वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक 28 जुलै रोजी विद्यापीठ खेळाडू व अधिकारी
- कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ.
बी. व्यंकटेश्वरलु हे होते तर शिक्षण संचालक
डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची प्रमुख
उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उपजत अनेक प्रतिभा कौशल्य असतात,
त्या प्रतिभांना सादरीकरणासाठी संधी देण्याची गरज असते, त्यासाठी विद्यापीठ व
महाविद्यालय स्तरावर मूलभुत क्रीडा सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे.
शिक्षण संचालक डॉ विलास
पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यापीठाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी क्रीडा व कला क्षेत्राचा विकास
करावा लागेल.
कार्यक्रमात विद्यापीठ
खेडाळु अपर्णा उजगरे हीने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सन 2016 – 17 मध्ये विविध खेळात
व कला प्रकार विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच अश्वमेध क्रीडा स्पर्धा
आयोजनात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांच्या हस्ते करण्यात आला.
हिस्सार येथील चौधरी
चरणसिंग हरियाणा कृषि विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठीय
क्रीडा स्पर्धेत मुलींचा व्हॉलीबॉल संघाने प्रथम स्थान प्राप्त केले, त्यात
सहभागी खेळाडु संजिवनी बारंगुळे, प्राजक्ता चौगुले, अर्पना उजगरे, जयश्री
भालेराव, शारदा चोपडे, रजनी टकले, प्रतिक्षा पवार, अश्लेशा क्षीरसागर, शितल पतंगे
आदींसह धावण्याच्या स्पर्धेत प्रथम स्थान पटकविलेला अरविंद जाधव व तिहेरी उडी
तृतीय स्थान पटकविलेला संजय लोहार यांचा सत्कार करण्यात आला. बिकानेर येथील
राजस्थान पशु व तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ
युवक महोत्सवात विद्यापीठाच्या समुह गीत गायनात विद्यापीठ संघाने चतुर्थ स्थान
पटकाविले, यात सहभागी विद्यार्थ्यी पवन चव्हाण, मृदुला पाटोळे, संतोष कुमार,
रेणुका शिंदे, वैदही शुक्ला, तुलसी बीस्ट आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच
विडंबन स्पर्धेत विद्यापीठाच्या संघाने चतुर्थ स्थान प्राप्त केले, त्यात
सहभागी आकाश डमरे, अतुल गाडे, दर्शनी जाधव, आदित्य पोखरकर, नितीन शिंदे, रोशन
ठाकुर आदीसह वादविवाद स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केलेला विद्यार्थ्यी रोहित
वेताळ यांचा सत्कार करण्यात आला. राजीव गांधी कृषी महाविद्यालयाचे प्रा डॉ
अभिजित कंडेरे यांना राज्य शासनाचा रासेयोचे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार
प्राप्त केल्याबाबत कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात विद्यार्थ्यी
कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी विद्यापीठाच्या क्रीडा व कला क्षेत्रातील योगदानाबाबतची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी
केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, अधिकारी, कर्मचारी,
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी डॉ डि एफ राठोड, प्रा जी ए गुलभिले,
प्रा शाहु चव्हाण आदीसह विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या
कर्मचा-यांना परिश्रम घेतले.