Monday, December 4, 2017

औरंगाबाद येथे जागतिक हवामान बदल व कृषि क्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञाचे आयोजन


चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आदी देशातील नामवंत शास्त्रज्ञांचा सहभाग मार्गदर्श


राष्ट्रीय अन्नसुरक्षेच्या दृष्टिने हवामान बदलाचे होणारे परिणाम हा आजच्या काळात महत्वाचा मुद्दा आहे. हवामान बदलाचा कृषि पाणी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असुन भारत देश हा देखील याला अपवाद नाही. अवकाळी पाऊस, पुर परिस्थिती, गारपीट, उष्णतेची लाट तसेच पावसाचे खंड हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्याचा अल्पभुधारक शेतक-यांच्या कृषि उत्पादनावर पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे नैसर्गिक साधनसामग्री जसे जमीन, पाणी वातावरण यांचाहास होऊन कृषि उत्पादनात घट हो असल्याचे वारंवार दिसुन येत आहे. अतिवृष्टीमुळे काही भागात जमिनीत वरचा सुपीक थर वाहुन जाऊन जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. काही भागात कमी पाऊस पडत असल्यामुळे धरणांमध्ये पाणी साठा कमी होत आहे, त्यामुळे सिंचनाचे क्षेञ कमी होत आहे. हवामान बदलामुळे पिकांवर किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या सर्व बाबींवर सखोल चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठे तथा जल भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल त्यांचे कृषि आणि जल क्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ दि. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत वाल्मी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आला आहे. चर्चासत्राच्या आयोजनाची तयारी मागील एक वर्षापासून सुरू असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे चर्चासत्राचे यजमानपद आहे. या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ प्रथमच आपल्या देशामध्ये आयोजीत करण्यात येत आहे.

या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नवी दिल्ली येथील  भारतीय कृषि अनुसंधान रिषदेचे माजी महा‍संचालक पदमभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा हे आहेत. आयोजन समितीचे अध्यक्ष कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु हे असुन सहअध्यक्ष राहुरी येथील हात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. तपस भटटाचार्य, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास भाले, औरंगाबाद येथील वाल्मीचे महासंचालक मा. श्री. एच. के. गोसावी हे आहेत. चर्चासत्राचे संयोजक वनामकृविचे संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे असुन सहसंयोजक मफुकृवि, राहुरीचे डॉ. सुनिल गोरंटीवार वाल्मी औरंगाबादचे डॉ. अविनाश गरुडकर आहेत तसेच आयोजन सचिव मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार हे आहेत. चर्चासत्राच्या आयोजनासाठी स्‍वतंत्र संकेतस्थ(www.ccaw2017.org) तयार करण्यात आले असुन त्या आजपर्यंत त्‍यास सुमारे २५,००० हुन अधिक शास्त्रज्ञांनी भेट दिली आहे.
या चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील नामवंत शास्त्रज्ञ सहभाग घेणार असुन मार्गदर्श करणार आहेत. आजपर्यंत देश विदेशातुन सुमारे ८०० हुन अधिक संशोधनपर निबंध प्राप्त झाले असुन ६०० हुन अधिक शास्‍त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
चर्चासत्राचे उदघाटन महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद येथील रुक्मिणी सभागृहात दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असुन उदघाटन कार्यक्रमास पदभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा, निती आयोगाचे मा. डॉ. रमेश चंद, चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू तसेच वाल्मीचे महासंचालक मा. श्री. गोसावी, महिकोचे अध्यक्ष श्री. राजु बारवाले यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्रा प्रामुख्याने हवामान बदल, कृषि क्षेत्रावर होणारे परिणाम, जल क्षेत्रावर होणारे परिणाम, मत्स्य पशु यावर होणारे परिणाम तसेच अल्पभुधारक शेतक-यांची हवामान बदलावर मात करण्याची उपाययोजना आदी आठ वेगवेगळया सत्रात विविध संशोधनपर निबंधाचे सादरीकरण होणार आहे. चर्चासत्रात यावर सखोल शास्त्रीय चर्चा होणार असुन हवामान बदलावर मात करून कृषि क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध नवनवीन तंञज्ञानाचा वापर करण्यासंबधी उपाययोजना सुचविल्या जातील त्याचा फायदा विविध शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक तसेच पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यासाठी होणार आहे. वाल्मी येथील संस्थेत तांत्रिक सत्राबरोबर हवामान बदलावर आधारीत उपकरणे, साहित्य विविध पुस्तकांचे तसेच अनेक कंपन्याचे दालन असलेले प्रदर्शन शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहे.  
चर्चासत्राचे सहआयोजक महिको, जालना असुन सहभागी संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, जैन इरीगेशन, जळगांव, भारतीय स्टेट बँक, महाबीज, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, टास नवी दिल्ली, विज्ञान अभियांत्रिकी मंडळ, नवी दिल्ली हे राहणार आहेत. अनेक खाजगी कंपन्या आणि विविध संस्था या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.