वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील विस्तार शिक्षण
संचालनालय व कृषि कीटकशास्त्र विभाग यांनी मुख्य पिकांवरील कीड व्यवस्थापनाची
परिपूर्ण माहिती असलेले आयपीएम व्हीएनएमकेव्ही (IPM VNMKV) या अँड्राईड
मोबाईल ॲप्लीकेशनची निर्मिती केली आहे. या ॲप्लीकेशनचे लोकार्पण महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल
तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. चे. विद्यासागर राव व कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु
यांचे हस्ते दिनांक ११ फेबुवारी रोजी कृषि
महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मा श्री राजेश विटेकर, खासदार मा. श्री संजय जाधव, आमदार मा डॉ. राहुल पाटील, महापौर सौ. संगीता वडकर, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दागंट तसेच जिल्हाधिकारी
मा. श्री राहुल रंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारीणी परिषदेचे सन्माननीय
सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री रविंद्र देशमुख,
मा. श्री अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ.
अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव
श्री दिलीप कच्छवे आदिसह प्रगतशील शेतकरी, विविध
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात मोठ्या
प्रमाणात तरुण शेतकरी वर्ग असुन मोबाईल हे तरुण शेतकऱ्यांच्या जीवनाचा
अविभाज्य भाग बनला आहे. हे ओळखुन मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करुन कीड व्यवस्थापनाचे
तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु व विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्या
मार्गदर्शनाखाली कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांच्या साहाय्याने या ॲपची
निर्मीती केली. या मोबाईल
ॲपमध्ये कापूस, सोयाबीन, ऊस, ज्वारी, तूर, हरभरा, मूग, उडीद, बाजरी, मका, गहू, तीळ आदी प्रमुख पिकांवर
येणाऱ्या किडी, त्यांची ओळख
तसेच किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, किडींसाठी शिफारस केलेली नेमकी कीटकनाशके, त्यांचे प्रमाण
इत्यांदीची माहिती विस्तृतपणे छायाचित्रांसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे ॲप्लीकेशन ज्या
शेतकयाकडे इंटरनेटची
सुविधा उपलब्ध आहे, त्यांना गुगल प्लेस्टोअर वर IPM VNMKV
Parbhani सर्च केल्यास मोफत डाऊनलोड करता येईल. यानंतर
वेळोवेळी होणाया सुधारणा व
अधिक माहिती आपोआप अदयावत होईल.
सदरील अॅप्लिकेशन कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु व विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्या मार्गदशनाखाली लेखन, निर्मिती व संपादनासाठी प्रा. बी. व्ही. भेदे, डॉ. पी. आर. झंवर, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. दयानंद मोरे या शास्त्रज्ञांनी तसेच तांत्रिक मदतनीस श्री.विकास
खोबे, श्री.गणेश
शिवलाड, श्री. विकास
पावडे व श्री.पी.डी.बोकारे यांच्या सहकार्य केले. राज्यातील शेतकरी हा
स्मार्ट शेतकरी होण्यासाठी विद्यापीठाचा हा एक प्रयत्न आहे. यापूर्वी कृषि कीटकशास्त्र
विभागाने VNMKV Kapus ॲप विकसीत केले असून त्याचा फायदा मोठया प्रमाणात राज्यातील शेतकरी घेत
आहेत.