Saturday, February 27, 2021

मौजे मानोली (ता. मानवत, जि परभणी) येथे रब्‍बी ज्‍वारी आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिक पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र व अखिल भारतीय समन्‍वयीत ज्‍वार सुधार प्रकल्‍प, हैद्राबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मौजे मानोली (ता मानवत जि परभणी) येथे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी शेतकरी श्री अशोकराव मांड यांच्‍या शेतातील रब्‍बी ज्‍वारी आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम संपन्‍न झाला.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावातील ज्‍येष्‍ठ नागरीक श्री ऋषीकेश मांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे होते. तर ज्‍वार संशोधन केद्रांचे प्रभारी अधिकारीडॉ के आर कांबळे, डॉ एल एन जावळे, डॉ महमंद ईलीयास, डॉ व्‍ही एम घोळवे, डॉ मदन पेंडके, प्रगतशील शेतकरी श्री मदन महाराज शिंदे, श्री रामभाऊ शिंदे आदीची उ‍पस्थिती होती. 

मार्गदर्शनात डॉ वासकर म्‍हणाले की, आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीस पोषणाच्‍या दृष्‍टीने मोठे महत्‍व असुन ज्‍वारीचे मुल्‍यवर्धन करून विविध पदार्थ केल्‍यास बाजारात चांगला भाव मिळेल, प्रास्‍ताविकात डॉ के आर कांबळे यांनी विद्यापीठ विकसि‍त रब्‍बी ज्‍वारीच्‍या नवीन वाण व लागवडीबाबत माहिती दिली. यावेळी श्री अशोकराव मांड, लक्ष्‍मण शिंद, शेख दस्‍तगीर यांच्‍या शेतावरील रब्‍बी ज्‍वारी पिक प्रात्‍यक्षिकाची पाहणी केली. कार्यक्रमास शेख दस्‍तगीर, माजी सैनिक बाबुराव जाधव, रामकिशन पटेल श्री गोपाल शिंदे, सुनील शिंदे, सुरेश मांड, उत्‍तम लेंगुळे आदीसह गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात कापुस उत्‍पादनवृध्‍दी कार्यशाळा संपन्‍न

कृषि संशोधन व विस्तार यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज …… कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण

संशोधनाद्वारे विकसीत तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषि संशोधन व विस्तार यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी केले. विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आयोजीत कापूस उत्पादनवृध्दी कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषि विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) श्री विकास पाटील, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, कृषि सहसंचालक श्री पांडुरंग शिगेदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे, नागपूर येथील ज्येष्ठ कापूस शास्त्रज्ञ डॉ. वेणुगोपालन, डॉ. बालसुब्रमणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा. कुलगुरू डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, भविष्यात शेतकर्‍यांचा बियाण्यावरील खर्च कमी करण्यासाठी विद्यापीठ कापसाचे बीटी स्वरुपातील सरळ वाण विकसीत करीत आहे. काळाची गरज ओळखून संशोधन करीत असुन विद्यापीठ विकसीत देशी कापसाचे वाण भविष्यात निश्चितच उपयोगी सिध्द होईल. कापसाच्या विविध प्रजातींचा समतोल राखण्यासाठी देशी कापसाचे क्षेत्र १०-१५ टक्के पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही ते म्‍हणाले.

प्रमुख अतिथी डॉ. प्रसाद यांनी कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत वाण - तंत्रज्ञान व चालू संशोधन कार्याचे कौतुक केले. कापूस पीकाची विशेषत: कोरडवाहू भागातील उत्पादकता वाढविण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखीत केली. भविष्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे विद्यापीठास संशोधनाकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील एनएचएच ४४ (बीजी २) हा पहिला बीटी संकरीत वाण वनामकृविच्या माध्यमातून विकसीत करण्यात आला. त्याप्रमाणेच विद्यापीठाचे एनएचएच २५० व  एनएचएच ७१५ हे नविन संकरीत वाणदेखील बीटी स्वरूपात परिवर्तीत करण्याचे कार्य महाबीजच्या माध्यमातून प्रगतीपथावर असून लवकरच ते शेतकर्‍यांच्या सेवेत अर्पण करण्यात येतील असे यांनी सांगितले. तर  श्री विकास पाटील यांनी राज्यातील कापूस पीकाची सद्यस्थिती, भविष्यातील गरज आणि त्याकरीता राज्य शासनाच्या कृषि विभागाद्वारे करावयाचे विस्तार कार्य याबाबतचा संदेश दिला.

कार्यशाळेत राज्यातील कापूस पीकाची उत्पादकता वाढ करण्यासाठी येत्या हंगामामध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. कपाशी उत्पादकता वाढीकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. आनंद दौंडे, डॉ. शिवाजी तेलंग प्रा. दिनेश पाटील व प्रा. अरूण गायकवाड यांनी माहिती दिली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते कापूस संशोधन केंद्राद्वारे कीटकानाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन व प्रथमदर्शनी पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकधारक शेतकर्‍यांना निविष्ठा वाटप करण्यात आल्या तसेच मान्‍यवरांनी  संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील चालू संशोधन कार्याची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बेग यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले तर आभार डॉ. आनंद दौंडे यांनी मानले. कार्यशाळेत कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पिल्लेवाड, पांचाळ, तुरे, शिंदे, रणवीर, गौरकर, जाधव, अडकिणे, सोनुले, श्रीमती सुरेवाड, ताटीकुंडलवार आदींनी परिश्रम घेतले.



Thursday, February 25, 2021

वनामकृवितील नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन शेतकरी बांधवाना उपयुक्त आधुनिक डिजिटल यंत्रे व औजारे निर्माण करण्‍यात यावीत ....... मा. आ. श्री. सतीश चव्हाण

वनामकृवितील नाहेप प्रकल्‍पांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅनचे उदघाटन

परभणी कृषी विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पांतर्गत आधुनिक प्रयोगशाळेची निर्मिती करण्‍यात येत असुन डिजिटल शेती तंत्रज्ञान विकसित करण्‍यात येत आहे. प्रकल्‍पातील कॅड कॅम व इतर प्रयोगशाळेचा वापर करुन शेतकरी बांधवाना उपयुक्‍त व कमी खर्चिक आधुनिक डिजिटल यंत्र व औजारे निर्माण करण्‍यात यावीत. प्रकल्‍पात कार्यन्‍वयीत करण्‍यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅन आदी उपक्रम निश्चितच कौतुकास्‍पद आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य व उच्च शिक्षण व विकास आयोग सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प – नाहेप प्रकल्‍पांतर्गत २६ केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम  प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅन आदी अद्यावत उपक्रमाचे उदघाटन दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मा. आ. श्री. सतीश चव्हाण आणि विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा डॉ. अदितीताई सारडा, मा श्री. शरद हिवाळे, मा श्री. लिंबाजीराव भोसले, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती. दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार, प्रा. डी.डी. टेकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार मा. डॉ राहुल पाटील म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारून एक चांगला पायंडा रचण्‍याचे काम केले आहे. नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन डिजिटल शेती तंत्रज्ञानास चालना देण्याचे चांगले कार्य विद्यापीठात होत असुन हे तंत्रज्ञान मराठवाडयातील कृषि विकासासाठी फायदेशीर ठरेल अशी आशा व्यक्त केले. 

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. अशोक ढवण म्‍हणाले कीसंशोधक विद्यार्थी व शास्त्रज्ञांना नाहेप प्रकल्पातील विविध तंत्रज्ञान व प्रयोगशाळाचा संशोधनात लाभ होणार असुन येथील विकसित होणारे डिजिटल तंत्रज्ञान शेतक-यांना उपयुक्‍त ठरणार आहे.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते २६ केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड  कॅम  प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅन उदघाटन करण्‍यात आले. नाहेप प्रकल्‍पाचे अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी सौरचलित स्वयंचलित बहुउपयोगी फवारणी यंत्र, सौरचलित कापूस वेचणी यंत्र आदीसह प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मेघा जगताप यांनी केले.

यावेळी मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरा, रिअल सेन्स कॅमेरा, लिडार कॅमेरा, स्पेक्ट्रोरेडिओमिटर आदींबाबत इंजि. अपुर्वा देशमुख यांनी माहिती दिली तसेच थ्री डी स्कॅनर याविषयी श्री. खेमचंद कापगते यांनी तर कॅड कॅम प्रयोगशाळेच्या कृषितील उपयोगाबद्दल श्री. रविकुमार कल्लोजी व शितगृहाबद्दल डॉ. हेमंत रोकडे यांनी माहिती दिली. 

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता नाहेपचे इंजि. खेमचंद कापगते, डॉ. हेमंत रोकडे, डॉ. अनिकेत वाईकर, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, श्री. रहिम खान, इंजि. स्वाती पाटील, इंजि. गोपाळ रनेर, इंजि. विश्वप्रताप जाधव, इंजि. तनझीम खान, इंजि. अपुर्वा देशमुख, श्री. प्रदिप मोकाशे, श्री. रामदास शिंपले, सौ. रेखा उदास, मुक्‍ता शिंदे, श्री. जगदीश माने, श्री. मारोती रनेर, श्री. गंगाधर जाधव आणि श्री. कुणाल कदम, श्री. रमेश कवाळे आदींनी परिश्रम घेतले.




Wednesday, February 24, 2021

म्हैसुर (कर्नाटक) येथील केंद्रीय अन्‍न तंत्रज्ञान संशोधन संस्थेत पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाकरिता अन्‍नतंत्र महाविद्यालयाची विद्यार्थींनी अनघा सुनील कदम पात्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अन्‍नतंत्र महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनघा सुनील कदम हिची म्हैसुर (कर्नाटक) येथील केंद्रीय अन्‍न तंत्रज्ञान संशोधन संस्थेत एम.एस्‍सी. (फ़ूड टेक्नोलॉजी) पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमास प्रवेशा करिता पात्र ठरली. सन २०२०-२१ वर्षाकरिता या पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाकरिता घेण्‍यात आलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील प्रवेश पात्रता परिक्षेत तीने यश संपादन केले. म्हैसुर येथील केंद्रीय अन्‍नतंत्र संशोधन संस्था ही अन्नप्रक्रिया संशोधन क्षेत्रामध्ये देशातील अतिउच्च अग्रगण्‍य संस्‍था असुन अन्‍नतंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्‍यांचे या शिक्षण संस्‍थेत शिक्षणाचे स्‍वप्‍न बाळगुन असतात. या निवडीबाबत कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, प्राचार्य डॉ उदय खोडके, श्री. रविंद्र पतंगे, डाॅ प्रविण घाटगे आदीसह प्राध्‍यापकवृदांनी तिचे अभिनंदन केले. 

वनामकृवि शास्‍त्रज्ञ डॉ कल्‍याण आपेट यांचा वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍थेच्‍या वतीने सन्‍मान

बॉयोमिक्‍सने विद्यापीठास वेगळी ओळख प्राप्‍त करून दिली आहे ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा शास्‍त्रज्ञ डॉ कल्‍याण आपेट यांना भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍था, नवी दिल्‍ली व अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्रज्ञ संस्‍थेच्‍या वतीने वनस्‍पती रोग शास्‍त्रात केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल दिनांक 24 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, तर ऑनलाईन माध्‍यमातुन संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ बी टी राऊत, सचिव डॉ आर एम गाडे, डॉ के डी ठाकुर, डॉ ए पी सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ कल्‍याण आपेट यांच्‍या बाबत गौरवोदगार काढतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, डॉ कल्‍याण आपेट व त्‍यांचे सहकारी यांच्‍या अविरत परिश्रमामुळे विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स या जैविक मिश्रणाचा शेतकरी बांधवामध्‍ये मोठया प्रमाणात प्रसार झाला. विद्यापीठाच्‍या इतिहासात प्रथमच एका आर्थिक वर्षात एका कृ‍षी निविष्‍ठापासुन अडीच कोटी पेक्षा जास्‍त महसुल प्राप्‍त झाला असुन कींबहुना देशातील कृषी विद्यापीठातही बियाणे व्‍यतिरिक्‍त एवढा महसुल कोणत्‍याच कृषी निविष्‍ठापासुन प्राप्‍त झाला नसेल. आज बॉयोमिक्‍सने विद्यापीठास वेगळी ओळख प्राप्‍त करून दिली आहे. डॉ आपेट यांचे कार्य कृ‍षी शास्‍त्रज्ञा करिता प्रेरणादायी  आहे. करोना रोगाच्‍याप्रादुर्भावात व लॉकडाऊन परिस्थितीही मोठया प्रमाणात मराठवाडयातीलच नव्‍हे तर इतर राज्‍यातील शेतकरी बांधवानी बॉयोमिक्‍सचा वापर केला.

डॉ कल्‍याण आपेट हे गेल्‍या तीन वर्षापासुन वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागात संशोधनाच्‍या माध्‍यमातुन बॉयामिक्‍सची निर्मिती करीत असुन बॉयामिक्‍स हे उपयुक्‍त सुक्ष्‍मजीवांचे मिश्रण आहे. हे एक चांगले जैविक किडनाशक व रोगनाशक म्‍हणुन विविध पिकांवर कार्य करते. याचा शेतकरी फळे, भाजीपाला, हळद आदी पिकांत मोठया प्रमाणात करित आहे. यामुळे पिकांची निरोगी वाढ होते,  तसेच पिकांचे रोग व किडींपासुन संरक्षण होऊन पिक उत्‍पादनात चांगली वाढ नोंदवली गेली आहे.

सदरिल ऑनलाईन पुरस्‍कार वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ योगेश इंगळे यांनी केले. यावेळी डॉ के डी नवगिरे, डॉ विक्रम घोळवे, डॉ महेश दडके, डॉ मिनाक्षी पाटील, डॉ सी व्‍ही अंबाडकर, डॉ संतोष पवार आदींसह संस्‍थेचे सदस्‍य ऑनलाईन माध्‍यमातुन उपस्थित होते.

Sunday, February 21, 2021

मौजे मांडाखळी (ता परभणी) ज्वारीच्या आद्यरेषीय पीक प्रात्याक्षिक पाहणी कार्यक्रम संपन्न‍

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्रातर्फे अखिल भारतीय समन्‍वयीत प्रकल्‍पांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे मांडाखळी येथील शेतकरी श्री कल्‍याण लोहट यांच्‍या शेतावरील ज्‍वारीच्‍या आद्यरेषीय पीक प्रात्‍यक्षिक कार्यक्रमाचे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावातील ज्‍येष्‍ट नागरीक श्री मुरलीधर लोहट हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते. ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे, विस्‍तार कृ‍षीविद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, डॉ एल एन जावळे, डॉ ईलियास खान, डॉ मदन पेंडके, डॉ विक्रम घोळवे, श्री कल्‍याण लोहट, श्री शिरीष लोहट, श्री सचिन शिराळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, पोषण मुल्‍याच्‍या दृष्‍टीने आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीचे महत्‍व सर्वांना कळले आहे. इक्रिसॅटच्‍या सहकार्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित परभणी शक्‍ती या ज्‍वारीच्‍या वाणात लोह व जस्‍त या घटकांचे प्रमाण अधिक आहे. हा वाण खरीप, रब्‍बी, व उन्‍हाळी अशा तीनही हंगामात पेरणीसाठी उपयुक्‍त असुन यापासुन खाण्‍यासाठी ज्‍वारी व चनावरासाठी कडबा उत्‍पादन मिळते. ज्‍वारीच्‍या मुल्‍यवर्धन करून विक्री केल्‍यास शेतकरी बांधवाना अधिक आर्थिक लाभ मिळु शकतो, या करिता शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांनी पुढाकार घ्‍यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

यावेळी शेतकरी श्रीकल्‍याण लोहट यांच्‍या शेतातील ज्‍वारीच्‍या पिक प्रात्‍यक्षिकांची पाहणी करण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ के आर कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन ज्‍वार कृषीविद्यावेत्‍ता डॉ जी एम कोटे यांनी केले तर आभार श्री सचिन लोहट यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी उपस्थित होते.

Friday, February 19, 2021

समाजाभिमुख कार्य करणा-या माजी विद्यार्थ्‍यांचा विद्यापीठास सार्थ अभिमान ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

कर्तबगार व कर्तव्‍यदक्ष अधिकारी तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी मा श्री कामाजी पवार व मनपा आयुक्‍त मा श्री देविदास पवार यांच्‍या हस्‍ते विद्यापीठात वृक्षारोपण

परभणी कृषि विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्‍लेखनिय योगदान देत असुन  समाजभिमुख कार्य करणा-या माजी विद्यार्थ्‍याचा विद्यापीठास सार्थ अभिमान आहे. विद्यापीठात बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातुन येतात अनेक अडजणीवर मात करून यश प्राप्‍त करतात. हेच विद्यार्थी राज्‍यातील प्रशासनात कार्य करतांना सातत्‍यपुर्ण समपर्ण भावनेने समाजासाठी कार्य करतात. स्‍वच्‍छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ व सुरक्षित विद्यापीठ ही संकल्‍पना राबवितांना वन विभागात अनेक माजी विद्यार्थी असलेले अधिका-यांनी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.  

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी मा श्री कामाजी पवार व मनपा आयुक्‍त मा श्री देविदास पवार यांच्‍या हस्‍ते विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालय परिसरात दिनांक १८ फेबुवारी रोजी वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्‍न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, प्रभारी प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ हिराकांत काळपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रशासकीय क्षेत्रात व समाजाभिमुख कार्य करणारे कर्तबगार व कर्तव्‍यदक्ष अधिकारी तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी मा श्री कामाजी पवार व मनपा आयुक्‍त मा श्री देविदास पवार यांचा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते विशेष सत्‍कार  करण्‍यात आला.

भाषणात मा श्री कामाजी पवार म्हणाले की, विद्यापीठात घेतलेल्‍या ज्ञान व संस्कारामुळेच प्रशासनात विविध पदावर चांगले कार्य करण्‍याची उर्मी मिळते. सामाजिक कार्याची सवय ही विद्यार्थीदशेत लागली. महाविद्यालयीन जीवनातच गुरूंनी केलेले मार्गदर्शन व संस्‍कार यामुळेच आमचे व्‍यक्तिमत्‍व विकसित झाले, कृषि विद्यापीठ राबवित असेलेले हरित विद्यापीठ उपक्रम निश्चितच एक स्‍त्‍युत्‍य उपक्रम असुन यास वन विभागाचे वेळोवेळी सहकार्य राहील. तसेच मा श्री देविदास पवार म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनातील अनुभवाची शिदोरीच्‍या बळावर प्रशासकीय क्षेत्रात चांगले कार्य करतांना शक्ती मिळते. गुरूच्‍या हस्‍ते शिष्‍यांचा सत्‍कार होणे म्‍हणजेच जीवनातील अत्‍यंत आनंददायी क्षण आहे

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मीना वानखेडे यांनी केले तर प्रास्‍ताविक डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले. कार्यक्रमास कॅफो श्री काळदाते, वन अधिकार श्री कच्‍छवे, श्री ऋषिकेश चव्‍हाण, वन अधिकार कु.सुरेखा नरवाडे, डॉ गजानन गडदे, डॉ जयकुमार देशमुख, डॉ आशाताई देशमुख, प्रा डि एफ राठोड आदींसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, February 16, 2021

वनामकृवित छात्रसैनिकांचा रायफल फायरींगचा सराव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 14 ते 18 फेब्रुवारी दरम्‍यान राष्‍ट्रीय छात्रसेनेचे शिबिर श्री शिवाजी महाविद्यालयात येथे आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 15 फेबुवारी रोजी कृषि विद्यापीठातील बीएसपी प्रक्षेत्रावर 148 छात्रसैनिकांचा रायफल फायरींगचा सराव घेण्‍यात आला. सदर रायफल फायरींग सरावात उत्‍कृष्‍ट कामगिरी करणा-या छात्रसैनिकांचा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी कंमाडींग ऑफीसर श्री जी आर के शेषासाई, सुभेदार मेजर बिक्रम सिंग, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ  यांनी केले तर आभार लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ अविनाश राठोड, सुनिल कुमार, जगतसिंग, शरद निंबाळकर, श्री बिस्‍ट, योगेश ठोंबरे, कृ‍ष्‍णा तोंडे, हर्षवर्धन जाधव, ज्ञानेश्‍वर खटारे, विष्‍णु राठोड, आदींनी परिश्रम घेतले.

वनामकृवितील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग मंजुर

राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरजना महाराष्‍ट्र शासनाने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय क्रमांक कृषिवि-3719/प्रक्र 40/5-ऐ प्रमाणे मंजुर केला आहे. सातव्‍या केंद्रीय वेतन आयोगाच्‍या शिफारसींवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्‍या वेतनश्रेणीत सुधारणा करण्‍याकरिता सेवानिवृत्‍त अप्‍पर मुख्‍य सचिव मा श्री के पी बक्षी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली राज्‍य वेतन सुधारणा समिती, 2017 ची स्‍थापना करण्‍यात आली. सदर समितीच्‍या शिफारसी शासनाने काही फेरफारांसह स्‍वीकृत करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला, त्‍या अनुषंगाने इतर राज्‍य शासकीय कर्मचा-याबरोबर कृषि विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचा-यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासुन सुधारीत वेतन संरचना लागु करण्‍याबाबतचा शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मंजुर करण्‍यात आला. या शासन निर्णयावर उपसचिव मा श्री सु सं धपाटे यांची स्‍वाक्षरी आहे.  

सदर सातव्‍या वेतन आयोगाची मागणी अनेक दिवसापासुन प्रलंबीत होती. याकरिता राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील कर्मचारी संघटनेच्‍या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करण्‍यात आला. याकामी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील श्री जी बी उबाळे, श्री सुरेश हिवराळे, श्री राम खोबे, श्री गिरीश कनिमर, श्री नरेंद्र खरतडे, श्री रमेश थोरात, श्री राजेंद्र उकंडे, श्री कृष्‍णा जावळे, श्री गंगाधर चांदणे, श्री कुंभार, श्री शेख जमील, श्री भारत उबाळे आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

छायाचित्र – सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनाचा शासन निर्णयाची प्रत प्राप्त केल्यानंतर वनामकृवितील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी 

Tuesday, February 9, 2021

वनामकृविचे छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांना लेफ्टनंट रँक


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय छात्रसेनाचे छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांना लेफ्टनंट रँक देऊन गौरविण्‍यात (दिनांक 28 जानेवारी रोजी) आले. नांदेड येथे 52 महाराष्‍ट्र बटालियन नांदेड येथील कमांडिंग ऑफिसर जी आर के शेषा साई यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. मार्गदर्शनात कमांडिंग ऑफिसर जी आर के शेषा साई म्‍हणाले की, महाविद्यालयीन एनसीसी युनिट आणि आर्मी यांनी एकत्र येऊन कार्य केल्‍यास देशाला निश्चितच चांगले कॅडेट्स मिळतील. यावेळी सुभेदार मेजर बिक्रम सिंग, यावेळी जगत सिंग, आर आर पवार, लेफ्टनंट सावळे आदीसह 52 महाराष्‍ट्र बटालियन नांदेड चे अधिकारी उपस्थित होते. सदरिल गौरवाबाबत डॉ जयकुमार देशमुख यांचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल आदींनी अभिनंदन केले.

Wednesday, February 3, 2021

भारतीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष मा डॉ सुनील मानसिंगा यांची पशूशक्तिचा योग्य वापर प्रकल्पास सदिच्‍छा भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशूशक्तिचा योग्य वापर प्रकल्पास भारतीय कामधेनु आयोग (केंद्र सरकार) चे अध्यक्ष तथा पशु कल्‍याण बोर्डचे सदस्य मा डॉ सुनील मानसिंगा यांनी दि १फेब्रुवारी रोजी सदिच्‍छा भेट दिली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मा अंबादासजी जोशी, यवतमाळ गो आधारित शेतीचे श्री सुभाषजी शर्मा, सत्यनारायण सोनी (देवलापार), श्री राजेश सिंग ठाकूर, श्री शिवप्रसाद कोरे (श्री छत्रपती शिवाजी गोशाळा राणीसावरगाव), श्री राजेंद्र सोनी, श्री महेश सोनी, श्री लोया, श्री रासवे (रामेटाकली), डॉ चौधरी साहेब, श्री दत्ता पहारे आदींनी भेट दिली.

विद्यापीठ विकसित पशुशक्तीवर चालणारे यंत्रे, रोटरी मोड अग्रप्रोसेसिंग युनिट, सौऊर्जेवर चालणारे बैलचालित फवारणी यंत्रे आदीची मान्‍यवरांनी पाहणी केली. पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी विविध बैलचलीत सुधारित शेती अवजारे याबद्दल माहिती दिली तर अपारंपारिक ऊर्जा विभागाचे प्रमुख डॉ. राहूल रामटेके यांनी सौर उर्जाचालित फवारणी यंत्र, सौर निक्षरिकरण यंत्र, जनावरे, पक्षी पळवणारे यंत्र याबद्दल माहिती दिली तसेच  श्री. अजय वाघमारे यांनी रोटरी मोड चे  प्रात्यक्षित दाखविले.

मा. श्री सुनील मानसिंगकाजी व मा. श्री अंबादासजी जोशी यांनी विकसित बैलचलित अवजारे यांची प्रशंसा केली तसेच नमूद केले की बैलचलित सुधारित शेती अवजारे द्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीतील कष्ट कमी करून निविष्ठांचा योग्य वापर करून नक्कीच त्यांच्या एकंदरीत शेतीतील आर्थिक व्यवहार व उत्पन्नामध्ये मदत होईल तसेच बैलाने चालणारे रोटरी मोड प्रक्रिया यंत्रे स्वयंरोजगार करिता उपयुक्त असल्याचे सांगितले. इतर उपस्थित मान्यवरांनी सदरील औजारे हे गो पालनाकरिता अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. यावेळी दीपक यंदे, भारत खटिंग, रुपेश काकडे, पवार मावशी, अवाड, अमोल, अनिल हरकळ, आशुतोष काकडे आदींचे सहकार्य लाभले.