Tuesday, July 22, 2014

कृषि अभियांत्रिकी महाविदयालयात गुणगौरव व निरोप समारंभ संपन्‍न

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्या निरोप समारंभात प्रसंगी प्रभारी शिक्षक संचालक डॉ. बी. बी. भोसलेव्‍यासपीठावर गोळेगाव कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटीलप्राचार्य डॉ. यु. एम. खोडकेप्रा.व्हि.एम.भोसलेअनंता हांडे आदी.
कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्या निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना प्रभारी शिक्षक संचालक डॉ. बी. बी. भोसलेव्‍यासपीठावर गोळेगाव कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडकेप्रा.व्हि.एम.भोसलेअनंता हांडे आदी.
**************************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यपीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्या सन २०१३-१४ वर्षात बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी) पदवी प्राप्‍त केलेल्‍या विदयार्थ्‍यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम दि १० जुलै २०१४ रोजी आयोजित करण्‍यात आला होत. कार्यक्रमास विदयापीठाचे प्रभारी शिक्षक संचालक व अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. बी. बी. भोसले, गोळेगाव कृषि महाविदयालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील प्रमुख पाहूणे म्‍हणुन उपस्थित होते तर महाविदयालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके अध्‍यक्षस्‍थानी होते.
      यावेळी प्रभारी शिक्षक संचालक डॉ. बी बी भोसले विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांनी म्‍हणाले की, आज शेतीचे मोठया प्रमाणावर यांत्रिकीकरण होत असुन कृषि अभियतांची शेतक-यांना मोठी गरज आहे. कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांनी शेतक-यांना केंद्रबिंदु मानुन कार्य करावे.
प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि अभियांत्रिकी विदयार्थ्‍यानी पदवी अभ्‍यासक्रमात संपादन केलेल्‍या ज्ञानाचा उपयोग कृषि क्षेत्रामध्‍ये कौशल्‍याने करावा. याप्रसंगी त्‍यांनी महाविद्यालयातील विद्यार्थींनीनीच्‍या यशाचे विशेष कौतुक केले.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. यु एम खोडके म्‍हणाले की, सद्य परिस्‍थीतीत कृषि विकासात कृषि अभियंत्‍यांचे योगदान अत्‍यंत महत्‍वाचे असुन कृषि अभियांत्रिकी महाविदयालय प्‍लेसमेंट व समुपदेशन आदी विविध योजना राबवुन विदयार्थ्‍यासाठी चांगल्‍या संधी उपलब्‍ध करण्‍याचा प्रयत्‍न करील.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिमखाना उपाध्‍यक्ष प्रा.व्हि.एम.भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विदयार्थी प्रतिनिधी रघुनाथ जगताप यांनी तर आभार प्रदर्शन विदयार्थी कृषि समितीचे अध्‍यक्ष अनंता हांडे यांनी केले.
कार्यक्रमात कृषि अभियांत्रिकी महाविदयालयास व विदयापीठास देश व राज्‍य क्रिडा, सांस्‍कृतिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात विशेष यश संपादन करून दिल्‍याबददल विदयार्थ्‍याचा सत्‍कार करण्‍यात आला. यामध्‍ये देशपातळीवर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेची कनिष्‍ठ संशोधन फेलोशिप प्राप्‍त विदयार्थ्‍यांचा समावेश होता. कार्यक्रमात महाविदयालयातील पदवी प्राप्‍त केलेल्‍या विदयार्थ्‍यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विदयार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, July 21, 2014

कुभकंर्ण टाकळी येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्‍न


    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्‍या कापुस संशोधन योजना येथील कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत टाकळी कुंभकर्ण वृक्षारोपणाचा कार्यक्रम दि. 21 जुलै 2014 रोजी आयोजित करण्‍यात आला होता. तसेच याप्रसंगी सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्‍यक्षिक सादरकरण्‍यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच श्री विनायकराव सामाले, उपसरपंच सौ. शामाबाई काचगुंडे, तुळशीराम सामाले, सुंदरराव देशमुख यांच्‍या सह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गणेश कंटूले, उमाकांत लहाडे, गोविंद कंटाले, बळीराम कोटूळे, विजय लामदाडे, प्रशांत गीते, किशोर जोजारे, खंडु साबळे, महेश बोदलोड, बबन गायके, राहूल मोरे, आकश सुर्यवंशी, प्रदीप राठोड, प्रदिप हजारे, रायकर लक्ष्‍मण, कृष्‍णा पौळ या कृषिदुतांनी प्रयत्‍न केले. हा उपक्रम कापुस संशोधन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. ए. एस. जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एच. कांबळे यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला. 

Sunday, July 20, 2014

लोहगांव येथे सोयाबीन बिजप्रक्रिया प्रात्‍यक्षिकाचे सादरीकरण

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कार्यानुभवाच्‍या कृषिदुतांनी लोहगांव येथे सोयाबीन बिजप्रक्रिया प्रात्‍यक्षिकाचे सादरीकरण केले. हा उपक्रम सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. एस. बेग, डॉ. ए. एम. भोसले, डॉ. एस. व्‍ही. पवार, डॉ. डि.टी. सारंग, डॉ. डी जी मोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला. कार्यक्रमास गावचे सरपंच शिवानंद पाटील, सुधीर पामे, देसाई देशमुख, अंकुश देशमुख, सुरेशराव सोनीसर, सखाराम देशमुख, अनंतराव देशमुख हे शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वतीसाठी कृषिदुत विजय जाधव, वसंत जाधव, राहुल जाधव, श्रीकांत कदम, मधुकर कंठाळे, बाळासाहेब जोंधळे यांनी परिश्रम घेतले.

Friday, July 18, 2014

कृषिकन्यांचे बाभुळगांव येथे सोयाबीन बीज उगवणक्षमता प्रात्यक्षिक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयित कोरडवाहू संशोधन शेती प्रकल्‍पांतर्गत असलेल्‍या कृषिकन्‍यांनी बाभुळगांव येथे दिनांक १६ जुलै २०१४ रोजी सोयाबीन बीज उगवणक्षमता प्रात्‍यक्षिक करुन दाखविले तसेच रासायनिक तणनाशकांचा वापर याचे महत्‍व याबाबत माहिती सांगीतली.

     हा कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी बी भोसले, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. एस. बी. चौलवार व कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिता पवार यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला. कार्यक्रमास गावातील सरपंच कुंतीताई पारधे, ज्ञानोबा पारधे आदीसह अनेक शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या शादरा घोलप, राजश्री धोंडे, संजीवनी बारंगुळे, पुनम जाधव, रुपाली इंगळे, स्‍वाती चव्‍हाण, सारिका गुट्टे, गौरी दिक्षीत, योगीता देसी, सोनी बुलरकर, मिनाली देशमुख, सुजाता देशमुख, चेतना फेसाटे, शिवकन्‍या भरोसे, मनिषा दहे, मनिषा गव्‍हाणे, मीरा घुले, प्रीतु, लिनु, श्रेया, शिशिरा, प्रकृ‍ती, श्रृती, आकांक्षा, किर्ती, श्‍वेता, शामना, उत्‍तरा, माधुरी भोसले आदिंनी परिश्रम घेतले.

Thursday, July 17, 2014

ऑनलाईन सेवार्थ प्रणालीमुळे विद्यापीठाच्या वेतन विषयकबाबतीत आर्थिक सुसूत्रता येणार...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

सेवार्थ प्रणालीबाबतच्‍या एक दिवशीय कार्यशाळाचे उदघाटन  
राज्‍य शासनाच्‍या ऑनलाईन सेवार्थ प्रणालीमुळे विद्यापीठाच्‍या कर्मचारी व अधिकारी यांच्‍या वेतन विषयक त्रुटी कमी होऊन मनुष्‍यबळ व वेळेची मोठी बचत होणार असुन देयके त्‍वरित पारित होऊन विद्यापीठाच्‍या आर्थिक प्रशासनात सुसुत्रता येणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सर्व आहरण वितरण अधिकारी व संबंधीत कर्मचारी यांची सेवार्थ प्रणालीबाबतचे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ नियंत्रक कार्यालयाच्‍या वतीने दिनांक १७ जुलै रोजी करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विद्यापीठाचे नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, श्री दिवाकर काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु भाषणात पुढे म्‍हणाले की, आज संगणक साक्षरता काळाची गरज झाली असुन जो व्‍यक्‍ती संगणकाबाबत अज्ञानी आहे त्‍यास निरक्षक समजला जात आहे. त्‍यामुळे या ऑनलाईन सेवार्थ प्रणालीचे ज्ञान विद्यापीठातील सर्व आहरण वितरण अधिकारी व संबंधीत कर्मचारी असणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे यांनी सेवार्थ प्रणालीबाबत सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सहायक नियंत्रक श्री जी बी उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राम खोबे, किशोर शिंदे, कृ‍ष्‍णा जावळे, तुकाराम शिंदे, बी. सी. कदम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्देशानुसार राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन चालु महिण्‍यापासुन सेवार्थ प्रणालीनुसार ऑनलाईन पध्‍दतीने संबंधीत कर्मचा-यांच्‍या बॅक खात्‍यात जमा होणार आहे. ही सेवार्थ प्रणाली राबविण्‍याबाबतचे सविस्‍तर मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्‍यात आले.  

Tuesday, July 15, 2014

नांदगाव येथे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम


    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्रातंर्गत कार्यरत असलेल्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिदुतांनी मौजे नांदगांव (खु.) येथे सोमवार दिनांक 10 जुलै 2014 रोजी सोयाबीन पिकाच्‍या बियाण्‍यास द्रवरुप रायझोबियम व पी.एस.बी. या जैविक खताच्‍या बिज प्रक्रियेचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविले. तसेच कृषिदुतांनी जैविक खतांचे महत्‍व व उपयोग याबद्दल शेतक-यांना सविस्‍तर माहिती दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी श्री विठ्ठल भालेराव, ज्ञानेश्‍वर भालेराव, अंगद भालेराव, संजय भालेराव यांच्‍यासह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी कृषिदुत शिवप्रसाद संगेकर, प्रविण तिडके, सचिन वाघमारे, हर्षल वाघमारे, अजय साळवे, बद्रिनाथ ढाकणे, नवनाथ मोरे, दिपेश बोरवाल, राजेश सोनी, विवेककुमार कटीहार, प्रविंद्रकुमार, निखीलकुमार, रोहित कुमार, धिरेंद्र कुमार, सचिन सुंदाळकर, रामकृष्‍ण माने, सतिष कटारे, अमोल वैद्य, राम कोलगणे, व्‍यंकटेश शिराळे, मनोहर शेळके, वाकळे, स्‍वप्निल बाहेकर, महेश झिंझुरडे, अरीसुदन, थिप्‍पी रेड्डी, मसुद शेख यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमास कृषिदुतांनी डॉ. एल.एन. जावळे व डॉ. कराड यांचे मार्गदर्शन लाभले.