कृषि क्षेत्रातील विद्यार्थी
शेती विकासात कार्य करण्यासाठी सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सक्षम होण्यासाठी
व जागतिकीकरणाला तोंड देण्यास सज्ज व्हावा यासाठी देशातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामांकीत
कृषितज्ञांचे विद्यापीठीतील विद्यार्थ्याना कृषिक्षेत्रातील प्राधान्यक्रम विषयावर
तांत्रीक माहीती व व्यक्तीमत्व विकास यावर मार्गदर्शनासाठी व्याख्यानाचे मराठवाडा
कृषि विद्यापीठात दि 28 मार्च रोजी दुपारी 2.00 वाजता कृषि महाविद्यालयाच्या
सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व
तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्मु) चे माजी कुलगूरू मा डॉ अन्वर आलम, स्वामी विवेकानंद
तंत्रज्ञान विद्यापीठ (भिलाई) चे माजी कुलगूरू डॉ बी सी मल, भारतीय कृषि अनूसंधान
परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील एस्कॉर्ड लिमीटेडचे सल्लागार
मा डॉ एस के टंडन, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी
कुलगूरू डॉ शंकरराव मगर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ
व्ही एम मायंदे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर
पी सिंग, महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण विभागाचे अव्वर सचिव अभियंता मा व्हि बी
नाथ हे मार्गदर्शक म्हणुन लाभणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा
कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे राहणार असुन संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे व विस्तार शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण प्रमुख उपस्थित राहणार आहे. तसेच दि 29 मार्च रोजी कृषि यांत्रिकीकरण,
कृषि
अभियांत्रिकीकरणाची शेती विकासातील महत्व, कृषि प्रक्रिया उद्योग, मृद व जल
संधारण, पाण्याचा काटकसरीने वापरासाठी आधुनिक सिंचन पध्दती, अपारंपारिक उर्जेचा
वापर, कृषि क्षेत्रात संगणकाचा वापर या कृषितील प्राधान्यक्रम
विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमामुळे कृषीच्या विद्यार्थीच्या विचारला एक विशिष्ट अशी दिशा प्राप्त व्हावी व त्यांच्यातील व्यक्तीमत्व विकासास चालना मिळावी या उद्देशाने हा अभिनव असा आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामांकीत कृषितज्ञांच्या याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, शास्त्रज्ञा, प्राध्यापक व कर्मचारी वर्गानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.