Saturday, September 17, 2022

वनामकृवित मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी मुख्‍य प्रांगणात माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकरकुलसचिव डॉ धिरजकुमार कदमविद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराजप्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइलप्राचार्य डॉ उदय खोडकेप्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ गजेंद्र लोंढे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या.

Thursday, September 15, 2022

मा श्री दादा लाड यांच्‍या तंत्रज्ञानानुसार लागवड केलेल्‍या कापुस प्रक्षेत्राची पाहणी

वनामकृविचे माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची मौजे सायाळा खटिंग येथील श्री शिवाजी खटींग यांच्‍या कापुस प्रक्षेत्रास भेट

मा श्री दादा लाड यांनी आपले शेतीतील अनुभवाच्‍या आधारे कापुस लागवड पध्‍दतीत स्‍वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या लागवड पध्‍दतीत कपाशीच्या बुडातल्या गळफांद्या काढून टाकुन झाडावर केवळ फळफांद्या ठेवण्‍यात येतात. यामुळे फळफांद्याना भरपूर अन्नद्रव्ये मिळते आणि झाडाचे खोड शेंड्यापर्यंत जाड होते. सोबतच बोंडाचा आकारात वाढ होऊन कापुस उत्‍पादनात भरीव अशी वाढ होते. मा श्री दादा लाड यांच्‍या मार्गदर्शनानुसार या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकरी बांधवा मध्‍ये होत असुन मौजे सायाळा खटींग येथील शेतकरी श्री शिवाजी खटींग यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापसाची लागवड केली आहे. सद्यास्थितीत सदर कापसाची वाढ अत्‍यंत चांगली असुन कापसाचे चांगले उत्‍पादन येण्‍याची शक्यता आहे.

सदर कापसाच्‍या प्रक्षेत्रास दिनांक १५ सप्‍टेबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मा श्री दादा लाड, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, अस्थिरोग तज्ञ डॉ केदार खटींग, श्री शिवाजी खटींग आदीसह गावातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

कापुस प्रक्षेत्राची पाहणी करतांना मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी स्‍वत: एक मोठा शास्‍त्रज्ञ असुन आपल्‍या अनुभवाच्‍या आधारे शेतकरी बांधवानी अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहे. विद्यापीठ कृषि संशोधनात शेतकरी बांधवांचाही सहभाग घेणार आहे. मा. श्री दादा लाड यांचे कापसातील तंत्रज्ञान निश्चितच चांगले असुन या तंत्रज्ञानाचा विद्यापीठ संशोधनात समाविष्‍ठ करण्‍यात येऊन शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न राहणार आहे.

स्‍वत: विकसित केलेले कापुस लागवड तंत्रज्ञानाची माहिती देणांना मा श्री दादा लाड म्‍हणाले की,  कपासातील दोन झाडे आणि दोन ओळीतील आंतर कमी करून झाडांची संख्‍या योग्‍य राखणे आवश्‍यक आहे. झाडाच्या खालच्या गळफांद्या काढल्याने दाटी कमी होते. गळफांद्या काढल्यावर खोड शेंड्यापर्यंत जाड बनते. गळफांद्या काढल्याने बोंडाचा आकार मोठा होण्‍यास मदत होते. एकरी झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, मा श्री दादा लाड यांचे तंत्रज्ञान पध्‍दतीत एकरी झाडांची संख्‍या योग्‍य राखल्‍यामुळे कापुस उत्‍पादनात वाढ होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री भगवानराव खटींग यांनी केले. कार्यक्रमास डॉ आनंद गोरे, डॉ प्रविण कापसे, डॉ अनंत लाड आदीसह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Tuesday, September 13, 2022

वनामकृवित शनिवारी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

राज्‍याचे माननीय कृषिमंत्री मा. ना. श्री. अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते मेळाव्‍याचे उदघाटन

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाचे  औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी दुपारी २.०० वाजता कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात ले असुन मेळाव्‍याचे उदघाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती मा. ना. श्री. अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते होणार आहे.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन माजी कुलगुरू मा डॉ वेदप्रकाश पाटील आणि कृषि उद्योजक तथा महिकोचे विश्‍वस्‍त मा श्री. राजेंद्र बारवाले हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि हे राहणार आहेत. मेळाव्‍यास राज्‍यसभा सदस्‍य मा. खा. श्रीमती फौजिया खान, परभणी लोकसभा सदस्‍य मा खा श्री संजय जाधव, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. सतिश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. बाबाजानी दुर्राणी, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. विप्‍ल बाजोरिया, परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील, पाथरी विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. सुरेश वरपुरकर, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा. आ. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. रत्‍नाकर गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन तांत्रिक चर्चासत्रात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन दींवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. दरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, आणि औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिनकरराव जाधव यांनी केले आहे.