Saturday, December 28, 2024

सद्यस्थितीत पिके आणि पशुधनाच्या काळजीबाबत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन

शेतकऱ्यांनी मिळालेले सल्ले आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कीटक शास्त्र विभागाद्वारा ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा सव्वीसावा भाग कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ डिसेंबर रोजी संपन्न झाला.

यावेळी बोलताना कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, सध्या हवामान बदल झाल्यामुळे पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन शेती सल्ला द्यावा. पिकावर नेमके कोणते लक्षण जाणवतील आणि त्यावर नियंत्रण करावयासाठीचे उपाय सुचवावेत. तूर, हरभरा या पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर अधिकाधिक चर्चा करावी. याबरोबरच पशुधन आणि फळ पिकावर देखील परिणाम होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन करावे असे नमूद करून शेतकऱ्यांना मिळालेले सल्ले त्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले. यामुळे पिकांचे आणि पशुधनाचे संरक्षण होऊन योग्य उत्पादन मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे यांनी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शेतकरी मेळावा खामगाव (ता. गेवराई) येथील कृषी विज्ञान केंद्र केंद्रामध्ये आयोजित केला असल्याचे नमूद करून महिला शेतकऱ्यांनी अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले. याबरोबरच विद्यापीठाद्वारे ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादाचे दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजता नियमितपणे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लाभ घेतला आहे. याकरिताही शेतकऱ्यांनी उत्साही प्रतिसाद देऊन सहभागी होण्याची आवाहन केले.

कार्यक्रमात सद्यस्थितीत हवामान बदलानुसार घ्यावयाची पिकांचीफळपिकांची आणि पशुधनाची काळजी तसेच इतर अनुषंगिक शेतकऱ्यांचे प्रश्नावर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी मार्गदर्शन केले. सद्यस्थिमध्ये उद्भवलेल्या तुर, हरभरा या पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी समस्या विचारल्या त्यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. गजानन गडदे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. अनंत लाड यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

Wednesday, December 25, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात हरभरा पिकातील कीड व्यवस्थापनासाठी ऑनलाईन मार्गदर्शन

 हरभऱ्याच्या परभणी चना – १६ वाणाची प्रशंसा... कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेत हरभरा पिकातील कीड व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाने हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) हा वाण विद्यापीठाच्या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित केलेला असुन हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. हा वाण सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक असून दाणे टपोरे आहेत. १०० दाण्याचे वजन ३८ ग्राम भरते. या वाणावर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी होतो. या वाणाचे विशेष गुणधर्म म्हणजे जमिनीपासून जवळपास ३० सेंटीमीटर उंचीवर घाटे लागतात यामुळे मशीनद्वारे काढणी करण्यासाठी सोपा आणि उपयुक्त आहे. म्हणून या वाणाची प्रशंसा होत आहे. हरभऱ्याचे उत्कृष्ट उत्पादन येण्याच्या दृष्टीने याची लागवड पद्धतीचे मानके (एसओपी) देणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या तुरीचा गोदावरी वाण हा अनेक भागात टोकन पद्धतीने ठिबक सिंचनावर लावण्यात येत आहे. याद्वारे शेतकरी उत्कृष्ट उत्पादन घेत असून मराठवाड्यासह महाराष्ट्रात मोठया प्रमाणात गाजत आहे.  २३ डिसेंबर रोजी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त प्रदर्शनात केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री माननीय ना. श्री. शिवराज सिंह चौहानजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे सांगितले. शेतकरी विद्यापीठाच्या तुरीच्या गोदावरी वाणाद्वारे ऊसाला पर्यायी पीक म्हणून पाहत आहेत. याप्रमाणेच हरभऱ्याचा परभणी चना – १६ देखील लागवडीच्या मानकांचा अवलंबून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्कृष्ट उत्पादन देईल. या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी सहज मिळावे म्हणून विद्यापीठाने बियाणाची एक किलोची बॅग करून २५० शेतकरी आणि २५० शेतकरी बीजोत्पादक गटांना बीजोत्पादनासाठी पुरविलेले आहे. याद्वारे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या उत्कृष्ट वाणाचे बियाणे उपलब्ध होईल. तसेच हरभरा पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक घटकांचा वापर कमी करून अधिकाधिक जैविक आणि यांत्रिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, संवादामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक भर देऊन शेतकरीभिमुख कार्यक्रम ठेवावा. शेतकरी प्रथम केंद्रित धरून “शेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करावे, असेही यावेळी शास्त्रज्ञांना मा. कुलगुरू यांनी सुचित केले. 

तांत्रिक सत्रात सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी हरभरा पिकातील प्रमुख किडी, त्यांची ओळख व प्रकार त्यांचे जीवनक्रम, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार नुकसान करण्याच्या पद्धती, किडीची आर्थिक नुकसान पातळी आणि नियंत्रण, किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, जैविक उपाय योजना याविषयी माहिती दिली. डॉ. भेदे यांनी सांगितले की, घाटे अळी ही हरभरा पिकावरील सर्वात महत्त्वाची कीड आहे. या किडीच्या सर्वेक्षणासाठी २ कामगंध सापळे लावावेत. पिकावरील मोठया आळया वेचून त्यांचा नाश करावा. पिकापेक्षा १ ते १.५ फुट अधिक उंचीचे इंग्रजी ‘टी’ अक्षराच्या आकाराचे २० पक्षी थांबे प्रति एकरी शेतात लावावेत. पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची / अझाडीराक्टीन ३०० पीपीएम १००० मिली प्रति एकरी फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. २०० मि.ली. प्रति एकरी वापरावे, त्यामध्ये २०० मि.ली. चिकट द्रव (स्टिकर) आणि राणीपाल (नीळ) ८० ग्रॅम  टाकावा. गरज पडल्यास इमामेक्टीन बेंझोएट ५% एसजी ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५% एससी ५० मि.ली. २०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
 कार्यक्रमात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गजानन गडदे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांनी केले.सूत्रसंचालन आणि आभार डॉ. श्रद्धा धूरगुडे यांनी मानले.








Tuesday, December 24, 2024

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त “शेतकरी देवो भव:” या भावनेतून शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान

 अन्नदाता हाच जीवनदाता .... कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि

२३ डिसेंबर, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers' Day) म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक धोरणे राबवली आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. या दिवशी अन्न सुरक्षा व ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांच्या कष्टांचे कौतुक केले जाते. या निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी देवो भव:” हा शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम दिनांक २३ डिसेंबर रोजी आयोजित केला. अध्यक्ष व प्रमुख वक्ते कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि हे होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, भारताचे माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी विद्यापीठाने अवलंबलेले ब्रीद “शेतकरी देवो भव:” नुसार शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचाप्रती आदर व्यक्त करत आहोत. विद्यापीठ शेतकऱ्यांचे कल्याणासाठी सतत कार्यरत आहे. शेतीमध्ये नेमके काय करायला पाहिजे हे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी त्यावेळीच विचार केला होता. त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी कार्य केले. ते खूप तत्त्वज्ञानी होते. त्यांना भारतरत्न दिला त्यावेळीच शेतकऱ्यांचा खरा सन्मान झाला. त्यांचे व्यक्तिमत्व अतिउच्च होते, यामुळे त्यांचा संपूर्ण देशात आदर्श घेतला जातो. ते म्हणत असत की, शेतकरी असणे हेच गर्व असायला पाहिजे. असे गौरवद्गार माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याप्रती कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा  अन्नदाता आहे, म्हणून तोच खरा जीवनदाता आहे. विद्यापीठ “शेतकरी देवो भव:” या भावनेने कार्य करत आहे. विद्यापीठाचे अस्तित्वच शेतकऱ्यांच्या हितावर अवलंबून आहे. विद्यापीठाच्या प्रत्येक कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण समजून त्यांचा सहभाग वाढवते आणि सन्मान करते. केंद्र सरकारने देखील कृषी मंत्रालयाचे नाव बदलून केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असे ठेवले आहे, यातूनच शेतकऱ्यांचे कल्याण महत्त्वपूर्ण मानले जात आहे असे नमूद केले. कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि यांना चौधरी चरण सिंह यांच्या गावात कार्य करण्याचे भाग्य लाभले. त्यांना शेतकऱ्यांचा मुलगा असल्याचा गर्व आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना असावा अशी इच्छा व्यक्त केली. सर्वांनी कार्य करत असताना आपण कर्तव्यनिष्ठ, स्वच्छ विचारांनी, धैर्यानी, मेहनतीने, चिकाटीने आणि हिमतीने कार्य करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विद्यापीठाद्वारे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले असल्याचे सांगितले. या वाणाची लागवड  मराठवाड्यासह महाराष्ट्रात केली जाते. विद्यापीठाच्या तुरीचा गोदावरी हा वाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास १५,५०० हेक्टर वर लागवड केली आहे. या वाणाद्वारे शेतकऱ्यांना साधारणपणे एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठात प्राप्त होत आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक, उप संचालक यांनी देखील गोदावरी वाणाचा उल्लेख पुसा येथून विकसित राष्ट्रीय पातळीवर  बासमतीच्या ११२१ हा जसा देश पातळीवर गाजला होता त्याची जागा घेण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

सोयाबीनच्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकीमध्ये परभणी कृषि विद्यापीठाने सोयाबीनचे वाण विकसित करून त्याचे पुरेसे बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल सोयाबीनच्या बियाणाचा प्रश्न सुटल्यामुळे समाधान व्यक्त केले होते. याबरोबरच बायोमिक्स सारखे उत्पादन देखील शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रात क्रांती करत आहे.

बीजोत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने विद्यापीठाची मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील अनेक वर्षापासून पडीत असलेल्या जमिनीपैकी ८०० हेक्टर जमीन लागवडीखाली आणलेली आहे. नुकतीच जमीन लागवडीखाली आली असल्याकारणाने या जमिनीची उत्पादन क्षमता पहिल्या वर्षी कमी राहिली. याशिवाय बीजोत्पादनामध्ये गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने भेसळयुक्त आणि रोगग्रस्त झाडांची काढणे करावी लागते. यामुळे सर्वसाधारणपणे येणाऱ्या उत्पादना एवढे बीजोत्पादनाचे उत्पादन होत नसते. परंतु या बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना गुणवत्ता युक्त बियाणे उपलब्ध करून विद्यापीठ शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे. दोन वर्षापूर्वी विद्यापीठ शेतकऱ्यांची बियाणाची मागणी पूर्ण करू शकत नव्हते, परंतु मागील वर्षी महाबीजला पुरवठा करून जवळपास १५०० क्विंटल बियाणे शिल्लक राहिले ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले.  विद्यापीठ यावर्षी १०० हेक्टर क्षेत्रावर फळबागेची नवीन लागवड करून, विविध फळांवर संशोधन करणार आहे. यातून निर्यातक्षम लागवड करणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शक्य होईल. विद्यापीठाने मुख्यमंत्री फंडातून संशोधन केंद्र सुरू केले आहेत.  हे विद्यापीठ ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ आहे. शिवाय या विद्यापीठातून ड्रोनचे कस्टम हायरिंग सेंटर देखील चालवले जाते. याचा मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या बरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी लाभ मिळून भवितव्य नक्कीच उत्कृष्ट होईल. विद्यापीठ सध्या कमी मनुष्यबळावर कार्य करत आहे. याच मनुष्यबळात यावर्षीपासून चार नवीन महाविद्यालयाची पूर्ण क्षमतेने यशस्वी सुरुवात केलेली आहे. या महाविद्यालयातून स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना  त्यांच्या जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेवून कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जेचे विस्तार कार्यक्रम राबवत आहे. यातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या वतीने ही नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला.

२३ डिसेंबर, हा दिवस शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस असून प्रत्येक शेतकरी हा एक रत्न समजून विद्यापीठ कार्य करत आहे. विद्यापीठाच्या कार्यात शेतकऱ्यांचा सहभाग आणि सहयोग महत्त्वाचा आहे. विद्यापीठाची कार्य करण्याची खरी ताकद शेतकरी यांचा सहभाग हाच आहे. असे त्यांनी शेवटी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक विस्तार शिक्षण संचालक डॉ जी. एम. वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात मराठवाड्यातील सुरज जयपाल जाधव, जनार्दन आवरगंड, रत्नाकर पाटील ढगे यांच्यासह अटलांटा अमेरिकेतून संगीता तोडमल यांनी शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त केला आणि विद्यापीठ तंत्रज्ञान आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवते म्हणून आम्ही घडत आहोत असे गौरवोद्गार काढले. शेतीमधील समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रमुख भूमिका बजावते यातून आमच्यासारखे अनेक शेतकरी यशस्वी होत असून राज्य पातळीवरील पुरस्कार मिळवू शकलो आहेत अश्या भवना व्यक्त केल्या. 

कार्यक्रमाचे आयोजनासाठी  डॉ आनंद गोरे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ मीनाक्षी पाटील यांनी तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. 

Friday, December 20, 2024

हरभ-यावरील घाटेअळीचे व्यवस्थापनाबाबत वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा संदेश


वातावरणातील बदलामुळे सध्याच्या परिस्थितीत हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे व श्री.एम.बी.मांडगे यांनी केले आहे.

घाटेअळी करीता शेतामध्ये इंग्रजी " T " आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. तसेच हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना  ५% निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५ % - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा फ्लुबेंडामाईड २० % - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.

वनामकृवि संदेश क्रमांक: ०९/२०२४  ( १८ डिसेंबर २०२४)


Thursday, December 19, 2024

विद्यापीठाची संपूर्ण जमीन लागवडीखाली आणण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटीबद्ध : कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

 विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रांतर्गत ८०० हेक्टरवर बीजोत्पादन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित विविध पिकांच्या वाणाच्या दर्जेदार बियाणास शेतकरी बांधवामध्ये मोठी मागणी आहेयात सोयाबीनतुरज्वारी आदीच्या वाणास शेतकरी बांधवाची विशेष पसंती लक्षात घेता बीजोत्पादन वाढ करणे महत्वाचे होते. विद्यापीठातील मध्यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब् आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्यान बीजोत्पादन घेतले जात होतेपरंतु गेल्या काही वर्षापासुन निधी मनुष्यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. गेल्या दोन वर्षात विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्पादन वाढ करण्याच्या उद्देश्याने मध्यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्याचा मानस माननीय कुलगुरू यांनी व्यक् केला. पडित जमीन लागवडीखाली आणण्यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुन जमिनीची नागंरणीमोगडणीचा-या काढणे इत्यादी मशागतीचे कामे  एप्रिल मे २०२३ मध्ये करण्यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल् योजनातील उपलब्ध ट्रॅक्टर्सआवश्यक औजारेजेसीबी यांचा वापर करण्यात आला. मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील जवळपास ८०० हेक्टर जमिन क्षेत्रावर अपुरे मनुष्यबळ, निधी, वन्य प्राण्याचा उपद्रव, नैसर्गिक आपत्तींचा सामना करून आणि उपलब्ध साधनसमुग्रीमध्ये  पैदासकार बीजोत्पादन हाती घेण्यात आले आहे. याशिवाय विद्यापीठ परिसर मराठवाडयातील विद्यापीठाच्या उपकॅम्पस येथील १२० हेक्टर एकर जमिन वहितीखाली आली. विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्ती करण्यात आली आहेया माध्यमातुन कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता शक् होत आहे. यामुळे बीजोत्पादनाकरिता काही प्रक्षेत्रावर संरक्षित सिंचन देणे शक्य होत आहे. २०२४ – २५ मध्ये बीजोत्पादनाखालील क्षेत्र ८०० हेक्टर वरून १३०० हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले. २०२३-२४ च्या खरीप रबी हंगामामध्ये विद्यापीठाचे बीजोत्पादन साधारणत: ७००० क्विंटल वरून ९१५४.८४ क्विंटल झाले. म्हणजेच साधारणतः ३० टक्के बीजोत्पादन वाढ झाले. विद्यापीठाने सुरवातीस जमीन लागवडीखाली आणण्यावर भर दिला आणि पुढील टप्प्यात हेक्टरी उत्पादकता वाढीवर भर देण्यात येत आहे. यामध्ये पायाभूत सुविधा विकास, शेततळे निर्मिती करून सिंचन क्षेत्रात वाढ, ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर, यांत्रिकीकरनावर भरदेण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच २०० हेक्टर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. या बाबींचा विचार करून कुलगुरू मा डॉ इन्द्र  मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने २०२४ मध्येही बीजोत्पादन २०,००० क्विंटल करण्याचे लक्ष ठेवले आहे, यामध्ये सोयाबीनचे साधारणत: ८५०० क्विंटल बियाणे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यापीठाच्या ५१ संशोधन आणि बीजोत्पादन केंद्राच्या विविध प्रक्षेत्रावर तसेच वेगवेगळ्या जमिनीमध्ये आणि हवामानामध्ये तयार झाले.  यापैकी मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या ३५० हेक्टरद्वारे ३५०० क्विंटल सोयाबीनचे बीजोत्पादन मिळाले आहे. विद्यापीठ गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या उद्दिष्टानुसार सोयाबीनचे पैदासकार बीजोत्पादन उतार हा हेक्टरी १० क्विंटल असा असून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील बीजोत्पादनाने तो पूर्ण केला आहे. तसेच काही केंद्रांनी हेक्टरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेतले आहे. २०२४-२५ च्या  खरीप, रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये निर्धारित २०,००० क्विंटलचे लक्ष गाठण्यास विद्यापीठास नक्कीच यश मिळेल असा विश्वास कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी व्यक्त केला आहे. यामुळे या वाणांचे जास्तीत जास् बियाणे शेतकरी बांधवाना उपलब् होणार आहे.

विद्यापीठाचा बीजोत्पादन कार्यक्रम मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात घेण्यात येतो तथापि मराठवाड्यातील हवामानात आंतरजिल्हा आणि आंतरजिल्ह्यातील विविधतेचा अनुभव येतो. वार्षिक ५०० ते ८३५ मिमी पाऊस पडतो आणि खात्रीशीर पर्जन्य क्षेत्र (६०%), मध्यम जास्त पर्जन्यमान झोन (२०%) आणि टंचाई क्षेत्र (२०%) अंतर्गत येतो. कृषी उत्पादन प्रामुख्याने मान्सूनच्या पावसाच्या अनियमित स्वरूपामुळे मर्यादित आहे. या सोबतच सद्य स्थितीमध्ये हवामान बदलामुले पर्ज्यन्यमानाची अनियमितता निर्माण झाली आहे२०२४ मध्ये विद्यापीठाचे मध्यवर्ती प्रक्षेत्र येथील बलसा, सायाळा, तरोडा शेंद्रा ‘क’ अश्या एकूण ०४ विभागावर पैदासकार सोयाबीन या पिकाच्या एमएयुएस ७१, एमएयुएस ६१२, एमएयुएस ७२५ एमएयुएस ७३१ या वाणांचा एकूण ४२५ हे. क्षेत्रावर  राबविण्यात आला होता. खरिप  हंगामात माहे जुले ऑगस्ट महिन्यात पिक फुलोऱ्यात असताना पाऊसाचा खंड (दि. २९.०७.२०२४ ते १८.०८.२०२४) या २० दिवसाचा असल्यामुळे त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर दिसून आला. माहे सप्टेबर महिन्यात सोयबीन पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना एकूण १५ दिवसाचा खंड (दिनांक ०६.०९.२०२४ ते २१.०९.२०२४) असल्यामुळे सोयबीनच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी घट झाल्याचे आढळून आले आहे. सप्टेबरच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी (१९६. मिमि) झाल्यामुळे सोयबीन पिकाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येतो. सदरील अतिवृष्टी मुळे प्रक्षेत्रावर राबविण्यात आलेले सोयबीनचे क्षेत्र एकूण ५० ते ६० हेक्टर क्षेत्रावरिल पिक पूर्णपणे नष्ट झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. यामुळे केवळ ३५० हेक्टरद्वारेच बीजोत्पादन मिळू शकले.

विद्यापीठाचे मागील दोन वर्षातील वाण विकासातील योगदान  

विद्यापीठ विकसित वाण तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्यापुरते उपयुक् नसुन देशातील अनेक राज्यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक् ठरले आहे. महाराष्ट्रातील तूर आणि सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा अर्ध्याहून अधिक वाटा आहे. २०२३ मध्ये केंद्रीय बियाणे अधिनियम१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार विद्यापीठ विकसित करडई पिकांच्या पीबीएनएस १८४, पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) आणि देशी कापसाच्या पीए ८३७खरीप ज्वारीच्या परभणी शक्तीतुरीचा वाण बीडीएन-२०१३- (रेणुका) आणि  सोयाबीनचे एमएयुएस-७२५ या वाणांचा समावेश केला आहे. याबरोबरच विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बीडिएनपीएच १८ - या संकरित वाणास लागवडीकरिता मान्यता प्राप् झाली असून या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह भारताच्या मध्य विभागासाठी करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे.

कापुस पिकातील बीटी सरळ वाणास केंद्रीय वाण निवड समितीची मान्यता मिळाली. यामध्ये तीन अमेरिकन बीटी सरळ वाण देशी कपाशीच्या एका सरळ वाणाचा समावेश आहे. विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात मध्य प्रदेशविभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे. परभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्पादनात सातत् देणारे वाण आहेत.

२०२४ मध्ये करडईचे नवीन पीबीएनएस २२१ आणि पीबीएनएस २२२ वाण, टोमॅटो वाण पीबीएनटी-२०, मिरची वाण पीबीएनसी-१७ आणि विद्यापीठाच्या सांभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्र, विकसित केलेले चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. यामुळे या वाणांचा प्रचार प्रसार मोठया प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. तसेच २०२४ मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित संयुक् कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सहा वाण तीन कृषी औजारे सह ३६ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता प्राप् झाली आहे. तसेच २०२४ मध्ये अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात आयोजित संयुक् कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -) आणि केळीचा वनामकृवि - एम या नवीन वाणाची आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित तसेच पोषण आहारपशुविज्ञान आणि कृषि संलग्न इतर शाखेतील तंत्रज्ञानाच्या ४८ शिफारशींना मान्यता प्राप् झाली आहे.

विद्यापीठाने मध्यवर्ती प्रक्षेत्रावर बिजोत्पादनासह हरित विद्यापीठ - वृक्ष लागवडीची  विशेष मोहिम हाती घेतली आहे. विद्यापीठ परिसरात एक लक्ष वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पासुन वन विभागाच्या माध्यमातुन विद्यापीठातील रेल्वे लाईनच्या लगत . किलोमीटर फळपिके वनपिकांची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी १०० हेक्टरवर नवीन फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले असुन, यात आंबा, आवळा, बेल, आव्होकोडा तसेच इतर महत्वाच्या फळपिकांच्या विविध ५० हून अधिक जातीची लागवड करण्यात येणार आहे. या फळबागेतून विविध प्रकारचे संशोधन करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्यापारी लागवड साध्य करून निर्यातक्षम फळ उत्पादने घेण्यात येणार आहेत.

कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी प्रक्षेत्र विकासासाठी व्यक्तीश: लक्ष घातले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांनी प्रक्षेत्र विकासास कटीबद्ध राहून  आवश्यक यंत्रसामुगी उपलब् करून  दिल्याने एवढे मोठे प्रक्षेत्र लागवडीखाली आणता येऊ शकलेअशी माहिती प्रक्षेत्र विकासातील महत्वपूर्ण योगदान देणारे मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे यांनी दिली. सदर बीजोत्पादनाकरिता विद्यापीठातील ड्रायव्हर ते डायरेक्टर यांचे मोठया प्रमाणात योगदान लाभत आहे.