कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी
व तंत्रज्ञान महविद्यालयात दिनांक 19 फेब्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर डॉ
विठ्ठलराव घुले हे प्रमुख वक्ते होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ उदय खोडके म्हणाले
की, पाणी अडवा पाणी जिरवा व आदर्श शेतसारा पध्दत यासारख्या शेतक-यांना उपयुक्त योजना
शिवाजी महाराजांनी अमलात आणल्या. सामान्य जनता, महिला, शेतकरी व दुर्बल घटक कडे महाराजांनी विशेष लक्ष्य दिले. शिवाजी
महाराजाच्या काळातील विविध धोरणांचा अभ्यास तरुणांनी करावा, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विठ्ठलराव घुले मार्गदर्शन
करतांना म्हणाले की, छत्रपती उच्चतम
प्रशासक व सयंमी व्यक्तीमत्व होते. समाजातील प्रत्येक घटकांचा विचार ते करीत. कोणावरही
अन्याय व अत्याचार होणार नाही यासाठी महाराज विशेष लक्ष देत असत, सध्या राष्ट्रीय अखंडतेसाठी देशात सामाजिक एकोप्याचे प्रयत्न
मोठया प्रमाणात होत असुन छत्रपतीचे स्वराज्य हे आपल्या समोरील एक आदर्श आहेत, असे
प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिवाजी महाराज
यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थीनी जान्हवी जोशी, मनीषा बुलांगे,
अश्विनी कदम आणि कविता लाड यांनी स्वागतगीत गायिले. विद्यार्थ्यांनी
‘प्रतापगडाच्या
पायथ्याशी’ ही एकांकिका सादर केली. याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या
जीवनावर आधारित चित्रफित सुद्धा दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विध्यार्थी
श्री प्रशांत अटकळ व पाटीलबा खाडे यांनी
तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.विवेकानंद
भोसले, डॉ. स्मिता खोडके, प्रा. भास्कर भुईभार प्रा. हरीश आवारी, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, डॉ.गोपाल शिंदे, प्रा.संजय
पवार, प्रा.प्रमोदिनी मोरे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री.फाजगे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.