Saturday, December 11, 2021

वनामकृवित राष्‍ट्रीय छात्रसैनिक वार्षिक शिबीराची सांगता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या ५२ महाराष्ट्र बटालियननांदेड यांच्या वतीने परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवजी महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता दिनांक ४ ते १० डिसेंबर दरम्यान वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते, सदरिल शिबीराची सांगता दिनांक १० डिसेंबर रोजी झाली, सांगता कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ  सय्यद इस्माईल हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन श्री शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस एन केशेट्टी हे उपस्थित होते. सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ, लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख, सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, अभिमन्यू भगत, शिव सरकटे आदींची उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, छात्रसेनेत एकात्मता, तत्परता, अनुशासन आणि देशभक्ती याचे शिक्षण मिळते. याच शिक्षणाचा उपयोग भविष्‍यात ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याठिकाणी आपल्या वैयक्तिक जीवनात होतो, तर डॉ एस एन केशेट्टी यांनी छात्रसेनेच्या प्रशिक्षणामुळे जीवन जगण्याची नवी दिशा प्राप्त होते असे प्रतिपादन केले. मार्गदर्शनात सुभेदार गोपाल सिंग म्‍हणाले की, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम आणि सामाजिक दायत्वाचे शिक्षण शिबिराच्या माध्यमातून मिळते. छात्रसैनिकांनी मानसिक आणि शारीरिकदृष्टया सक्षम राहिले पाहिजे. 

सांगता कार्यक्रमाच्‍या प्रारंभी शहीद सीडीएस बिपीन रावत व इतर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. शिबीराकरिता कुलगुरू मा डॉ. अशोक ढवणशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेकमांडिंग ऑफिसर श्री वेत्रीवेलप्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील प्रशिक्षण संचलित करण्याकरिता आलेल्या बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार सुनीलकुमार आणि योगेशकुमार यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या छत्रसैनिकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सातपुते याने केले तर आभार संजय येवले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीताने करण्यात आली. सात दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, अभिमन्यू भगत,शिव सरकटे व इतरांनी परिश्रम घेतले. शिबीरात १५० छात्रसैनिक सहभागी झाले होते. शिबिरात छात्र सैनिंकांना ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन, अंबुश (घात), पॅट्रोल यासह आपत्कालीन व्यवस्थापन, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा, परिसर स्वछता या विविध विषयासह, भारतीय सैन्याचा इतिहास या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 





Tuesday, December 7, 2021

वनामकृवि येथे छात्रसैनिकांचा फायरिंग सराव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या ५२ महाराष्ट्र बटालियननांदेड यांच्या वतीने परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्‍या राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता दिनांक ४ ते १० डिसेंबर दरम्यान वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ७ डिसेंबर रोजी विद्यापीठातील खानापुर अ ब्लॉक परिसरामध्ये ०.२२ रायफलद्वारे फायरिंग चा सराव घेण्यात आला, या फायरिंग सरावाकरिता एकूण १३० छात्रसैनिकांनी सहभाग घेतला. सरावा दरम्यान छात्रसैनिंकांना शस्त्र हाताळणे, टार्गेटवर अचूक निशाणा साधने, शस्त्राची साफसफाई इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. सरावा दरम्यान शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कमांडिंग ऑफिसर श्री वेत्रीवेलू, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव भेट देऊन मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षण बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार सुनीलकुमार आणि योगेशकुमार यांनी दिले आहेत. लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ यांनी मान्यवरांचे आभार मानले. सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, शिव सरकटे, चंद्रकांत सातपुते, कॅडेट अभिमन्यू भगत, इस्रायल पठाण आदीसह छात्रसैनिंकांनी परिश्रम घेतले.



वनामकृवित आयोजित शेतकरी प्रशिक्षणास सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व औरंगाबाद येथील कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 डिेसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान नाबार्ड पुरस्कृत तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटन दिनांक 6 डिसेंबर रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे तर कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री नारायण जराड, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे, विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ.जी.डी.गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डी डी पटाईत आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले कि, विद्यापीठाव्दारे विकसीत तुरीचे, सोयाबीनचे विविध वाण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतक-यांमध्‍ये प्रचलित आहेत. शेतक-यांनी शेती विषयक तांत्रिक  अडचणी नुसार विद्यापीठ प्रशिक्षण आयोजित करते. विद्यापीठाचे विविध वाण, तंत्रज्ञान निश्चीतच शेतक-यांचे उत्पन्न वाढी करता महत्वाची भुमिका बजावत आहेत. प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या संपर्कातील इतर शेतक-यांना विषयी माहिती देऊन या तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

प्रमुख पाहूणे श्री.जराड यांनी त्यांच्या संस्थेमार्फत घेण्यात येणारे विविध उपक्रम माहिती दिली. प्रास्ताविक डॉ.जी.डी.गडदे यांनी केले. सुत्रसंचालन श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ.मधुमती कुलकर्णी व केंद्रातील कर्मचा-यांनी सहकार्य केले.

प्रशिक्षणाकरिता  मौजे उज्जेनपुरी (ता.बदनापुर जि.जालना) येथील 25 शेतकरी सहभागी झाले असुन प्रशिक्षणार्थींना मागणी आधारीत रबी पिक व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, ऊस लागवड, कांदा लागवड, मधुमक्षिका पालन, कीड नियंत्रण या विविध विषयावर व्याख्यान व प्रात्याक्षिकाव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Monday, December 6, 2021

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मृदा दिना साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल धमक आदीची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, जमिनीचे क्षारता संशोधन व व्यवस्थापनाव्दारे थांबवीता येते. नवसंशोधकांनी मृदशास्त्रातील नवीनतम विषयातील संशोधन इतर विभागाशी सलग्न राहुन करणे काळाची गरज आहे. कोरडवाहु शेतीत पिक उत्पादकता टिकविण्याचे मोठे आव्हान असुन शेतक­यांनी सेंद्रीय खते, हिरवळीच्या खतांच्या वापर करावा. शेतक-यांनी दरवर्षी मातीचे आरोग्य तपासण्याचा सल्ला त्‍यांनी दिला.

मार्गदर्शनात माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी उत्पादनवाढीसाठी माती परिक्षण गरजेचे असल्याचे सांगितले. भावी पिढीच्या चांगल्या आरोग्यसाठी रासयनिक खतांचा समतोल वापर माती परिक्षणाच्या अहवालानुसार करण्याचा सल्ला दिला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी जमिनीत सुक्ष्म जिवांनुचा उपयोग करुन क्षारता कमी करता येते असे प्रतिपादन केले तसेच त्यावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे व पिक पध्दतीत व्दिदल पिकांचा समावेश करण्याचे सांगीतले

प्रास्‍ताविकात आयोजक डॉ. प्रविण वैद्य यांनी शाश्‍वत शेती करीता जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची हवामान आधारीत विविध पिकांच्या वाणांची निवड करणे, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविणे व आरोग्यदायी जीवनासाठी आरोग्यदायी मृदा असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी डॉ. प्रविण वैद्य व डॉ. रामप्रसाद खंदारे लिखित दिर्घकालीन खत प्रकल्पावरील घडीपत्रिकांचे  तसेच डॉ. अनिल धमक व डॉ. सय्यद इस्माईल लिखित जैविक खतावरील घडीपत्रीकेचे विमोचन करण्यात आले. प्रश्नमंजुषा व भित्तीपत्रक स्पर्धेतील प्रथम तिन विजेत्या विद्यार्थ्‍यांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

आंतरराष्‍ट्रीय मृदा दिनाचे औजित्‍य साधुन मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्‍यांसाठी “जमिनीची क्षारता थांबवा जमिनीची उत्पादकता वाढवा” याविषीयावर प्रश्नमंजुषा आणि भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली. तसेच भारतिय मृद विज्ञान संस्था नवी दिल्ली, शाखा परभणी व स्मार्ट टेक टेक्नॉलॉजी पुणे (महाधन) यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक ४ डिसेंबर रोजी मौजे करडगाव (ता.जि. परभणी) येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. यात जमिनीचे आरोग्य उंचावण्याबाबत डॉ. प्रविण वैद्य, डॉ. निशीकांत इनामदार, डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी मार्गदर्शन केले तसेच “जमिनीचे आरोग्य” या घडीपत्रीकेचे विमोचन व वितरण करण्यात आले. शेतक­यांना माती परिक्षण करीता नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्‍यांमार्फत करुन दाखविण्यात आले, जैविक खतांचे बीज प्रक्रीयाकरण प्रात्यक्षिक डॉ. अनिल धमक यांनी करुन दाखवीले. विभागाच्‍या वतीने सदर गाव पुढील एक वर्षा करीता दत्तक म्हणुन घेण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ अनिल धमक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. भाग्यरेषा गजभीये, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. सय्यद जावेद जानी, डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री भानुदास इंगोले, श्री अभीजीत पंतगे, श्री अजय चरकपल्ली तसेच पदव्युत्तर विद्यार्थी राकेश बगमारे, निखील पाटील, शुभम गीरडेकर, प्रियंका लोखंडे व एम.एस्सी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.



Saturday, December 4, 2021

वनामकृवित आयोजित राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या वार्षिक प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालयाच्‍या १५० छात्रसैनिकांचा सहभाग 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या प्रागंणात राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता दिनांक ४ ते १० डिसेंबर दरम्यान वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ४ डिसेंबर रोजी शिबीरास सुरूवात झाली.

शिबिरात परभणी येथील कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्‍या १५० विद्यार्थां सहभागी झाले आहेत. शिबिरामध्ये छात्र सैनिंकांना ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन, अंबुश (घात), पॅट्रोल यासह आपत्कालीन व्यवस्थापन, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा, परिसर स्वछता आदी विविध विषयासह, भारतीय सैन्याचा इतिहास या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी शिबिरार्थी छात्र सैनिंकाकरिता फायरिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना ०.२२ रायफलद्वारे फायरिंग करण्याची संधी मिळणार आहे. शिबिरातून कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस, भारतीय सैन्य दल, केंद्रीय व राज्य राखीव दल इत्यादी परीक्षेच्या निवडीसाठी सराव होणार आहे. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांकरिता अल्पोपहार व भोजन व्यवस्था बटालियनच्या वतीने करण्यात आलेली असुन इतर सुविधा कृषि महाविद्यालयाच्या वतीने पुरविण्यात आल्या आहेत. सदरिल शिबीर आयोजनाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कमांडिंग ऑफिसर श्री वेत्रीवेलू , परभणी कृषि महाविद्यालायाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार सुनीलकुमार, योगेशकुमार हे प्रशिक्षण संचलित करित असुन शिबिराच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, शिव सरकटे, चंद्रकांत सातपुते आदी परिश्रम घेत आहेत.



सामुदायिक विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयात कृषी शिक्षण दिन साजरा

उद्योजकतेचा ध्यास  आणि सातत्य व्यक्तींना यशस्वी बनवते .... उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक ३ डिसेंबर रोजी आभासी माध्यमाद्वारे कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्‍त विद्यार्थी  उद्योजकतेकडे आकर्षीत होण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे या होत्या तर मार्गदर्शक म्हणून उद्यान पंडित श्री प्रतापराव किसनराव काळे आणि सौ छायाताई साहेबराव शिंदे हे होते.

अध्यक्षीय समारोपात डॉ. जया बंगाळे यांनी कृषी शिक्षण दिनाचे महत्त्व सांगून भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषी हा आर्थिक कणा असल्याने कृषी शिक्षणाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी शेतीकडे एक उत्तम उद्योग म्हणून पाहावे असे नमूद केले.

मार्गदर्शनात श्री प्रतापराव काळे म्‍हणाले की, शेतकरी कुटुंबांनी समृद्ध होण्यासाठी फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे, शेतमाल विक्री व्यवस्थापनामध्ये कुटुंबातील सदस्यांनी कामाची विभागणी करून घ्यावी. जीवनात यशस्‍वीतेकरिता सकारात्मक दृष्टीकोणाबरोबरच कामामध्ये सातत्य ठेवावे.

सौ छायाताई शिंदे यांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणी करत असतानाचे आपलेु अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्यासमवेत त्यांचे पती श्री साहेबराव शिंदे यांनीही मार्गदर्शन केले, त्यांनी उद्योजकता विकास साधण्यासाठी ग्राहकांची गरज ओळखावी आणि सेवा गुणवत्ता उत्तम ठेवणे गरजेचे असल्‍याचे सांगुन  परभणी जिल्ह्यातील उद्योजक छाया शिंदे यांचे पदार्थ राज्याबाहेर केरळ पर्यंत पोहोचत असल्‍याचे सांगितले.

सुत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. तस्नीम नाहीत खान, डॉ. सुनिता काळे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, संशोधक कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.