वनामकृविचे माननीय
कुलगुरूंच्या हस्ते शिंदे दाम्पत्यांचा सत्कार
शेती उत्पादन वाढ व
प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा अंगिकार व प्रसार करण्यासाठी केलेल्या उल्लेखनिय
कामगिरीबद्दल मानवत तालुक्यातील मौजे मानोली येथील सौ. सुनंदाताई
मदनराव शिंदे यांना जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार 2016 नुकताच
भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या तर्फे
जाहीर करण्यात आला असुन त्यानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
वतीने कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते शिंदे दाम्पत्यांचा दिनांक 11 जुलै रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, संशोधन उपसंचालक डॉ गजेंद्र
लोंढ, डॉ अशोक जाधव, डॉ डिंगाबर पेरके,
डॉ हिराकांत काळपांडे आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया
संख्येने उपस्थित होते.
या वेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मराठवाडयातील
अनेक शेतकरी तंत्रशुध्द शेती करून विविध पिकांचे चांगले उत्पादन घेतात, त्यांचे हे कार्य इतर शेतक-यापर्यंत पोहोचले पाहिजे,
त्यापासुन इतर शेतकरी प्रेरणा घेतील. यासाठी
अशा प्रगतशील शेतक-यांना सन्मानित करणे गरजेचे आहे. शिंदे दाम्पत्याचा कापसातील मानोली पटर्न मराठवाडयात प्रसिध्द आहे,
परंतु याचा प्रचार व प्रसार इतर राज्यातही झाला पाहिजे.
संशोधक संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर आपल्या भाषणात म्हणाले की, सौ. सुनंदाताई शिंदे या जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार प्रा़प्त झालेल्या मराठवाडयातील पहिल्याच महिला शेतकरी असुन कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात शिंदे दाम्पत्यांचे मोठे योगदान आहे. प्रगतशील शेतकरी श्री मदनमहाराज शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, शेतक-यांच्या श्रमाला विद्यापीठ तंत्रज्ञानाची जोड दिल्यास निश्चितच शेतीत भवितव्य आहे. विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतक-यांसाठी उपयुक्त असुन सदरिल पुरस्कार हा कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या तांत्रिक पाठबळाचे फलित असल्याचे मत व्यक्त केले.
संशोधक संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर आपल्या भाषणात म्हणाले की, सौ. सुनंदाताई शिंदे या जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार प्रा़प्त झालेल्या मराठवाडयातील पहिल्याच महिला शेतकरी असुन कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात शिंदे दाम्पत्यांचे मोठे योगदान आहे. प्रगतशील शेतकरी श्री मदनमहाराज शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, शेतक-यांच्या श्रमाला विद्यापीठ तंत्रज्ञानाची जोड दिल्यास निश्चितच शेतीत भवितव्य आहे. विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतक-यांसाठी उपयुक्त असुन सदरिल पुरस्कार हा कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या तांत्रिक पाठबळाचे फलित असल्याचे मत व्यक्त केले.
सौ सुनंदाताई शिंदे
यांना यापुर्वी राज्यपातळीवर ज्वारीचे विक्रमी उत्पादन काढल्याबद्दल महाराष्ट्राच्या
माननीय राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले आहे. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र, हैद्राबाद
येथील भारतीय भरडधान्य संशोधन संस्था व इक्रीसॅट यांच्या व्दारे निर्मित विविध
खरीप व रब्बी ज्वारीच्या सुधारीत वाणांचे बीजोत्पादन आदर्श लागवड
तंत्रज्ञानाने घेऊन ज्वारीच्या नवीन वाणांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शिंदे
दाम्पत्य गेल्या वीस वर्षापेक्षा जास्त काळापासुन प्रयत्नशील आहे. बीटी कपाशी लागवड पध्दतीचा मानोली पॅटर्न परिसरात प्रसिध्द असुन गाई,
म्हशी व शेळीपालन करून दुग्धव्यवसायचा जोडधंदासाठी
परिसरात चारा उपलब्ध करणे, विद्यापीठाव्दारे मानोली व
परिसरातील शेतक-यांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे,
महिला बचत गट चालवणे, परिसरात विहिर पुर्नभरण
कार्यक्रम राबविणे, शेततळे, गांडुळ खत,
विविध सुधारीत शेती यंत्राचा वापर आदी बाबत शिंदे दाम्पत्य
अग्रेसर आहेत. त्यांच्या या कार्याची पावती म्हणुन
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी सौ. सुनंदाताई शिंदे यांची या
पुरस्कारासाठी शिफारस केली होती. सदरिल पुरस्कार भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेच्या स्थापना दिनी 16 जुलै रोजी बंगलोर
येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित वितरीत केला जाणार आहे. सदरिल पुरस्कारात रू 50,000 रोख रक्कम या व्यतिरीक्त
सौ शिंदे यांना त्यांनी केलेल्या कार्याचे विस्तार कार्य इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी
रू. 50,000 प्रवास खर्च, प्रशस्तीपत्र
व सन्मानचिन्ह याचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले. सुत्रसंचालक श्री ऋषिकेश
औंधेकर यांनी केले तर आभार डॉ गजेंद्र लोंढे यांनी मानले.