व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातुन परीसर मुलाखती देताना विद्यार्थी व विभाग प्रमुख डॉ विलास पाटील |
मराठवाडा कृषि
विद्यापीठातील विद्यार्थी सल्ला व रोजगार केंद्राव्दारे नवी दिल्ली येथील वैश्य बॅके तर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातुन 40 विद्यार्थीच्या परिसर मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये समुहचर्चा,
वैयक्तीक मुलाखती घेउन त्यांची निवड करण्यात आली. यापैकी परभणी येथील कृषि
महाविद्यालयातील 3 तर लातुर येथील कृषि
महाविद्यालयातील 2 विद्यार्थीची निवड केली गेली. हे विद्यार्थी पहिल्या वर्षी
ट्रेनी म्हणुन तर नंतर त्यांना बॅकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणुन सामावुन घेतले
जाणार आहे. त्यांना प्रति वर्ष साधारणता
4 – 5 लाख रूपये पगार राहणार आहे. ही ऑन लार्इन मुलाखतीची कल्पना नवी दिल्ली
येथील वैश्य बॅकचे अध्यक्ष यांनी अमलात आणली त्यांना विभाग प्रमुख डॉ विलास
पाटील व विद्यार्थी सल्ला व रोजगार केंद्राचे सचिव डॉ महेश देशमुख यांनी मदत
केली. या ऑन लार्इन मुलाखती कार्यप्रणालीमूळे विद्यार्थी आणि बॅक यांचा वेळ व पैसा
याची बचत झाली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, शिक्षण संचालक
तथा अधिष्ठाता डॉ. विश्वासराव शिंदे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांनी विद्यार्थी, विभाग प्रमुख डॉ विलास पाटील व डॉ
महेश देश्मुख यांचे अभिनंदन केले.