भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहून दिनांक ४ डिसेंबर रोजी जालना, बीड, उस्मानाबाद,लातुर व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २७.० ते ३२.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान १३.० ते २१.० अंश सेल्सीअस राहील. वारा ताशी ४.० ते १२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१.० ते ८५.० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८.० ते ५१.० टक्के राहील.
विशेष सुचना - या आठवडयात आकाश ढगाळ राहून दिनांक ४ डिसेंबर रोजी जालना, बीड, उस्मानाबाद,लातुर व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्याची शक्यता आहे.
शेतकरी बांधवाना कृषि सल्ला
गहू
|
वेळेवर पेरणी केलेल्या गव्हाचे पिकास नत्राची दुसरी मात्रा दिली नसल्यास हेक्टरी ५० किलो देण्यात यावी. गव्हाची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत पुर्ण करावी. हेक्टरी १००-११० किलो बियाण्याचा वापर करावा. पेरणीपुर्वी बियाण्यास अॅझेटोबॅक्टर या जैविक खताची बिजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी परभणी ५१, लोक-१, त्र्यंबक या वाणाची निवड करावी.
| |
हरभरा
|
घाटे अळी
|
हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याचे नियंत्रणासाठी २० टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस २० मिली किंवा क्विनॉफलफॉस १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
|
तुर
|
पोखरणारी अळी
|
तुरीचे पिकात शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत आहे. त्याचे नियंत्रणाकरीता प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४० टक्के २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
|
उस
|
सुरू उसाचे लागवडीसाठी मध्यमकाळी व उत्तम पाण्याचा उत्तम निचरा होणा-या जमीनीची निवड करून पुर्व मशागतीचे कामे पुर्ण करून घ्यावीत. पुर्व हंगामी लागवड केलेल्या उसाची पिकात खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवावे.
| |
डाळिंब
|
आंबेबहार धरलेल्या डाळिंबाचे बागेत अंतरमशागतीची काम पुर्ण करून बाग स्वच्छ ठेवावी. खोडावर बोर्डोपेस्ट लावावे.
| |
संत्रा मोसंबी
|
संत्रा व मोसंबीचे बागेत अंतरमशागतीची कामे पुर्ण करून घ्यावीत.
| |
पेरू
|
पेरूच्या पक्व फळांची काढणी करावी. फळांची प्रतवारी करून विक्रीसाठी प्लास्टीकच्या कॅटरस मधुन बाजार पेठेत पाठवावी.
| |
कागदीलिंबु
|
आंबेबहार धरण्यासाठी कागदी लिंबाचे बागेस पाणी देणे बंद करावे. आळयात टाचन करून घ्यावी. खोडावर बोर्डोपेस्ट लावावे.
| |
भाजीपाला
|
कोबीवर्गीय पिकातील अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
| |
पशुधन व्यवस्थापन : लाळया खुरकुत रोगाचे लसीकरण करून घ्यावे.
|
सौजन्य
केंद्र प्रमुख
ग्रामिण कृषि मौसम सेवा
कृषि हवामानशास्त्र विभाग, व.ना.म.कृ.वि. परभणी
पञक क्रमांकः ६३ दिनांकः ०३.१२.२०१३