Saturday, May 18, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठाचा खरीप शेतकरी मेळावा उत्‍साहात साजरा

कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्यवर 
कृषी मेळाव्याचे  उदघाटन करतांना मान्यवर 



उपस्थित शेतकरी वर्ग 
मार्गदर्शन करतांना महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल, पुनवर्सन व मदतकार्य, सहकार पणन व वस्‍त्रउद्योग राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके 
मार्गदर्शन करतांना सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास, राजशिष्‍टाचार व अल्‍पसंख्‍यांक विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान 

मार्गदर्शन करतांना वैद्यकीय शिक्षण, उच्‍च व तंत्रशिक्षण, विशेष सहाय व अपारंपारीक उर्जा राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत 

मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे अध्यक्षयी भाषण करतांना 
प्रगतशील शेतकरी श्री भगवानराव ठोंबरे यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला त्याप्रसंगी 







प्रगतशील शेतकरी श्री अजित मगर यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला त्याप्रसंगी 

प्रगतशील शेतकरी महिला लक्ष्मीबाई मुटकुळे यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला त्याप्रसंगी 

विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी तयार केलेले तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकाशनाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करतांना 

 इफकोचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्री. अरविंद ठाकरे
         दुष्‍काळाचा फटका सर्वात जास्‍त शेतकरी व शेतमजुरांना बसला आहे. एक वर्ष दुष्‍काळामुळे शेतकरी पाच वर्ष सावरत नाही, हवामान बदलामुळे पावसात अनियमितता आली आहे. त्‍यामुळे पावसाचे पडणारे पाणी कसे मुरवता येईल व त्‍याचा कार्यक्षम कसा वापर करता येईल याकडे शेतक-यांनी लक्ष दिले पाहिजे. जो शेतकरी जलसाक्षर नाही तो शेतीत निरक्षरच आहे. शेतक-यांनी जलसंधारणाची कामे वेळेवर करावी असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल, पुनवर्सन व मदतकार्य, सहकार पणन व वस्‍त्रउद्योग राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके यांनी उदघाटनपर भाषण केले. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४१  व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय, इफको आणि महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्द्याटन प्रसंगी ते बोलत होते. सदरील कार्यक्रमास सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास, राजशिष्‍टाचार व अल्‍पसंख्‍यांक विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान आणि वैद्यकीय शिक्षण, उच्‍च व तंत्रशिक्षण, विशेष सहाय व अपारंपारीक उर्जा राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत हे प्रमुख अतिथी होते तर विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे अध्‍यक्षस्‍थानी होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील केंद्रिय कृषि अभियांत्रीकी संस्‍थेचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी, प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. एल. पी. गिते, पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. जी. लांडे तसेच व्‍यासपीठावर जिल्‍हाधिकारी डॉ् शालीग्राम वानखेडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कुल‍सचिव श्री का. वी. पागिरे, इफकोचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्री. अरविंद ठाकरे व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विठ्ठल कुडमुलवार हे उपस्थित होते.
       मा. ना. श्री प्रकाशदादा सोळंके पुढे म्‍हणाले की, मराठवाड्यातील लोकांनी लढा उभारुन आंदोलन केले व विद्यापीठाची निर्मिती झाली. त्‍यामुळे मराठवाडा कृषि विद्यापीठाचा विकास मराठवाड्यांच्‍या लोकांच्‍या भावनेशी निगडीत आहे. कृषि विद्यापीठाची वाटचाल मराठवाड्याच्‍या विकासात भर टाकणारीच आहे. गेल्‍या दहा वर्षापासून केंद्र शासनाच्‍या निर्णयामुळे शेतक-यांच्‍या जीवनात क्रांती निर्माण होत आहे. शेतक-यांना पिक कर्ज स्‍वस्‍त दरामध्‍ये मिळण्‍यासाठी व शेतीमालाचा हमी भाव वाढविण्‍यासाठी केंद्र शासन प्रयत्‍नशील आहे. शाश्‍वत शेतीसाठी व शेतक-यांच्‍या विकासासाठी कृषि विद्यापीठ हे दिपस्‍तंभ आहे असे प्रतिपादन मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके यांनी केले.
       राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, कृषि विद्यापीठ हे शेतक-यांची श्‍वासनलिका आहे. विद्यापीठ संशोधन करुन नविन तंत्रज्ञान करीत आहे व त्‍याचा विस्‍तारही चांगल्‍या प्रकारे होत आहे. याविद्यापीठातील विद्यार्थी राष्‍ट्रीय पातळीवर चांगले काम करीत आहेत. परंतु जागतीकीय स्‍तरावरील संशोधन विद्यापीठात झाले पाहिजे. परभणी जिल्‍ह्याचे मानव विकास निर्देशांक अत्‍यंत कमी आहे आणि ते वाढवायाचे असेल तर शेतक-यांचे जीवनमानाची पातळी वाढविणे आवश्‍यक आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाप्रती शेतक-यांचे आकर्षण वाढत आहे हे निश्‍चीतच अभिमानास्‍पद गोष्‍ट आहे. शेतक-यांनी दिर्घकालीन उपायावर भर द्यावा, शेतीसोबतच जोडधंद्याची साथ दिल्‍याशिवाय शेतीमध्‍ये प्रगती शक्‍य नाही. विद्यापीठाचा पिंगळगडनाला विकास प्रकल्‍पामुळे परभणी जिल्‍ह्याच्‍या आजुबाजूच्‍या गावांना दिर्घकालीन फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी शासनदरबारी सर्वांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मेळाव्‍यामध्‍ये असलेले भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रीकी संस्‍थेचे दालणातील यंत्रे व वस्‍तु महिला शेतक-यांसाठी निश्‍चीतच उपयोगी आहेत. यावेळी मा. ना. प्रा. फौजिया खान यांनी गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या ३८  व्‍या वर्धापन दिनानिमीत्‍त गृह विज्ञान महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थीनीसाठी सुवर्णपदक दरवर्षी देण्‍यासाठी एक लाख रुपयाची देणगी महाविद्यालयाच्‍या वतीने देण्‍याची घोषणा केली.
       राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाचा परिसर पाहुन गेल्‍या काही वर्षापासून विद्यापीठाची चांगली प्रगती होत आहे असे अधोरोखीत होत आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे तो मोडता कामा नये यासाठी विद्यापीठाने आधार द्यावा. आज विद्यापीठाच्‍या बियाणासाठी शेतकरी रांगाच्‍या रांगा लावून बियाणे खरेदी करतांना पाहुण विद्यापीठावरील शेतक-यांचा किती विश्‍वास आहे हे लक्षात येते. विद्यापीठ माती परिक्षणापासून ते पिक प्रक्रियेपर्यंत तंत्रज्ञान विकसीत करुन शेतक-यांना देते ही एक चांगली गोष्‍ट आहे. कृषि पदवीधर हा फक्‍त नौकरीक्षमच झाला नाही पाहिजे तर त्‍यांचे शिक्षण शेतकरी उभा करण्‍यासाठी कामाला यायला पाहिजे. पिंगळगडनाला हा नाला नसून नदी आहे, याचा फायदा या परीसरातील पाणी पातळी वाढीसाठी होणार आहे. या प्रकल्‍पासाठी सर्वांनी पाठींबा देणे आवश्‍यक आहे. आजच्‍या दुष्‍काळाच्‍या परिस्थितीत पाटाने पाणी देणे विसरले पाहिजे. ठिबक सिंचनाचा वापर न करणा-या शेतक-यांवर येणा-या काळात गुन्‍हे दाखल करण्‍याची वेळ येऊ शकते. शेतक-यांनी एकाच कंपनीच्‍या एकाच जातीच्‍या बियाणाचा आग्रह करु नये असाही सल्‍ला त्‍यांनी दिला.
        विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाले की, मराठवाड्यात ८६ टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. गेल्‍या सहा वर्षापेंकी पाच वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मराठवाड्यातील १० टक्‍के भागात पाऊस कमी पडतो तर ८० टक्‍के भागात खात्रीशीर पाऊस पडतो. या खात्रीशीर पावसाच्‍या भागात २ ते ३ पावसाचे खंड येतात त्‍यामुळे पिक उत्‍पादनात ३०-४० टक्‍के घट येते यावर उपाय म्‍हणुन विहीरी, शेततळ्यामध्‍ये साठून ठेवलेल्‍या संरक्षीत पाण्‍याच्‍या १-२  पाळ्या देणे आवश्‍यक आहे. डॉ. कुलगुरू पुढे म्‍हणाले की, दुष्‍काळ परिस्‍थीतीवर मात करण्‍यासाठी वरचेवर उपाय न करता दीर्घकालीन उपाय करावे लागणार आहेत. यामध्‍ये पाणलोट क्षेत्र विकास, पाण्‍याचा कार्यक्षम वापर, विविध सिंचन पध्‍दतीचा अवलंब करावा लागणार आहे. पावसाच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहाबरोबर हेक्‍टरी १६  टन माती वाहुन जाते, माती सोबत अन्‍नद्रव्‍य वाहुन जातात. मातीचा एक इंच सुपीक थर तयार होण्‍यास पाचशे वर्षाचा कालावधी लागतो त्‍यामुळे हे अमूल्‍य असे नैसर्गीक स्‍त्रोत जपण्‍यासाठी मृद व जलसंधारणाचे उपाय न केल्‍यास सुपीक जमिनीचे वाळवंटात रुपांतर होण्‍यास वेळ लागणार नाही. विद्यापीठाने आजवर विविध पिकांचे १२५ पेक्षा वाण व २० हून अधिक शेती औजारे विकसीत केली आहेत तसेच ७२५ पेक्षा अधिक तंत्रज्ञानाच्‍या शिफारसी शेतक-यांना सुचविल्‍या आहेत. दुष्‍काळ परिस्थितीत तग धरू शकणारा तुरीचा बिडीएन-७११ हा वाण तर यांत्रीकी पध्‍दतीने काढणी करण्‍यासाठी सोयीस्‍कर असलेला सोयाबीनचा एमएयुएस-१६२ वाण विकसीत केला आहे. विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा नाविण्‍यपूर्ण विस्‍तार उपक्रम मराठवाड्यात आठही जिल्‍ह्यात राबवून शेतक-यांसोबतचे नाते अधिक दृढ केले आहे.
       या मेळाव्‍यात चर्चासत्र, प्रदर्शन, प्रात्‍यक्षीके, विद्यापीठाची बियाणे विक्री इत्‍यादी उपक्रमांचा समावेश होता. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात राष्ट्रिय पातळीवरील तज्ञ भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील केंद्रिय कृषि अभियांत्रीकी संस्‍थे अंतर्गत असलेल्‍या सोयाबीन प्रक्रिया व वापर केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी यांनी सोयाबीनचा आहारात वाढ होण्‍यासाठी त्‍यावर प्रक्रिया करून मुल्‍यवर्धीत पदार्थाबाबत माहीती दिली. तसेच इरगोनॉमीक्‍स अॅन्‍ड सेफटी इन अॅग्रीकलचर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. एल. पी. गिते यांनी श्रमबचतीसाठी कृषि औचारांचा वापर यावर तसेच पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. जी. लांडे यांनी जमिनीचे आरोग्‍य याविषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले. चर्चासत्रामध्‍ये विद्यापीठाच्‍या शास्‍त्रनांनी कापुस, सोयाबीन व इतर खरीप पीक लागवड तंत्रज्ञानाची माहीती दिली तसेच शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान केले.
        कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. माधुरी कुलकर्णी व प्रा. ए. पी. गुट्टे तसेच आभारप्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले. या प्रसंगी पुरस्‍कार प्राप्‍त १३ प्रगतशील शेतकरी यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. तसेच विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी तयार केलेले तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात आले.
     कृषिविद्या पदव्‍युतर प्रयोगशाळा, द्रवरुप जीवाणू खते निर्माण प्रकल्‍प, निम्‍नस्‍तर शिक्षण सभागृह याचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. विद्यापीठाचे बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 
       सदरील मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते, यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्‍थेचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे शेतक-यांसाठी आकर्षणाचा भाग होता. या प्रसंगी विद्यापीठाचे विविध पिकांचे बियाणे विक्री उद्घाघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या मेळाव्‍यास मराठवाडयातील व राज्‍यातील शेतकरी व कृषि उद्योजकांनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळावा यशस्‍वीतेसाठी विद्यापीठ अशिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी इत्‍यादीनी परिश्रम घेतले. 
 विद्यापीठाचे विविध पिकांचे बियाणे विक्रीचे उद्घाघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करतांना  

Grand Celebration of MKV Foundation Day

Marawada Krishi Vidyapeeth, Parbhani grandly celebrated its 41st foundation day on 18th May 2013. On this occasion, the mega exhibition was organized by the Directorate of Extension Education in collaboration with FICCO and State Department of Agriculture. State Minister of Revenue, Rehabilitation and Guardian Ministry of Parbhani district Hon. Prakashdada Solunke has inaugurated the function. State Minister of Cultural Activities, General Administration, Women and Child Development Hon. Fauzia Khan and State Minister of Medical Education and Non-Conventional Energy Hon. D.P.Sawant were the special guests. Dr. K.P.Gore, Vice-chancellor, MKV was the president of the function. District Magistrate Dr. Shaligram Wankhede, Dr. S.D.Kulkarni, Director of CIAE, Bhopal and Dr. L.P.Geete, Project Coordinator, CIAE, Bhopal, Director of Extension Education Dr. A.S.Dhawan, Director of Instruction Dr. V.S.Shinde, Director of Research Dr. G.B.Khandagale, Registrar Mr. K.V.Pagire, IFFCO Regional Manager Mr. Arvind Thakare, District Superintendent Agricultural Officer Dr. V. Kudmulwar and other dignitaries were attended the function. 
In the inaugural speech Hon Prakash Solunke praised the progress made by the MKV and its valuable contribution in particular to the farmers of this region. He advised to farmers that recommended measures to be taken for coping with climate change and drought situations.
Hon Prof. Fauzia Khan appreciated that MKV student’s remarkable performance in JRF and other competitive examination. She appealed to MKV staffs to raise the standard of research and education to global level and also to make sincere efforts to raise Human Development Index of the district.
            Hon D.P.Sawant praised the development of MKV and stated that it is at par with universities of the multinational cities with respect to infrastructural facilities. He also applauded to increase in seed production of the MKV which is more demanded by the farmers. He mentioned that MKV’s irrigation project of Pigalagarh Nala work should be expanded and needed grant would be made available by the state government. Vice Chancellor Hon Dr K.P.Gore gave the gist of all activities carried out by MKV and its contributions for the uplift farming community.
Technical session for guiding on kharif seasonal crops, exhibition, demonstration, sale of university seeds etc events were included in the exhibition.  The dignitaries felicitated the 13 progressive farmer’s couples, who work was recognized at state level. Director of Extension Education Dr. A.S.Dhawan gave the welcome speech. Anchoring was done by Dr. Madhuri Kulkarni and Prof. A.P.Gutte. Dr. R.D.Ahire gave vote of thanks. Thousands of farmers from the various districts of the state took benefit of all technical sessions and exhibition.