Thursday, January 3, 2013

मराठवाडा कृषी विद्यापीठात महिला शेतकरी मेळावा संपन्‍न

मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय व गृह विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी २०१३ रोजी महिला शेतकरी मेळाव्याचे संपन्‍न झाला. या मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे होते. व्‍यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, जालन्याच्या महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवपरभणीचे जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी श्री. पी.  एच. मालेगावकर, हिंगोलीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बी. एच. कच्छवे, श्रीमती भावनाताई नखाते, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पट्टणम आणि माजी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ राजेश्वर कोटीखाने, विद्यापीठ अभियंता श्री. डी डी कोळेकर, नियंत्रक श्री.एन.जे.सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदघाटनपर भाषणात मा. श्रीमती रजनीताई सातव म्‍हणाल्‍या की, शेतकामात महिलांचा वाटा मोठा आहे, परंतु त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिला शिक्षित व स्वावलंबी झाल्या पाहिजेत तरच देशाची प्रगती होईल, देशातील साधारणत: ५०% लोकसंख्या हि महिलांची असून त्यांचा विकास झाला तर देश महासत्ता होईल. बचत गटाच्या माध्यमाने ग्रामीण महिला खऱ्या अर्थाने बोलक्या झाल्या, त्यामुळे महिलामध्ये उद्योजकता निर्माण झाली. ग्रामीण महिलानी बचत गट स्थापन करून त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. 
अध्‍यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे म्‍हणाले की, शेतकामात महिलांचा वाटा मोठा असूनही निर्णय प्रक्रियात त्यांचा सहभाग कमी आहे. बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण व ज्ञान घेऊन महिलांनी प्रक्रिया व शेती-जोड उद्योगात उतरावे. विद्यापीठाच्या कृषी शिक्षणात मुलींचा सहभाग वाढला आहे. यशस्वी उद्योजक महिलांपासून प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रक्रिया उद्योग उभारावेत.  
महिला उद्योजिका सौ. संजीवनी जाधव यानी आवळा प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा सांगितली. त्या म्‍हणाल्‍या की, सावित्रीबाई फुले यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन निश्चित ध्येय ठरवुन काम करावे तर निश्चित यश प्राप्त होईल. बचत गटाच्या आधारे उद्योगास सुरवात करून यश संपादन केले. उच्च गुणवत्ता असलेल्या मालास मोठी बाजारपेठ आहे, यामुळे गुणवत्ता असलेल्या मालाची निर्मिती करावी.  
विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी महिला शेतकरी मेळाव्‍याचे महत्‍व मनोगतात विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटटनम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. माधुरी कुलकर्णी तर आभार प्रदर्शन डॉ.विना भालेराव यांनी केले.
याप्रसंगी विभागप्रमुख डॉ.बी.एम.ठोंबरे यांनी संपादीत केलेल्या कृषी दिनदर्शिकाचे प्रकाशन तसेच शेतीभाती मासिकाचा महिला विशेषांक, विद्यापीठाच्या शास्त्रानानी तयार केलेल्या घडीपत्रीकांचे विमोचन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
तांत्रिक सत्रात डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी पशु-संवर्धन विकासात ग्रामीण महिलांचा सहभाग यावर मार्गदर्शन केले, माता व बालंकाचा आहार, आरोग्‍य व विकासाची मार्गदर्शीका यावर डॉ विजया नलावडे, वेळ व‍ पैश्‍याचे नियोजन यावर डॉ जयश्री रोडगे,  डॉ हेमांगिनी सरांबेकर तर सीताफळ प्रक्रिया उद्योगावर डॉ. डी.पी.वासकर, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग या विषयावर डॉ. दिलीप मोरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आयोजीत कृषी प्रदर्शनाच्या विविध दालनास महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्याने भेटी दिल्या.मेळाव्यास मराठवाडयातील महिला शेतकरी, विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी मोठया संख्याने उपस्थित होते. 
महिला शेतकरी मेळाव्याचे उदघाटन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा.श्रीमती रजनीताई सातव, मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवगृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाला पट्टणम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.बी.एच.कच्छवे आदि.   
महिला शेतकरी मेळाव्यात विभाग प्रमुख डॉ. बी एम ठोंबरे यांनी संपादित केलेल्या कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव, मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे,  महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवगृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाला पट्टणम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पी.  एच. मालेगावकर, श्री.बी.एच.कच्छवे  आदि.

महिला शेतकरी मेळाव्यात शेतीभाती मासिकाच्या विशेषांकाचे विमोचन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव, मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे,  महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवगृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाला पट्टणम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पी.  एच. मालेगावकर, श्री.बी.एच.कच्छवे प्रा पी एस चव्हाण आदि.
उपस्थित महिला 
महिला शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा.श्रीमती रजनीताई सातव

महिला शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे

महिला शेतकरी मेळाव्यात मनोगत व्यक्त करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण

महिला शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधव

Saturday, December 29, 2012

महिला शेतकरी मेळावाचे आयोजन


      मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय व गृह विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषी महाविद्यालय, परभणीच्या सभागृहात करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे राहणार आहेत. जालनाच्या महिला उद्योजिका सौ. संजीवनी जाधव, लातूरचे  कृषी सहसंचालक श्री के. एन. देशमुख व औरंगाबादचे  कृषी सहसंचालक श्री शु. रा. सरदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
       कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ महिलांना कृषी तंत्रज्ञानबाबत   मार्गदर्शन करणार आहेत तसेच महिला शेतकरी व उद्योजकासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास शेतकरी महिलांनी मोठया संख्याने उपस्थिती राहावे असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा विशाला पट्टणम  आणि  मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ राजेश्वर कोटीखाने यांनी केले आहे.


Tuesday, December 25, 2012

मा.कुलगुरू डॉ.रविप्रकाश दानी यांची मराठवाडा कृषि वि़द्यापीठास सदिच्‍छा भेट

    कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांसमोर नवीन आव्हाने आहेत. कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनास दिशा मिळण्‍यासाठी व प्रगतीसाठी आंतर-विद्या‍पीठीय विद्यार्थी व शास्‍त्रज्ञ यांच्‍यात विचारांचे आदान-प्रदान होणे आवश्‍यक आहे. मराठवाडा कृषि वि़द्यापीठात विदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत हि निश्चितच अभिमानाची बाब आहे. भविष्‍यात कृषि शिक्षणासाठी हे विद्यापीठ विदेशातील विद्यार्ध्यानमध्‍ये आकर्षण ठरेल असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्या‍पीठाचे मा. कुलगुरू डॉ. रविप्रकाश दानी यांनी दिनांक 25 डिसेंबर 2012 रोजी वि़द्यापीठाच्‍या सदिच्‍छा भेटी दरम्‍यान केले.
    पशु-संवर्धन व दुग्‍धशास्त्र विभागास भेटी दरम्‍यान विद्यापीठातील उस्‍मानाबादी शेळीवरील संशोधन लहान शेतक-यांनसाठी उपयुक्‍त आहे असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. विलास पाटील, डॉ. ए. टि. शिंदे, प्रा.लोंढे उपस्थित होते.
    गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या भेटी प्रसंगी मा. कुलगुरू डॉ. रविप्रकाश दानी म्‍हणाले कि, गृहविज्ञान महाविद्यालय असलेले हे महाराष्‍ट्रातील एकमेव कृषि विद्यापीठ आहे, ज्‍यामुळे येथे  ग्रा‍मीण महीलासह संपुर्ण्‍ा कूटुंबाचा विचार केला जातो. महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटटणम यांनी महाविद्यालयाच्‍या विविध उपक्रमाची माहीती दिली. या प्रसंगी विभाग प्रमुख डॉ.प्रभा अंतवाल, डॉ.जयश्री झेंड, डॉ.सुनीता काळे आदी उपस्थित होते.
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक प्रा. आनंद गोरे यांनी विद्या‍पीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती मा. कुलगुरू डॉ. रविप्रकाश दानी यांना दिली. मा.डॉ.रविप्रकाश दानी म्‍हणाले कि, विद्यापीठाच्‍या माहिती तंत्रज्ञानाच्‍या विविध माध्‍यमांमुळे शेत‍क-यांमध्‍ये जिज्ञासा निमार्ण होत आहे.
अधिक बियाणे उत्पादनासाठी सिंचनस्त्रोत विकास प्रकल्पाची माहिती सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या डॉ. अशोक कडाळे, प्रा. मदन पेंडके व प्रा. स‍ंदिप पायाळ यांनी दिली तर कृषि अभियांत्रिक महाविद्यालयच्‍या सौरउर्जा पार्कची माहीती प्रा.टेकाळे, प्रा.संजय पवार यांनी दिली. तसेच कृषि अभियांत्रिक मधील विविध औजाराची माहिती प्रा. पोटेकर व प्रा. गोपाल शिंदे यांनी दिली. लिंबुवर्गीय तंत्रज्ञान अभियानांतर्गत रोपवाटीकेची माहिती डॉ. सरकटे व डॉ. एंगडे यांनी दिली. यावेळी डॉ. एस. पी. जिंतुरकर, डॉ. एन. डी. देशमुख उपस्थित होते. उस संशोधन प्रक्षेत्राची माहिती सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या डॉ. उदय खोडके व प्रा. आसेवार यांनी दिली. कार्यक्रम यशस्‍वीते साठी डॉ. काळपांडे, प्रा.अनिस कांबळे, प्रा.महेश देशमुख, प्रा.रवि शिंदे आदिनी परिश्रम घेतले
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या कृषी विस्तार कार्यक्रमाची माहिती कुलगुरू  मा  डॉ रविप्रकाश दानी यांना देतांना 
मा.कुलगुरू डॉ  किशनराव गोरे सोबत प्रा आनंद गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, प्रा काळपांडे आदि 
गृह विज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार विभागाची माहिती कुलगुरू  मा  डॉ रविप्रकाश दानी यांना देतांना सहयोगी अधिष्टता तथा प्राचार्या प्रा विशाला पट्टणम, सोबत मा  कुलगुरू डॉ  किशनराव गोरे,  शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, डॉ प्रभा अंतवाल  आदि 
कृषी अभियांत्रिक महाविद्यालयाच्या विविध ओंजारांची माहिती कुलगुरू  मा  डॉ रविप्रकाश दानी यांना देतांना मा  कुलगुरू डॉ  किशनराव गोरे,  शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, प्रा मुंडे, प्रा  गोपाल शिंदे  आदि 

उती संवर्धन प्रयोगशालाची माहिती कुलगुरू  मा  डॉ रविप्रकाश दानी यांना देतांना प्रा दौंडे सोबत  मा कुलगुरू डॉ  किशनराव गोरे,  शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, प्रा काळपांडे आदि 

अधिक बियाणे उत्पादनासाठी  सिंचन स्रोत  विकास प्रकल्पाची माहिती कुलगुरू  मा  डॉ रविप्रकाश दानी यांना देतांना मा   कुलगुरू डॉ  किशनराव गोरे,  शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, डॉ अशोक कडाळे, प्रा संदीप पायाल, प्रा मदन पेंडके आदि
पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र  विभागाच्या विद्यार्ध्या बरोबर संवाद साधतांना कुलगुरू  मा  डॉ रविप्रकाश दानी सोबत मा कुलगुरू डॉ  किशनराव गोरे,  शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, सहयोगी अधिष्टता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्रा काळपांडे आदि
कुलगुरू  मा  डॉ रविप्रकाश दानी यांनी ऊस प्रक्षेत्रास भेट दिली त्या प्रसंगी,  सोबत  मा कुलगुरू डॉ  किशनराव गोरे,  शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, डॉ उदय खोडके,  डॉ  आसेवर, श्री वाघमारे आदि 

Saturday, December 22, 2012

संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे हे भारत शिक्षा रत्‍न पुरस्‍काराने सन्‍मानित

नवी दिल्‍ली येथील ग्लोबल सोसायटी फॉर हेल्‍थ अन्ड एज्‍युकेशनल ग्रोथ या संस्‍थ्‍ोतर्फे दिनांक 17 डिसेंबर 2012 रोजी नवी दिल्ली येथे मराठवाडा कृषि वि़द्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे हयांना भारत शिक्षा रत्‍न पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. संशोधन व‍ शैक्षणिक क्षेत्रातील उल्‍लेखिनीय योगदानासाठी डॉ. गोवर्धन खंडागळे यांना सन्‍मानित करण्‍यात आले. संस्‍थेतर्फे नवी दिल्‍ली येथे आयोजीत 36 व्‍या राष्‍ट्रीय परिषदेत नायजेरियाचे राजदुत श्री.अली इलीयसु यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. या प्रसंगी तामीळनाडूचे माजी गव्‍हर्नर श्री. भीष्‍मनारायण सिंग, युनीस्‍कोचे प्रा.एस.एस.भाक्री, संस्‍थेचे सचिव श्री. अनिस दुराणी, विदेशातील व देशातील संशोधक व शिक्षणतज्ञ उपस्थित होते. यासन्‍मानानिमित्‍य मराठवाडा कृषि वि़द्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ. किशनराव गोरे यांनी त्‍याचे अभिनंदन केले. तसेच विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थीं तर्फे त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

Wednesday, December 19, 2012

नैसर्गिक जैव साखळया नष्‍ट होउन जैवविविधता संपत चालली आहे


नैसर्गिक जैव साखळया नष्‍ट होउन जैवविविधता संपत चालली आहे
      मा.कुलगुरू डॉ. किशनराव गोरे

जगातील जैवविविधता नष्‍ट होण्‍याचा वेग प्रचंड असुन विकासाला पर्यावरण संरक्षणाच्‍या अटी न लावल्‍याने लागवडीखाली असलेली जमीन व पिकाच्‍या उत्‍पादकतेवर संकट आले असून मोठया संशोधनाची व जनजागरणाची गरज असल्‍याचे प्रतिपादन मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांनी हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयात ‘जैवविविधता व निसर्गाचे संवर्धन’ या विषयावर दिनांक 14 व 15 डिसेंबर रोजी आयोजीत राष्‍ट्रीय परिषदेच्‍या उदघाटन ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. किशनराव गोरे पुढे म्‍हणाले की, भारतात जगातील सर्वोत्‍कृष्‍ट जैवविविधता पाहण्‍यात मिळते; पण वाढत्‍या लोकसंख्येने सिमेंटची जंगले वाढत चालली आहेत, त्‍यासोबत नैसर्गिक जैव साखळया नष्‍ट होउन जैवविविधता संपत चालली आहे. विकासाच्‍या प्रक्रियेसोवत पर्यावरण रक्षणाच्‍या अटी आपण लावू शकलो नाही, त्‍यामुळे एकीकडे सिमेंटचे जंगल, तर दुसरीकडे वाळवंट अशी स्थ्‍िाती झाली आहे.
पावसाची अनियमितता व तापमान वाढीचे परिणाम आता पिकाच्‍या उत्‍पादनावर होउ लागले आहेत. दरवर्षी नवनवीन रोग पिकावर येउ लागले आहेत. केंद्राने वर्ष 2002 मध्‍ये राष्‍ट्रीय जैवविविधता संरक्षण प्रणाली निश्चित केली. या शिवाय आजूबाजूच्‍या परिसरात जैवविविधतावरील संकटाच्‍या संदर्भात जनजागरण व संशोधन या दोन्‍ही गोष्‍टींची आवश्‍यक्‍ता आहे. जमिनीची सुपीकता झपाटयाने कमी होउ लागली असुन पिकाच्‍या उत्‍पादकतेवर देखील संकट येत आहे.
    या वेळी व्‍यासपीठावर सुप्रसिध्‍द वैज्ञानिक तथा राष्‍ट्रीय जैवविविधता समितीचे सदस्‍य डॉ. बबनराव इंगोले, संस्‍‍थेचे पदाधिकारी श्री धरमचंद बडेरा, डॉ. वाय. टी. खिल्‍लारे, प्राचार्य डॉ. बर्वे, डॉ. रेडडी, डॉ. सिन्हा, डॉ. बी. एस. साळवे आदी सह पत्रकार, प्राध्‍यापक, विदयार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी संस्‍थाध्‍यक्ष एकनाथदादा नीलावार यांच्‍या संदेशाचे वाचन करण्‍यात आले. विशेष स्‍मरणिकेचे प्रकाशन करण्‍यात आले. सूत्रसंचालन डॉ. कुलकर्णी यांनी केले. प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. बर्वे व समन्‍वयक डॉ. साळवे यांनी केले. प्रा. पी. पी. जोशी यांनी आभार मानले.


Thursday, December 13, 2012

अन्न साखळी करिता अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली या विषयावरील हिवाळी कार्यशाळेचा समारोप

अन्न साखळी करिता अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली या विषयावरील हिवाळी कार्यशाळेचा समारोप 



बाबू गेनू शहीद दिन साजरा

मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या वतीने बाबू गेनू शहीद दिन निमित्त मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे यांच्या हस्ते बाबू गेनू यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिन्यात आली. त्याप्रसंगी संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, डॉ राजेश्वर कोटीखाने, श्री रवींद्र जुक्टे, डॉ कार्ले आदी