मौजे मांडाखळी येथे आयोजित माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी उपक्रमात प्रतिपादनड्रो
न फवारणीचे दाखविण्यात आले प्रात्यक्षिक
महिला व युवकांचा मोठा सहभाग
कृषि व ग्राम
विकासात महिलांचे मोठे योगदान असुन समाजात महिलांचा
योग्य सन्मान झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असुन शेतीतील अनेक
काम महिला चांगल्या पध्दतीने करतात. कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान वापराबाबत
परभणी कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला असुन शेतकरी बांधवामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा
प्रसार व प्रचार करिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय पातळीवर शेतीत
ड्रोन वापराबाबत कार्यपध्दती व मार्गदर्शक तत्वे निश्चित झाले आहे. ड्रोनचा वापर
केल्यास कमी वेळात कार्यक्षमरीत्या किटकनाशकांची फवारणी होते. सेंन्सर व्दारे ड्रोनच्या
माध्यमातुन पिकांतील किड व रोगाचा प्रादुर्भाव ओळखुन इच्छित ठिकाणीची किटकनाशकांची
फवारणी करता येणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले. महाराष्ट्र
शासनाच्या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात
दिनांक २७ जुन रोजी 'माझा एक दिवस
माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात
आला, या उपक्रमांतर्गत परभणी तालुक्यातील मौजे मांडाखळी येथे परभणी कृषी विज्ञान
केंद्र व विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
हे होते, तर विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, सरपंच श्री नागेश सिराळ, उद्यानविद्या महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ एम बी पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम
समन्वयक डॉ प्रशांत भोसले, नाहेप प्रकल्प अन्वेषक डॉ गोपाल
शिंदे आदीसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाने नुकतेच ग्राफ्टींग
रोबोट खरेदी केले असुन ही सुविधा शेतकरी बांधवा उपलब्ध करण्यात येईल. डिजिटल तंत्रज्ञानाबाबत
ग्रामीण युवकांचे कौशल्य विकास केल्यास मोठा रोजगार ही उपलब्ध होईल. विद्यापीठ शेतकरी, महिला व युवकांमध्ये उद्योजकता विकासाकरिता प्रयत्नशील
आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात निरंतर शिक्षणाची संधी सर्वांना मिळणार आहे. या
वर्षी विद्यापीठाने १२५० एकर अतिरिक्त जमीन वहती खोली आणली असुन यामुळे विद्यापीठाचे
बीजोत्पादन दुप्पट होण्यास मदत होणार आहे.
डॉ देवराव देवसरकर म्हणाले की, शेतकरी बांधव सोयाबीन, तुर, ज्वारी, मुग आदींची पिकांचे स्वतांचे बियाणे वापरू शकतो. पेरणीपुर्वी बीजप्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते. ज्या शेतकरी बांधवांना शक्य आहे, त्यांनी सोयाबीन पिकांकरिता बीबीएफ पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. डॉ एम बी पाटील यांनी संत्रा फळबागेचे व्यवस्थापनावर तर डॉ गोपाल शिंदे यांनी ड्रोनचा वापराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शेतकरी रमेश राऊत, महिला शेतकरी अर्जना सिराळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी बांधवाच्या शेतात ड्रोन फवारणीचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रशांत भोसले यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीधर पवार यांनी केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव, महिला शेतकरी व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात दिनांक २७ जुन रोजी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी
विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ प्रत्यक्ष
गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसचे त्यांच्या शेती विषयी तांत्रिक
समस्याचे समाधान करण्यात आले.