Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Wednesday, October 26, 2016
Tuesday, October 25, 2016
मौजे बाभुळगांव येथे रबी शेतकरी मेळावा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती
संशोधन प्रकल्प येथे कार्यरत असलेल्या कृषिकन्यानी मौजे बाभुळगांव येथे दिनांक २४
ऑक्टोबर रोजी रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर संरपचा श्रीमती कुंदाताई
पारधे, उपसरपंच असगर पठाण, प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा पारधे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ
बी व्ही आसेवार, डॉ डि आर कदम, डॉ. पी एस कापसे, डॉ पी के वाघमारे, प्रा. मेधा
सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ
धर्मराज गोखले म्हणाले की, विविध पिकांत कीडींचे व्यवस्थापन करतांना योग्य
वेळी, योग्य मात्रेत किडकनाशकांची फवारणी केल्यास कमी खर्चात कीड नियंत्रणात
येते. रबी पिकांत विद्यापीठाने विकसित केलेल्या
सुधारित वाणाचा वापर करावा. यावेळी पशुसंगोपनावर डॉ बी एम ठोंबरे, कोरडवाहु शेती
पध्दतीवर डॉ बी व्ही आसेवार, किड व्यवस्थापनावर डॉ डि आर कदम, रबी पिक
लागवडीवर डॉ पी के वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गिरीश पारधे व
ज्ञानोबा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पी एस
कापसे यांनी केले. सुत्रसंचालन उषा घनवट व शेख शबाना हिने केले तर आभार प्रियांका
वालकर हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्या व गांवकरी मंडळीनी परिश्रम
घेतले.
Monday, October 24, 2016
मुरूंबा येथे रबी शेतकरी मेळावा संपन्न
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील
अखिल भारतीय एकात्मिक शेती
पध्दती योजना व कापुस संशोधन
योजना येथे कार्यरत असलेल्या
कृषी महाविद्यालयाच्या
कृषिदुतांनी ग्रामीण कृषी
कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत
दिनांक 19
ऑक्टोबर
रोजी मौजे मुरूंबा येथे रब्बी
पीक शेतकरी मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्राचार्य
डॉ धर्मराज गोखले हे होते तर
संरपंचा श्रीमती लताबाई झाडे,
डॉ.
बी
एम ठोंबरे,
डॉ
आर डी आहिरे,
डॉ
डब्ल्यु एन नारखेडे,
डॉ
ए एस जाधव, डॉ. डि आर कदम, डॉ
पी बी केदार,
डॉ
पी के वाघमारे,
डॉ
पपिता गौरखेडे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
याप्रसंगी
प्राचार्य डॉ धर्मराज गोखले
यांनी रबी हंगाम नियोजनावर
मार्गदर्शन करतांना म्हणाले
की, शेतक-यांनी
विद्यापीठाने शिफारस केलेल्या
तंत्रज्ञानाचा वापर करावा.
रबी
पीकांतील विविध सुधारीत वाणाचे
स्वत: बीजोत्पादन
करून वापर करावा.
मेळाव्यात
रबी पीकांचे नियोजन,
करडई
पीक लागवड,
रबी
पीकांवरील कीड व रोग व्यवस्थापन
आदी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक विभाग प्रमुख
डॉ आर डी आहिरे यांनी केले.
सुत्रसंचालन
अक्षय सुरवसे,
पल्लवी
मस्के यांनी केले तर आभार
अनुराधा शिंदे हिने मानले.
मेळावा
यशस्वीतेसाठी कृषिदुत व
कृषिकन्यानी परिश्रम घेतले.
मेळाव्यास
शेतकरी बांधव मोठया संख्येने
उपस्थित होते.
Saturday, October 22, 2016
संविधानाशी प्रामाणिक राहुन प्रशासन केले तर भारतीय समाजाचे अनेक प्रश्न सुटु शकतात.....माजी सनदी अधिकारी मा. ई. झेड. खोब्रागडे (भाप्रसे)
शासनकर्ता हा समाजाचा शोषणकर्ता होऊ नये. समाजाचे अनेक
प्रश्न आहेत, परंतु प्रशासनाने भारतरत्न डॉ बाबासाहेबांनी तयार केलेल्या
संविधानाशी प्रामाणिक राहुन प्रशासन केले तर अनेक प्रश्न सुटू शकतात. प्रशासकिय
सेवेतील व्यक्तींनी संविधानाप्रमाणाने लोकांची सेवा करावी. लोकशाही टिकविणे ही
नागरिकांची जबाबदारी आहे. संविधानाच्या तत्वाचा नागरिकांना समज होणे गरजेचे आहे,
असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी मा. ई. झेड. खोब्रागडे (भाप्रसे) यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी आयोजित व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे होते तर
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
प्रभारी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले,
महासंघाचे अध्यक्ष डॉ गजेंद्र लोंढे, मुख्य सचिव प्रा ए एम कांबळे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
माजी सनदी अधिकारी मा. ई. झेड. खोब्रागडे (भाप्रसे) पुढे म्हणाले की,
देशातील विविध कायदांचा स्त्रोत हे संविधानच आहे. संविधानाची प्रास्तावना हे
संविधानाचा आरसा असुन संविधान हे राष्ट्रग्रंथ आहे. देशात अनेक विविधता आहेत,
पर्यंत संविधानामुळेच देश एकसंघ आहे. देश महासत्ता होण्यासाठी आपणास
बाबासाहेबांचे विचार घेऊन वाटचाल करावी लागेल. देशात आजही अस्तित्वात असलेली
वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था तोडावी लागेल. लोकशाही यशस्वी होण्यासाठी विविध
जाती व समाजात संवाद होणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, भारतात स्थिर प्रशासन हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे असुन
इतर देश आपल्या देशाचा आदर करतात. सर्वांना समान न्याय संविधानामुळे प्राप्त
झाला असुन डॉ बाबासाहेबांच्या विचारापासुन आपण प्रेरणा घेतली पाहिजे.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख व्यक्तांचा
परीचय डॉ व्ही जी टाकणखार यांनी करून दिला तर प्रास्ताविकात डॉ गजेंद्र लोंढे
यांनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ निता गायकवाड व डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा
ए एम कांबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक
वर्ग व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कास्ट्राईब
कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Friday, October 21, 2016
अवर्षणावर एकात्मिक पदधतीने मात करता येईल.....कुलगुरू मा. डॉ. बी.व्यंकटेश्वरलु
कृषि क्षेत्रातील अवर्षण व्यवस्थापनावरील आर्दश प्रशिक्षण कार्यक्रमाचाा समारोप
भारतीय शेतीमध्ये अवर्षण ही एक अतिशय जुनी आणि वारंवार आढळुन येणारी समस्या
असुन कोरडवाहु तंत्रज्ञानाच्या एकात्मिक पध्दतीने वापर करून मात करता येऊ शकते. कोरडवाहु
शेतीमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी अधिका-यांनी प्रयत्न
करावेत तसेच कालानुरूप आढळुन येणा-या शेतक-यांच्या समस्यांवर शास्त्रज्ञांनी
उपाय शोधावेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले. अखिल भारतीय
समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प तर्फे दि. १३ ते २० ऑक्टोंबर दरम्यान आयोजीत
कृषि क्षेत्रातील अवर्षण व्यवस्थापनावरील आर्दश प्रशिक्षण कार्यक्रमाच्या
समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. एस. भास्कर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, मुख्य
शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. बी. व्ही. आसेवार आदींची उपस्थित होते.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, कोरडवाहु शेतीमध्ये प्रत्येक सुक्ष्मतम तंत्रज्ञानयोग्य
पदधतीने वापरणे गरजेचे आहे. रूंद वरंबा सरी (बीबीएफ)
सारखे तंत्रज्ञान अवर्षणाच्या तसेच अधिक पावसाच्या अशा दोन्ही परिस्थितीमध्ये
उपयोगी ठरले आहे. उताराला आडवी मशागत व पेरणी, बंदीस्त वाफे,
मुलस्थानी जलसंवर्धन, आंतरपीक पध्दती, भुजल पुर्नभरण
आणि उपलब्ध पाण्याचा आधुनिक सिंचन पदधतीद्वारे कार्यक्षम वापर ही काळाची गरज
आहे.
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ.
दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, दुष्काळावर
मात करण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असुन त्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
अर्वषणाने कृषि विस्तारक आणि शास्त्रज्ञांना त्यांची पुढील आव्हाने दाखवुन सजग
केले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी उपलब्ध तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त
प्रसार करावा जेणेकरून शेतक-यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होईल. एकात्मिक शेती
पदधती, पावसाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर,कोरडवाहु फळबाग आणि दुरदूष्टी यातुन कोरडवाहु शेती शाश्वत करता येईल.
प्रमुख पाहुणे डॉ. एस. भास्कर मार्गदर्शन
करतांना म्हणाले की, अवर्षण ग्रस्तभाग आणि अवर्षणाची तिव्रता लक्षात घेउन त्यावर
मात करण्यासाठी दिर्घकालीन उपाय योजना हाती घेणे गरजेचे आहे. अवर्षण किंवा दुष्काळाच्या
मुळाशी अनेक कारणे आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील शास्त्रज्ञ
व विस्तारक यांनी एकत्रित कामे करण्याची गरज आहे. प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणाच्या
माध्यमातुन घेतलेल्या तंत्रज्ञानाचा आपअपल्या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणात
प्रसार करावा, असे अवाहन त्यांनी केले.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील
व राज्याबाहेरील एकुण २२ प्रशिक्षणर्थ्यांना देशातील विविध शास्त्रज्ञ व
प्रशिक्षक तज्ञांकडुन अवर्षण व अवर्षण व्यवस्थापन यावर प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमात
सर्व प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या
सिडींचे तसेच प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थी संजय रामटेके, डॉ. इंदीरा घोनमोडे, वृषाली घुले, एस.एस.निबांळकर, कृष्ण भगवान यांनी
मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक मुख्यशास्त्रज्ञ डॉ.
बी.ही.आसेवार यांनी केले. सुत्रसंचलन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे व आभार
प्रदर्शन डॉ. गणेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. पी. एन. सत्वधर, प्राचार्य डॉ. ए. एस. कदम, प्राचार्य डॉ. ए. एस. कडाळे, डॉ. ए. एस. कारले आदीसह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी, विदयार्थी व सर्व प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वीततेसाठी प्रा. एम.एस. पेडंके, डॉ. ए.एस. जाधव, डॉ. नारखेडे श्री. धिरज पाथ्रीकर, श्री. अभिजीत कदम, श्री. माणिक समिंद्रे, सौ. सारिका
नारळे, श्री. एम.डी. सयद, श्री. नारायण
पेदेुवार, श्री. भंडारे, श्री. पंडीत आदींनी
परिश्रम घेतले.
Tuesday, October 18, 2016
वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघााच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त “आंबेडकरी चळवळ सक्षमीकरणासाठी संविधानात्मक तत्वज्ञान आणि शासकीय अधिका-यांची भुमिका” याविषयावर माजी सनदी अधिकारी मा. ई. झेड. खोब्रागडे (भाप्रसे) यांच्या व्याख्यानाचे आयोजन दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ठिक ५.०० वाजता कृषि महाविद्यालयााच्या सभागृह करण्यात आले असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्र्वरलू राहणार आहेत. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री. डी. एस. कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरील व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. जी. के. लोंढे व सचिव डॉ. अनिश कांबळे यांनी केले आहे.
Friday, October 14, 2016
वनामकृवित आयोजित अवर्षण व्यवस्थापनावरील आदर्श प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल
भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने व भारत सरकारच्या
कृषी मंत्रालयाच्या कृषी व सहकार विभागाच्या सौजन्याने दिनांक १३ ते २० ऑक्टोबर
दरम्यान शेतीतील अवर्षण व्यवस्थापनावर आठ दिवशीय आदर्श प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात
आले असुन प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. उद्घाटनास
मुंबई येथील भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक श्री. कृष्णानंद होसालीकर व
बेंगलुर येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. ए. शंकर यांची
प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे
होते.
भारतीय हवामान
विभागाचे उपमहासंचालक श्री. कृष्णानंद होसालीकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले
की, यावर्षी मान्सुन चांगला असला तरी भविष्यात येणारे धोके लक्षात घेऊन वेळीच योग्यरीत्या
जल व्यवस्थापन केल्यास दिर्घकालीन उपयोग होईल. हवामानशास्त्राचा उपयोग शास्त्रीय
दृष्टीने केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल.
माजी संशोधन संचालक
डॉ. एम. ए. शंकर मार्गदर्शनात म्हणाले की, ८० टक्के तेलबिया, दाळवर्गीय
पिके कोरडवाहु क्षेत्रातुन उत्पादित केली जातात. अन्न व पोषण सुरक्षेचे उदिष्ट साध्य करण्यासाठी कोरडवाहु
क्षेत्र महत्वाचे असुन हवामान बदलानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करून कोरडवाहु शेती
शाश्वत करणे ही काळाची गरज आहे. कृषिसह आर्थिक व सामाजीक अवर्षणावर मात करण्यासाठी
एकात्मिक पध्दतीने व्यवस्थापन तंत्र अवलंबावे लागेल.
अध्यक्षीय समारोप
करतांना संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, ज्वारी, बाजरी, तुर या
सारखी हवामान बदलातही शाश्वत उत्पादन देणा-या पीकांचा पीक पध्दतीमध्ये समावेश
करणे गरजेचे आहे. विद्यापीठाने विकसित केलेले कोरडवाहु शेती तंत्रज्ञान जसे विहीर
पुनभर्रण, आंतरपीक पध्दती, कमी कालावधीत येणारे व पाण्याचा ताण सहन करणारे वाण आदींचा
ज्ञान कृषी अधिका-यांनी प्रशिक्षणात अवगत करून शेतक-यापर्यंत प्रभावीपणे पोहचवावे.
हवामान बदलात कमी व अधिक पर्जन्यमानावर मात करण्यासाठीचे तंत्रज्ञानावर विद्यापीठास
अधिक संशोधन करावे लागेल. परतीच्या चांगल्या पावसामुळे रबी हंगाम निश्चितच यशस्वी
होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मुख्य शास्त्रज्ञ तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ बी व्ही आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे
यांनी केले तर आभार प्रा एम एस पेंडके यांनी मानले. तांत्रिक सत्रात उपमहासंचालक श्री
कृष्णानंद होसाळीकर, माजी संशोधन संचालक डॉ एम ए शंकर, भारतीय हवामान विभागच्या श्रीमती
शुभांगी भुते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ आनंद गोरे, डॉ ए
एस जाधव, डॉ डि एस चौहान, डॉ जी के गायकवाड, आर बी परीहार, सारीका नारळे, माणिक
समींद्रे, अभिजीत कदम, आर बी तुरे, एम डी सय्यद आदींनी परिश्रम घेतेल.
गत दोन वर्षापासुन पडत
असलेल्या अवर्षणामुळे देशातील अनेक राज्यातील शेती प्रभावीत झाली असुन दुष्काळाशी
सामना करण्यासाठी कृषि विस्तारक व अधिका-यांमध्ये अवर्षण व्यवस्थापनाचे ज्ञान
अवगत करण्याच्या उद्देशाने सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणात देशातील कृषी क्षेत्रातील तज्ञ हवामान बदल, मान्सुनचे स्वरूप,
पडणारा दुष्काळ, होणारे नुकसान, त्याचे मुल्यमापन व परिणाम, पाऊसाच्या पाण्याचे
व्यवस्थापन, जलसंवर्धन व पाण्याचे पुर्नवापर, दुष्काळाची दाहृकता कमी करणारे तंत्रज्ञान,
एकात्मिक शेती पध्दती, चारापीके व पशुपालन, कोरडवाहु फळ लागवड, सेंद्रिय शेती,
पीकांची संरक्षीत पाण्यावरील लागवड, कोरडवाहु शेतीतील यांत्रिकीकरण आदी विषयावर
मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणात महाराष्ट्र, तामीळनाडु व आंध्रप्रदेश राज्यातील
कृषी विभागातील वीस कृषी अधिकारी व कृषी विस्तारक सहभागी झाले आहेत.
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्त्रप्रसाद वासकर |
मार्गदर्शन करतांना भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक श्री कृष्णानंद होसाळीकर |
मार्गदर्शन करतांना बेंगलुर येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ एम ए शंकर |
Monday, October 10, 2016
वनामकृविच्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी अनुदान मंजुर
महाराष्ट्र शासनाने पंचवीस लाख अनुदानास दिली मंजुरी
परभणी
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील दुष्काळग्रस्त गावांतील शिक्षण
घेत असलेल्या कृषीतंत्र विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा
शुल्कास माफीसाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान मंजुर केले असल्याचे नुकतेच शासन
निर्णयााव्दारे कळविले आहे. सन २०१६–१७ या आर्थिक वर्षात सन २०१५–१६ च्या रबी व
खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी ५० पैश्यापेक्षा कमी असलेल्या गावांतील कृषीतंत्र
विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कास माफीसाठी विद्यापीठास
रूपये २५,२८,८०० (अक्षरी रूपये पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे केवळ)
इतके अनुदान वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनास कळविले
आहे.
Sunday, October 9, 2016
शेतक-यांनी कृषी तंत्रज्ञानाचा सामुदायीकरित्या व एकात्मिक पध्दतीने वापर करावा.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
वनामकृवित हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रमातंर्गत रबी हंगाम नियोजन व्यवस्थापन व शेतकरी मेळावा संपन्न
शेतक-यांनी हवामान बदल व तंत्रज्ञान यांची योग्य सांगड
घालुन शेती करावी. रबी हंगामाचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर,
बीजप्रक्रिया, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन आदी तंत्रज्ञानाचा
अवलंब करून हरभरा, रबी ज्वारी, करडई आदी पिकांचे शाश्वत उत्पादन घ्यावे. कमी व
अधिक पाऊस अशा दोन्ही परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतक-यांनी तंत्रज्ञानाचा सामुदायीकरीत्या
व एकात्मिक पध्दतीने वापर करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत
कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रमातंर्गत
दिनांक ५ ऑक्टोबर रोजी रबी हंगाम नियोजन व्यवस्थापन व शेतकरी मेळाव्याचे
आयोजन कोरडवाहु शेती संशोधन केंद्र येथे करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून
ते बोलत होते. याप्रसंगी सहयोगी संचालक
बियाणे डॉ व्ही डी सोळंके, मुख्य शास्त्रज्ञ डॉ बी व्ही आसेवार, प्रा. एम एस
पेंडके, डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, कृषी
शास्त्रज्ञांनी रबी हंगामाबाबत शेतक-यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. आज
यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे शेतकरी बांधवांना
निक्रा या योजनेंतर्गत भाडेतत्वावरील अवजारे केंद्राच्या (कस्टम
हायरींग सेंटर) माध्यमातुन उपलब्ध करून द्यावेत. शेतकरी
बांधवांनी खरीप हंगामातील झालेले नुकसान रबी हंगामात भरून काढण्याचा दृष्टीने
सर्तक रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात प्रात्यक्षिक घेणा-या निवडक शेतक-यांना
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते हरभरा, करडई, रबी ज्वारी आदी
पिकांच्या विद्यापीठ विकसित विविध वाणाच्या बियाण्याचे वितरण करण्यात आले. विद्यापीठातर्फे
अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या अंतर्गत हवामान
बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम गेली चार वर्ष मौजे बाभुळगांव (ता.
जि. परभणी) येथे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु व
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत
असुन कोरडवाहु शेती तंत्रज्ञानावर आधारित व विशेषत: हवामान बदलानुरूप
तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन थेट शेतक-यांच्या शेतावर
करण्यात येऊन शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातुन केले
जात आहे. यावर्षी खरीप हंगामात बाभुळगांव येथील सत्तर शेतक-यांच्या शेतावर
तंत्रज्ञान प्रात्यक्षिके राबविण्यात आली तर रबी हंगामातही एकुण पंच्चेचाळीस
शेतक-यांच्या शेतावर तंत्रज्ञान प्रात्यक्षिके राबविण्याचे नियोजित केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ बी
व्ही आसेवार यांनी उपक्रमाचे माहिती दिली तर शेतकरी बाबासाहेब पारधे देउन गतवर्षी
शेतक-या उपक्रमाच्या माध्यमातुन प्रसार करण्यात आलेल्या विहीर पुनभर्रण,
पोटॅशियम नायट्रेटची फवारणी, आंतरपीक पध्दती आदी तंत्रज्ञानाचा शेतक-यांना लाभ झाल्याचे
मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारीका नारळे यांनी केले तर आभार प्रा
एम एस पेंडके यांनी मानले. तांत्रिक सत्रात रबी पीक व्यवस्थापनावर डॉ आनंद गोरे
यांनी तर डॉ एम एस पेंडके यांनी मृद व
जलसंधारण व डॉ जी के गायकवाड यांनी रबी पिकांतील अन्नद्रव्य व्यवस्थापनावर
मार्गदर्शन केले. यावेळी रामकिशन दळवे, विठ्ठलराव पारधे, ज्ञानेश्वर पारधे,
काशीनाथ पारधे, नरहरी साखरे आदींसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी माणिक समिंद्रे, अभिजीत कदम, आर बी तुरे, एम डी सय्यद, एन आर
भंडारे, चतुर कटारे आदींनी परिश्रम घेतले.
Tuesday, October 4, 2016
गृहविज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील
गृहविज्ञान
महाविदयालयाच्या
राष्ट्रीय
सेवा
योजना
व
जीमखाना
यांच्या
संयुक्त
विद्यमाने
दिनांक
२ ऑक्टोबर रोजी महात्मा
गांधी
व
लालबहादुर
शास्त्री
यांच्या
जयंती
साजरी करण्यात आली.
जयंती
निमित्त महाविद्यालयाच्या
परिसरात स्वच्छता अभियान
राबविण्यात आली.
महाविद्यालयाचे
प्राध्यापकवृंद,
कर्मचारी
व
विद्यार्थी
आदींनी
परिसर
स्वच्छ
करून
स्वच्छतेची
शपथ
घेण्यात
आली.
प्राचार्या
प्रा विशाला पटणम यांनी महात्मा
गांधी व लालबहाद्दुर शास्त्री
यांच्या प्रतिमेस
पूष्पहार
अर्पण
करुन
वंदन
केले
तर "वैष्णव
जनतो"
ही
प्रार्थना
म्हणण्यात
आली.
यानिमित्त
विदयार्थ्यांसाठी
फान्टवॉक
स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते,
यात
सोनाली
हिगंणे
हीने
प्रथम,
गिताजंली
फोफसे
हीने
व्दितीय
तर
ज्ञानेश्वरी
गडदे
यांनी
तृतीय
क्रमांक पटकावला.
कार्यक्रम
यशस्वीतेसाठी राष्ट्रीय
सेवा
योजनेच्या
कार्यकाम
अधिकारी
प्रा.
निता
गायकवाड,
स्वंयसेवक
व
कर्मचारी
आदींनी
परिश्रम घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)