यावर्षी मराठवाडयात
सरासरीच्या तुलनेत केवळ ३४ टक्केच पाऊस पडला असुन सर्वदुर सारखा झालेला नाही, त्यामुळे
पीक परिस्थिती समाधानकारक नाही. काही ठिकाणी अजुन पेरण्या बाकी असुन पावसाचा दीड महिन्याचा
कालावधी जवळपास होत आला आहे. अशा परिस्थितीत पर्यायी पीके व पीकपध्दती आपत्कालीन पीक
नियोजनात समाविष्ठ करुन पेरणी करणे सोईस्कर होईल, असा सल्ला वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्तातथा व्यवस्थापक डॉ. यु.एन. आळसे
यांनी दिला आहे. या पुढील काळात पेरणी योग्य पावसाच्या आगमनानुसार पीकांची पेरणी करावी.
आता १६ ते ३१ जुलै दरम्यान सुर्यफुल, बाजरी, सोयबीन + तुर, बाजरी + तुर, एरंडी, कारळ, तीळ, हुलगा, मटकी आदी पीकांची पेरणी
करावी. कमी कालावधीच्या वाणाची निवड करावी, यात तुर (बीडीएन-७११), सोयबीन (एमएयुएस-७१, जेएस-९३०५), बाजरी (एबीपीसी-४-३, धनशक्ती), सुर्यफुल (एलएस-११, ३५) वाणांचा वापर करावा. तसेच १ ते
१५ ऑगस्ट दरम्यान बाजरी, सुर्यफूल, एरंडी,
तीळ, एरंडी अधिकधने, एरंडी
+ तुर आदी पीकांची पेरणी करावी. तर १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान बाजरी,
सुर्यफुल, एरंडी, तीळ,
एरंडी + तुर, एरंडी +
धने आदींची लागवड करावी. मुलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ)
पध्दतीचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, अशा ठिकाणी अरुंद ओळीच्या
खरीप सर्वच पीकांमध्ये ३-४ ओळी नंतर एक सरी काढावी व कापुस व तुर रुंद ओळीतील पीकांमध्ये
एक तास आड करुन सरी काढावी जेणेकरुन पडलेला पाऊस सरीमध्ये साठून पीकाच्या वाढीसाठी
उपयोगी पडेल, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Tuesday, July 16, 2019
कृषी कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाव्दारे कुशल मनुष्यबळ निर्मिती शक्य ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
वनामकृवित आंतरराष्ट्रीय युवा
कौशल्य दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न
कृषि क्षेत्रातील अनेक कंपन्याना एका
बाजुस कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे, तर अनेक युवक रोजगारापासुन दुर आहेत.
त्यामुळे ग्रामीण युवकांना कृषी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज आहे. राज्यात
मोठया प्रमाणात शेतकरी एकत्रित येऊन उत्पादक कंपन्या स्थापन करित आहेत, परंतु तांत्रिक
पाठबळ व मार्गदर्शनाच्या अभावामुळे या कंपन्या अकार्यक्षम होत आहेत. या कंपन्यासाठी
प्रशिक्षित बेरोजगार युवकांनी सल्लागार म्हणुन कार्य केल्यास निश्चितच शेतकरी उत्पादक
कंपन्या चांगल्या पध्दतीने विकसित होतील, व शेतक-यांचा आर्थिक विकास होईल, असे
प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य
दिनाचे औचित्य साधुन दिनांक 15 जुलै रोजी वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
राबवण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व सिमॅसिस लर्निग एलएलपीस यांच्यात
सहकार्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. सदरिल प्रशिक्षण केंद्र शासनाची
पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज
कौशल्य विकास व उद्योगजकता अभियांनांतर्गत राबविण्यात येणार असुन या प्रशिक्षण उपक्रमाबाबत
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ प्रदिप
इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, जेष्ठ पत्रकार श्री दयानंद माने,
सिमॅसिस लर्निंगचे सहाय्यक सरव्यवस्थापक श्री अमोल बिरारी आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
कुलगूरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले
की, कृषी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातुन बेरोजगार युवकांना
रोजगारासाठी दिशा मिळेल, अनुभवजन्य ग्रामीण मनुष्य निर्मीती होईल. कौशल्यावर आधारित
उत्पादनक्षम व्यवस्था निर्माण होऊन ग्रामीण भागात सामाजिक समृध्दी येईल, अशी
अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले
यांनी मार्गदर्शनात सर्व कृषि विज्ञान केंद्रे, घटक व संलग्न महाविद्यालय व कृषि
तंत्र निकेतन यांनी वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम योग्य पध्दतीने
राबविण्याबाबत आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री
अमोल बिरारी यांनी केले तर श्री उदय वाईकर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास
विद्यापीठांतर्गत असलेल्या घटक व संलग्न महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे,
कृषि तंत्र विद्यालय आदींचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता
व कौशल्य विकास अभियानात राज्यातील पन्नास हजार ग्रामीण बेरोजगार तरूणांना मोफत
प्रशिक्षण देऊन शेतीतील महत्वाच्या घटकांविषयी कौशल्य देण्याचा कार्यक्रम हा राज्य
शासनाचा हा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्रामीण तरूणांना रोजगाराभिमुख
बनविणे प्रमुख उदीष्ट असुन ग्रामीण तरूणांना शेतीविषयक नवनवीन घटकांविषयी
प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविणे व त्यातुन त्यांना रोजगाराच्या
किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध देण्याचा प्रयत्न होणार आहे. यात
सेंद्रीय पीक उत्पादक, कृषि विस्तार सेवा प्रदाता, गुणवत्ता बियाणे उत्पादक,
बीज प्रक्रिया कामगार, सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञ, हरितगृह चालक, ट्रॅक्टर चालक, दुग्ध
उत्पादक व उद्योजक व छोटे कुक्कुटपालक आदी विषयात दोन महिनाचा पुर्णवेळ प्रशिक्षण
कार्यक्रम विद्यापीठातंर्गत असलेल्या घटक व संलग्न महाविद्यालये, कृषि विज्ञान
केंद्रे, कृषि तंत्र विद्यालय आदींच्या माध्यमातुन सिमॅसेस लर्निंग एलएलपीस राबविणार
आहे.
Monday, July 15, 2019
कुलगुरू आपल्या भेटीला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण हे डीडी सह्याद्री दूरदर्शन च्या कृषिदर्शन - फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात दिनांक 18 जुलै गुरुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सहभागी होणार आहे. कुलगुरू आपल्या भेटीला या कार्यक्रमात आपणही आपले प्रश्न विचारू शकता, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 022 24908050 तसेच 022 24988050, अशी माहिती डी डी सह्याद्री वाहिनीच्या वतीने देण्यात आली आहे.
Saturday, July 13, 2019
हरित विद्यापीठासाठी परभणीकरही सरसावले
माननीय
कुलगुरू यांच्या वृक्षसंवर्धनाच्या आवाहनास मोठा प्रतिसाद
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा स्वच्छ परिसर, हरित परिसर व सुरक्षीत परिसर या
संकल्पनेतुन हरित विद्यापीठासाठी विद्यापीठ परिसर व मराठवाडयातील विद्यापीठांर्गत
असलेल्या प्रक्षेत्रावर यावर्षी एक लक्ष वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिम दिनांक
1 जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या जयंती पासुन हाती
घेण्यात आली. आजपर्यंत मराठवाडयातील विद्यापीठ प्रक्षेत्रावर हजारो वृक्षांची
लागवड करण्यात आली आहे. परंतु या वृक्षाचे जनावरे व मनुष्यापासुन संरक्षण करण्याची
गरज लक्षात घेऊन संपुर्ण वृक्ष ट्री गार्डने संरक्षीत करण्याची आवश्यकता होती
तसेच परिसरात येणा-या व्यक्तींमध्ये निर्सगप्रेम व वृक्षप्रेम वाढीस लागावे यासाठी
माननीय कुलगुरू यांनी परिसरात येणा-यांच व्यक्तींनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्याचे
आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देऊन विद्यापीठ परिसरात सकाळ व संध्याकाळी
मॉर्निग व इंव्हीनिंग वॉक साठी येणा-या प्रतिष्ठीत नागरिकांनी ट्रि-गॉर्ड खरेदीसाठी
देगणीच्या स्वरूपात योगदान दिले. यात शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, डॉक्टरांचा ग्रुप,
विद्यापीठ सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी पतसंस्था आदींसह अनेकांनी वैयक्तीक
देणगी स्वरूपात योगदान दिले. यापुर्वीही विद्यापीठ परीसरात फिरण्यासाठी येणार्या अनेकांनी अशी मोहीम विद्यापीठाने सुरु केल्यास स्वच्छेने आपले योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
या मोहीमेस माननीय कुलगुरु डाॅ अशोक ढवण यांनी दहा हजार व डाॅ हिराकांत काळपांडे यांनी वीस हजार देऊन प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेसाठी जमा झालेली रक्कम माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांना दिनांक 12 जुलै रोजी सपुर्त करण्यात आली.
या मोहीमेस माननीय कुलगुरु डाॅ अशोक ढवण यांनी दहा हजार व डाॅ हिराकांत काळपांडे यांनी वीस हजार देऊन प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेसाठी जमा झालेली रक्कम माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांना दिनांक 12 जुलै रोजी सपुर्त करण्यात आली.
यावेळी
बोलतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, प्रत्येक व्यक्तींनी जन्मदिनी,
लग्नाच्या वाढदिवशी, आई-वडील, मुले-मुलींच्या नावे वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन
करावे. झाडांमध्ये आपल्या भावना गुंतल्यास निश्चितच मानवाचे वृक्षप्रेम वाढीस लागुन
वृक्षसंवर्धन होईल. विद्यापीठ परिसर सुंदर, स्वच्छ व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने
हरित परिसर हे एक पाऊल आहे, यात विद्यापीठातील विद्यार्थ्यी, प्रा़ध्यापक, अधिकारी,
कर्मचारी आदीं योगदान देतच आहेत परंतु परभणी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकही सहभागी
होत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, या सहभागामुळे माझे झाड, माझा परिसर, माझे विद्यापीठ ही भावना वाढीस लागण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी डॉक्टर ग्रुपचे डॉ सुभदा
दिवाण, डॉ संध्या मानवतकर, डॉ प्रियंका मुळे, डॉ भारती आहुजा, डॉ स्मिता खोडके, सेवानिवृत कर्मचारी संघाचे श्री शिवाजीराव काकडे, विद्यापीठ
पतसंस्थेचे प्रा राजाभाऊ बोराडे, डॉ राजेश कदम, डॉ प्रविण घाडगे, श्री कृष्णा जावळे, डाॅ टि बी भुक्तार, एकनाथ कदम, ए डी काळे, वैयक्तीकरित्या
योगदान देणारे डॉ हिराकांत काळपांडे, डॉ विणा भालेराव, श्री कोकणे, डॉ जयकुमार देशमुख, डॉ रणजित चव्हाण, विराज एजन्सीचे विलास कौसडीकर
आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले.
Wednesday, July 3, 2019
वनामकृवितील कोरडवाहु संशोधन प्रकल्पास वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
हरित
क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या नावे जाहीर झालेला पुरस्कार ही विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु
शेती संशोधन प्रकल्पास नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार सन २०१८ साठीचा जाहिर करण्यात आला असुन दिनांक
३ जुलै रोजी तसे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले, पुरस्काराबद्दल संशोधन
प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांचा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ
प्रदीप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, डॉ अशोक जाधव, पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ
डॉ भगवान आसेवार, डॉ मदन पेंडके, डॉ आनंद गोरे, डॉ मेघा जगताप, डॉ पपिता गौरखेडे आदींची
उपस्थिती होती.
पुरस्कार
प्राप्त शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, नुकतेच
आपण हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करून विद्यापीठांतर्गत
असलेल्या मराठवाडयातील विद्यापीठ प्रक्षेत्रावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची
महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली. कै वसंतराव नाईक यांच्या नावाचा वारसा लाभलेल्या
कृषी विद्यापीठास त्यांच्याच नावे असलेला प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार
विद्यापीठास जाहिर झाला, ही मोठी गौरवास्पद बाब आहे. मराठवाडयातील बहुतांश शेतीही
कोरडवाहु असुन यासाठी अनुकूल कोरडवाहु शेती तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित करून
त्याचा शेतक-यांमध्ये प्रसार व प्रचार केला. या तंत्रज्ञानाच्या आधारे मराठवाडयातील
शेती बळकट करण्याचा प्रयत्न होत आहे, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच भारतीय
कृषी संशोधन परिषदेचा प्रतिष्ठीत असा पुरस्कार जाहिर झाला असुन हे विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या
व शेतक-यांचा सन्मान असल्याचे ते म्हणाले.
हा पुरस्कार कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या पथकास जाहिर झाला असुन यात डॉ भगवान आसेवार, डॉ मदन पेंडके, डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ अनिल गोरे, डॉ मेघा जगताप, डॉ गणेश गायकवाड, डॉ पपिता गौरखेडे, डॉ रविंद्र चारी या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. सदरिल संशोधन प्रकल्पाचे कार्य कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या नेतृत्वाखाली व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुरस्काराचे वितरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्थापनादिनी दिनांक १६ जुलै रोजी नवी दिल्ली येथे माननीय केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे परिषदेने पत्राव्दारे कळविले आहे.
अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या उल्लेखनीय कार्याची दखल
सदरिल पुरस्कार अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या कोरडवाहु शेती मधील उल्लेखनीय संशोधन कार्य, तंत्रज्ञान विकास, व त्याचा शेतक-यांमधील प्रचार व प्रसार आदी कार्याची दखल घेऊन भारतीय कृषि संशोधन परिषदेने जाहिर केला आहे. या संशोधन कार्यात शेततळे व पाण्याचा पुर्नवापर, विहिर व कुपनलिका पुर्नेभरण, सोयाबीन करिता रूंद वरंबा व सरी पध्दती, मुलस्थानी जलसंधारण पध्दती, आंतरपीक पध्दती, आप्तकालीन पिक नियोजन, हवामान बदलानुरूप कोरडवाहु शेती संशोधन या बाबींचा प्रामुख्याने समावेश असुन हे तंत्रज्ञान प्रसारासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठवाडयातील आठही जिल्हयासाठी आप्तकालिन पिक नियोजन आराखडा तयार करण्यात आला असुन शासनस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास (पोक्रा प्रकल्प) या संशोधन केंद्रामार्फत तंत्रज्ञानात्मक पाठबळही पुरविण्यात येते. प्रकल्पामार्फत हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम हा परभणी तालुक्यातील मौजे बाभळगांव व उजळांबा या गावातील शेतक-यांच्या शेतावर संशोधनात्मक प्रात्यक्षिके राबविण्यात येऊन शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या संशोधन केंद्रामार्फत कोरडवाहु शेती निगडीत बावीस तंत्रज्ञान शिफारसी मान्य करण्यात आल्या असुन विविध तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी घडीपत्रिका, पुस्तिका, वार्तापत्र लेख आदी प्रकाशित करण्यात आले आहे.
सदरिल पुरस्कार अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या कोरडवाहु शेती मधील उल्लेखनीय संशोधन कार्य, तंत्रज्ञान विकास, व त्याचा शेतक-यांमधील प्रचार व प्रसार आदी कार्याची दखल घेऊन भारतीय कृषि संशोधन परिषदेने जाहिर केला आहे. या संशोधन कार्यात शेततळे व पाण्याचा पुर्नवापर, विहिर व कुपनलिका पुर्नेभरण, सोयाबीन करिता रूंद वरंबा व सरी पध्दती, मुलस्थानी जलसंधारण पध्दती, आंतरपीक पध्दती, आप्तकालीन पिक नियोजन, हवामान बदलानुरूप कोरडवाहु शेती संशोधन या बाबींचा प्रामुख्याने समावेश असुन हे तंत्रज्ञान प्रसारासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठवाडयातील आठही जिल्हयासाठी आप्तकालिन पिक नियोजन आराखडा तयार करण्यात आला असुन शासनस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास (पोक्रा प्रकल्प) या संशोधन केंद्रामार्फत तंत्रज्ञानात्मक पाठबळही पुरविण्यात येते. प्रकल्पामार्फत हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम हा परभणी तालुक्यातील मौजे बाभळगांव व उजळांबा या गावातील शेतक-यांच्या शेतावर संशोधनात्मक प्रात्यक्षिके राबविण्यात येऊन शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या संशोधन केंद्रामार्फत कोरडवाहु शेती निगडीत बावीस तंत्रज्ञान शिफारसी मान्य करण्यात आल्या असुन विविध तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी घडीपत्रिका, पुस्तिका, वार्तापत्र लेख आदी प्रकाशित करण्यात आले आहे.
Tuesday, July 2, 2019
कृषि विद्यापीठाचा एक लक्ष वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा संकल्प.......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
वनामकृवित कृषि दिनानिमित्त वृक्ष लागवड व वृक्षदिंडीचे आयोजन
मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत प्रक्षेत्रावर होणार वृक्षलागवड
मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत प्रक्षेत्रावर होणार वृक्षलागवड
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्हणुन साजरी करण्यात आली. कै वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कृषिदिनाचे औचित्य साधुन वृक्षलागवड व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शनात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाचा एक लक्ष वृक्ष लागवड व
वृक्षसंवर्धनाचा मानस असून मराठवाडयातील विद्यापीठांतर्गत असलेले
विविध महाविद्यालये, विद्यालये, संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रांच्या प्रक्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. कै वसंतराव नाईक यांच्या नावे हे विद्यापीठ असुन हरित
महाराष्ट्र करण्यासाठी तेहतीस कोटी वृक्षलागवड अभियानात प्रत्येकांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यापीठ परिसरात वृक्षदिंडी काढण्यात येऊन मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्यात
आली. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ
हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य
डॉ टी एम तांबे, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
वृक्षदिंडी व वृक्षलागवडीत शहरातील प्रतिष्ठीत नागरीक
डॉ रविंद्र मानवतकर, डॉ संध्या मानवतकर, डॉ शिरीष देशपांडे, डॉ जयश्री
देशपांडे, डॉ अनिल दिवान, डॉ सुभदा दीवान, डॉ उज्ज्वला झांबरे, डॉ संजीवनी कात्नेश्वरकर, डॉ चारुशीला जवादे, डॉ रामपुरीकर, डॉ कुलकर्णी आदींनीही सक्रीय सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ टि बी तांबे, डॉ एच व्ही काळपांडे, डॉ विजयकुमार
जाधव, डॉ जयकुमार देशमुख, डॉ पपिता गौरखेडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व
राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, ग्रामीण कृषी कार्यानुभवाचे कृषिदुत व कृषिकन्या
आदींसह परभणी कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Monday, July 1, 2019
वनामकृविच्या लातुर येथील कृषी महाविद्यालयात कृषिदिन साजरा
लातूर: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या लातुर येथील कृषी महाविद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषिदिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ. दिनकर जाधव, उपवन परिक्षेत्र अधिकारी श्री. सचिन माने, डॉ.अरूण कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या परिसरात भव्य वृक्षदिंडी काढण्यात येऊन कडूलिंब, वड, पिंपळ, जांभूळ व गुलमोहर आदीं एक हजार रोपांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. प्रदिप इंगोले यांच्या पुढाकाराने ही चळवळ राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रशांत करंजीकर यांनी केले डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)