार करित आहेत, आजही सावित्रीबाईना अपेक्षित स्‍त्री-पुरूष समानता प्राप्‍त करू शकलो नाही. उच्‍च शिक्षणात स्‍त्रीचा सहभाग वाढवावा लागेल. आज सावित्रीबाईनाच्‍या चिकित्‍सक शिक्षण पध्‍दतीची समाजास आवश्‍यकता आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. 
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जिजाऊ व सावित्रीबाई यांचे विचार काळाच्‍या पुढचे होते. आजही स्‍त्री शिक्षणात आपणास मोठा पल्‍ला गाठावयाचा आहे. 
कार्यक्रमाचेे प्रास्‍तविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वक्‍त्‍यांचा परिचय डॉ नंदकिमोर भुते यांनी करून दिला तर सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले व आभार कृष्‍णा होगे यांनी मानले. कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने आंतरराष्‍ट्रीय धावपटू ज्‍योती गवते हिचा सत्कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यानिमित्‍त रक्‍तदान शिबीराचे ही आयोजन करण्‍यात आले होते, यात एकशेसात विद्यार्थी-विद्यार्थींनी रक्‍तदान केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यीनी परिश्रम घेतले.



गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या एलपीपी स्‍कुलमध्‍ये टॅलेेन्‍ट शो संपन्‍न


टिप - सदरिल बातमी प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

वनामकृवित प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ६ वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियांता श्री रूमणे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी राष्‍ट्रीय छात्रसैनिकांनी छात्राधिकारी ले प्रा आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरूनां सलामी देण्‍यात आली. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी प्रजासत्‍ताक दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. माननीय कुलगुरूच्‍या हस्‍ते परभणीतील आंतरराष्‍ट्रीय धावपटु ज्‍योती गवते हीचा विद्यापीठाच्‍या वतीने गौरव करण्‍यात आले.


26

Saturday, January 21, 2017

कृषिक्षेत्रात मुलभूत संशोधनात अधिक गुंतवणूक करणे गरजेचे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित शिक्षण व संशोधन क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्‍या कौशल्‍य विकासावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

कोणत्‍याही संस्‍थेचे भविष्‍य हे उपलब्‍ध मनुष्‍यबळावर अवलंबुन असते, हे मनुष्‍यबळ प्रशिक्षीत करण्‍यासाठी कौशल्‍य विकासावर भर द्यावा लागेल. कृषि संशोधनात उपयोजित संशोधनावर आपण जास्‍त भर देतो, परंतु भविष्‍यात मुलभूत संशोधनाकरिता गुंतवणूक वाढवावी लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने मृदा, पिक, जल, अन्न, चारा संशोधन व अद्यावत परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकास या विषयावरील एकवीस दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २० जानेवारी ते फेब्रूवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन  विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम हे उपस्थित होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, मुलभूत संशोधनात कार्य करण्‍यासाठी कृषि शास्‍त्रज्ञांना मोठा वाव आहे. विविध विषयात ही आंतर शाखीय संशोधन झाले पाहिजे तरच आपण नवनवीन शोध लावु शकु. संशोधन करतांना शास्‍त्रज्ञांनी विशिष्‍ट चौकटीबाहेर पडुन संशोधन केल्‍यास निश्चितच समाजाचा फायदा होईल. विदेशात प्राध्‍यापक वर्गास समाजात मोठा मान असतो, आपल्‍याही देशात प्रत्‍येक प्राध्‍यापकांनी समाजासाठी संशोधनातुन कार्य केलयास निश्चितच ते स्‍थान प्राप्‍त होऊ शकते.   
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, आज शेतीत अतिरिक्‍त रासायनिक खते व पाण्‍याचा वापरामुळे मोठे नुकसान होत आहे. कृषि विकासासाठी काटेकोर शेती तंत्रज्ञानावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. शेतक-यांची कृषिक्षेत्रातील समस्‍या सोडविण्‍यासाठी विविध विषयात आंतर शाखीय संशोधन करावे लागेल. संशोधनास गती देण्‍यासाठी विद्यापीठातील संशोधन व प्राध्‍यापकांच्‍या कौशल्‍य विकासावर भर द्यावा लागेल, यासाठी सदरिल प्रशिक्षणासारखे कार्यक्रय उपयूक्‍त ठरतात, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
जल व मृदाच्‍या गुणधर्मात वरचेवर –हास होत असुन समाजाच्‍या कल्‍याणासाठी जल व मृदाचे गुणधर्मात सुधारणा करणे गरजेचे असल्‍याचे मत कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे यांनी व्‍यक्‍त केले तर केंद्र शासनाने हाती घेतलेला मृदा आरोग्‍य पत्रिका वाटप व त्‍याचा वापर यशस्‍वीतेसाठी कृषि शास्‍त्रज्ञांना प्रयत्‍न करावा लागेल, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्रशिक्षण आयोजक कुलसचिव तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील मृदाशास्‍त्रज्ञ लिखित पुस्‍तकांचे प्रकाशन करण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षणाबदलत्या हवामानामुळे होणाऱ्या पर्यावरण विषयक तसेच अन्नधान्य, मृदा, जल, पिके, प्राणी आदीवर होणाऱ्या परिणामाबाबत मान्‍यवरांचे व्याख्यानेे होणार आहेत. कौशल्य विकासासोबत व्यक्तीमत्व विकास या विषयावार मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी भारतातील नामांकित संस्थामधील शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), डॉ. भुपालराज (हैद्राबाद),  डॉ. अंजली पारसनिस (मुंबई), डॉ. अे. एल. फरांदे (राहुरी), डॉ. व्हि. के. खर्चे (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी), तसेच विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाचा सहभागी प्रशिक्षणार्थीना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कौशल्‍य विकासासाठी फायदा होणार आहे. प्रशिक्षणा शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ३० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे व इतर कर्मचारी परिश्रम घेतले.


शहर स्‍वच्छता मोहिमेत वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु

वनामकृविच्‍या वतीने परभणी शहर स्‍वच्‍छ सर्वेक्षण मोहिमेसाठी जनजागृती रॅलीचे आयोजन


शहर व परिसर स्‍वच्‍छतेसाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपली जबाबदारी उजलली पाहिजे. स्‍वच्‍छता मोहिम केवळ कार्यक्रमापुरतीच सीमीत न राहता, स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहीजे. परभणी शहर स्‍वच्‍छता मोहिमेत वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांचा सहभाग निश्चितच मोलाचा ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी शहर महानगरपालिका यांचे संयुक्‍त विद्यमाने स्‍वच्‍छता मोहिमेचे कृषि महाविद्यालयात आयोजन दिनांक २१ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते, याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल, माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम, महापौर मा. संगिताताई वडकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे, हे उपस्थित होते तर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ अरूण कदम, प्रा. हेमा सरंबेकर, मनपा अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अजिज कारचे, केंद्र शासनाचे स्‍वच्‍छता सर्वेक्षण समिती सदस्‍य श्री सिंतेंद्र त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, विद्यापीठाचे विद्यार्थी गेल्‍या दोन वर्षापासुन सातत्‍याने स्‍वच्‍छता मोहिम राबवुन स्‍वच्‍छतेप्रती जनजागृतीत सहभाग नोंदवीत आहेत, याची दखल राज्‍याचे माननीय राज्‍यपाल महोद्यांनी देखिल वेळोवेळी घेतली आहे. कृषिचे विद्यार्थ्‍यीचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.
जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांनी शहर स्‍वच्‍छता मोहिमेत गेली दोन वर्षापासुन भरीव योगदान दिले असुन स्‍वच्‍छता मोहिमेत प्रत्‍येक नागरिकाचा सहभाग महत्‍वाचा आहे. सांडपाणी व्‍यवस्‍थापन, कच-यांचे योग्‍य विल्‍हेवाट आदी तांत्रिक गोष्‍टीत सुधारणा करण्‍यास मोठा वाव आहे. परभणी स्‍वच्‍छ सर्वेक्षण मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्‍याच्‍या सहकार्याने शहराच्‍या क्रमांकात निश्चितच सुधारणा होत आहे.  
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी गेल्‍या दोन वर्षापासुन सातत्‍याने स्‍वच्‍छता मोहिमे योगदान देत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुषमा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.  
यावेळी स्‍वच्‍छता जनजागृती प्रभात फेरीची सुरवात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन करण्‍यात आली. प्रभात फेरीची सांगता स्‍टेडियमवर स्‍वच्‍छतेवर आधारित पथनाटयाच्‍या सादरीकरणाने झाली. कार्यक्रमास कृषि महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या स्‍वयंसेवकासह विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 




Friday, January 20, 2017

वनामकृवित शिक्षण व संशोधन क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्‍या कौशल्‍य विकासावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने राज्यस्तरीय मृदा, पिक, जल, अन्न, चारा संशोधननविनतम परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकास या विषयावरील 20 जानेवारी ते 09 फेब्रूवारी दरम्‍यान एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमााचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 21 जानेवारी रोजी माजी कुलगुरू मा. डॉ एस एस कदम यांच्‍या हस्‍ते होणार असुन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहेत. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रशिक्षणाचे आयोजक विभाग प्रमुख डॉ विलास पाटील हे असुन समन्वयक म्‍हणुन डॉ सय्यद ईस्माईल हे काम पााहात आहेत. सदरील प्रशिक्षाबदलत्या हवामानामुळे होणाऱ्या अन्नधान्य, मृदा, जल, पिके आणि प्राणी यांच्यावार होणाऱ्या परिणामाचा प्रश्नावर विविध प्रात्याक्षिके व मान्‍यवरांचे व्याख्यानेे  होणार आहेत. कौशल्य विकासासोबत व्यक्तीमत्व विकास या विषयावारही मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणासाठी देशातील विविध संस्थामधील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), डॉ. भुपालराज (हैद्राबाद), डॉ. अंजली पारसनिस (मुंबई), डॉ. अे. एल. फरांदे (राहुरी), डॉ. व्हि. के. खर्चे (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी) तसेच विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाचा सहभागी प्रशिक्षणार्थीना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कौशल्‍य विकासासाठी फायदा होणार आहे. प्रशिक्षणास शिक्षण व संशोधन क्षेत्रातील 30 शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे व इतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

Wednesday, January 18, 2017

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘देशी कापूस पुनरूज्जीवन’ बाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्‍न

देशी कपाशीचे बिजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणे आवश्यक......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू


कोरडवाहू लागवडीमध्ये कापसाचे किफायतीशीर उत्पन्न मिळण्यासाठी देशी कापसाची लागवड करणे आवश्यक आहे. देशातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान २० टक्के क्षेत्रावर देशी कापसाची लागवड होणे आवश्यक असुन त्याकरीता विभागनिहाय योग्य वाणांची निवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन हाती घ्‍यावे लागेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये देशी कापूस पुनरूज्जीवन बाबत एकदिवसीय कार्यशाळेचे दि. १६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेत हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉ. ब्लेझ डीसूझा, बेंगलुरू येथील सहज समृद्धी स्वयंसेवी संस्थेचे श्री कृष्णा प्रसाद, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर, खांडवा येथील प्रमुख कापूस शास्त्रज्ञ डॉ. शास्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी कोरडवाहू लागवडीमध्ये लांब धाग्याचा देशी कापूस अधिक फायदेशीर ठरेल असे मत व्‍यक्‍त केले तर कपाशीच्‍या नविन विकसित वाणांचे धाग्याचे गुणधर्म अमेरिकन कपाशीच्या तोडीचे असल्यामुळे या वाणांची लागवड कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे श्री. कृष्णा प्रसाद यांनी सांगितले. देशी कापसाच्या वाणांचे बिजोत्पादन करण्यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्र तथा बिजोत्पादक कंपन्यांशी सामंजस्य करार करून अधिक प्रमाणात बियाणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे संचालक संशोधन डॉ. वासकर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी कार्यशाळेच्या आयोजनाविषयीची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यशाळेत देशी (गावराण) कापूस लागवडीविषयी असणा-या शेतक-यांच्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि देशामध्ये देशी कापसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी दिशा याबाबत चर्चा करण्यात येऊन भविष्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात आला. कापूस संशोधन केंद्राच्या कपाशीच्‍या विविध देशी वाणांच्‍या प्रक्षेत्रास सहभागी शेतकरी व शास्त्रज्ञांनी भेट दिली. प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसीत विविध वाण हे धाग्याचे गुणधर्म व उत्पादकता याबाबत सरस असल्याचे आढळून असुन हे वाण विविध राज्यांतील देशी कापूस लागवड करणा-या शेतक-यांना उपलब्ध करून देण्याची मागणीही सहभागी शेतक-यांनी यावेळी केली. देशी कापसाच्या धाग्याचे गुणधर्मामध्ये प्रदीर्घ संशोधन व अथक परिश्रमाने अमुलाग्र बदल घडविणा-या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी कापूस विशेषज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर यांचा विशेष सत्कार यावेळी मा. कुलगुरू यांचे हस्ते करण्यात आला.

तांत्रिक सत्रात विद्यापीठ विकसीत विविध देशी कापसाचे वाण व त्यांची लागवड याबाबत कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे, इतर राज्यातील वाणांबाबत नागपूर येथील डॉ. ब्लेझ आणि देशी कापसातील कीड व्यवस्थापन याबाबत डॉ. शिवाजी तेलंग यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यशाळेत कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल आदी राज्यांतील तसेच राज्‍यातील नांदेड, परभणी, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, नंदुरबार आदी जिल्ह्यातील शास्त्रज्ञ, कृषि विस्तारक व देशी कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.

Friday, January 13, 2017

तरुणांनी आपल्‍या ज्ञानाचा उपयोग शेतक-यांच्‍या विकासासाठी करावा.... शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात राष्‍ट्रमाता जिजाऊ आणि स्‍वामी विवेकानंद यांची जयंती निमित्‍त दिनांक 12 जानेवारी रोजी व्याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण होते तर विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. रणजीत चौव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात डॉ. ढवण म्‍हणाले की, नितीशास्‍त्र आणि युध्‍द शास्‍त्राचा मुळ गुरु म्‍हणजे राष्‍ट्रमाता जिजाऊ होत तर स्‍वामी विवेकानंद म्‍हणजे आजच्‍या युवकांचा आदर्श होत. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या बुध्‍दीचा व शक्‍तीचा उपयोग  देशाच्‍या विकासासाठी करावा. तल्‍लक बुध्‍दी व कुशाग्र तरुणांचे मुर्तीमंत उदाहरण म्‍हणजे स्‍वामी विवेकानंद होत. विवेकानंदानी भारतीय संस्‍कृती व तत्‍वज्ञानाचा गाडा अभ्‍यास केला. त्‍यांनी भारत भ्रमणकरुन संस्‍थानांशी संपर्क साधुन समाजामध्‍ये जनजागृतीचे कार्य केले. आजच्‍या तरुणांनी ज्ञानलालसा अंगीकृत करुन शेतक-यांच्‍या विकासासाठी या ज्ञानाचा वापर करावा. प्रास्‍ताविकात डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्‍हणाले की, आजचा तरुण हा कार्यक्षम, उत्‍साही व अहंम जागृत असणे आवश्‍यक आहे. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धामंचचे अध्‍यक्ष जितेंद्र गायकवाडा, सदस्‍य रवि उगले, सुशांत धवारे, विनोद पवार, महावीर मैद, मनोज बोक्‍से, प्रशांत तोटेवाड, नवनाथ राठोड, पंकज वाघ यांनी परिश्रम घेतले.

मौजे ब्राम्‍हणगांव येथे गृहविज्ञान तंत्रज्ञानावर कार्यशाळा संपन्‍न


टिप - सदरिल बातमी प्राचार्या, गृहव्‍ािज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Tuesday, January 10, 2017

वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयांतर्गत असलेल्‍या कृषि वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या वतीने दिनांक २७ डिसेंबर २०१६ ते ९ जानेवारी २०१७ दरम्‍यान वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार या विषयावर चौदा दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता दिनांक ९ जानेवारी रोजी झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. एन. डी. जांभळे हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. एन. डी. जांभळे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विविध पिकांच्‍या चांगल्‍या वाण निर्मितीसाठी पारंपारीक पैदास पध्‍दती सोबतच जैविक तंत्रज्ञानाचा संशोधकांनी वापर करावा. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी सदरिल प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या राबविल्‍याबाबत आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एल. एन. जावळे यांनी केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रशिक्षणास राज्‍यातील विविध महाविद्यालय व संशोधन केंद्राातील २२ प्रशिक्षणार्थीनी सहभागी झाले होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. एस. व्‍ही. कल्‍याणकर, डॉ. जी. डी. देशमुख, प्रा. के एम शर्मा, डॉ. ए. बी. बागडे, डॉ. डी. जी. दळवी, प्रा. एच एच भदरगे, के एल सांगळे आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, January 3, 2017

महिलांनी स्‍वत: वरील विश्‍वास वाढवावा, स्‍वयंसिध्‍द व्‍हावे.....सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर

तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित वनामकृविच्‍या महिला शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद
महिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर  
कृषि  प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्‍यवर 



सावित्रीबाई फुले यांचे चरित्र अभ्‍यासुन त्‍या मार्गाने जाणे आज आवश्‍यक आहे, देश महासत्‍ता होण्‍यासाठी महिलांचा विकास आवश्‍यक आहे. महिलांनी स्‍वत: वरील विश्‍वास वाढवावा, स्‍वयंसिध्‍द व्‍हावे, असे प्रतिपादन कोल्‍हापुर येथील स्‍वयंसिध्‍दा संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय, हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग, हिंगोली यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. एच. पी. तुम्‍मोड, हिगोंली जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. श्री. राजेश्‍वर पतंगे, माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्या प्रा विशाला पटनम, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, नाबार्डचे श्री प्रितम जंगम, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ पी पी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर पुढे म्‍हणाल्‍या की, महिला आर्थिक व राजकीय साक्षर झाल्‍या पाहिजेत. शिक्षण व शेतीची सांगड घातली पाहिजे. महिला बचतगटांनी कर्जाचा उत्‍पादक कामासाठी उपयोग करावा. महिला बचत गट हे विकासाचे व्‍यासपीठ व्‍हावे. महिला बचत गटांनी गटशेती, कंत्राटी शेती करावी. महिलांनी चौकटी बाहेर पडुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. रोज नवनवीन शिक्षण घ्‍या. महिलांनी घर सांभाळुन एकमेकींना प्रोत्‍साहन देत रोपवाटीका, जीवाणु खत व गांडुळ खत निर्मिती, फळ प्रक्रिया उद्योग, कुटिर उद्योग करावेत. आज सर्वांना नौकरी मिळणे दुरापास्‍त आहे, शेती व शेतीपुरक व्‍यवसायात उतरावे लागेल. आज पिकविता येते पण विकता येत नाही अशी गत झाली आहे, विक्री कौशल्‍य महिलांनी शिकावे. महिलांनी एकतरी हस्‍तकला जोपासवी. महिलांनी शेती, माती व ज्ञान संस्‍कृती जपावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु यांनी राज्‍यातील महिला बचत गटात मराठवाडयातील महिला बचत गट सर्वांत सक्रिय असुन या बचत गटांना तांत्रिक, आर्थिक व बाजारपेठेबाबत प्रशिक्षण देण्‍यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईन. शेतकरी बियाणे कंपन्‍या व महिला बचत गटांचा माल विक्रीसाठी थेट विक्रते ते ग्राहक यांच्‍यात एक व्‍यासपीठ उपलब्ध करण्‍यासाठी विद्यापीठ उपक्रम घेईन, असे आश्‍वासन दिले.
आमदार मा. श्री रामराव वडकुते आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महिलांना आपल्‍या शक्‍तीची जाणीव झाली पाहिजे, समाज परिवर्तनासाठी महिलांनाच पुढाकार घ्‍यावा लागेल. माजी खासदार मा. अॅड. शिवाजी माने आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेती विषयक निर्णय प्रक्रियेत महिलाचा सहभाग वाढवावा लागेल, महिला जोपर्यंत पुरूषांच्‍या खांद्यालाखांदा लावुन समाजात उभ्‍या राहणार नाहित तोपर्यंत देशाची प्रगती होणार ना‍ही. जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष श्री राजेश्‍वर पतंगे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व विजय ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ पी पी शेळके यांनी केले. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलाचे काबाटकष्‍ट कमी करणारे तंत्रज्ञान, अन्‍न व फळप्रक्रिया तंत्रज्ञान, बालकांचा विकास आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच नाबार्डच्‍या वतीने कॅशलेस प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या शेतीभातीच्‍या महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. दाळ प्रक्रिया उद्योग करणा-या ग्रामीण महिला उद्योजिका सुलोजना नरवाडे यांच्‍या यशोगाथावर आधारीत आम्रपाली या लघुपटाचे विमोचन यावेळी करण्‍यात आले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास शेतकरी महिलांनी मोठया प्रतिसाद दिला तर मेळाव्‍यास मोठया संख्‍येने शेतकरी महिला उपस्थित होत्‍या.
मार्गदर्शन करतांना सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर
मार्गदर्शन करतांना विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते

अध्‍यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने


प्रास्‍ताविक करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले