पिकांचे नवीन वाण निर्मितीकरिता कमीत कमी सात वर्षाच्या कालावधी लागतो, तर जलद पैदास - स्पीड ब्रीडींग तंत्रज्ञानाने अर्ध्या कालावधीतच नवीन वाण निर्मिती शक्य होते. देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता जलद पैदासकार तंत्रज्ञानाने अन्नधान्य सुरक्षेच्या बाबतीत एक उत्तम पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडीगन्नावार यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठातील कृषि वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर रोजी
स्पीड ब्रींडिग तंत्रज्ञानावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्रगतशील शेतकरी श्री
मधुकररावजी घुगे, सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. शिवाजी मेहत्रे, विभाग प्रमुख डॉ.
हिराकांत काळपांडे यांची उपस्थिती होती.
डॉ.अशोक बडीगन्नावार
यांनी पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना तसेच कृषी
वनस्पतीशास्त्र आणि भाभा अनुसंशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या
जाणाऱ्या उत्परीवर्तनाद्वारे पिवळी ज्वारी आणि रब्बी ज्वारी मध्ये उच्च उत्पादन व
गुणवत्तेमधील बदल घडविण्यासाठीच्या घेण्यात येत असलेल्या प्रयोगांना भेट देऊन
तांत्रिक मार्गदर्शन केले. उत्पपरिवर्तनाद्वारे बदल झालेल्या राळ पिकाची पाहणी करण्यात
आली. कृषिभूषण मधुकरराव घुगे यांनी भुईमूग बिजोत्पादन याबद्दल मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन डॉ.
अंबिका मोरे यांनी केले व डॉ. अंबालिका चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ.
दिलीप झाटे डॉ. जयकुमार देशमुख, डॉ.गोदावरी पवार, डॉ. संदीप शिंदे आदींसह
विभागातील विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री
शेंगोळे आदीसह विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.