आहारतज्ञा डॉ रीता रघुवंशी यांचे स्वागत करतांना संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, प्रा विशाला पटणम, डॉ डी बी देवसरकर, डॉ अर्जना सिंग, डॉ विजया नलवडे आदी |
आहारतज्ञा डॉ रीता रघुवंशी मार्गदर्शन करतांना |
आजच्या अयोग्य जीवनशैलीमुळे मधुमेह,
हदयरोग, कॅन्सर, संधीवात या रोगांचे प्रमाणात वाढ होते आहे. देशात एका बाजुला
कुपोषण तर दुस-या बाजुस अतिरीक्त व अयोग्य आहारामुळे लठ्ठपणा अशा दोन्ही समस्या
भेडसवत आहे, असे प्रतिपादन पंतनगर येथील जे बी पंत कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठांतील
गृहविज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा आहारतज्ञा डॉ रिता रघुवंशी यांनी
केले.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘जीवनशैलीमुळे निर्माण होणा-या
रोगाच्या प्रतिबंधासाठी आहार’ याविषयावर गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि
महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत व्याख्यानात मार्गदर्शन करतांना
त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर होते तर बिकानेर येथील राजस्थान कृषि विद्यापीठाच्या गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ अर्जना सिंग, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी
अधिष्ठाता प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डि बी
देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ
रीता रघुवंशी पुढे म्हणाल्या की, संतुलित आहार व आदर्श जीवनशैलीमुळे अनेक
रोगांना आपण प्रतिबंध करु शकतो. यामध्ये दररोज तीस मिनीटे शारीरीक व्यायाम,
वजनावर नियंत्रण व संतुलित आहार ह्या महत्वाच्या बाबी आहेत. यावेळी त्यांनी
विविध जीवनसत्वाचा व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा रोग प्रतिबंधामध्ये असलेली
भुमिका स्पष्ट केली. टि. व्ही. पाहात जेवण करणे, रात्री उशीरा जेवण करणे, फास्ट
फुडचा वापर, व्यायामाचा अभाव ह्या अयोग्य जीवनशैली अनेक रोगास कारणीभुत आहे. वनस्पती
तुपात तयार केलेले पदार्थ आरोग्यास अत्यंत हाणीकारक असुन तिळ, शेंगदाणा,
सुर्यफुल, सोयाबीन या विविध तेलांचा संमिश्र वापर आहारात केला पाहिजे. जेवढे उष्मांक
आपण जेवणातुन घेतो, तेवढ्या उष्माकांचा वापर शरीराद्वारे झाला पाहिजे. मधुमेहामध्ये
मेथ्याचा वापर अत्यंत उपयुक्त असुन कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थाचा
वापर आहारात जास्तीत जास्त असला पाहिजे. जास्त रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी
मिठाचा आहारात प्रतिदिनी पाच ते सात ग्रॅम या प्रमाणात नगण्य वापर केला पाहिजे,
असा सल्ला त्यांनी दिला.
अध्यक्षीय
भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, भारत देश मधुमेहाची
राजधानी होत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवन पध्दती असुन लोकांमध्ये
आहाराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. ‘गृह विज्ञान आपल्या दारी’
या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण महिलांमध्ये याबाबत मार्गदर्शन होत आहे ही चांगली
बाब आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित
श्रोत्यांच्या शंकांचे समाधान डॉ. रीता रघुवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला पटणम यांनी केले तर प्रमुख वक्त्याचा परीचय डॉ
विजया नलवडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ आशा आर्या यांनी तर आभार
प्रदर्शन डॉ नाहीद खान यांनी केले. व्याख्यानास नागरीक, विद्यार्थी, प्राध्यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्येने उपस्थित होते.