Friday, September 27, 2013

जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास सदिच्‍छा भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयास भेट दिली त्‍याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग, सोबत कुलगूरू डॉ किशनराव गोरे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  प्रभारी ग्रंथपाल डॉ जे बी जगताप आदी
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रास जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग यांनी भेट दिली त्‍याप्रसंगी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत मा‍हिती देतांना कुलगूरू डॉ किशनराव गोरे व व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे आदी
परभणी जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग  यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास दिनांक 27 सप्‍टेंबर 2013 रोजी सदिच्‍छा भेट दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का. वि. पागीरे, ग्रंथपाल डॉ. जे. बि. जगताप, डॉ. मेहत्रे आदि उपस्थित होते.
विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालय, बिजोत्‍पादन प्रक्षेत्र, शेततळे, उद्यानविद्या विभाग व कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र या उपक्रमास भेट देवुन समाधान व्‍यक्‍त केले. विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयातील अद्यावत सुविधांची पाहाणी करुन उपस्थित विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. विद्यार्थ्‍यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करतांना मा. श्री एस. पी. सिंग म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये यश प्राप्‍त करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी प्रामाणिक प्रयत्‍न व कठोर परिश्रम करावेत. कृषि पदविधरांनी शेतीवर प्रेम करण्‍याचा सल्लाही त्‍यांनी दिला. तसेच त्‍यांनी स्‍वत:चे अनुभव विद्यार्थ्‍यांना सांगितले. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात भेटी प्रसंगी व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत मा‍हिती दिली. 

Wednesday, September 25, 2013

जमीनाची प्रत सुधारण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक ........डॉ.विलास पाटील

शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ विलास पाटील
प्रास्‍ताविक करतांना डॉ. बि. एम. ठोंबरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत, असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व सोयाबीन संशोधन केंद्र यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदुतांनी मौजे दामपुरी येथे रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 25.09.2013 रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमास अध्‍यक्ष म्‍हणुन गांवचे सरपंच सौ. स्‍वाती बालासाहेब सुर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषि महाविद्यालयचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. विलास पाटील, सोयाबीन संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. के. एस. बेग, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्‍वयक तथा विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे, प्रभारी डॉ. आर. पी. कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. नागरगोजे,  प्रा. डि. टी. पवार, गावचे पोलीस पाटील श्री अण्‍णासाहेब गमे व उपसरपंच श्री माणिकराव गमे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. बि. एम. ठोंबरे यांनी केली. कृषि महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील म्‍हणाले कि, जमीनचे आरोग्‍य सुधारण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक असुन रासायनिक खतांची संतुलीत वापर करावा. डॉ. अशोक जाधव यांनी तण व्‍यवस्‍थापन माहिती दिली तर डॉ. डि. जी. मोरे यांनी खरीप व रबी हंगामातील येणा-या किडीबद्दल किटकनाशक फवारतांना घ्‍यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच डॉ संतोष पवार यांनी ए‍कात्मिक रोग व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. लोहगावातील माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य श्री सखारामजी लोहगांवकर व श्री माणिकराव गमे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
शेतक-यांचे प्रश्‍नोउत्‍तराच्‍या माध्‍यमातून शेती विषयक शंकाचे समाधान शास्‍त्रज्ञांनी केले. यावेळी शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळावा यशस्‍वी करण्‍यासाठी उमेश चादर, विनायक राठोड, साईनाथ तांबोळी, शेख आशिफ, श्रीकांत गोरे, बालाजी डाके, महेश देशमुख, विकास कदम, राहुल कच्‍छवा, नागेश एंगडे, अमोल मोरे, देवानंद गायकवाड, मनिष मस्‍के, वैभस सितापुरे, शेख शफीक, शेख मोईज, खातिब खालेद व विनायक राठोड कृषिदुतांनी परिश्रम घेतले.


Tuesday, September 24, 2013

शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खतांचा संतुलीत वापर करावा.....डॉ. व्हि. डी. पाटील



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय कोरडवाहु संशोधन केंद्र यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकंन्‍यानी मौजे बाभुळगांव येथे रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 23.09.2013 रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमास अध्‍यक्ष म्‍हणुन गांवचे सरपंच सौ. कुंताताई विठ्ठलराव पारधे तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील व मुख्‍य शास्‍त्रज्ञ श्री सु. भा. चौलवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्‍तावना डॉ.आर.पी.कदम यांनी केली.
अधिक उत्‍पादनासाठी माती परिक्षण अत्‍यंत आवश्‍यक असुन एक वेळेस माती परिक्षण केल्‍यास तीन वर्ष त्‍याच्‍या आधारे खताचे नियोजन करता येते. सर्व शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खतांचा संतुलीत वापर करण्‍याचा सल्‍ला कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी आपल्‍या भाषणात दिला. डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी करडई पिक लागवड तंत्रज्ञान व त्‍याची उपयुक्‍तता याबद्दल मार्गदर्शन केले; प्रा. सौ. एस. यु. पवार यांनी तण व्‍यवस्‍थापनांतर्गत विविध तणनाशके व त्‍याचा वापर ह्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. डि. आर. कदम यांनी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन तर डॉ. ए. पी. सुर्यवंशी यांनी ए‍कात्मिक रोग व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. चौलवार ह्यांनी कोरडवाहु पिकाबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रश्‍नोत्‍तराच्‍या माध्‍यमातून शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान करण्‍यात आले यावेळी गांवातील 100 ते 150 शेतकरी उपस्थित होते. मेळावा यशस्‍वी करण्‍यासाठी कृषिकन्‍या स्‍वाती आमले, शितल देशमुख, अनिता देशमुख, वैशाली देशमुख, सत्‍यभामा घाटुळ, अश्विनी गाडेकर, अल्‍का ढवळे, श्रुती जोगु, ज्‍योत्‍स्‍ना कुमारी, प्रियंका चव्‍हाण, प्रियंका कदम, सुरेखा कडेकर, शुभांगी कळंबे, वैशाली काळे, प्रियंका खटींग, ज्‍योती खुपसे, मधुरा कुलकर्णी, अश्विनी कुबडे, सरोजना पटेवाड, प्रितीमाला या सर्व कृषिकन्‍यांनी परिश्रम घेतले. 

राष्‍ट्रीय सेवा योजना दिन साजरा

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात 24 सप्‍टेंबर रोजी राष्‍ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्‍यात आला. राष्‍ट्रीय सेवा योजना स्‍थापना 1969 साली म. गांधीजीं यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त तत्‍कालीन केंद्रिय शिक्षण मा‍‍ डॉ. व्‍ही. के. आर. व्‍ही राव यांच्‍या सुचनेनुसार भारतातील प्रत्‍येक महाविद्यालयात करण्‍यात आली. त्‍या‍निमित्‍त सहयोगी अधिष्‍ठता व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी रासेयो स्वयंसेवकांना स्‍वयं शिस्‍तीची शपथ दिली. तसेच म. गांधीजींच्‍या अहिंसा व सत्‍य या तत्वावर आधारीत व समाजोपयोगी भुमिका सर्व स्‍वयंसेवकांनी अंगीकृत करावी असा सल्‍ला त्‍यांनी आपल्‍या भाषणात दिला. भ्‍भ्‍भ्‍भुमिकार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी रासेयोचे स्वयंसेवक सागर झावरे, सुनिल शिंदे, उमेश राजपुत, राजेंद्र पवार, कुमारी वैशाली खकाळ आदी परिश्रम घेतले.

एकात्मिक शेती पध्‍दती प्रारूपाची पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन प्रकल्‍पास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी भेट देउन विविध प्रयोगांची व एकत्मिक शेती पध्‍दती प्रारूपाची पाहणी केली. यावेळी मुख्‍य कृषिविद्यावेत्‍ता डॉ बा नि नारखेडे यांनी मान्‍यवरांना माहीती दिली. याप्रसंगी तण नियंत्रण योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ अशोक जाधव, श्री गि य सोनवणे, श्री समर्थ कारेगांवकर, श्री शेख एजाज, श्री शेख नुर, श्रीमती मिनाक्षी बेंडे, श्री इमरान आदी उपस्थित होते. 

Monday, September 23, 2013

कृषिदुतांनी केले दामपुरी येथे घटसर्प व फ-या रोगासाठी जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम वर्षातील कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमांतर्गत मौजे दामपुरी येथे घटसर्प व फ-या या दोन रोगांसाठी जनावरांना प्रतिबंधनात्‍मक लसीकरणाचा कार्यक्रम घेण्‍यात आला. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश माने यांनी जनावरांचे लसीकरण केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपसरपंच श्री माणिकराव गमे व शेतकरी बांधव मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी कृषिदुत विनायक राठोड, साईनाथ तांबोळी, आमोल मोरे, शेख आशिफ, बालाजी डाके, श्रीकांत गोरे, नागेश एंगडे, विकास कदम, महेश देशमुख, शेख मोईज आदिंनी परिश्रम घेतले.
ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सुचनेनुसर आणि विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा सहसमन्‍वयक डॉ. बी; एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. राजेश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. नागरगोजे व कार्यक्रम प्रमुख डॉ. के. एस. बेग यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला.

Sunday, September 22, 2013

दामपुरी येथे वृक्षारोपन कार्यक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, परभणी येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रयाचे कृषिदुतांनी दि. 19.09.2013 रोजी मौजे दामपुरी येथे वृक्षारोपन कार्यक्रम राबविला. कार्यक्रमास गावाती उप-सरपंच श्री माणिकराव गमे व शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी विद्यार्थी श्री एम. चादर, डी. गायकवाड, व्हि. राठोड, एन. येडगे, एस. तांबोळी, ए. शेख, एस. गोरे, बी. डाके, एम. देशमुख, व्‍ही. कदम, एस. शेख, के. खालेद, ए. मोरे, एम. शेख, व्‍ही. सीतापुरे, एम. मस्‍के, आर. कच्‍छवा इत्‍यादींनी प्रयत्‍न केले.
ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सुचनेनुसर आणि विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा सहसमन्‍वयक डॉ. बी; एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. राजेश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. नागरगोजे व कार्यक्रम प्रमुख डॉ. के. एस. बेग यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत.

Saturday, September 21, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम तर काही ठिकाणी जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २५.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ३.० ते १७.० कि.मी. प्रति तास वेगाने पश्चिम व पश्चिम-वायव्‍य दिशेने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६.० ते ९५.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२.० ते ८७.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्‍यम तर काही ठिकाणी जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

शेतकरी बांधवांना कृषि सल्‍ला

 सोयाबीन

या आठवडयात हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे सोयाबीनची कापनी करू नये.
 बाजरी

या आठवडयात हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे बाजरी पिकाची कापनी करू नये.
 मुग,उडीद

मुग व उडीदाची काढणी केलेल्‍या जमीनीत वापसा येताच वखरणी करून रब्‍बी पेरणीसाठी जमीन तयार करून घ्‍यावी.  
 तीळ,कारळ

जमिनीत वापसा येईपर्यंत तीळ कारळाची कापनी करू नये. मागील आठवडयात कापनी केलेले पीक जमिनीवर उभे करून ठेवावे.
 हळद,आले

हळदीचे व आले पिकातील अतिरिक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे.
 केळी

केळीचे बागेतील पावसाचे पाणी बाहेर काढून द्यावे. केळीच्‍या बागेतील पाण्‍याच्‍या निच-यासाठी उताराच्‍या अडव्‍या बाजुने बागे बाहेरून चर घ्‍यावेत.
 डाळिंब

बागेतील पावसाचे पाणी बाहेर काढून द्यावे. फळावरील ठिपके रोगाच्‍या नियंत्रणासाठी बागेत वापसा येताच कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
 आंबा

पावसाचे पाणी बागेत साचुन रहाणार नाही याची काळजी घ्‍यावी. आंबेबहाराच्‍या फळकाडयावरील नवीन येणारी फुट काढून टाकावी.     
 बोर

बोरीच्‍या झाडावर पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याच्‍या नियंत्रणासठी फेन्‍वलरेट २० टक्‍के ५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० टक्‍के १६ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
 भाजीपाला़

कोबीवर्गीय भाजीपाला पिकात पानेखाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याच्‍या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. रांगडा कांदा लागवडीसाठी वापसा येताच गादीवाफयावर बियाण्‍याची पेरणी करावी. लसुन लागवडीसाठी वापसा येताच जमीन तयार करून घ्‍यावी. 

 पशुधन व्‍यवस्‍थापन : जनावरांमध्‍ये सद्या गोचीडांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. 
 त्‍याच्‍या नियंत्रणासाठी ब्‍युटॉक्‍स १ मिली प्रति लिटर पाण्‍यात मिसळून जनावरांचे 
 अंगावर फवारणी करावी. 
 शेळया मेंढयामध्‍ये सर्दीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास नाकात निलगीरीच्‍या  
 तेलाचा १ थेंब सोडावा. 

सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ४५                                              
दिनांकः २०.०९.२०१३

Thursday, September 19, 2013

फिरते कृषि निदान व प्रदर्शन केंद्राचे उद् घाटन

वसंतराव नाइक मराठवाडा कृषि विद्यापीठ गेली चार शतकापासुन कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात सेवा देत आहे. विद्यापीठाच्‍या वतीने विद्यापीठ कृषि तंत्रज्ञान प्रसारासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. याकरीता सातत्‍याने आधुनिक पध्‍दती व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्‍यात येतो. या प्रयत्‍नातुनच शेतक-यांच्‍या समस्‍यांचे त्‍यांच्‍या शेतावर निदान करणे व सोडविणे तसेच विद्यापीठाचे तंत्रज्ञान थेट त्‍यांच्‍या बांधावर पोहचविण्‍यासाठी सुसज्‍ज असे फिरते कृषि निदान व प्रदर्शन केंद्र 17 सप्‍टेंबर रोजी रबी पीक शेतकरी मेळाव्‍याच्‍या निमित्‍त भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करून कार्यान्वित करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड, मा श्री अनिलराव नखाते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. व्‍ही. एस. शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आदी उपस्थित होते.
हे वाहन तथा केंद्र अतिशय आधुनिक पध्‍दतीने तयार करण्‍यात आले असुन यात कीड व रोग निदान, माती व पाणी परिक्षण, पशु व दुग्‍ध संवर्धन निदान व चिकित्‍सा आदी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. यामुळे शेतक-यांच्‍या समस्‍यांचे निदान थेट त्‍यांच्‍या शेतावर होवून त्‍याच ठिकाणी समस्‍यांचे निराकरण करता येउ शकते. तसेच विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाची माहिती शेतक-यांना या केंद्राच्‍या माध्‍यमातुन थेट त्‍यांच्‍या शेतावर उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. यासाठी दोन स्‍पर्शपटल सुविधा संच वाहनात बसविण्‍यात आले आहेत. यामुळे बोटाच्‍या एका स्‍पर्शावर शेतक-यांना शेतीबद्दल आवश्‍यक माहिती मिळणार आहे. वाहनामध्‍ये कृषि तंत्रज्ञान प्रदर्शन, चलचित्र प्रदर्शन आदी कृषि क्षेत्राशी निगडीत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. चित्रफित पाहण्‍याची व ऐकण्‍याची तसेच शेतक-यांच्‍या शेतावर किंवा गावात शेतकरी मेळावे, चर्चासत्रे घेण्‍याच्‍या दृष्‍टीने ध्‍वनीक्षेपन यंत्रणेची व्‍यवस्‍थाही वाहनात करण्‍यात आली आहे. वाहनाच्‍या दर्शनी भागात कृषि विद्यापीठाने संशोधित केलेल्‍या विविध वाणांची माहितीही शेतक-यांना होईल, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
सदरिल वाहन विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आले असुन वाहनात सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी डॉ. एन. डी. पवार, डॉ. व्‍ही. डी. पाटील, डॉ. डी. एन. गोखले, डॉ. बी. बी. भोसले, डॉ. बी. बी. ठोंबरे, डॉ. डी. एन. धुतराज, डॉ. यु.एम.वाघमारे आदींसह सर्व विभाग प्रमुख व अधिकारी यांनी सहकार्य केले आहे. हे फिरते निदान व प्रशिक्षण केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे तयार करण्‍यात आले असून यासाठी व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे, दिगंबर पटाईत, डॉ.भगवान आरबाड, उदय वाईकर यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, September 18, 2013

गृहविज्ञान तंत्रज्ञानावरील पुस्‍तकांचे विमोचन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयास भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक मा. डॉ अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते प्राचार्या प्रा विशाला पटनम व डॉ वीणा भालेराव लिखीत ‘बालकांच्‍या बौध्दिक व संवाद कौशल्‍यासाठी विकसीत केलेल्‍या बहुभाषिक बालगीते व भाषणे’ या प्रभावी ई-बुकचे विमोचन करण्‍यात आले. तसेच अखिल भारतीय सन्‍वयक संशोधन प्रकल्‍पांतर्गत विकसीत विविध संशोधनात्‍मक तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्‍याच्‍या उद्देशाने तयार केलेल्‍या ‘गृहविज्ञान तंत्रज्ञानाचा स्‍वीकार कुटुंबाचा आधार’ या पुस्तिकेचे विमोचन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ गोविंदराव भराड यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी मान्‍यवरांनी बालमार्गदर्शन चिकीत्‍सालय, वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना प्रयोगशाळेस भेट दिली. एलपीपी स्‍कुलच्‍या ब्रिज सेक्‍शनच्‍या विद्यार्थ्‍यांनी पर्यावरण संवर्धनावर उत्‍कृष्‍ट शास्‍त्रोक्‍त भाषण मान्‍यवरांच्‍या समक्ष सादर केले. तसेच मान्‍यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍या समवेत संवाद साधला. याप्रसंगी वनामकृवि चे कुलगूरू मा डॉ किशनराव गोरे, मा श्री अनिल नखाते, श्री विश्‍वनाथ थोरे, शिक्षण संचालक त‍था अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्या प्रा विशाला पटनम व महाविद्यालयातील प्राध्‍यापिका उपस्थित होते. 


Tuesday, September 17, 2013

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनानिमित्‍त आयोजित रबी पीक शेतकरी मेळावा उत्‍साहात संपन्‍न

कृषि प्रदर्शनाचे उद् घाटन 
रबी पीक शेतकरी मेळावाचे उद् घाटन 
रबी पीक शेतकरी मेळावाचे उद् घाटन
उद् घाटक नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार मार्गदर्शन करतांना
मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखीत विविध प्रकाशनाचे विमोचन 
पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री. विजयरावजी कोलते मार्गदर्शन करतांना
वनामकृविचे कुलगूरू मा. डॉ. किशनरावजी गोरे मार्गदर्शन करतांना
माजी कृषि राज्‍यमंत्री मा. श्री सुरेश वरपुडकर मार्गदर्शन करतांना 
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड मार्गदर्शन करतांना 




विद्यापीठाने विकसीत केलेले विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीची सुरूवात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्घाटन करून करण्‍यात आली

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाचे औचित्‍त साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने 17 सप्‍टेंबर 2013 रोजी रबी पीक शेतकरी मेळावा उत्‍साहात संपन्‍न झाला.
मेळाव्‍याचे उद्घाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते झाले तर अध्‍यक्षस्‍थानी वनामकृविचे कुलगूरू मा. डॉ. किशनरावजी गोरे होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री. विजयरावजी कोलते, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड व माजी कृषि राज्‍यमंत्री मा. श्री सुरेशराव वरपुडकर उपस्थित होते.
व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नियंत्रक श्री ना ज सोनकांबळे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहिम व उपविभागीय कृषि अधिकारी श्री पि.एच. मालेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 मेळाव्‍याचे उद्घाटक मा. डॉ. अरविंद कुमार म्‍हणाले की, देशात महाराष्‍ट्र राज्‍य कृषि शिक्षणात आघाडीवर आहे. सर्वात जास्‍त कृषि महाविद्यालय राज्‍यात असून सर्वात जास्‍त कृषि पदवीधर या राज्‍यात तयार होतात. याचा निश्‍चीतच शेतक-यांना फायदा होत आहे. आजच्‍या मेळाव्‍यात शेतक-यांचा उत्‍स्‍फुर्त  प्रतिसाद पाहुन हे लक्षात येते की, शेतक-यांचे विद्यापीठाशी घनिष्‍ठ नाते आहे. देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण होण्‍यास शेतक-यांचे मोठे योगदान आहे. शेतक-यांनी बिजोत्‍पादनावर भर द्यावा. विद्यापीठातील विविध उपक्रमाचा व तंत्रज्ञानाचा लाभ घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
प्रमुख पाहुणे कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. श्री विजयरावजी कोलते म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञान, शास्‍त्रज्ञांचे प्रयत्‍न व शेतक-यांची अथक मेहनतीमुळे आज आपण अन्‍नधान्‍यात निर्यातदार देश झालो आहोत. देशपातळीवर व राज्‍यात शासनाने शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल्यामुळे शेतीचे चित्र बदलत आहेत. शासनाच्‍या योजनांचा अभ्‍यास करुन शेतक-यांनी त्‍याचा फायदा घ्‍यावा. कृषि विद्यापीठाने शेतक-यांच्‍या जीवनामध्‍ये परिवर्तन घडविले आहे. आज विद्यापीठाच्‍या बियाणावर शेतक-याचा मोठा विश्‍वास आहे. अधिक रोजगार देणारा व्‍यवसाय म्‍हणून आजही शेतीकडे पाहिले जाते. कृषि उद्योजकांनी व शेतक-यांनी पुढे येऊन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शाश्‍वत शेतीसाठी शास्‍त्रज्ञ, शासन व शेतकरी बंधुनी एकत्रीत प्रयत्‍न करावा असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
माजी कुलगुरू मा. डॉ. गोविंदराव भराड म्‍हणाले की, शेतकामामध्‍ये महिलांचा मोठा वाटा असूनही शेतकरी मेळाव्यामध्‍ये शेतकरी महिलांचा सहभाग नगण्‍य आहे तो वाढविणे आवश्‍यक आहे. शेतीत स्‍थैर्य आणण्‍यासाठी फळबाग, फुलशेती, भाजीपाला लागवड केल्‍या शिवाय गत्‍यंतर नाही. प्रत्‍येक शेतक-यांनी शेती नोंदवही तयार कराव्यात, त्‍यातील चांगल्‍या बाबी प्रसिध्‍द कराव्‍यात. त्‍याचा फायदा इतर शेतक-यांना होईल असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
माजी कृषि राज्‍यमंत्री मा. श्री सुरेशरावजी वरपुडकर म्‍हणाले की, शासनाने दुष्‍काळाचे निकष हे पैसेवारी व आणेवारीबरोबर जमीनीतील पाण्‍याच्‍या पातळीवर दुष्‍काळ जाहीर करावा.  कृषि विद्यापीठाने संशोधनामार्फत शेतक-यांना विविध पिकांचे अनेक वाणे व शिफारशी दिल्‍या असुन शेतक-यांचा त्‍याचा निश्‍चीतच फायदा झाला आहे. विद्यापीठाने कापूस वेचणीचे तंत्रज्ञान विकसीत करण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
अध्‍यक्षीय समारोपात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे म्‍हणाले की, भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या पाठींब्यामुळे विद्यापीठात शैक्षणीक व संशोधनाच्‍या सुविधा निर्माण झाल्‍या आहेत. कोरडवाहू शेतीमध्‍ये शाश्‍वत उत्‍पादनासाठी संरक्षीत पाण्‍याची व्‍यवस्‍था करणे, एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन तसेच एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन सोबतच जोडधंदे, प्रक्रिया उद्योग, मूल्‍यवर्धीत पदार्थ तयार करणे यासह काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शेतक-यांची प्रगती नाही. शक्‍य असेल तिथे शेतक-यांनी सामुदायीक यांत्रीकीकरण करावे. शेतक-यांनी विद्यापीठातील विविध प्रशिक्षण कार्यक्रमास सहभाग घ्‍यावा व विद्यापीठातील संशोधन केंद्रास नियमीत भेटी द्याव्‍यात असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍ताराच्‍या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली. विद्यापीठ शेतक-यांना उभारी देण्‍यासाठी कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केले.  
या प्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखीत विविध प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ.राकेश अहिरे यांनी केले.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक चर्चासत्रामध्‍ये खरीप व रबी पिकातील कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ बी बी भोसले, हरभरा लागवडीवर डॉ डी के पाटील, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे, गहु लागवडीवर डॉ व्‍ही डी सोळुंके, रबी पिकावरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ डी एन धुतराज व डॉ ए पी सुर्यवंशी, हरितगृहांतर्गत फुलशेती व भाजीपाला लागवडीवर डॉ एस डी जेटुरे, कोरउवाहु फळझाडांची लागवडीवर प्रा डी एम नाईक, रबी हंगामातील भाजीपाला लागवडीवर डॉ व्‍ही एस खंदारे, पुर्व हंगामी उस लागवडीवर डॉ पी ऐ पगार व डॉ आनंद गोरे, शेतीपुरक दुग्‍धव्‍यवसायावर डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ के आर कांबळे, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ अशोक जाधव, डॉ मदन पेंडके, डॉ एस बी पवार, डॉ के टी जाधव, प्रा ए व्‍ही गुट्टे, डॉ एच के कौसडीकर, डॉ डी जी मोरे व प्रा आर बी क्षीरसागर यांनी शेतक-यांच्‍या शेती विषय विविध शंकाचे समाधान केले. सदरील मेळाव्‍यास शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
आयोजित कृषि प्रदर्शनातील विविध नामांकित कंपन्‍याचे व विद्यापीठ प्रसारीत तंत्रज्ञान, विविध पिकांच्‍या वाणांचे तसेच शेतक-यांना उपयुक्‍त असे अवजारांची दालनांना शेतक-यांनी मोठ्या संख्‍येने भेटी दिल्‍या. प्रदर्शनांतर्गत सार्व‍ज‍निक-खाजगी भागीदारी तत्‍वावर आधारीत कृषि अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व झेन नॅचरल अग्रो प्रा. लि. यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सुरु असलेल्‍या प्रकल्‍पांतर्गत उत्‍पादीत विविध फळ प्रक्रिया पदार्थाच्‍या नाविन्‍यपुर्ण दालनास शेतक-यांचा व बचत गटाच्‍या सदस्‍यांचा विशेष प्रतिसाद होता.
विद्यापीठाने विकसीत केलेले विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीची सुरूवात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्घाटन करून करण्‍यात आली. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने फिरते कृषि निदान व प्रदर्शन केंद्राची सुरूवात, ग्रीष्‍म वसतीगृह व विद्यापीठ ग्रं‍थालयाच्‍या नुतनीकरणाचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. शेतक-यांसाठी शिवार फेरीचे आयोजन देखिल करण्‍यात आले होते.   
मान्‍यवरांनी विद्यापीठामधील विविध नाविण्‍यपुर्ण कार्यरत असलेले उपक्रम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, पिंगळगडनाला सिंचन प्रकल्‍प, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालायातील फळ प्रक्रिया प्रकल्‍प तसेच गृहविज्ञान महाविद्यालय इत्‍यादींना भेटी दिल्‍या. 

Monday, September 16, 2013

Saturday, September 14, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या् प्रकल्पा‍स प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्‍या अधिक बियाणे उत्पादणासाठी  सिंचनस्रोत विकास प्रकल्पातंर्गत शेततळे यावर्षीच्या पाऊसाने पूर्ण भरले 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्‍या अधिक बियाणे उत्पादणासाठी  सिंचनस्रोत विकास प्रकल्पातंर्गत तयार केलेल्‍या शेततळयास प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी भेट दिली, त्‍याप्रसंगी प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ उदय खोडके व शास्‍त्रज्ञ डॉ मदन पेंडके.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयात अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतुन सुरू असलेल्‍या फळ प्रक्रिया पदार्थ प्रकल्‍पास प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी भेट दिली, त्‍याप्रसंगी प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना प्रकल्‍पाचे प्रभारी डॉ व्‍ही एम पवार व झैन नॅचरल अग्रो प्रा लि चे मोहम्‍मद गौस.


पत्रकार परिषद संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मराठवाडा मुक्‍तीदिनी दिनांक 17-09-2013 रोजी रबी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असून त्‍यानिमित्‍य विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्‍न झाली, याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ राकेश आहिरे, विस्‍तार शिक्षणाधिकारी प्रा पी एस चव्‍हाण उपस्थित होते. याप्रसंगी प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

कुलगूरू मा. डॉ किशनराव गोरे यांची प्रेस नोट

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाचे औचित्‍त साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्‍य रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन 17 सप्‍टेंबर 2013 रोजी सकाळी 10.30 वा कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍यात तांत्रिक चर्चासत्र, बि-बियाणे वाटप, कृषि प्रदर्शन, शिवार फेरीचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरील मेळाव्‍यास उद् घाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते होणार असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे राहणार आहेत. महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री. विजयरावजी कोलते, कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्‍लीचे माजी अध्‍यक्ष तथा वनामकृवि चे माजी कुलगुरु डॉ. चारुदत्‍त मायी व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन ते शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रीष्‍म वसतीगृह व विद्यापीठ ग्रं‍थालयाच्‍या नुतनीकरणाचे उद् घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होणार आहे. ग्रंथालयात विद्यार्थ्‍यासाठी अत्‍याधुनिक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या असुन ऑन लाईन ई-रिसोर्स कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  
मेळाव्‍यात तांत्रिक सत्राचे आयोजन करण्‍यात आले असुन यामध्‍ये विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ रबी हंगामातील विविध पिके रबी ज्‍वार, गहु, हरभरा, करडई इत्‍यादीच्‍या लागवड तंत्रज्ञानावर उपस्थितीत शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आयोजित कृषि प्रदर्शनामध्‍ये विविध नामांकित कंपन्‍याचे व विद्यापीठ प्रसारीत तंत्रज्ञान, विविध पिकांच्‍या वाणांचे तसेच शेतक-यांना उपयुक्‍त असे अवजारांची दालने असणार आहेत. तसेच सार्व‍ज‍निक-खाजगी भागीदारी तत्‍वावर आधारीत कृषि अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व झेन नॅचरल अग्रो प्रा. लि. यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सुरु असलेल्‍या प्रकल्‍पाअंतर्गत तयार करण्‍यात आलेले विविध फळ प्रक्रिया पदार्थाचे नाविन्‍यपुर्ण दालन असणार आहे. या प्रकल्‍पाअंतर्गत तयार करण्‍यात आलेले विविध फळ प्रक्रिया पदार्थाची 20 टनाचे प्रत्‍येकी दोन कंटेनर नुकतेच परदेशात निर्यात केली आहेत. या नाविण्‍यपुर्ण प्रकल्‍पामुळे या भागातील शेतकरी, विद्यार्थी व उद्योजक यांना फायदा होणार असून या भागात कृषि उद्योजकता वाढीस गती प्राप्‍त होणार आहे.
विद्यापीठामध्‍ये विविध नाविण्‍यपुर्ण उपक्रम कार्यरत असुन यामध्‍ये कृषि अवजारे चाचणी, निर्मिती व प्रशिक्षण केंद्र, पिंगळगड नाला सिंचन प्रकल्‍प, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालायातील फळ प्रक्रिया प्रकल्‍प तसेच कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, विविध संशोधन केंद्र व त्‍याचप्रमाणे विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्‍यात आले आहे.
विद्यापीठाने विकसीत केलेले व शेतकरी बांधवांची प्रचंड मागणी असलेले रबी ज्‍वार, हरभरा, करडई इत्‍यादी पिकांचे उपलब्‍ध बियाणे शेतक-यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद् घाटन करुन विक्री करण्‍यास सुरुवात करण्‍यात येणार आहे.
राज्‍यामध्‍ये जवळपास 82 टक्‍के क्षेत्र कोरडवाहु असुन या भागाच्‍या कृषि विकासासाठी कोरडवाहु शेती अभियानाचा शुभारंभ नुकताच कृषिमंत्री मा ना श्री राधाकृष्‍णजी विखे-पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे संपन्‍न झाला आहे. तसेच विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत केलेल्‍या कृषि हवामान विभागनिहाय अभ्‍यास गट क्रमांक 3 च्‍या बैठका तथा कार्यशाळा मराठवाडयातील आठ जिल्‍हयासह सोलापुर, जळगांव, वाशिम, बुलढाणा ईत्‍यादी जिल्‍हयात घेण्‍यात येउन त्‍याचा अंतरिम अहवाल महाराष्‍ट्र शासनास सादर करण्‍यात आला आहे. यामुळे कृषि हवामान विभागनिहाय आधारीत कृषि धोरण आखण्‍यास शासनास मदत होणार आहे.
नुकतेच गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयातील 65 पदे व चाकुर येथील पद्वव्‍युत्‍तर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे 38 पदे शासनाने मंजुर केले आहेत. त्‍यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक कार्यास बळकटी प्राप्‍त होणार आहे. याबद्दल राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा.ना.श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व कृषि मंत्री मा.ना.श्री. राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील यांचे आभार व्‍यक्‍त करतो.या रबी मेळाव्‍यास शेतकरी व कृषि उद्योजकांनी मोठया संख्‍येने उपस्थितीत रहावे असे आवाहन करण्‍यात येते व येत्‍या रबी हंगामासाठी शुभेच्‍छा. 

Friday, September 13, 2013

पत्रकार परिषदेस निमंत्रण

विस्‍तार शिक्षण संचालनालय
 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
जा.क्र.ईईयु/    /2013
दिनांक: 11-09-2013
निमंत्रण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मराठवाडा मुक्‍ती दिनी दिनांक 17-09-2013 रोजी रबी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असून त्‍यानिमित्‍य विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ.किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक 14-09-2013 वार - शनिवार रोजी सकाळी 11.00 वा करण्‍यात आली आहे. तसेच विद्यापीठातील विविध कृषि तंत्रज्ञान प्रकल्‍पास प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधीची भेट आयोजित केली आहे.  
      तरी सदरील पत्रकार परिषदेस व प्रकल्‍प भेटी प्रसंगी उपस्थितीत राहावे, हि विनंती.


वेळ   : सकाळी 11.00 वाजता                                           
दिनांक : 14-09-2013 वार: शनिवार                                   
स्‍थळ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
       प्रशासकीय इमारत हॉल क्र.17

संचालक
विस्‍तार शिक्षण
                               
प्रति,
मा जिल्‍हा प्रतिनिधी
दैनिक / साप्‍ताहीक ..................
जिल्‍हा परभणी

Thursday, September 12, 2013

संघर्षाशिवाय प्रगती नाही ................ डॉ उमाकांतजी राठोड


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सव 2013 निमित्‍य आज दि 11.09.13 रोजी सुप्रसिध्‍द वक्‍ते डॉ उमाकांतजी राठोड यांचे ‘भगतसिंग – युवकांचे प्रेरणास्‍थान’ या विषयावर व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी प्राचार्य डॉ विलास पाटील होते तर विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, डॉ बी व्‍ही आसेवार व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ उमाकांतजी राठोड आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भगतसिंग यांचे चरित्र आजच्‍या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्‍या युवकांनी देश व समाज घडविण्‍यासाठी  त्‍याग व बलीदाना करणे आवश्‍यक आहे. संघर्षाशिवाय कोणाचीही प्रगती होत नाही, विद्यार्थ्‍यानी यशासाठी संघर्ष करावा. गणेशोत्‍सवानिमित्‍त विद्यार्थ्‍यानी केलेल्‍या विविध प्रबोधनात्‍मक व्‍याख्‍याने आयोजित करून चांगला उपक्रम सुरू केला आहे असे मत अध्‍यक्षयीय समारोपात डॉ विलास पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप टाले यांनी केले तर आभार अमोल बांगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.