क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
क्रॉपसॅप प्रकल्पामुळे गेल्या चार-पाच वर्ष राज्यातील शेतक-यांना विविध पिकांतील कीड व रोगांचे व्यवस्थापन करतांना निश्चितच मोठा फायदा झाला असुन हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग व कृषि विद्यापीठे यांचा एक महत्वकांक्षी प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले.
ते महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) प्रकल्पांतर्गत दिनांक २७ व २८ जुन रोजी आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटना प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर, लातुरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अशोक किरनाळी, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, सदर प्रकल्पात राज्यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विभाग तसेच राष्ट्रीय स्तरावरील आठ संस्थाचा सुयोग्य सहभाग असलेला इतर राज्यांना अनुकरणीय प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी प्रती हेक्टरी केवळ सतरा रूपये खर्च करण्यात आला, पंरतु गेल्या चार-पाच वर्ष राज्यातील शेतक-यांना या प्रकल्पांतर्गत देण्यात आलेल्या योग्य सल्लामुळे विविध पिकांतील कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करण्यास मोठी मदत झाली आहे. यामुळे कृषि विभाग व कृषि विद्यापीठावरील शेतक-यांमध्ये विश्वासहर्ता वाढीस लागण्यास हातभार लाभला आहे. याधर्तीवर फळ व भाजीपाला पिकांसाठी हॉर्टीसॅप प्रकल्प राबविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. क्रॉपसॅप प्रकल्पात प्राप्त झालेल्या गेल्या चार-पाच वर्षातील आकडेवारीच्या आधारे हवामान अंदाजाप्रमाणे कीड-रोग पुर्व अनुमान यंत्रणा तयार करण्यात यावी म्हणजे भविष्यात शेतक-यांना अधिक फायदा होईल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांनी क्रॉपसॅप प्रकल्पाची माहिती देतांना सांगितले की, किड व रोगांचे सर्वेक्षकांकडुन ऑनलॉईन भरण्यात आलेल्या अहवालावर आधारीत माहितीचे विश्लेषण आठवडयातुन दोनदा कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते, त्याची माहिती कृषि विभागातील कर्मचा-यांव्दारे तसेच एस.एम.एस. सेवा व प्रसारमाध्यमाव्दारे वेळोवेळी शेतक-यांना दिली जाते. शेतक-यांना कीड व रोगांची ओळख होण्यास मदत होत असुन विनाकारण अयोग्य किटकनाशक न वापरता योग्य किटकनाशके वापरण्याचा सल्ला वेळेवर दिला जातो आहे. या प्रकल्पांर्गत कृषि कर्मचा-यासाठी प्रत्यक्ष शेतावर कीड रोगांची ओळख होण्यात येणा-या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभागाव्दारे दर्जेदार छायाचित्रे व उपयुक्त माहितीचा समावेश असलेली पुस्तके व घडीपत्रिका उपलब्ध करून दिल्या असुन प्रकल्पास राष्ट्रीय पातळीवरील सन 2012 चा ई-गर्व्हर्नस अवार्ड प्राप्त झाला आहे.
याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी तर आभार प्रदर्शन सेलु तालुका कृषि अधिकारी श्री. राम रोडगे यांनी केले. यावेळी कृषि विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस टी शिंदे, डॉ. श्रध्दा धुरगुडे, व्ही व्ही खोबे, एम.एस.भारती, टी.बी.धोपटे, कृषि विभागाचे आनंदराव आदींनी परिश्रम घेतले.
तांत्रिक सत्रात डॉ. के एस बेग, डॉ ए के गोरे, डॉ ए डी पांडागळे, डॉ पी आर झंवर, डॉ पवन ढोके, डॉ हरिहर कौसडीकर, डॉ डी जी हिंगोले, प्रा. बी. व्ही. भेदे, डॉ. ए. जी. बडगुजर आदी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण |
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. बी. भोसले |
मार्गदर्शन करतांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर |
उपस्थित कृषि विभागचे व वनामकृविचे अधिकारी व कर्मचारी |